वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

काही प्रश्न

११ प्रतिक्रिया

वेळे सोबत सारं काही का बदलतं ?
हसू कधी रडता रडता का आढळतं ?
मुके पणी शब्ध बोलके का होतात ?
सारं काही नजरेतूनच कस समजतं ?

भास होऊन तिचा तो का हसतो ?
नाही केला फोन म्हणून का रुसतो ?
रात्र भर तिच्या साठी का जागतो ?
चालता चालता रस्त्यात का वळतो ?

ओघळण्या आधी अश्रू का थांबतात ?
पण दुरावताना पापण्या का भिजतात ?
आठवणी ने पण सहज ती का लाजते ?
लिहिता लिहिता कधी ती मागे वळते ?

फक्त पाहण्या साठी फेरया तो का मारतो ?
दिसली नाही ती तर का शोधतो ?
सर्वात आधी समोर तीच का दिसावी ?
हवीशी वाटते तेंव्हाच ती का नसावी ?

पाहता क्षणी त्याला धडधड का होते ?
आपोआप पण नजर का झुकते ?
गालावरती हसू का उमलतं ?
आठवणींनी त्याच्या मन का बहरतं ?

संबंधित लेखन

 • डोळ्या मध्ये पाणी का बर यावे.
  जगताना मी जीवनातला
  आनंद जगुन घ्यावे.
  मग जाता जाता डोळ्या मध्ये
  पाणी का बर यावे.

  हसतं जगावे …

 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
 • काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला
  द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
  सुकुमारी…
 • ‘वणवा’
  ‘विवाहितेवर हिंजेवाडीत झालेल्या सामुहिक बलात्कार’ घटनेने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा…
 • तुकडे-
  माणसाने कागदाचे लहान-मोठे तुकडे केले

  त्यांची किंमतही ठरवली

  रुपये दोन, पाच, वीस, पन्नास-

PG

चैताली कदम

मी चैताली कदम मला वेग वेगवेगळ्या कला शिकायला खुप आवडतात आणि त्या सगळ्यान पर्यंत खुप सुंदर रीत्या पोहोचाव्यात असे मनापसुन वाटते
आयुष्यात चढ उत्तार हे येतच रहतात पण ते कसे पार करावेत ही कला शिकुन
आयुष्य खुप सुंदर पध्द्तीने निभवावे ही आवड.
आणि ब्लॉगस्पॉट वर मनोकल्प या नावने लिहिते .
माझा ब्लॉग
http://manokalp.blogspot.in/
हे लिखाण कॉपीराईट प्रोटेक्टेत आहे लिखाण कुठेही पब्लिश / प्रकाशित करण्या आधी लेखकाची परवानगी घेणे आवशक

 1. छान कविता लिहिता आपण .आणखी काळजाला भिडायला हवे. कवितेचा नवा फोरम शोधायला हवा. खूप जुन्या वळणाचा आहे .

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME