वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

उबुन्टू १०.०४

२६ प्रतिक्रिया

उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ ooBOONtoo)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिटी आहे… ह्या कम्युनिटीद्वारे बनविण्यात येणार्‍या सिस्टिम आणि इतर बहुतांश प्रणाल्या या सर्वांसाठी मोफत असतात, त्यासाठी तुम्हाला १ पैसुद्धा खर्च करावी लागत नाही… FSF आणि GNU च्या नियमांअंतर्गत या कम्युनिटीवरील कशामध्येही कोणीही कसलेही बदल करण्यास समर्थ असतो. उबुन्टूची कॉपी ही जगातील प्रत्येकाला मोफत मिळावी यासाठी इंटरनेटवर डाउनलोड करण्यासाठी मोफत उपलब्ध असते, कुठल्याही संगणकावर चालू शकते, तुमच्याकडील कॉपी तुम्ही रीडिस्ट्रीब्युट करू शकता किंवा त्याच्या इमेजेस तयार करून त्या इतरांना विनामुल्य वाटू शकता, लिनक्स सिस्टिम्सचा अभ्यास करण्यासाठी उबुन्टू सर्वांत मोठे व योग्य दालन आहे, तुम्ही तुमच्या कडील कॉपीत हवे ते बदल करू शकता इत्यादी अनेक सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत… या सर्व गोष्टी असंविधानिक नाहीत, सर्व काही कायद्याच्या अंतर्गतच निश्चित केलेले आहे. एकदा का तुम्ही उबुन्टू वर आले, तर मात्र तुम्ही उबुन्टूला सोडणे अवघड आहे… बहुतेक उबुन्टू युजर्स हे उबुन्टू ऍडिक्ट आहेत, अगदी माझ्याप्रमाणे… वुई लव्ह ओपन सोअर्स, ऍण्ड ओपन माईंडेड पीपल टू…!!!!

काही दिवसांपुर्वीच (एप्रिल २०१० मध्ये) लिनक्सच्या एका लोकप्रिय फ्लेवरची, म्हणजेच उबुन्टूची नविन आवृत्ती, “उबुन्टू १०.०४” कॅनॉनिकलने (दक्षिण अफ्रिकेतील एक नावाजलेल्या उद्योजक मार्क शटलवर्थ यांची ही खाजगी कंपनी, उबुन्टूचे संस्थापकही शटलवर्थच आहे, उबुन्टू आणि इतर मुक्त-स्त्रोत प्रणाल्यांचे विकसन आणि प्रमोशन या कंपनीद्वारे चालवले जाते.) रीलिज केली. या नविन रीलिज बद्दलची थोडक्यात माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न आहे…

२००४ साली स्थापन झालेल्या उबुन्टूने गेल्या पाच वर्षांत अनेक “ओपन सोर्स गीक”स् ची हृदये जिंकली आहेत. इतर अनेक डिस्ट्रोंची (खासकरून ओपन स्युस) कडवी टक्कर असतांनाही उबुन्टूने “ह्युमन” इंटरफेस मुळे ओपन सोर्स सिस्टीम्स जगतात नविन क्रांती घडवून आणली आहे… कॅनॉनिकल उबुन्टूची दर सहा महिन्यांनी नविन अपडेटेड प्रत रीलिज् करते, प्रत्येक एप्रिल (४था महिना) आणि ऑक्टोबर (१०वा) महिन्यामध्ये… मी वापरत असलेली उबुन्टू ९.०४ ही प्रत २००९ (९ म्हणजे २००९) च्या ४ थ्या महिन्यात रीलिज झालेली आहे. सध्या ९.१० (२००९ च्या ऑक्टोबर महिन्यात रीलिज झालेली प्रत) ही स्टेबल कॉपी अजुनही बरेच जण वापरत आहे, जरी या एप्रिल मध्ये नविन अद्ययावत १०.०४ उपलब्ध करून देण्यात आली असली तरीही, कारण जोपर्यंत नविन कॉपी मधील काही बग्ज आणि त्रुटी दुरूस्त केल्या जात नाहीत, तोपर्यंत बरेच जण कसलाही धोका न पत्करता जुन्या प्रतीवरच आपले काम चालवतात!

कॅनॉनिकलने अधिकृतपणे हे जाहीर केलंय की, नविन उबुन्टू १०.०४ ही सर्वांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याची कॉपी तुम्ही या दुव्यावरून कोणत्याही पर्यायांद्वारे डाऊनलोड करू शकता किंवा तुमच्या संगणकावर सध्या असलेल्या जुन्या आवृत्तीवरून डायरेक्ट अपग्रेड करू शकता! जर तुमचे इंटरनेट कनेक्शन फारच हळू असेल, तर तुम्ही या आवॄत्तीची होम पीसी सीडी किंवा सर्वर सीडी पोस्टाद्वारे अगदी मोफत मागवू शकता, त्यासाठी या दुव्यावर जाऊन तेथे रेजिस्ट्रेशन व नंतर योग्य पत्ता अन इतर माहिती भरावी… अंदाजे ३-४ आठवड्यांत तुम्हाला विनंती केलेली सीडी दिलेल्या पत्त्यावर निःशुल्क आणून दिल्या जाईल! नविन उबुन्टु १०.०४ रीलिजचे “Lucid Lynx” असे कोडनाव ठेवण्यात आले आहे.  पुढील आवृत्ती (उबुन्टू १०.१०) ऑक्टोबर २०१० मध्ये रीलीज होईल, तीचे कोडनाव “Maverick Meerkat” असे असेल.

नविन उबुन्टू १०.०४ LTS

नविन उबुन्टू १०.०४ LTS

उबुन्टू १०.०४ ही लाँग टर्म सपोर्ट (LTS) आवृत्ती आहे, म्हणजेच ही आवृत्ती वापरणारे वापरकर्ते अधिक काळापर्यंत नियमित पॅकेज अपडेट्स मिळवू शकतील. सामान्यतः सर्व उबुन्टू आवृत्त्यांना १८ महिने नियमित अपडेट्स पुरविले जातात, पण LTS आवृत्ती वापरणार्‍या डेस्कटॉप वापरकर्त्यांना सलग तीन वर्षे तर सर्व्हर्संना नियमित ५ वर्षे अपडेट सपोर्ट पुरविला जातो.

उबुन्टूचा नविन जांभळा लुक!

उबुन्टूचा नविन जांभळा लुक!

आतापर्यंत उबुन्टूच्या लुक मध्ये तुम्ही बदामी चॉकलेटी आणि नारंगी रंगाचा वापर बघितला असेल, पण या नविन आवृत्तीमध्ये पहिल्यांदाच एकदम वेगळी थीम वापरण्यात आलेली आहे… काळसर आणि सौम्य जांभळ्या रंगामध्ये किंचित नारंगी रंगाची डोळे दिपून टाकणारी सुंदर छटा बाय-डीफॉल्ट देण्यात आली आहे… पुर्णपणेच नविन असलेला हा नविन लुक मला तर खुपच आवडला आहे. या थीमचे नाव Ambience असे असून aubergine (म्हणजे काही जांभळ्या वांग्यांसारखी गोष्ट?) नामक वॉलपेपर या दृष्य-कल्पकतेत (?) देण्यात आला आहे.

उबुन्टू १०.०४ चा लोगो

उबुन्टू १०.०४ चा लोगो

आणखी एक गोष्ट मला नविन दिसली, ती म्हणजे तुम्हाला वरच्या चित्रामध्ये दिसलेच असेल की, उबुन्टू जेव्हा बुट होते, तेव्हा दिसणारा उबुन्टू लोगो… बारीक फॉन्ट असलेले नाव आणि छोटा आयकॉन… एकदम भारी आहे…

उबुन्टू १०.०४ ची आणखी काही ठळक वैशिष्ट्ये:

जलद गती

जलद गती

जलद गती

कोणत्याही संगणकावर (१६-बिट, ३२-बिट किंवा ६४-बिट) ताबडतोब लोड होते, पण आजच्या नविन टेक्नॉलॉजीयुक्त मशीन्सवर ते तुमच्या अंदाजापेक्षा अधिक वेगाने लोड होईल! प्रायमरी लोडिंग झाल्यानंतर डेस्कटॉप (टेबलाचा माथा?) लोड होण्यासाठी फक्त काहीएक सेकंद लागतात, दुसर्‍या सिस्टिम्सप्रमाणे तुम्हाला ताटकळत वाट पाहावी लागत नाही!

आंतरजालावर मुक्त संचार

आंतरजालावर मुक्त संचार

आंतरजालावर मुक्त संचार

उबुन्टूमध्ये मोझिला फायरफॉक्सची अद्ययावत आवृत्ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे – ज्याद्वारे तुम्ही अधिक वेगवान आणि गतीने सुरक्षितपणे वेब ब्राऊज करू शकता. शिवाय तुम्ही उबुन्टू सॉफ्टवेअर सेंटर मधून अन्य मुक्त स्त्रोत इंटरनेट ब्राऊजर्ससुद्धा वापरू शकता!

व्यावसायिक दस्तावेज आणि प्रेझेंटेशन्स

व्यावसायिक दस्तावेज आणि प्रेझेंटेशन्स

व्यावसायिक दस्तावेज आणि प्रेझेंटेशन्स

मायक्रोसॉफ्ट ऑफिसशी पुर्णपणे मिळते-जुळते ओपन ऑफिस.ऑर्ग वापरून तुम्ही तुम्हाला हवे तसे आणि अत्युच्च दर्जाचे डॉक्युमेण्ट्स, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशन्स बनवू शकता! ओपन ऑफिस.ऑर्ग हे ऑफिस पॅकेज वापरायला अत्यंत सोयिस्कर, सर्व सुविधांयुक्त आणि अगदी विनामूल्य बाय-डिफॉल्ट देण्यात आलेले आहे.

मोफत सॉफ्टवेअर्स

मोफत सॉफ्टवेअर्स

मोफत सॉफ्टवेअर्स

उबुन्टू सॉफ्टवेअर सेंटर तुम्हाला हजारो ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स आणि अनुप्रयोग अगदी विनामुल्य पुरविते. शैक्षणिक, खेळ, ध्वनी आणि चित्रफित साधने, ग्राफिक्स, प्रोग्रॅमिंग आणि ऑफिस टूल्स इत्यादी अशा अनेक प्रवर्गांमध्ये तुम्ही उपलब्ध असलेल्या साधनांना निःशुल्क तुमच्या उबुन्टू वर स्थापित करू शकता! येथे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर्स शोधण्यास, स्थापित करण्यास आणि काढून टाकण्यास अत्यंत सुलभ आहेत!

बीइंग सोशल!

बीइंग सोशल!

बीइंग सोशल!

पहिल्यांदाच… १०.०४ मध्ये हे एक नविनतम वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुमच्या सोशल नेटवर्कवरील अपडेट्स आता तुमच्या उबुन्टूवर थेट वाचा आणि मित्रांसोबत सदैव संपर्कात राहा… उबुन्टूमधील मी मेन्युद्वारे तुम्हाला तुमच्या ट्विटर आणि फेसबुक आणि इतर अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवर थेट ऍक्सेस मिळतो! एकाच विन्डोमध्ये सर्व नेटवर्क्स एकत्रितपणे उपलब्ध करून दिलेले असल्याने एका क्लिकद्वारे तुम्ही सगळीकडे अपडेटेड राहू शकता. शिवाय तुमचे गप्पांसाठीचे चॅनेल्स जोडण्याची सुद्धा मुभा यात देण्यात आली आहे. ही सुविधा Gwibber यांनी पुरविली आहे…

संगीत ऐकायला आवडते?

संगीत ऐकायला आवडते?

संगीत ऐकायला आवडते?

पहिल्यांदाच… १०.०४ मध्ये हे एक नविनतम वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उबुन्टूचे नविन संगीत प्लेअर iTunes प्रमाणेच शक्तिशाली आहे, Rhythmbox म्युजिक प्लेअर, जे की जुन्या आवृत्त्यांमध्येही उपलब्ध आहे, त्यामध्येच ही सुविधा ऍड करण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही गाणे ऐकत असतांनाच तिथल्या तिथे जुने-नविन सुप्रसिद्ध ट्रॅक्स, अल्बम्स विकत घेऊन डाऊनलोड करू शकता, तेही काही क्लिक्स मध्येच…! शिवाय उबुन्टूवर नव्यानेच उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन म्युझिक लायब्ररीद्वारे तुम्ही तुमचे संगीत ऑनलाईन जतन करू शकता आणि पाहिजे तेव्हा ते तुमच्या संगणकावर मिडिया प्लेअर्सच्या मदतीने ऐकू शकता! उबुन्टू बहुतेक नावाजलेल्या मिडिया फॉर्मॅट्स बरोबर आणि मिडिया प्लेअर्सबरोबर अगदी सुलभतेने काम करते!

चित्रांसोबत खेळा!

चित्रांसोबत खेळा!

चित्रांसोबत खेळा!

तुमच्या बहुतेक सर्वच इ-गॅझेट्स साठी उबुन्टू सज्ज आहे. मोबाइल फोन्स, कॅमेरे उबुन्टू ला जोडून तुमचे अप्रतिम फोटोज संगणकात उतरवून घ्या अगदी काही क्लिक्समध्ये… तुमचे फोटोज F-Spot, पिकासा, फेसबुक किंवा फ्लिकर सोबत ऑर्गानाइझ करून ठेवण्यासाठी जास्त सुविधा देण्यात आल्या आहेत. GIMP आणि उबुन्टू सॉफ्टवेअर सेंटरवर उपलब्ध असलेल्या अनेक फ्री फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर्स द्वारे अनेक प्रो सुविधांचा लाभ घेता येईल!

संकालन (सिन्क्रोनायझेशन)

संकालन

संकालन

सर्व उबुन्टू वापरकर्त्यांना एक मोफत Ubuntu One खाते निर्माण करता येण्याची मुभा दिलेली आहे. उबुन्टू वन द्वारे नोंदणीकृत वापरकर्ता त्याचे वैयक्तिक बुकमार्क्स, संपर्क, संगीत आणि चित्रे ऑनलाइन साठवू शकतो व कधीही, कोठेही ते तो ऍक्सेस करू शकतो! उबुन्टू वन कायमस्वरूपी २ जीबी डेटा स्टोरेज स्पेस अगदी मोफत देणार आहे आणि जर तुम्हाला आणखी स्पेस हवी असल्यास तुम्ही $१० दराने प्रतिमहा ५० जीबी इतकी स्पेस वापरू शकाल!

व्हिडीओज

व्हिडीओज

व्हिडीओज

Youtube, iPlayer आणि MSN player वरील तुमचे आवडते व्हिडिओज अधिक सुलभतेने व अत्युच्च क्वालिटी मध्ये पाहण्याची सुविधा… संगणकातील तुमचे व्हिडिओज Movie Player सोबत प्ले करा किंवा Pitivi ह्या साधनाद्वारे ते एडिट करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे!

शेकडो मोफत खेळ

शेकडो मोफत खेळ

शेकडो मोफत खेळ

उबुन्टू सॉफ्टवेअर सेंटर मध्ये उपलब्ध असलेल्या कोडे, ऍडव्हेन्चर, टॅक्टिकल चॅलेन्जेस आणि इतर अनेक प्रवर्गांमधील शेकडो गेम्स पुर्णपणे मोफत उपलब्ध आहेत!

सुलभता

सुलभता

सुलभता

जगातील प्रत्येकाने संगणकावर काम करता यावे यासाठी उबुन्टूचे कार्यकारी मंडळ नेहमीच अग्रेसर राहिले आहे… उबुन्टू ही एकमात्र सिस्टिम आहे, ज्याद्वारे कोणत्याही अंध, अपंग व्यक्तिला संगणकाशी इंटरफेस साधता येतो… स्टिकी कीज, स्लो कीजसारख्या असिस्टिव्ह टेक्नॉलॉजींचा वापर करून प्रत्येकाला सुलभ संचार करण्यासाठी निरनिराळ्या सुविधा या नविन आवृत्तीत देण्यात आल्या आहेत.


अपडेट:

काही दिवसांपूर्वी दिपक दादाने (भुंगा) उबुन्टूच्या ९.०१ (कार्मिक) आवृत्तीवरून या नविनतम १०.०४ (ल्युसिड) वर अपग्रेडेशन केले होते… पण त्याला १०.०४ मध्ये लॉगिन केल्यानंतर माउस आणि कीबोर्ड स्टक/फ्रीज/हँग होणे असे प्रकार जाणवायला लागले… याबाबत आम्ही उबुन्टू फोरम्सवर बरीच विचारपूस केली, पण योग्य उत्तर नाही मिळाले.. शेवटी उबुन्टू फोरमवरीलच एका लिंकद्वारे मी श्री. चिन्मय इनामदार यांच्या ब्लॉगवर पोहोचलो… त्यांनाही हाच प्रॉब्लेम आलेला होता… त्यांनी सांगितलेले सोल्युशन आम्हाला खुपच लाभदायक ठरले… जर तुम्हालाही या ९.०१ वरून १०.०४ वर अपग्रेड केल्यानंतर हाच प्रॉब्लेम येत असेल, तर खालील माहिती तुमच्यासाठी नक्कीच खुप फायद्याची आहे… खालील माहितीसाठी चिन्मय इनामदारांचे मनःपूर्वक आभार!

खालील पायर्‍यांमध्ये आपण अपग्रेडेशन/इन्स्टॉलेशन झाले, त्यावेळी इग्नोअर केलेले पेरिफेरल डिव्हायसेस शोधणार आहोत व नंतर त्या डिव्हायसेस ना मॅन्युअलि रेजिस्टर करणार आहोत…

१) तुमचे संगणक चालू करा. सुरुवातीलाच दिसणार्‍या ग्रब लोडर (उपलब्ध सिस्टिम्सची यादी दिसते) मधून उबुन्टू लोड करण्यासाठी Generic मोड (शक्यतो पहिल्याच क्रमांकाला असतो) निवडा व एन्टर कि हिट करा. त्यानंतर कमांड लाइन इंटरफेस (सिंगल युजर मोड) मध्ये दाखल होण्यासाठी ctrl + alt + F1 ही कॉम्बिनेशन की एकत्र दाबा.

२) आता तुम्हाला कमाण्ड प्रॉम्प्ट प्रमाणे स्क्रीन दिसू लागेल. त्यामध्ये तुमचे युजरनेम अन पासवर्ड दिअसणार्‍या सुचनांप्रमाणे दाखल करा. त्यानंतर रूट म्हणून लॉगिन होण्यासाठी sudo -i ही कमाण्ड टाईप करून एन्टर कि हिट करा. पासवर्ड विचारल्यावर तुमचे युजरनेमसाठी टाकलेले पासवर्ड द्या… रूट मधून लॉगिन होण्यासाठी su ही कमांड देखील चालेल, फक्त येथे रूटचेच पासवर्ड द्यावे लागते, त्यामुळे या कमाण्डचा वापर शक्यतो टाळा.

३) आता खालील कमांड एक्जिक्युट करा:

cd /var/log/

त्यामध्ये गेल्यावर ls ही कमांड टाइप करून सध्याच्या डिरेक्टरी मध्ये Xorg.log किंवा Xorg.0.log यांपैकी कोणती फाइल दिसते ते बघा.

४) वरीलपैकी ज्या नावाने फाइल दिसत असेल ती खालील कमांडचा (vi editor चा) वापर करून उघडा:

उदा. vi Xorg.0.log किंवा vi Xorg.log

५) ह्म्म, आता या फाइलमध्ये तुमच्या ज्या डिव्हायसेस ना इग्नोअर केलं गेलंय ते शोधा…
दिपक दादाच्या मशीनवर खालीलप्रमाणे इग्नोअर केलेले किबोर्ड व माउस सापडले… तुमच्या मशीन वर त्यांची नावे व पाथ वेगळे असू शकतात… व त्यांची संख्यासुद्धा कमी-जास्त असू शकते… शक्यतो माउस आणि किबोर्डशी संबंधित असणार्‍या नोंदी शोधा, दिपक दादाच्या बाबतीत हे असं होतं:

(II) config/udev: Adding input device AT Translated Set 2 Keyboard (/dev/event3)
(II) No input driver/identifier specified (ignoring)
(II) config/udev: Adding input device Logitech Wheel Mouse (/dev/event4)
(II) No input driver/identifier specified (ignoring)

६) वरील प्रमाणे तुमच्या बाबतीतही दिसत असेल, तर लाल रंगाने दर्शवलेले आयडेन्टिफायर नावे आणि निळ्या रंगाने दर्शवलेले डिव्हाइस पाथ नावे तुमच्याकडे जसे दिसत असतील, जसेच्या तसे, कसलिही स्पेलिंग मिस्टेक, स्पेस वगैरे, कॅपिटल-स्मॉल मध्ये घोळ न होउ देता एका कागदावर व्यवस्थित लिहून घ्या.

७) ह्म्म आता ती उघडलेली फाइल बंद करण्यासाठी :q ही कमांड टाइप करून एण्टर कि हिट करा… आता तुम्ही vi editor मधून बाहेर आलेले आहात…

८) आता खालील कमांड टाइप एक्जिक्युट करा:

cd /usr/lib/X11/xorg.conf.d

आता या डिरेक्टरी मध्ये *evdev.conf अशा काहीशा नावाने असलेली फाइल शोधण्यासाठी खालील कमांडचा वापर करा:

ls *evdev.conf

वरील कमांडद्वारे मिळालेल्या रीजल्टमधून तुमच्या मशीनवर कोणती फाइल मिळते ते बघा.
आमच्या बाबतीत त्या फाइलचे नाव 05-evdev.conf असे होते… तुमच्या बाबतीत ती दुसर्‍या नावाने असू शकते किंवा याच नावानेसुद्धा असू शकते.

९) यानंतर ती फाइल vi editor सोबत खालील कमांडद्वारे उघडा:

उदा. vi 05-evdev.conf

ही फाइल तुम्हाला रीड ओन्लि मोड मध्ये दिसत आहे… तिच्यात बदल करण्यासाठी तुम्हाला ऍपेन्ड (रीड/राइट) मोड चालू करणे गरजेचे आहे… ऍपेन्ड मोड चालू करण्यासाठी a ही कळ दाबा. आता तुम्ही या फाइलमध्ये हवे ते बदल करण्यास समर्थ आहात!
आता या फाइलच्या एकदम शेवटी खालीलप्रमाणे लाइन्स टाइप करा.

Section "InputClass"
Identifier "AT Translated Set 2 Keyboard"
MatchIsKeyboard "on"
MatchDevicePath "/dev/event3"
Driver "evdev"
EndSection

Section "InputClass"
Identifier "Logitech Wheel Mouse"
MatchIsPointer "on"
MatchDevicePath "/dev/event4"
Driver "evdev"
EndSection

सुचना: वरील लाइन्समधील Identifier मधील एन्ट्री ही तुम्ही पायरी क्र. ५ आणि ६ मध्ये लाल रंगाने दर्शवलेली होती, ज्याची तुम्ही आधीच नोंद केलेली आहे, ती येथे टाइप करा.
आणि वरील लाइन्समधील MatchDevicePath मधील एन्ट्री ही तुम्ही पायरी क्र. ५ आणि ६ मध्ये निळ्या रंगाने दर्शवलेली होती, ज्याची तुम्ही आधीच नोंद केलेली आहे, ती येथे टाइप करा.

१०) आता ही फाइल जतन करण्यासाठी :wq असे टाइप करून एन्टर हिट करा…

११) आता तुम्ही vi editor मधून ती फाइल यशस्वीरित्या जतन करून बाहेर पडला आहात… आता reboot ही कमांड टाइप करून एन्टर हिट करा…

१२) संगणक पुन्हा (रीबूट) चालू झाल्यानंतर तोच Generic मोड निवडा…

१३) आता तुमचा माउस आणि किबोर्ड स्टक/फ्रिज/हँग होणार नाही….

धन्यवाद!

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. विशाल,
  वा.. काय मस्त लिहिलंयस रे! मी स्वतः जरी लिहायचं ठरवलं असतं ना तरीसुद्धा एवढं सविस्तर लिहिता आलं नसतं! आणि हो – मला युबंटुसाठी फोनवरुन मदत केल्याबद्दल जाहीर आभार!

  एक मात्र आहे.. युबंटु सुरुवातीला वापरायला थोडं अवघड वाटेल.. [ विंडोज’ला आधीन झालोयत ना ] पण एकदा का हात बसला .. मग एकदम भन्नाट! माझी घरची मशिन जुनी आहे.. [पी४ – १जीबी रॅम] त्यावर युबंटु जरा हळु चालतंय [१०.४] मात्र या आठवड्यात नविन मशिन घेतोय.. युबंटु सहीत!

  जय युबंटु.. जय मुक्तप्रणाली!

  • आणखी जास्तीत-जास्त लोकांपर्यंत “ओपन सोर्स” चे लोण कसे फैलावता येईल, त्यावर विचार करण्याची गरज आहे… विन्डोजच्या पायरेटेड सिस्टिम्स वापरणे, ऍन्टिव्हायरस प्रणाल्यांसाठी हजारो रुपये खर्च करणे, अति-महत्वाचे सॉफ्टवेअर्स विन्डोजसाठी फुकट न मिळणे… आणि अशी बरीच कारणे माहित असुनही लोकं विन्डोज सोडायला तयार नाहीत… ओपन सोर्स मधील बहुतेक प्रोडक्ट्स ओपन टु युज ऍण्ड ओपन टु मॉडिफाय असतात… प्रत्येक गोष्ट ओपन सोर्स प्रोडक्ट्स वर फुकटात करता येते… असो..

   अभिनंदन, उबुन्टू साठी नविन मशीन घेतोहेस, त्याबद्दल…!!!

   ओपन सोर्स झिंदाबाद!

 2. विशाल मस्त लिहिलंय. ओपेन सोर्स आणि संबंधित गोष्टींकरिता येथे भेट देत राहा [http://ossrc.org.in/]. नक्कीच या राष्ट्राल आपण पूर्णतः स्वतंत्र करूयात. कारण ओपेन सोर्स फक्त एक तंत्राद्यान नाही तर, ती एक चळवळ जी बरेच आर्थिक आणि एकप्रकारे सामजिक हि बदल घडवू शकते (या बद्दल अधिक कधी तरी ब्लोग वर लिहिलच मी).
  असो, छान लिहिलंय!


  प्रकाश बा. पिंपळे
  ओपेन सोर्स वाढवू आणि तंत्रज्ञानाला खऱ्या अर्थाने सर्व समावेशक बनवू!

 3. अगदी सहज आणि सोप्या भाषेत लिहिले आहेस रे
  त्यामुळेच लेख वाचतानाच तुला फोन करण्यापासून स्वताला रोखू शकलो नाही
  बाकी मला हि हे वापरायचे आहे तुला मी सांगितले आहेच
  लेख मस्त आणि उपयोगी झालाय
  धन्यवाद माहितीबद्दल 🙂

 4. विशाल,
  मस्तच !! आणि, अपडेट करायला इच्छूक असलेल्यांसाठी या लेखात काहीच नाही‌ 🙁 .. तुलना आणि गो-नो-गो आली असती तर आणखी छान.

  • हा… हा… 😛

   अरे स्वॉरी… पण मी तरी कुठे १०.०४ वर अपग्रेड केलंय अजुन… दिपक दादाला आलेला प्रॉब्लेम सोडवतांनाच आमच्या नाकी नऊ आले होते… तो प्रॉब्लेम कोणता होता आणि तो कसा सॉल्व्ह झाला, ते या लेखाच्या उत्तरार्धात सांगितले आहेच… असो…
   तुलना अन् गो-नो-गो माझ्यामते तुच करायला हवीस… त्यासाठी लवकर पोस्ट येऊ दे.. 🙂 (पण अपग्रेड करण्यासाठी जरा थांब अजुन महिनाभर तरी… बरेच प्रॉब्लेम्स येताहेत लोकांना १०.०४ सोबत सध्या तरी… फिचर्स आधीच्या, म्हणजेच तू सध्या वापरत असलेल्या कार्मिक (९.१०) च्या तुलनेने बरेच ऍड केले गेले आहेत, जसे की तू या लेखात वाचले असशीलच… उबुन्टू वन, सॉफ्टवेअर सेंटर, इन्स्टन्ट सोशल नेटवर्किंग सारख्या सुविधा स्वागतार्ह आहेत… मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ते नविन जांभळ्या रंगाचे थीम…!)

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 😉

 5. सितराम वाळके म्हणतात:

  नमस्कार विशाल,
  उबुन्टु बद्द्ल माहिती एकदम मस्तच लिहिली आहेस. मी हा लेख वाचुनच प्रथमच उबुन्टु वापरायला चालु केले आहे. मस्तच आहे.
  मला अडचण आली आहे. गुगल इमे – यावर लोड करायला देत नाही. मी वाइनपण लोड केले आहे. तरिपण The file ‘/home/sr/Downloads/googlemarathiinputsetup.exe’ is not marked as executable. If this was downloaded or copied form an untrusted source, it may be dangerous to run. For more details, read about the executable bit. हा एरर देतो.
  यावर काही उपाय असल्यास क्रुपया माहिती द्यावी.

 6. विशाल

  अनेक दिवसांपासून उबंटू इन्स्टॉल करायची इच्छा होती पण धाडस होत नव्हतं. वर्षानुवर्षं विंडोज् वापरल्याचा परिणाम.

  पण हा लेख वाचून पुन्हा उचल खाल्लीय आणि उबंटू डाऊनलोडला लावलंय. इन्स्टॉल करताना काही अडचण आली तर मदत लागेल.

  अजून एक: एक्सपी इन्स्टॉल केल्यावर ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागतात (मोडेम, ऑडिओ इ.) तसं यात काय करावं लागेल? उबंटूचे ड्रायव्हर्स वेगळे असतात का?

  -विवेक.

  • विवेक,

   मी लॅपटॉप वापरतो, मला तरी ऑडिओ, ग्राफिक्स, मोडेम इत्यादी कशासाठीच कसलेही ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागलेले नाहीत उबुन्टू साठी (फेडोरा ११ वरही गरज पडली नव्हती)… मी माझ्या डेस्कटॉप वापरणार्‍या मित्रांना विचारलं असता त्यांनाही ऑडिओ, ग्राफिक्स च्या ड्रायव्हर्सची गरज पडली नाही… ह्म्म, मोडेम ड्रायव्हर बद्दल काही सांगू शकत नाही, पण बहुदा तेसुद्धा आपोआप इन्स्टॉल होईल! तुम्ही लाइव्ह सीडीवरून उबुन्टू डायरेक्ट इन्स्टॉल न करता पहिले चेक करून बघा, जर तुम्हाला खात्री पटली की बाहेरून ड्रायव्हर्स टाकण्याची काहीही गरज नाही, तेव्हा उबुन्टूला इन्स्टॉल करा…

   तुम्ही उबुन्टू इन्स्टॉल केल्यानंतर शक्य तेवढी मदत करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन!

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • विवेक, उबुंटू १०.०४ च्या सीडीमध्ये एक उबुंटू रनटाईम म्हणजे इंस्टॉल न करता वापरुन पहायची सोय आहे. त्यासाठी सीडी टाकून त्यातून बूट कर. आधी ते वापरुन ड्रायव्हर्स किंवा इतर हार्डवेअर टेस्ट करुन घेणे. आणि सगळ्या शंका दूर झाल्या की मगच इंस्टॉल कर. अन्य काही अडचण असल्यास सांगणे.

 7. निखिल वाळवेकर म्हणतात:

  नमस्कार,
  मी सध्या उबुन्टू स्टुडिओ ९.०४ वापरतो आहे. त्यात मला ९.१० ला उप्ग्रडे उपलब्ध आहे असे दिसते, पण मला १०.०४ ला उप्ग्रडे करायचे आहे. कोणी केले आहे का? आणि कसे करावे?

  धन्यवाद,
  निखिल

  • मी सुद्धा अजुनही ९.०४ (डेस्कटॉप व्हर्जन) वापरतो. कोणत्याही उबुन्टू फ्लेवरच्या जुन्या आवृत्तीवरून फक्त त्यापुढील निघालेल्या नविन आवृत्तीवरच अपग्रेड करता येते, जसे की ९.०४ वरून ९.१० वर… जसे की तुमच्याकडे दिसते आहे… जर १०.०४ वर ९.०४ वरून थेट अपग्रेड करावयाचे असल्यास त्यासाठी उपलब्ध मार्ग मलाही माहित नाहीत. ह्म्म, पण मी १०.०४ काही दिवसांतच सीडीवरून अपग्रेड होते की नाही, हे करून पाहणार आहे… जर झाले तर चांगलीच गोष्ट आहे, लाइव्ह सीडीमध्ये तसा ऑप्शन असतो कदाचित!

  • आज १०.०४ डाऊनलोड करतोय, कदाचित Virtual Box वर चालवून पाहिल अगोदर. तुला सनचा व्हर्च्यूअल बॉक्स माहित असेलच .. हो ना ?

   • ह्म्म, मी मागच्याच महिन्यात विन्डोज xp वर VMware virtual machine वापरून दुसरी विन्डोज xp चालवून बघितली होती (खरं तर Mandriva चा प्लॅन होता, पण अजुनपर्यंत तीची सीडी मिळाली नाहिये!) असो, Sun Microsystems च्या Virtual Box बद्दल सुद्धा मला माहिती आहे…

    मीसुद्धा पंकज दादाकडून उबुन्टू १०.०४ ची सीडी मागवलिय, त्यामध्ये व्हर्च्युअलायझेशन व क्लस्टरिंगचे कन्सेप्ट्स अप्लाय करून पाहण्याचा बेत आहे… अरे हो, लिनक्सवरही व्हर्च्युअलायझेशनसाठी पॅकेजेस उपलब्ध आहेत:

    १) Xen: उबुन्टू व इतर डेबिअन बेस्ड फ्लेवर्स, फेडोरा, SUSE इत्यादींना फुल्ल सपोर्ट । दुवेः http://xensource.com, http://xenman.sourceforge.net
    २) Virtual Machine Manager (virt-manager): रेड हॅटसाठी । http://virt-manager.et.redhat.com/, http://virt.kernelnewbies.org
    ३) Kernel-Based Virtualization Machine (KVM): हार्डवेअर व्हर्च्युअलायझेशन । दुवाः http://kvm.qumranet.com/kvmwiki । टीपः KVM हे QEMU (सॉफ्टवेअर व्हर्च्युअलायझेशन साठी) सोबत चालवले जाते.
    ४) शिवाय इतर व्यावसायिक व्हर्च्युअलायझेशन सर्व्हर्स, उदा. VMware (याचे फ्री सर्व्हर देखील उपलब्ध आहे), ESX virtualization server, Sun चे Virtual Box इत्यादी सुद्धा लिनक्ससाठी उपलब्ध आहेत.


    उबुन्टू १०.०४ तुला कसे वाटले, ते जरुर कळव! 😉

 8. Thank u yar ! Ya gosti khup janana mahi sudha nastat navin kai ale te sudha mahi naste. He mala pan mahi navte me pan torent varun image downlode karto ahe ata nakki vaprun pahin. madhe sun chi open solaris vaprun pahili mast ahe.

 9. Thanks for excellent articles on Ubuntu in Marathi.

  Needs following info / details urgently.

  1. Procedure on how to Install Marathi IME on ubuntu.

  2. Can linux command entered in marathi [ using alias ] on console. It would be great for novice.

  3. Marathi Translation of Ubuntu Manual / User guide.

  • १) ह्म्म, यासंदर्भात स्टेप-बाय-स्टेप लेख लिहिण्याचा माझा विचार चालू आहे… SCIM किंवा iBus या दोन्हींमध्ये भाषा जोडणे एकदम सारखे आहे, आणि आता SCIM ऐवजी iBus उबुन्टू मध्ये बाय-डिफॉल्ट येतंय, त्यामुळे iBus IME मध्ये मराठी सेटअप करण्यासाठीचे आर्टिकल लवकरच लिहून प्रकाशित करण्याचा मी प्रयत्न करेन,

   २)
   हो नक्कीच!
   उदा. alias यादी=ls
   यामुळे ls चे अजुन एक नाव तयार होईल व ls शिवाय तुम्ही “यादी” ही मराठी(utf-8 supported) कमांड देखील वापरू शकता!
   किंवा खालील स्क्रीनशॉट पाहाः
   alias command screenshot
   स्क्रीनशॉट अधिक मोठा दिसण्यासाठी. येथे क्लिक करा.

   ३) उबून्टू चे युजर मॅन्युअल बहुतेक जागतिक भाषांमध्ये (मराठीसुद्धा) उपलब्ध आहे.
   दुवाः http://ubuntu-manual.org/
   पण गचाळ व अशुद्ध भाषांतरामुळे (उदा. युबुंटु माहितीपुस्तकाबद्दलः गेटिंग स्टार्टेड विथ युबुंटु %version हे नवशिक्यांचे युबुंटु ओपरेटींग सिस्टिमसाठी कोम्प्रेहेन्सीव मार्गदर्शक आहे . हे ओपन सोर्स परवाना वापरुन बनवलेले आहे आणि तुमला हे डाउनलोड, वाचने, बदल करणे आणि इतरांना वाटण्यासाठी मोफत आहे . हे माहितीपुस्तक तुम्हाला रोज कराव्या लागण्यारे काम जसे की वेब सर्फ करणे, गाणे ऐकणे आणि द्स्तेवज स्कॆन करणे यांची ऒळख करुन देण्यात मदत करेल. उपयोगात आणायला सोपे अशा सुचनांना जास्त महत्व दिल्यामुळे हे सर्व स्तरांवरील अनुभवी व्यक्तींना वापरण्यजोगे आहे .) मी अजुनही ते बघितलेले नाही. मी स्वतः लाँचपॅडवर उबुन्टूच्या बर्‍याच पॅकेजेससाठी मराठी भाषांतर नित्य-नियमाने करीत असतो, पण अशा प्रकारचे (हे युजर मॅन्युअल आहे त्याप्रमाणे) कधीच करीत नाही. जर तुम्हाला आवड असेल आणि तुमचे मराठीवर प्रभुत्व असेल तर तुम्हीदेखील उबुन्टू साठी “अनुवादक” बनू शकता.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME