वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आंतरजाल (Internet) – भाग २

४ प्रतिक्रिया
Internet

आंतरजाल (माहितीजाल)

१) मोडेमः
मोडेम (MODEM) हा शब्द MOdulator आणि DEModulator यांचे मिळून संक्षिप्त रुप आहे. सामान्यतः मोडेम हे एक रूपांतरक (converter) आहे, जे डिजिटल माहिती (द्विमान अंकीय पद्धतीतील १ व ० यांनी बनलेली) ध्वनीच्या तरंगांमध्ये रूपातंरीत करण्याचे काम करते. ही रूपांतरीत केलेली माहिती (data) नंतर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या आधारे एका आदर्श स्टॅंडर्ड (टेलि)फोन लाईनद्वारे जगात कुठेही पाठवली जाते. हीच रूपांतरीत केलेली माहिती परत डिजीटल माहितीत (संगणकाला कळण्यासाठी) रूपांतरीत करण्यासाठी दुसर्‍या एका मोडेमचा वापर केला जातो. सारांश पाहता, मोड्युलेटर हे डिजिटल माहिती ध्वनी तरंगांत रूपांतरीत करते तर डीमोड्युलेटर हे ध्वनी तरंगांना रूपांतरीत करून त्यांना डिजिटल माहितीमध्ये पुरविण्याचे काम करते. प्रत्येक मोडेम मध्ये ह्या दोन्ही प्रणाली बसविलेल्या असतात, त्यामुळे तुमच्या संगणकावर माहितीचे आदान-प्रदान होण्यास अडचणी येत नाहीत.
आजच्या स्थितीत, मोडेम्स ५६ किलो बिट्स प्रति सेकंद (Kbps) पासून काहीएक Gbps पर्यंतच्या गतीने संवाद साधू शकण्यास समर्थ आहेत.
आजचे मोडेम्स v.92 ही स्टॅण्डर्ड (मानक/प्रमाणित?) आवृत्ती वापरतात.
तुम्ही जेव्हा मोडेम्सचा वापर करुन आंतरजालावर जोडण्यासाठी डायल करता, त्यावेळी तुम्हाला काही कर्कश आणि विनोदी आवाज येत असतील. हे आवाज येण्यामागचे कारण म्हणजे तेव्हा तुमच्या मोडेमची आणि दुसर्‍या एन्डच्या मोडेमची (ज्याच्याशी तुम्ही संवाद साधू इच्छित आहात) हातमिळवणी (handshake) चालू असते. या हातमिळवणीच्या प्रक्रियेमध्ये दोन्ही मोडेम्स त्यांच्यामध्ये सर्वांत जास्त किती वेगाने माहिती वहन होऊ शकते याची तपास्णी केली जाते व त्यानंतरच तुम्ही एकमेकांना जोडले जातात.
मोडेम्सच्या जुळणीसाठी प्रमाणित फोन लाईनवर संवाद साधण्यासाठी काही इतर प्रणाल्यांचाही वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्या म्हणजे, ISDN (Integrated Services Digital Network) लाईन १२८Kbps या गतीने तर DSLs (Digital Subscriber Lines) १Mbps पेक्षा जास्त गतीने सहज माहितीचे वहन करू शकतात.

केबल मोडेमः केबल मोडेम हे तुमची केबल लाईन वापरून तुम्हाला अतिशय वेगवान गतीने आंतरजाल ऍक्सेस पुरविते. डायल-अप पेक्षा केबलचा वापर केल्याने बर्‍याच वेगवान गतीने तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करू शकता. सामान्यतः, डायल-अप्स हे ५६Kbps या सर्वोत्तम गतीने चालतात, तर केबलद्वारे १.५Kbps पेक्षा जास्त गतीने तुम्ही ऍक्सेस करू शकता, ह्म्म हे सर्व तुमच्या आंतरजाल सुविधा पुरविणार्‍याने (ISP) तुम्हाला देऊ केलेल्या बॅंडविड्थ वर अवलंबून असते. केबल मोडेम्स हे तुमच्या संगणकाच्या लॅन कार्ड मध्ये जोडले (प्लग) जातात.

२) वाय-फायः
वाय-फाय (WiFi) हे Wireless Fidelity याचे संक्षिप्त रुप आहे. बिनतारी लॅन्स (WLAN) वाय-फाय वापरतात. वाय-फाय हा एक प्रमाणित नियमांचा संच आहे. मोठाल्या संस्थांमध्ये तारीय (wired) लॅन्सना पर्यायी सुविधा म्हणून WiFi चा वापर करतात. काही नविन लॅपटॉप आणि मोबाईल उपकरणे बनविणारे निर्माते आता त्यांच्या नविन उत्पादनांमध्ये वाय-फाय सुविधा वापरण्यासाठीचे पर्याय देत आहेत. वाय-फाय कार्ड्स द्वारे डेस्कटॉप संगणकांना WLANs ना जोडता येते, त्यासाठी मुख्य स्थळाचा ऍक्सेस पॉईण्ट वापरला जातो. हाच ऍक्सेस पॉईण्ट तारीय लॅनमध्येही वापरला जातो, त्यामुळे अगदी सुरळीतपणे बिनतारी व तारीय लॅन्सद्वारे जोडलेली उपकरणे एकमेकांशी संवाद साधू शकतात, यासाठी CSMA/CA या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. सध्याचे \”802.11g\” हे प्रमाणन ५४Mbps या गतीने संवाद साधण्यास समर्थ आहे. WLANs द्वारे व्यापल्या जाणार्‍या जागांना “हॉट स्पॉट्स” म्हणतात.

३) नेटवर्क इंटरफेस कार्ड (NIC):
नेटवर्क इंटरफेस कार्ड हे उपलब्ध नेटवर्कचा विस्तार करण्यासाठीचे कार्ड असते, ज्याद्वारे एखादे संगणक एखाद्या नेटवर्कवर किंवा दुसर्‍या एखाद्या संगणकाशी जोडता येते. NICs हे विशेषकरून एखाद्या नेटवर्क, प्रोटोकॉल किंवा माध्यमासाठी बनवले जातात. बाजारात आज अनेक कामे एकाच वेळी करणारी मल्टी फंक्शनल कार्ड्स उपलब्ध आहेत. काही संगणकांचा एखादा समुह जर एकमेकांना जोडला गेलेला असेल तर त्या समुहाला लॅन (Local Area Network) असे म्हणतात. अशा लॅन्सवर काही प्रोटोकॉल्सचा (उदा. इथरनेट किंवा टोकन रिंग) वापर करून माहितीची नियमीत देवाण-घेवाण केली जाते. मुलतः NICs हे अशा नेटवर्क्स वर पुर्ण वेळ जोडणी राहावी यासाठी बनवले जातात.

४) इथरनेट (Ethernet):
Xerox, Intel आणि DEC यांनी मिळून सन १९७६ मध्ये हे लॅन मानक (स्टॅण्डर्ड) तयार केले. संगणकांना जोडण्यासाठी ह्या मानकाची लोकप्रियता सर्वात जास्त आहे. यामध्ये ट्री, स्टार आणि बस या मुख्य तीन टोपोलॉजींचा संगणक जोडण्यांसाठी वापर होतो. सामान्य इथरनेट १०Mbps या गतीने माहिती वहन करू शकते. मागील काही वर्षांमध्ये १०/१०० इथरनेट उपलब्ध करण्यात आले, ज्याद्वारे १००Mbps गतीने माहिती वहन होऊ शकेल. या प्रणालीमध्ये को-ऍक्सियल (उदा. टिव्ही केबल वायरसारखे) आणि ट्विस्टेड पेयर केबल्सचा, नेटवर्कवरील संगणकांना जोडण्यासाठी वापर केला जातो; बिनतारी माध्यमेही जोडली जाण्याची सोय यात असते. इथरनेट प्रणाली आजच्या बहुतेक सर्व संगणकांवर सुरळितपणे चालते, संगणकावर ही प्रणाली स्थापित करण्यासाठी फक्त एक इथरनेट चिप आणि एक ३२ बिट डेटा लाईनची गरज पडते. सध्या एक नविन आवृत्ती येत आहे, गिगाबिट इथरनेट, याद्वारे सुमारे १Gbps या गतीने माहिती वहन होऊ शकेल व त्यासाठी ६४ बिट डेटा जोडणीची आवश्यकता असेल. नेटवर्क्स जोडणीतील ही एक अतिशय महत्वपूर्ण प्रणाली आहे.

५) Ping:
पिंग हे साधन बहुतेक नेटवर्क प्रशासकांकडून वापरले जाते. पिंगचा वापर मुख्यत्वे, नेटवर्कवरील जोडलेले एखादे उपकरण किंवा प्रणाली योग्य काम करीत आहे की नाही हे तपासण्यासाठी केला जातो. पिंग प्रणाली ही नेटवर्कवरील विशिष्ट उपकरण किंवा इतर संगणक्क किंवा प्रणालीला एक पॅकेट माहिती पाठवते आणि प्रत्युत्तराची वाट पाहते. त्या एक पॅकेट माहितीमध्ये ६४ बाइट्स (१ बाइट = ८ बिट) असतात; ५६ बाइट्स मध्ये सर्वसाधारण माहिती तर उरलेल्या ८ बाइट्समध्ये प्रोटोकॉल संदर्भात महत्वपूर्ण माहिती असते. जेव्हा पिंग केल्यानंतर प्रत्युत्तर मिळते, तेव्हा इच्छित जोडणी व्यवस्थितरीत्या काम करीत आहे, अशी खात्री केली जाते. पिंग ही प्रणाली ICMP (Internet Control Message Protocol) यावर आधारित आहे आणि IP (Internet Protocol) किंवा ICMP ECHO_REQUEST व ECHO_REPLY पॅकेट्सचा वापर करते.

संबंधित लेखन

 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • आंतरजाल (Internet) – भाग १

  तंत्रज्ञान शाखेचा आवाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेतील व्यक्तीला तंत्रज्…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME