वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

उबुन्टू १०.०४ मध्ये iBus द्वारे देवनागरीत टंकलेखन

३१ प्रतिक्रिया

बर्‍याच जणांनी काही दिवसांपूर्वी  प्रकाशित केलेल्या “उबुन्टू १०.०४” लेखाला भरभरून प्रतिसाद दिला व काहींनी ते इन्स्टॉलसुद्धा केले. पण अनेकांना विन्डोज वरील बराहा सारख्या IME पद्धती वापरायची सवय असल्याने उबुन्टू १०.०४ वर मराठीत टंकलेखन करणे अवघड जात होते. त्यामुळेच या लेखात उबुन्टू १०.०४ मध्ये मराठी अगदी सहजतेने कशी टाईप करता येईल, याकरिता आवश्यक ठिकाणी वेगवेगळे स्क्रीनशॉट्स जोडून सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. एक सुचना आहे, फक्त उबुन्टू १०.०४ साठीच हा लेख आहे, असा गैरसमज मुळीच करून घेऊ नये, कारण यातील पद्धती बहुतेक जुन्या उबुन्टू आवृत्त्यांमध्ये मध्ये अगदी योग्य रितीने काम करतील आणि इतर लिनक्स फ्लेवर्स वरही तुम्ही या लेखातील माहितीचा उपयोग करू शकता.

उबुन्टू मध्ये ९.०१ व १०.०४ आवृत्त्यांमध्ये iBus ही डिफॉल्ट IME  पद्धत अवलंबली गेली असल्या कारणाने या लेखात मी iBus द्वारे मराठी कसे टाईप करावे ते सांगणार आहे. पुर्वीच्या उबुन्टू फ्लेवर्स मध्ये SCIM IME चा अंतर्भाव होता, पण त्यामध्ये देखील iBus प्रमाणेच सेटअप करता येईल. तुमच्याकडे कुठलेच IME सॉफ्टवेअर इन्स्टॉल नसेल तर ibus, scim, xcin, gcin, uim, iimf, xim, ipa, inuktitut इत्यादींपैकी तुमच्या आवडीनुसार पॅकेज इन्स्टॉल करावे, iBus किंवा SCIM माझ्या मते वापरायला अगदी सोप्या आहेत.

iBus मध्ये फोनेटिक, इन्स्क्रिप्ट आणि आयट्रान्स या पद्धती आधीपासूनच उपलब्ध आहेत, त्यांपैकी तुमच्या आवडीची कशी निवडायची ते जरा पुढे आहे… पण ज्यांना विन्डोज वर बराहा ची सवय होती, त्यांनी लगेच खालच्या ओळीपासून अनुसरण करण्यास सुरूवात करावी.

 • ज्यांना बराहा सारखी पद्धत हवी आहे, त्यांनी येथून पुढे सुरूवात करावी!

॑» खात्री करा की तुम्ही तुमच्या उबुन्टू १०.०४ वर आहात.

» खालील दुव्यावर क्लिक करा व एक फाइल डाउनलोड होईल, तीला तुमच्या डेस्कटॉप वर सेव्ह करा, कारण यापुढील पायर्‍या त्या अनुषंगानेच पार केल्या जातील.

दुवा: hi-baraha.mim फाइल डाउनलोड करा.

» वरील hi-baraha.mim ही एक किमॅप माइम फाइल आहे, ज्यामध्ये तुमच्या किबोर्डवरील कोणती कळ दाबल्यास काय उमटेल, हे लिहिलेले असते. तुम्हाला त्याबाबतील खोलवर माहिती असल्याशिवाय ती फाइल एडिट करू नका.

» आता डेस्कटॉपवर साठवलेली ही फाइल आपण /usr/share/m17n या डिरेक्टरी मध्ये कॉपी करू, कारण सर्व किमॅप फाइल्स तेथेच साठवलेल्या असतात.
खालील कमांड्स दिलेल्या सुचनांनुसार एक्जिक्युट करा.
» कमांड्स एक्जिक्युट करण्यासाठी Applications -> Accessories -> Terminal उघडा किंवा ctrl+alt+t दाबून टर्मिनल उघडा.

१) तुम्हाला रूट युजरचे अधिकार असण्यासाठी खालील कमांड टाईप करा.॒

sudo -i


यानंतर एन्टर की हिट करून तुमचे पासवर्ड टाका, ते दिसणार नाही, त्यामुळे काळजीपुर्वक टाइप करा. आता तुम्ही रूट म्हणून तुमच्या उबुन्टू संगणकावर लॉग-इन झालेला आहात.
२) तुम्ही वरील hi-baraha.mim ही फाइल डेस्कटॉपवर व्यवस्थित डाउनलोड केलेली आहे की नाही, हे तपासण्यासाठी आता खालील कमांड एक्जिक्युट करा.॑

ls /home/username/Desktop/hi-baraha.mim


येथे username च्या ऐवजी तुमचे युजरनेम टाकायला मात्र विसरू नका! वरील कमांड एक्जिक्युट केल्यावर तुम्हाला लगेच खालच्या ओळीत /home/username/Desktop/hi-baraha.mim असे दिसेल, याचा अर्थ तुमची ती फाइल सध्या डेस्क्टॉप वर जतन आहे. जर तसे नसेल, तर पुन्हा एकदा ती फाइल डाउनलोड करून डेस्कटॉपवर जतन करा.
३) आता ह्या फाइलला आपण /usr/share/m17n या डिरेक्टरीमध्ये कॉपी करणार आहोत, त्यासाठी खालील कमांड व्यवस्थित एक्जिक्युट करा. (कॉपी-पेस्ट करणंच सोयिस्कर!)

cp /home/username/Desktop/hi-baraha.mim /usr/share/m17n


येथे username च्या ऐवजी तुमचे युजरनेम टाकायला मात्र विसरू नका! ही कमांड एक्जिक्युट केल्यानंतर फाइल कॉपी झाली की नाही हे दिसणार नाही. त्यासाठी पुढील पायरी पाहा.
४) वरील कमांडद्वारे आपण डेस्कटॉपवर असलेली hi-baraha.mim ही फाइल /usr/share/m17n या डिरेक्टरीमध्ये कॉपी केली. ती कॉपी झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील कमांड एक्जिक्युट करा.

ls /usr/share/m17n/hi-baraha.mim


याचे आउटपुट खालच्या ओळीवर /usr/share/m17n/hi-baraha.mim असे दिसेल, याचा अर्थ तुम्ही यशस्वीरित्या ती फाइल /usr/share/m17n डिरेक्टरी मध्ये कॉपी केली आहे.

» वरील सर्व कमांड मी कशा एक्जिक्युट केल्या ते पाहण्यासाठी खालील स्क्रीनशॉट बघा.

hi-baraha.mim फाइल m17n डिरेक्टरीमध्ये कॉपी करणे

hi-baraha.mim फाइल m17n डिरेक्टरीमध्ये कॉपी करणे

 • ज्यांना बराहा पद्धत आवडत नसेल, त्यांनी यापुढील पायर्‍यांचा अवलंब करावा! (बराहा पद्धत हवी असलेल्यांनी लेखाच्या शेवटपर्यंतच्या सर्व पायर्‍या पार पाडाव्यात.)

» आता आपण iBus मध्ये सेटअप करूया.

menu_iBus_preferences

iBus Preferences मेन्यू निवडा.

» तुमच्या संगणकाच्या वरच्या पॅनेलमधील System -> Preferences मेन्यु मध्ये जाऊन iBus Preferences निवडा.  (वरील स्क्रीनशॉट बघा.)

» त्यानंतर खालीलप्रमाणे एक विन्डो उघडेल (General टॅब).

IBus Preferences_003

iBus Preferences विन्डो

» वरील स्क्रीनशॉटमध्ये दर्शवल्याप्रमाणे ते लाल चौकटीने दर्शवलेले बटन क्लिक करा आणि इतर दिसत असलेले बदल देखील तुमच्या संगणकावर वापरा. बटन क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे त्यात अजुन एक विन्डो उघडेल.

IBus Preferences_004

input method टॉगल करण्यासाठी कीज जोडणे.

» वरील स्क्रीनशॉटमध्ये हिरव्या चौकटीने दर्शवलेले बटन क्लिक करा, त्यानंतर खालीलप्रमाणे आणखी एक विन्डो उघडेल.

IBus Preferences_005

input method टॉगल करण्यासाठी कीज जोडणे

» वरील स्क्रीनशॉटमध्ये दिसत असल्याप्रमाणे input methods (उदा. इंग्रजी आणि मराठी) बदलण्यासाठी काही शॉर्टकट कीज तुम्हाला सेट करता येतात. मला बराहा IME ची सवय असल्यामुळे मी F११ व F१२ ह्या फंक्शन कीज सेट केल्या आहेत. तुम्हाला ज्या सोप्या वाटतील त्या सेट करा. कॉम्बिनेशन किज सुद्धा सेट करता येतात.

» हे झालं General टॅब मधलं… आता आपण input methods सिलेक्ट करू… त्यासाठी iBus Preferences या विन्डोमधील Input Method ही टॅब निवडा. खालील स्क्रीनशॉटप्रमाणे ती दिसेल.

IBus Preferences_007

नविन input method जोडणे

» वरील विन्डोतील Select an input method हा ड्रॉप डाउन मेन्यू सिलेक्ट करा व खालीलप्रमाणे तुम्हाला हवी असलेली कोणतीही input method भाषा निवडा. खालील चित्रांमध्ये मराठी भाषेतील itrans ही पद्धत आणि हिंदी भाषेतील baraha ही पद्धत जोडतांना दर्शवली आहे.

Screenshot-IBus Preferences_marathi_itrans

मराठी-itrans पद्धत

» किंवा Hindi मेन्य़ुमधील baraha हा पर्याय निवडावा. (बराहाची सवय असणार्‍यांनी हा पर्याय निवडावा, पण त्यासाठी या लेखाच्या पूर्वार्धात सांगितलेल्या सुचना पार पाडलेल्या असाव्यात, नाहीतर हा पर्याय दिसणार नाही.)

Screenshot-IBus Preferences_hindi_baraha

बराहा input method

» उदाहरणार्थ मी बराहा पद्धत निवडली (खालील स्क्रीनशॉट बघा.)

IBus Preferences_009

input method निवडणे

» वरील स्क्रीनशॉटमध्ये दर्शवल्याप्रमाणे, तुम्हाला हवी असलेली input method निवडल्यानंतर Add हे बटन क्लिक करा. त्यानंतर खालीलप्रमाणे बदल दिसतील.

IBus Preferences_010

नविन input method जोडल्यानंतर असे दिसेल.

» तर वरील स्क्रीनशॉटमध्ये दिसत असल्याप्रमाणे Add क्लिक केल्यानंतर Hindi – baraha ही पद्धत यादीमध्ये दिसू लागेल. या दोन्ही भाषा मी टाईप करतांना वापरू शकतो, तेही आलटून-पालटून, F११ किंवा F१२ या फंक्शन कीज द्वारे टॉगल करून!

» आता iBus Preferences या विन्डोतील शेवटची टॅब म्हणजेच Advanced सिलेक्ट करा व खालील स्क्रीनशॉटमध्ये दिसत असल्याप्रमाणे बदल करा.

IBus Preferences_001

Advanced टॅब

» आता iBus सुरू होईल, पण त्याअगोदर खालील मॅसेज दिसेल, त्यातील OK बटन क्लिक करा.

iBus_message

iBus_message

» iBus चालू झाल्यावर खालीलप्रमाणे किबोर्डचा आयकॉन वरच्या पॅनेलवर दिसेल. (जर दिसत नसेल, तर पॅनेलवर राइट-क्लिक करून Add to panel निवडा व Indicator Applet जोडा.)

Selection_011

iBus indicator icon

» सिस्टीम रीबूट/रीलॉग-इन केल्यानंतर iBus आपोआप चालू व्हावे यासाठी आपण आपण ~/.bashrc या फाइलमध्ये काही बदल करणार आहोत.
» टर्मिनल उघडून त्यामध्ये खालील कमांड कॉपी-पेस्ट करा.

sudo gedit ~/.bashrc


» यानंतर पासवर्ड विचारला की तुमचा पासवर्ड टाका व एन्टर हिट करा. त्यानंतर gedit या टेक्स्ट एडिटर मध्ये खालील स्क्रीनशॉट मध्ये दर्शवल्याप्रमाणे .bashrc फाइल उघडेल. त्यामध्ये तळाशी खालील कोड-लाइन्स कॉपी-पेस्ट करून .bashrc फाइल सेव्ह करून बंद करा, व नंतर टर्मिनल सुद्धा बंद करा.

export GTK_IM_MODULE=ibus
export XMODIFIERS=@im=ibus
export QT_IM_MODULE=ibus


» अधिक माहितीसाठी खालील स्क्रीनशॉट बघा.

editing .bashrc file

.bashrc फाइलमध्ये चेन्जेस करणे.

» आता iBus ला स्टार्ट-अप ऍप्लिकेशन्सच्या यादीमध्ये जोडू, जेणेकरून iBus सिस्टीम बूट झाल्याबरोबर आपोआप चालू होऊ शकेल. त्यासाठी System -> Preferences मध्ये जाऊन Startup Applications हा मेन्यू निवडा. (खालील स्क्रीनशॉट बघा.)

startup_apps_menu

Startup Applications menu निवडणे

» त्यानंतर एक Startup Applications Preferences नावाची विन्डो उघडेल, त्यामधील Add हे बटन दाबा, अजुन एक सब-विन्डो उघडेल, त्यामधील दिलेल्या चौकटीमंध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा.

Name: iBus

Command: /usr/bin/ibus-daemon -d

Description: काहीही चालेल.

» अधिक माहितीसाठी खालील स्क्रीनशॉट बघा. माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर Add करून ती विन्डो बंद करा.

Startup Applications Preferences

iBus ला स्टार्ट-अप आप्लिकेशन्सच्या लिस्ट मध्ये जोडणे.

» आता या iBus चा वापर करून मराठी मध्ये लिहायचे कसे, ते आपण पाहूया…

» Input Method बदलण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या खालून(?) उजव्या बाजूला खालील स्क्रीनशॉटप्रमाणे एक आयकॉन दिसत असेल.

Selection_012

» या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही input method बदलू शकता. (मी F११ किंवा F१२ ने देखील बदलू शकतो, जसे की यापूर्वीच मी सांगितले आहे.)

Selection_013» भाषा बदलल्यानंतर तो आयकॉन काहीसा खालीलप्रमाणे दिसू लागेल, ज्याद्वारे तुम्हाला सध्या तुम्ही कोणत्या भाषेत टाइप करत आहात, ते दिसू शकेल!

Selection_014

» झालं आता… शेवटची गोष्ट… तुम्हाला खात्री पटावी, यासाठी काहीतरी लिहून दाखवतो मराठीमध्ये…!!! 😛

Selection_002

iBus चा वापर करून मराठी लेखन!

धन्यवाद!
[साभारः चिन्मय इनामदार]


संबंधित लेखन

 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • उबुन्टू १०.१०
  परिचय-ओळख
  उबुन्टू १०.०४ नंतर, म्हणजे ६ महिन्यांनंतर कॅनॉनिकलने १० ऑक्टोबरला आपली नवीन आवृत्ती बा…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. वा! एकदम सॉलिड माहिती दिली रे… अगदी स्क्रीनशॉट सहित… उबंटुचं मार्केट वाढतंय हां!
  मी घरी उबंटु आणि ऑफिसमध्ये विंडोज वापरतोय…. पण हळु – हळु उबंटुचं एवढं जुळु लागलंय की बर्‍याचदा विंडोजमध्ये टर्मिनल / गेम्स शोध असं चालु असतं!

 2. नमस्कार विशाल,
  फ़ारच छान माहिती दिली आहेस. छायाचित्रा सोबत असल्याने समजायला फ़ार सोपे जाते. असेच लिहित राहा. आजकाल नक्कीच ubuntu लोकप्रिय होत आहे. मलाहि open OS वापरायची आहे. पण प्रश्न आहे की ubuntu वापरावं की Red hat. तुझं काय मत आहे.

  – techmr.wordpress.com

 3. धन्यवाद विशाल,
  फ़ेडोरा मधे सुद्धा प्रक्रिया सारखिच आहे. . . . . १-२ errors आले पण it works very well..
  @Akshay Sawadh
  नमस्कार,
  माझ्या मते red hat पेक्शा ubuntu च बरी कारण माझ्या ओफ़िस मधल्या ३ जनांना मी ubuntu install करुन दिल होत. . . ३ही जाम खुश आहेत्त. . . red hatचे २ problem मझ्या मते आहेत्त १ तर support आणि २ म्हंणजे latest package updates…ubuntu ची community खुप् मोठिय त्यामुळे problem आला तरी मदत लगेच मीळते. . . . operating system सुद्धा ubuntu ची लवकर release होत असते त्यामानान red hat 18 ते 24 महिने घेतो.

 4. Excellent article…

  अति सुंदर.

  Sorry, Ajun mala thodi practice pahije marathi type karnya karita.

  To spread Marathi, what we would like to see is DTP Suite…. to create really nice & quality stuff in Marathi.

  Will honestly appreciate if you word GIMP and Sribus in your own way. Your style of explaining every bit makes all the difference. [ I intend to write Open Office Tutorial covering everything in Marathi. I always believed that using Linux or opensource software like open -office is better than using pirated ms office ]

  Hoping to put everything in Marathi in couple of days.

  Nice work… Keep doing.

 5. विजय भिडे म्हणतात:

  ibus ने लिनक्स मधे मराठीत लिहीण्याची उणीव भरुन काढली,

 6. तुम्ही मस्त माहिती दिली आहे….
  बाय द वे, हे वापरून “ज्ञ, ळ, श्री” लिहिता येतात का..? hi-baraha.mim नावावरून तरी हिंदी वाटते…iBus चे माहित नाही…

 7. उबुन्टू १०.१० मधे पण ह्या सूचना चालतात. अर्थात थोडे फार फरक आहेत, पण अगदीच नगण्य
  धन्यवाद !!!

 8. राजा पाटील (कोल्हापूर) म्हणतात:

  विशाल,
  आपण दिलेल्या माहीतीला http://goo.gl/UcEg ची जोड दिली व आता मी मराठीमध्ये टाईप करू शकतो. धन्यवाद.

  मी जवळ जवळ १९९९/२००० सालापासून लिनक्स वापरत आहे. अगदी सुरवातीला Suse वापरली परंतु गेली
  ४/५ वर्षे मी फक्त Ubuntu वापरत आहे, मी माझ्या लॅपटॉपवर Windows XP (duel boot) Install केले आहे परंतु फारच कमी वेळा मी ते वापरतो.

  आपण हाती घेतलेल्या उपक्रमास अनेक शुभेच्छा.

  • धन्यवाद राजा…
   आपल्याला या लेखाचा उपयोग झाला, यातच सर्व काही आले.

   लिनक्स वापरण्याचे तोटे तर मुळीच नाही, उलट विन्डोज वापरतांना तुम्हाला जे काय प्रॉब्लेम्स सतावतात, त्यांना चुटकीसरशी सोडवण्याचे उत्तर लिनक्स वर तुम्ही अनुभवले असेल. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तीचा अनुभव असला, तरीदेखील हल्ली सर्वसामान्य लोकांना लिनक्स किंवा त्यावरील फ्लेवर्स बद्दल फार म्हणणयापेक्षा मुळीच माहिती नसल्यामुळे लोकांचा विन्डोज संगणकासमवेतचा इंटरफेस अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे लोक फार वैतागलेले मी दररोज बघतो. तथापि, माझ्या अथक प्रयत्नांमुळे तरी माझे आप्तजन व जवळचे मित्र-मैत्रिणी आता उबुन्टू तथा इतर लिनक्स फ्लेवर्स वापरत आहे, व त्यांचे त्याबद्दलचे सुखद अनुभव ऐकण्यासारखे आहेत. आपणही असेच तुमच्या निकटवर्तीयांमध्ये लिनक्सचा प्रसार व प्रचार करीत असाल, याची मला खात्री आहे, पण आपले प्रयत्न हे अगदी तोकडे पडत आहेत, असे मला वाटते. असो, काहीही न करण्यापेक्षा या लेखाप्रमाणे वाचकांसाठी काहीतरी केलेले बरे, अशी उक्ती मनी बाळगून मी लिनक्स व तत्सम लेखन अविरत चालू ठेवण्याचा प्रयत्न जपलाय!

   नुकत्याच रीलीज झालेल्या उबुन्टू १०.१० बद्दल परिचयात्मक लेख लिहिण्याचा गेल्या १० दिवसांपासून विचार करतोय, पण हल्ली कामाच्या व्यापातून वेळ मिळणे फारच कठिण होऊन बसले आहे. तत्पश्चात, मी काल रात्री जरा उशीरा जागरण करुन काही स्क्रीनशॉट्स काढले आहेत. आज त्यावर लिहिणे फत्ते होईल, असा मानस आहे.

   • राजा पाटील (कोल्हापूर) म्हणतात:

    विशाल,
    माझ्यामते लिनक्स अगदी सुरवातीच्या काळात वापरणे थोडे अवघड आहे कारण
    कांही संकल्पना मनात रूजाव्या लागतात जसे कि मोटारसायकल चालवण्या आधी
    सायकल चालवता आली पाहिजे. तसेच विंडोज वापरली कि लिनक्स वापरणे सोपे
    जाते व नंतर लिनक्सपासून दूर जाणे अवघड होऊन बसते. मी सुध्धा लिनक्सचा
    प्रचार करतो व मला बरयापैकी यश आले आहे. माझी मुले घरी लिनक्सच वापरतात व माझ्या कांही व्यावसायिक मित्रांनी त्यांच्या ऑफिसमध्ये लिनक्स
    सक्तीचे केले आहे पण त्यासाठी ३ ते ४ वर्षे त्यांना पटवून ध्यावे लागले. आपले
    प्रयत्न तोकडे पडताहेत यापेक्षा त्यांचे जडत्व जास्त आहे असा विचार करणे
    जास्त संयुक्तीत आहे व त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेळ देणे गरजेचे आहे.

    असो, Open Office मध्ये मला Font चेंज करता आला नांही. आपण Marathi Font बदलाबाबत कांही माहिती मिळवली आहे कां? तसेच याचा वापर Database Application मध्ये होऊ शकेल कां ?
    असल्यास कृपया मला कळवाल कां ? आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.

 9. `इथे मराठी phonetic layout upload करु शकता का?

 10. ऱ्या

  हे अक्षर कसे type करावे? मी itrans वापरत आहे. वर दिलेला “ऱ्या” माझ्याकडून चुकून type झाला आहे. त्यासाठी कोणते
  key-combination वापरले ते आठवत नाही.

 11. आता Ubuntu11.04 मधे ibus ने मराठी लिहीता येते।

  विजय भिडे

 12. आता Ubuntu12.1 आले आहे. वाचकानी ट्राय करावे.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME