वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

उबुन्टू १०.१०

५ प्रतिक्रिया

परिचय-ओळख

ubuntu-10.10_logoउबुन्टू १०.०४ नंतर, म्हणजे ६ महिन्यांनंतर कॅनॉनिकलने १० ऑक्टोबरला आपली नवीन आवृत्ती बाजारात उतरवली आहे. उबुन्टूच्या आवृत्तीला संख्यात्मकदृष्ट्या नामकरण देण्याच्या पद्धतीबद्दल मी अगोदरच ‘उबुन्टू १०.०४‘ या लेखात सांगितलेले आहेच, त्यामुळे परत त्या व तत्सम गोष्टींची पुनरावृत्ती या लेखात करण्याचं मी टाळण्याचा कटाक्ष अवलंबलाय. यामुळे या लेखामधील गोष्टींशी नवख्या असलेल्यांना हा लेख तसा समजण्यास क्लिष्ट वाटू शकतो, पण हा उबुन्टूबद्दलच्या माहितीपर-मालिकेतील तिसरा लेख असल्याने त्याच-त्याच गोष्टींबद्दल पुन: तेच-तेच लिहिणे योग्य नाही. तथापि, काही गोष्टींसाठी संदर्भ(दुवे) दिले आहे, समजण्यास त्यांचा थोडाफार उपयोग होईल, अशी आशा आहे.

आणि हो, लेख लिहिण्याला उशीर होण्यामागे अनेक अपरिहार्य कारणे होती, त्यांवर चर्चा न केलेलीच बरी! 😉

*****

दिनांक १० ऑक्टोबर २०१० रोजी, १०:१० (UTC) वाजता, उबुन्टूची १०.१० ही कॅनॉनिकलने रीलीज केलेली १३ वी आवृत्ती आहे. या आवृत्तीचे नाव Maverick Meerkat असे ठेवण्यात आले आहे. या आवृत्तीला एप्रिल २०१० पर्यंत कॅनॉनिकल कंपनी सपोर्ट पुरवेल; मागील १०.०४ आवृत्ती लाँग टर्म सपोर्ट आहे. या आवृत्तीमध्ये लिनक्सचे नवीनतम् २.६.३५ आवृत्ती असणारे कर्नल वापरण्यात आले आहे.
» उबुन्टू १०.१० ची सीडी इमेज डाउनलोड करण्यासाठी http://ubuntu.com/ येथे जा.

Ubuntu CDs

Ubuntu CDs

*****

या रीलीजमधील करण्यात आलेले मोठे बदल खालीलप्रमाणे:

» आधीच्या रीलीजमधील F-Spot च्या जागी Shotwell हे डिफॉल्ट फोटो मॅनेजर म्हणून अंतर्भाव
» इतर अक्षर-शैली (font) वापरण्याऐवजी उबुन्टूने बनवलेल्या स्वतःच्या अक्षर-शैलीचा डिफॉल्ट फॉन्ट म्हणून अंतर्भाव (जो मला सर्वांत जास्त आवडला!)
» नेटबूक आवृत्तीमध्ये नवीन युनिटी इंटरफेस चा वापर

यानंतरची आवृत्ती, ११.०४, जीचे Natty Narwhal असे नामकरण करण्यात आले आहे, ती २८ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित करण्यात येईल. त्या आवृत्तीमध्ये Rythmbox ला बदलवून Banshee हे म्युझिक प्लेअर, डेस्कटॉप व्हर्जनमध्ये GNOME Shell च्या ऐवजी युनिटी युजर इंटरफेस, शिवाय मोझिला फायरफॉक्सची ४थी आवृत्ती आणि ओपन ऑफिस.ऑर्ग च्या जागी LibreOffice चा अंतर्भाव करण्यात येणार आहे.

*****

उबुन्टू १०.१० ची चित्र-ओळख व काही ठळक वैशिष्ट्ये:

(स्क्रीनशॉट्स रीसाइज करुन टाकल्यामुळे ते अस्पष्ट दिसताहेत, त्याबद्दल दिलगीर आहे.)
Maverick_10.10_Desktop

Ubuntu_10.10_Maverick


डेस्कटॉपच्या दृश्यपटलामध्ये मागील १०.०४ आवृत्तीमध्ये वापरण्यात आलेले Ambiance व Radiance या विषय-वस्तू चौकटी सजविण्यासाठी वापरण्यात आलेल्या आहेत, तथापि किंचीत बदल आहेत, जे की लगेच कळू शकतात.

App_menu_10.10_Maverick

App_menu_10.10_Maverick


Ambiance/Radiance थीम्समध्ये निवडलेल्या पर्यायाचा/वस्तूंचा/साधनांचा रंग नारंगी देण्यात आला आहे.

Volume_display_Maverick

Volume_display_Maverick


Rythmbox मध्ये जर तुम्ही गाणी वाजवीत असाल, तर वरच्या पॅनेलवरील Indicator Applet मधील आवाज कमी-जास्त करण्याच्या चिन्हावर क्लिक करताच तुम्हाला गाणे बदलण्याची, थांबवण्याची मुभा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Video_Maverick

Video_Maverick


High Definition चित्रफिती उत्कृष्ट व दर्जेदार क्वॉलिटीमध्ये बघण्याचा तुम्हाला अनुभव येईल!

Ubuntu Software Center_Maverick

Ubuntu Software Center_Maverick


सुमारे ३३ हजार मोफत सॉफ्टवेअर्स पैकी कुठलेही सॉफ्टवेअर अगदी सोप्या रीतीने एका क्लिकसह Software Center च्या आधारे इन्टॉल करा!

Ubuntu_One_Rythmbox_Maverick

Ubuntu_One_Rythmbox_Maverick


उबुन्टू वन वरील एका मोफत खात्याच्या आधारे मोफत ऑनलाईन गाणी ऐका, शिवाय २ GiB पर्यंत मोफत ऑनलाईन फाइल्स साठवा!

Nautilus_Maverick

Nautilus_Maverick


नॉटिलस सारखे अतिशय किफायती व फायदेशीर व वापरण्यास अत्यंत सुलभ असे फाईल ब्राउजर (मॅनेजर) वापरण्याचा आनंद घ्या!

Internet_Maverick

Internet_Maverick


माहितीची आंतरजालावर अत्यंत जलद गतीने देवाण-घेवाण करा. शिवाय चॅटिंग, सोशल नेटवर्किंग वरील मित्रांशी सर्वकाळ जोडलेले रहा!

टीप: उबुन्टू १०.१० मध्ये मराठीमधून टंकण्यासाठी “उबुन्टू १०.०४ मध्ये iBus द्वारे देवनागरीत टंकलेखन” हा लेख बघावा, या लेखातील सर्व क्रिया तुम्हाला १०.१० वर जशाच्या तशा वापरता येतील, फक्त सुरूवातीला m17n हे
पॅकेज इन्स्टॉल खालील कमांड वापरून इन्स्टॉल करा:

sudo apt-get install m17n

*****

लेखाबद्दल वा उबुन्टू वा इतर मुक्त स्रोत ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल आपणास असलेल्या शंका, अडचणी, अनुभव स्वागतार्ह आहेत!

धन्यवाद!

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. प्रिय विशाल
  तू हि linux बद्दल माहिती देत आहे त्याचेबद्दल हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!!!!!
  मी उबुन्टू १०.१० ची आवूती इंस्टाल केली, परतुं त्यावर facebook ,youtube चालत नाही तरी मार्गदर्शन करावे.(आमचेकडे proxy setting आहे)
  सर्वात महतवाची माहिती मला अशी हवी होती कि windows XP वर डॉट matrix प्रिंटर इंस्टाल आहे , ते प्रिंटर share केलेले आहे. मला उबुन्टू १०.१० वरून प्रिंट पहिजे ,प्रिंट दिले तर ती प्रिंट कशी येईल , त्या साठी काय सेत्तिंग करावे लागेल. तरी मार्गदर्शन करावे.

  अमोल
  9850124737

 2. अमोल,

  facebook ,youtube चालत नाही म्हणजे नक्की काय होते त्या बद्दल अधीक माहीती कळवू शकाल का ?
  facebook ,youtube मधे विशेष काही वेगळे नाही. जर बाकीच्या sites चालत असतील तर facebook ,youtube साठी problem यायला नको.
  तुम्ही कुठला browser वापरत आहात ? firefox मधे वरील दोन्ही sites छान चालतात.
  google chrome मधे पण चालतात. पण google chrome मधे देवनागरी font render करायला problem आहे.

 3. Hi Vishal,
  I have installed Ubuntu 10.10 on VM.
  Doyou know how can I access files stored on windows partition in Ubuntu?
  Satish

 4. hi vishal ,
  i have install ubuntu10.10 on my pc but i have got problems in plug-ins of firefox due to slow net. what to do??
  please help..
  instead of use of brodband.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME