वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

काय सांगता, “ग्रब लोडर”च गायब झालंय?

८ प्रतिक्रिया

जेव्हा तुमच्या संगणकाच्या MBR (Master Boot Record) मध्ये काही प्रॉब्लेम येतो, म्हणजे व्यवस्थित काम करीत नाही, तेव्हा तुमच्या डोक्याचा पार भुगा होत असणार!  हे सहसा तेव्हा घडते, जेव्हा ड्युअल बुट असताना (दोनपक्षा जास्त संगणक प्रणाल्या स्थापित केलेल्या असताना) तुम्ही विन्डोजची सिस्टीम पुनः स्थापित करता. MBR हे तुमच्या हार्ड डिस्कच्या प्रायमरी पार्टीशन मध्ये सर्वांत अगोदर असते, व यामध्येच संगणक चालू केल्या केल्या सुरू करण्यासाठीच्या महत्वपूर्ण आज्ञावल्या साठवलेल्या असतात.

GRUB Loder

GRUB Loader

जर तुम्ही तुमची एखादी लिनक्स फ्लेवर असलेली सिस्टीम विन्डोजसह ड्युअल बुट मोड मध्ये तुमच्या संगणकावर स्थापित केली असेल, तर संगणक सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या सिस्टीमवर काम करायचे आहे, त्यासाठी “सिस्टीम निवडा” असे उपलब्ध पर्याय जेव्हा दिसतात, तेव्हा तेथे एक बुट लोडर असतो, जो हे उपलब्ध सिस्टीम्स तुम्हाला निवडण्यासाठी दाखवण्याचे काम करतो. लिलो (लिनक्स लोडर?) आणि ग्रब लोडर हे मला नुकतेच माहीत झालेले प्रकार आहेत. त्यापैकी ग्रब बुट लोडरच सर्वसाधारणपणे सगळीकडे वापरला जातो. ग्रब लोडर हा MBR मधून लोड होत असल्याकारणाने जर MBR ला काही प्रॉब्लेम आला, तर ग्रब लोड होऊ शकणार नाही.

समजा तुम्हाला काही कारणास्तव (ह्म्म काही कारण नसतांनाही! 😉 )  लिनक्ससोबत ड्युअल बुट मोड मध्ये असलेली विन्डोज सिस्टीम (XP/व्हिस्टा/सेव्हन यांपैकी कोणतेही फ्लेवर) तुम्ही रीइन्स्टॉल (पुनः स्थापित) केली. तुम्हाला अजुनही जर अनुभव आला नसेल तर मीच सांगतो, तुमची विन्डोज सिस्टीम तर इन्स्टॉल होईल, पण अगोदर (रीइन्स्टॉल करण्यापूर्वी) विन्डोजला ड्युअल बुट मध्ये सोबत असलेली लिनक्स सिस्टीम मात्र तुम्हाला ऍक्सेस करता येणार नाही. विन्डोज रीइन्स्टॉल केल्यानंतर जेव्हा तुम्ही संगणक रीबूट कराल, तेव्हा तुम्हाला पहिल्याप्रमाणे बुट लोडर (ग्रब) दिसणार नाही व कसलेही पर्याय न दर्शवता बाय डिफॉल्ट विन्डोज बूट होईल. मग काय, झाला ना सत्यानाश, गेली की तुमची लिनक्ससुद्धा खड्ड्यात, त्या विन्डोजच्या नांदात…! आय ऍम ग्लॅड टू से, पण असं जरी होत असलं ना, तरी तुमची लिनक्स मात्र पहिल्यासारखीच चालू ठेवता येऊ शकते, आणि तीसुद्धा फक्त ५ ओळींच्या कमांड्सने… आश्चर्य वाटतंय ना, पण ते सहज शक्य आहे.

तुम्ही जेव्हा विन्डोज रीइन्स्टॉल करता, तेव्हा MBR मधले GRUB लोडर पुसले जाते (ओव्हरराईट होते), व त्यामुळे तुम्हाला लिनक्स इन्स्टॉल असुनही पर्याय दिसत नसल्यामुळे (ग्रब लोडरच हे पर्याय दर्शवतो ना!) तुम्ही लिनक्स ऍक्सेस करू शकत नाहीत. तर या लेखामध्ये, हे उडालेले ग्रब लोडर पुन्हा कसे दाखल (रीस्टोअर) करायचे ते बघणार आहोत.

 • सर्वात पहिले म्हणजे, तुम्ही लिनक्सच्या उबुन्टू फ्लेवरची (शक्यतो नविनतम आवृत्ती असणारीच वापरावी) सीडी/डीव्हीडी मिळवा किंवा एखाद्या टोरेण्ट साईटवरून त्याची .iso इमेज फाईल डाऊनलोड करून तीला सीडी/डीव्हीडी वर बर्न करा.
 • झाले, आता ती सीडी/डीव्हीडी बूट करा (BIOS मधून किंवा F12 ही कळ दाबून धरून CD/DVD/Removable Drive अशा प्रकारचा पर्याय निवडावा).
 • नंतर ह्यातील सर्वांत पहिला पर्याय, “try Ubuntu without installation” किंवा “boot as a live CD” अशा प्रकारचा पर्याय निवडा!
 • आता तुम्हाला उबुन्टू चे डेस्कटॉप काही वेळातच  दिसू लागेल. (लाईव्ह सीडीद्वारे बूट केल्यामुळे!)
 • ह्म्म, आता वरच्या बाजुच्या पॅनेवरील एकदम डाव्या बाजूच्या Applications ह्या मेन्यूमधून Accessories मधून Terminal हा पर्याय निवडा.
 • क्षणार्धात तुमच्या समोर टर्मिनल उघडेल!
  आता त्या उघडलेल्या टर्मिनल मध्ये खालील कमाण्ड्स स्टेप बाय स्टेप फॉलो कराः

पायरी १: पुढील कमाण्ड टाका. या कमाण्डमुळे ग्रब लोड होईल.

sudo grub

पायरी २: आता पुढील कमाण्ड टाका. यामुळे सध्या ग्रब हार्ड डिस्कच्या कोणत्या पार्टीशनमध्ये आहे, ते शोधेल.

find /boot/grub/stage1

तुम्ही वरील कमाण्ड एन्टर केल्याबरोबर तुम्हाला पुढीलप्रमाणे निकाल दिसेल.

(hd0,येथे एक अंक असेल)
उदा. (hd0,06)

पायरी ३: मागील पायरीमध्ये मिळालेला निकाल कॉपी करून खालील कमाण्डमध्ये पेस्ट करा.

root (hd0,येथे एक अंक असेल) #मागील पायरीत मिळालेल्या रीजल्टप्रमाणेच तो अंक असावा.
उदा. root (hd0,06)

पायरी ४: त्यानंतर पुढील कमांड एक्जिक्युट करावी.

setup (hd0)

क्षणार्धात ग्रब लोडर रीकव्हर केला जाईल. त्यानंतर संगणक रीबूट करावे, व तुमचा ग्रब पुन्हा काम करत असलेला तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर सीडी/डीव्हीडी आवश्यकता नाही.

************************************************************************************

धन्यवाद!

अजून काही शंका, अडचणी आहेत? (वरील माहिती व्यवस्थित कळाली नसेल, तर तेही कळवा!)

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. विशल्या, जबरदस्त रे…. मी हे करुन बघितलं “It Works..”
  अरे उबुन्टूच्या फोरमवर सुद्धा याची माहीती दिलेली नाही. Thanks…

 2. khup chan re vishlya..
  mala to problem aala hota mi aata jar punha aala tar nakki karun pahin……….
  keep it up. & sorry to write post in english ..

 3. धन्यवाद… मी ह्या प्रश्नासाठी बराच वेळ डोके खाजवले होते. पण लिनक्स मध्ये नवखा असल्याने फार काही हाती लागले नाही.

  एक सुपरग्रब नावाचे सॉफ्ट्वेअर आहे. त्याचा वापर होऊ शकतो का?
  कसा?

  गॅजेटकिडा – http://gadgetkida.blogspot.com/

  • विक्रम,

   सुपर ग्रब डिस्क ही GRUB वरच आधारीत एक प्रणाली आहे. जे लोक लिनक्सवर नव्यानेच स्विच झाले आहेत, त्यांना आलेल्या प्रॉब्लेम्स ही प्रणाली अगदी सहजतेने सॉल्व्ह करू शकते. विन्डोज आणि लिनक्स दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर ही प्रणाली खालीलपैकी सुविधा पुरवतेः

   GNU/लिनक्सः
   – MBR मध्ये ऍटोमॅटिकली GRUB/LILO रिस्टोअर करते.
   – लिनक्स बूट करते.
   – थेट लिनक्स बूट करते (इतर उपलब्ध ऑपरेटिंग सिस्टीम्सना न दाखवता)
   – लिनक्सचे पार्टिशन कार्यान्वित करते.

   विन्डोज XP/9x/2k/व्हिस्टा:
   – विन्डोजला बूट होतांना येणारे प्रॉब्लेम्स फिक्स करते.
   – विन्डोज बूट करते.
   – दुसर्‍या (तुमच्या मशीनसोबत न मिळालेल्या) हार्ड डिस्कवरून विन्डोज बूट करते.
   – दुसर्‍या एखाद्या ड्राईव्हमधून (उदा. C:\ मध्ये XP, D:\ मध्ये 2k असल्यास) दुसरी विन्डोज ओ.एस. बूट करते.

   शिवाय या प्रणालीचा वापर करून तुम्ही ड्राईव्ह्ज लपवू देखील शकता.

   डाऊनलोड कोठून करालः
   सुपर ग्रब डिस्क या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून (उजव्या पॅनेलमध्ये असलेल्या लिंक्स) तुम्ही ही प्रणाली तुमच्या विन्डोज किंवा लिनक्स फ्लेवर मध्ये उतरवू शकता व तुमचे वरील नमूद केलेल्या प्रॉब्लेम्सपैकी सॉल्व्ह करू शकता. शिवाय येथे तुम्हाला फोरमवर बरीच माहिती मिळेल (जसे की, डाऊनलोड/इन्स्टॉल करतांना येणार्‍या अडचणी व त्यांवर उपाय)…
   डाऊनलोड डॉट कॉम/ऑटो सुपर ग्रब डिस्क येथून तुम्ही तुमच्या विन्डोज मध्ये ती प्रणाली स्थापित करू शकता.

   तुम्हाला या प्रणालीच्या वैशिष्ट्यांविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही लिनक्स डॉट कॉम वरील डॉक्युमेण्ट वाचा.

   अजुन काही शंका?

   धन्यवाद!

 4. या पेक्शा बुट रेऔर्ड सेव्ह करुन रेस्तोर करने सोपे आहे असे वाटते.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME