वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

“अवकाशात गुरूत्वच नाही” हे असत्य आहे!

१९ प्रतिक्रिया

“अवकाशामध्ये ग्रॅव्हिटी (गुरूत्व/वजन ?) नाहीच!” हे वाक्य जर खरे असते, तर आजच्या अवकाशाची जागा, जी आपण अनुभवतोय, ती निराळी असती, अन त्यामुळे आपणसुद्धा असतो की नसतो, याबद्दलही शंका आहे.

अवकाशात गुरूत्वच नाही

“अवकाशात ग्रॅव्हिटीच नाही!” हे चुकीचे आहे, पण ही अशी चुकीची गोष्ट का सुरू झाली, त्यामागची गोष्टही खुप सोपी आहे. अंतराळ वीरांची अवकाशातील (किंवा पृथ्वीभोवतीच्या कक्षेमध्ये असतानाची किंवा चांद्रमोहिमेवर जातानाची) काही छायाचित्रे आणि चित्रफितीमध्ये असे दिसते की ते अंतराळवीर त्यांच्या अवकाश यानात किंवा अवकाश यानाच्या बाहेर (अवकाशात) मुक्त संचार करताना (तरंगताना) दिसतात. (पक्षी किंवा माश्यांप्रमाणे!) शिवाय १९५०-६० च्या दशकांतील काही पहिल्या-पहिल्या अंतराळवीरांनी, काही अंतराळ संशोधकांनी, अवकाशात शुन्य गुरूत्व (झिरो ग्रॅव्हिटी) असे मानून (गृहित धरून) चुकीची विधाने देण्यास सुरू केले होते.

गुरूत्व हे एक बल असते, वस्तूमान असलेल्या या विश्वातील कोणत्याही वस्तूकडून (दिसणारी किंवा स्पर्श करता येणारी) ते

निर्मित केले जाते. आपण नेहमी सुर्य, चंद्र आणि ग्रह (विशेषतः पृथ्वी) यांना वस्तू (दिसणारी किंवा स्पर्श करता येणारी) असे मानून त्यांना गुरूत्व आहे, पण तुम्ही आणि मी, आपल्यालाही काहीप्रमाणात वजन असतेच, त्यामुळे आपणाकडूनही काही

प्रमाणात गुरूत्वीय बल निर्माण केले जाते – यद्यपि ते जरी अतिशय कमी असले तरीही!

सर्वांना ज्ञात असलेला गणितज्ञ व शास्त्रज्ञ आयझॅक न्युटन (१६४३-१७२७) याने कसल्याही गुंतागुंतीच्या व भल्या-मोठ्या समीकरणांचा व सुत्रांचा आधार न घेता हे सिद्ध करून दाखवले होते की जसं-जसं दोन वस्तूंमधील (दिसणार्‍या किंवा स्पर्श करता येणार्‍या) भौतिक अंतर वाढत जाते, तसं-तसं त्यांच्यामधील गुरूत्वीय बलाची प्रखरता (प्रमाण?) कमी होत जाते. पण ते गुरूत्वीय बल कधीच संपत नाही, त्या वस्तूंमधील अंतर कितीही वाढले तरीसुद्धा…! खरे पाहता, पृथ्वीच्या बाह्यभागातील सुमारे १०० किलोमीटर्स पर्यंतच्या भागाचे कर्षण (pull, ओढ?) हे अजुनही ९७ टक्के मजबूत (?) आहे जसे की पृथ्वीवरील सागराच्या तळाचे कर्षण बल सध्या आहे.

आता आपण एक उदाहरण पाहूया, सुर्याचे बुध ग्रहाशी (आपल्या सुर्यमालेतील सुर्याला सर्वांत जवळचा ग्रह) असलेले गुरूत्वाकर्षण हे शुक्र, पृथ्वी, मंगळ तसेच इतर ग्रहांपेक्षा अधिक मजबूत आहे. (बहुतेक यामुळेच बुध सुर्याभोवती इतर ग्रहांच्या तुलनेने अतिशय वेगाने परिक्रमा करत असेल, जर तो पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या परिक्रमण गतीसारखीच गती राखून परिक्रमण करायला लागला तर सुर्य त्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. 😛 ) त्याचप्रमाणे, पृथ्वीचे गुरूत्व चंद्राला २७.३ दिवसांत स्वतःभोवती परिक्रमा करण्यास भाग पाडत असते (ते नॅचरल आहे, आपण त्यात काय करणार!), आणि आपल्या सर्वात मोठा ग्रह (आकारमानाने) गुरूही ६० चंद्र स्वतःभोवती फिरवतो, याच गुरूत्वामुळे!

यावरूनव तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, जर अवकाशात गुरूत्व ही गोष्ट आहे, तर का मग ते अंतराळवीर अवकाशात तरंगतांना दिसतात? त्यामागे एक अत्यंत महत्वाचे कारण आहे, ते असे, की अवकाशातील प्रत्येक वस्तू (दिसणारी किंवा स्पर्श करता येणारी) ही कायम फ्री-फॉलच्या (अधोगतीच्या?) स्थितीमध्ये असते. ही “फ्री-फॉल” गोष्ट, त्वरणरहित (without acceleration) चलनाच्या (motion) स्थितीचे वर्णन करते, जे चलन गुरुत्वाशिवाय इतर काही कारणांमुळे निर्माण झालेले असते. याच प्रकारची एक गोष्ट आपण काही जणांनी अनुभवलेली असेल, ती म्हणजे जेव्हा आपण उद्वाहकातून (lift) अतिशय वेगाने वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर येत असतो, त्यावेळी सुद्धा आपल्या हातात असलेली एखादी पिशवी आणि आपले वजन अगदी शुन्य असल्यासारखा आपल्याला भास होतो… तेथेही वरीलप्रमाणेच स्थिती निर्माण असते.

अन् आता एक शेवटची गोष्ट जाणून घ्या, जर का अवकाशात गुरूत्वच (gravity) नसेल, तर हवामान, संपर्क-साधने, उपग्रहे (कृत्रिम,प्राकृतिक) पृथ्वीभोवती फिरणारच नाहीत, पृथ्वीही सुर्याभोवती फिरणार नाही, आणि आपला सुर्यतारा सुद्धा आपल्या आकाशगंगेच्या मध्यान्हाभोवती परिक्रमा करणार नाही. वास्तविक पाहता यामुळे होईल काय, अवकाशातील सर्वकाही एका रेषेत येतील, आणि त्यावेळी जी अराजकता निर्माण होईल, ती अतिशय वेगळी असेल, जीचा विचारही आपण सध्या करू शकणार नाहीत. पण काळजी करू नका, अवकाशामध्ये गुरुत्व आहे, अन त्यामुळेच असं काहीही होणार नाही…

याविषयी काही प्रश्न, शंका, शिल्लकची माहिती आहे?

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. छान माहीती,
  अवकाशात गुरुत्व आहेच, म्हणुन तर उपग्रहाना कक्षेत राहण्यासाठी वारंवार इजींन फायर करुन करेक्षन करत रहावे लागते.

 2. पण वजन शुन्य होते हे ही तितकच खर आहे

 3. je lihila ahe te akadam barobar ahe. Avakashat Gurutvakarshan ahe fakt te apalyala janavat nahi karamn te pruthvichya tulanet mojata yenar nahi. Pratyek graha/tara aka vishisht kakshet firato hech sangate ki te kuthalya tari karshanachya under ahet.

  Lekh vachun chan vatala..!!

  • नेहा,

   हो, न्युटन ने सांगितलेल्या गुरूत्वकर्षणाच्या नियमाप्रमाणे किमान दोन वस्तूंमध्ये (ज्या दृश्य आहेत, ज्यांना वस्तूमान आहे,आणि ज्या जाणवता येतात अशा!) कर्षण (ओढ) असतेच, जर त्या समान वस्तूमानाच्या असतील, त्यांच्या वस्तूमानामध्ये अवाढव्य अंतर असेल तर त्यांच्या एकमेकांशी असलेले कर्षण गणिती नियमाद्वारे कमी-जास्त असल्याचे सांगता येते.

   प्रतिसाद नोंदविल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!

 4. mast re, ekdam awadale, mala tar ha navinach gosht samajali,
  thanks yaar, ya khup mahatwachya mahiti baddal 🙂

 5. जालन्दर बनकर म्हणतात:

  विशाल, मी तुमचे इथे लिहिलेले सर्व लेख वाचले आहेत.सायन्स वर असेच सोप्या भाशेत लिखाण करा.इन्ग्रजीमध्ये लिहिलेल्या सर्व सन्कल्पना मला समजतातच असे नाही.तुमचे लिखान मात्र समजण्यास सोपे वाटले.लोकसत्तात सुध्दा असे लिखान असते.तुम्ही इथला हा उपक्रम नियमित चालु द्या.आम्ही त्याचे स्वागतच करु.त्यायोगे आम्हाला नविन माहिती मिळत जाईल.धन्यवाद.

  • जालंदर जी,

   आपल्या सारख्या जिज्ञासू वाचकांचा जर असाच अमूल्य प्रतिसाद मिळत राहिला तर नक्कीच माझे बारा वाजतील (?) 😛 . असो, मी कसलीही अपेक्षा न ठेवता, आवड म्हणून असे लिखान नक्कीच चालू ठेविन, आपले आशिर्वाद नेहमी असेच माझ्या पाठीशी असू द्यात.

   आपले मनःपूर्वक आभार!

   • जालन्दर बनकर म्हणतात:

    बारा वगैरे काही वाजणार नाहित.आमच्या सारख्यान्च्या माहितीमध्ये मात्र भरपुर भर पडनार आहे.मी काही तुमच्या इतका शिकलो नाही पण तुमच्या सारख्या मित्रान्च्या सन्गतित राहुन काही शिकायचा प्रयत्न करतो आहे.माझ्या एका मित्राने मला “आकाशासी जडले नाते”हे पुस्तक वाचायला दिले.(पनवेल ते पाकिस्तान असा सायकलवरुन प्रवास करणारा धनन्जय मदन,निसर्गमित्र पनवेल या सन्स्थेचा सन्स्थापक सदस्य.)तेव्हा पासुन अवकाशासम्बधी जे मिळेल ते वाचतो.बरिच पुस्तके विकतही घेतो.धन्यवाद.

 6. bhartat uttam awkashacha abhyas karnyashati kont college aahe aani tethe kiti takkela entry aasate most of mumbai or nashik in maharashtra

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME