वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

उखाणे

१९ प्रतिक्रिया

अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/ घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असे.
– मराठी विकि वरुन

१) कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर …… रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
२) प्रेमरूपी कादंबरी प्रेमाने वाचते ……. रावांच्या जीवनातील फुले आनंदाने वेचते.
३) नदीच्या काठी कृष्ण वाजीवतो बासरी ……. रावांच्या जीवावर मी आहे सुखी सासरी .
४) सत्यवानाच्या सुटकेसाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा …… रावांची सेवा घडो हीच माझी इच्छा.
५) चमकती बिजली निलवाणी आकाशात …….. रावांचे नाव घेते सौभाग्याच्या प्रकाशात.
६) मंगलअष्टका झाल्या,अंतरपाट झाला दूर …….. रावांची सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर.
७) नदीकाठी ताजमहालाची सावली ……. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली.
८) इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून ……… ची मी आहे …….. ची सून.
९) सुवर्णाची अंगठी,रुप्याचे पैंजण …….. चे नाव घेते ऐका सारेजण.
१०) उगवला चंद्र मावळला शशी …….. चे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी.
११) मला नको हिरे,माणके, नको आकाशातील तारे ……… हेच माझे अलंकार खरे.
१२) भावंडांचा सहवास, आई वडिलांचा आशीर्वाद ………. रावांचे नाव घेताना तुमचेही लाभो आशीर्वाद.

संबंधित लेखन

 • सप्तपदी
  सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटां…
 • गोंधळ
  विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा …
 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • ११८ वर्षांची गणेशोत्सव परंपरा………….
  दगडूशेठ च्या शतकातील तीनही मूर्तींचे आजही विधिवत पूजन
   
  श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केले…
PG

विक्रम घाटगे

आपण कधी कधी असे काहीतरी वाचतो जे मनाचा ठाव घेऊन जाते, विचार करावयाला लावते. स्वतःकडे, या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवण्यास भाग पाडते. असे काही मी वाचलेले आपल्यासारख्या वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावे म्हणून मी “जीवनमूल्य “ या ब्लॉगवर लिहितो. जय हिंद, जय महाराष्ट्र!

 1. विक्रांत सगळेच मुलींनी घ्यायचे उखाणे आहेत…मुलांचं काय???

 2. @अपर्णा
  अगोदर मुलीच नाव घेतात सहसा म्हणून अगोदर मुलीनी म्हणायचे उखाणे दिले आहेत 😉
  आणि हो मी विक्रम बर का विक्रांत साहेब दुसरे आहेत 😉

  @पंक्या
  मुलांनी जरा कळ काढावी त्यांच्यासाठीही उखाणे लवकरच येत आहेत 🙂

 3. मुलांनी दिलेल्या उखाण्यांत योग्य तो बदल करावा.
  उदा. कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर …… रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
  –> कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर …… ला दिला मी सौभाग्याचा आहेर.
  🙂

 4. vikram, tujhe jar lagin jhale asel tar tu ghetlele ukhane lih ,mhanje ammala hi te ukhane upyogi padtil. ok….!! jai maharashtra

 5. मुलांसाठीचे उखाणे उद्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो मी 🙂
  तसेही मला गरज आहेच त्याची लवकरच 😉

 6. JAY MAHARASHTRA VIKRAM,

  KHARACH TU PATHAVALELE SAGLE UKHANE PHAAR CHHAAN AAHE… PAN MULANSATHI ASALELE UKHANE PATHAV KI LAVAKAR…. NAMASKAR….

 7. Ram-Ram vikramrav sarv mulisatich ukhane patvale tumirav jara mulastipan patava rav
  Namskar yeto mag Aammi patil

 8. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
  लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…
  ***रावांची थोरवी मी सांगत नाही
  कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
  इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
  **** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
  सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
  ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून
  पावाबरोबर खाल्ले अमूल बटर…
  ***चे नाव घ्यायला अडलय माझ …

 9. Pachpaulila Chalalo hoto, khandyawar ghongadi chatyapattyachi,
  Tumacha maan theun nav gheto, …. Mazya eka Rattyachi.

 10. आजकालच्या नववधुंसाठी अत्यंत उपयुक्त !

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME