वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

काही लिनक्स कमांड्स – भाग १

९ प्रतिक्रिया
लिनक्स पेंग्विन

पेंग्विन |सौजन्य: spinics.net

लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून बघितल्यात, काही टेस्टिंग न करताच् दिल्या आहेत, पण त्यामुळे काही भलतंच होणार नाही, याची हमी मात्र मी नक्कीच् देऊ शकतो. हसण्यासारखी गोष्ट जरी असली, तरी नवख्यांसाठी ह्या कमांड्स नक्कीच फायदेशीर ठरतील, अशी आशा आहे! जर तुम्हाला आणखी काही माहित असतील, तर त्या सुद्धा येथे देण्याचा प्रयत्न करावा.

सध्याची उबुन्टू आवृत्ती

सध्या तुमच्या मशीनवर असलेल्या उबुन्टूच्या आवृत्तीबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठीची कमांड:

cat /etc/lsb-release

ffmpeg चा वापर करून स्क्रीन रेकॉर्ड करा
तुमच्या डेस्कटॉपवर चालू असणार्‍याचे हालचालींचे चित्रण करण्यासाठी बरेच सॉफ्टवेअर्स ffmpeg या डिपेण्डन्सीचा वापर करतात. कशाचाच वापर न करता, खालील कमांडद्वारे स्क्रीन कास्ट (avi, mp4, mpg, mpeg या आणि बर्‍याच लोकप्रिय फॉर्मॅट्स मध्ये) करता येईल:

ffmpeg -f x11grab -s 800x600 -i :0.0 /tmp/screencast.mpg

ह्म्म, पण यासाठी ffmpeg तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, ते इन्स्टॉल करण्यासाठी apt://ffmpeg असे तुमच्या उबुन्टूवरील फायरफॉक्समध्ये टाइप करून हिट एण्टर करा अन नंतर विचारल्यावर पासवर्ड देऊन इन्स्टॉल करा किंवा खालील कमांड टाइप करा:

sudo apt-get install ffmpeg

व्हिडिओ फाइलमधून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करणे
ffmpeg चाच वापर करून हे करता येईल.

ffmpeg -i व्हिडिओ_फाइल -acodec libmp3lame आउटपुट.MP3

ही कमांड इनपुट व्हिडिओ फाइलमधील ऑडिओ स्ट्रीम एक्स्ट्रॅक्ट करून आउटपुट मध्ये असलेल्या फॉर्मॅट (mp3, wav, wma, ogg इत्यादी) मध्ये फाइल रुपांतरीत करून त्याची कॉपी सेव्ह करेल…

याचसाठी

mplayer -dumpaudio -quiet व्हिडिओ_फाइल

ही कमांडदेखील वापरता येईल. (ह्म्म, पण यासाठी शिल्लकचे mplayer अन mplayer-nogui हे पॅकेजेस इन्स्टॉल करावे लागतील.)

अपग्रेड करणे
तुमचे उबुन्टू किंवा इतर डेबिअन जातीचा स्वाद त्यापुढील आवृत्तीमध्ये (उदा. उबुन्टू ९.०४ मधून डायरेक्ट १०.०४ होणार नाही या कमांडने, तर ९.०१ होईल!) अपग्रेड करण्यासाठी खालील दोन कमांड्स वापरा:

sudo apt-get update
sudo apt-get dist-upgrade

स्पेशल ग्रुपमधील पॅकेजेस शोधणे (rpm साठी)
कोणत्याही कॅटेगरीमधील RPM पॅकेजेस शोधण्यासाठी खालील कमांड उपयोगी पडेल:

rpm -qg "System Environment/Daemons"

अवतरण चिन्हातील जागी तुम्हाला हवी असलेली कॅटेगरी टाका.

चित्राच्या कडा कापून व्यवस्थित करणे:
कोणत्याही प्रतिमेच्या कडा व्यवस्थित कापून (trim) चांगले दिसण्यासाठी खालील कमांड वापरून पाहा:

convert -trim image.jpg output.jpg

sed द्वारे फाइलमधील रिकाम्या जागा उडवणे
फाइलमधील प्रत्येक लाइनच्या सुरूवातीला असणार्‍या रिकाम्या जागा (व्हाइट स्पेसेस/टॅब्ज) उडवण्यासाठी खालील कमांड्स पैकी एक वापरून पाहावी:

cat file.txt | sed -e 's,^ *,,'
किंवा
ruby -pe 'gsub(/^\s+/, "")' < file.txt

॑खास mime-टाइप च्या फाइल्स शोधणे:
एखाद्या स्पेशल माइम-टाइपच्या फाइल्स शोधण्यासाठी खालील कमांड वापरावी. येथे आपण व्हिडिओ फाइल्स शोधत आहोत:

find -type f -print0 | xargs -0 file -i | grep -i video

(साभार: महेश)


टॉप लिस्ट मध्ये फक्त तुमच्याच प्रोसेसेस दाखवणे

तुमच्या किंवा एखाद्या दुसर्‍या युजरच्या प्रोसेसेस बघण्यासाठी खालील कमांड वापरावी:

top -u `whoami`
किंवा
top -u युजरनेम

बाकी असलेली बॅटरी पॉवर चेक करणे
तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीची अजुन किती पॉवर बाकी आहे, हे तपासण्यासाठी खालील कमांड ट्राय करून पाहा, माझ्याकडून तरी जमले नाही, तुम्ही बघा:

acpi -V

उबुन्टू/डेबिअन वर संपूर्ण LAMP स्टॅक इन्स्टॉल करणे
खालील कमांडमध्ये LAMP (Linux-Apache-MySQL-PHP) साठीचे गरज पडणारे सर्व (? कदाचित नसतीलही!) पॅकेजेस आणि डिपेन्डन्सीज आहेत… जर काम नाही झाले तर एक-एक करून पॅकेज इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करा!

sudo apt-get install openssh-server openssh-client apache2 libapache2-mod-php5 php5-cli php5-common php5-cgi mysql-client mysql-common mysql-server php5-mysql php5-sqlite php5-gd phpmyadmin

RPM पॅकेज मधील फाइल्स पाहणे
एखाद्या RPM पॅकेज मध्ये कोणत्या आणि किती फाइल्स आहेत, त्यांची यादी पाहण्यासाठी खालील कमांड वापरून पाहावी:

rpm -ql पॅकेज_नाव

सध्याचे DNS सर्व्हर पाहणे
DNS ऍड्रेस पाहणे, ही माहिती /etc/resolv.conf या फाइलमध्ये असते.. तुम्हाला यामधील डेटा (म्हणजेच DNS server चा पत्ता आणि अल्टरनेट पत्तासुद्धा!)..

cat /etc/resolv.conf

टारबॉलद्वारे बॅक-अप घेणे
समजा मला माझ्या /home/vishaltelangre या डिरेक्टरीचा बॅकअप घेऊन ठेवायचा आहे:

tar -Puf backup.tar /home/vishaltelangre

Zip चा वापर
एखाद्या फोल्डरची कम्प्रेस्ड zip फाइल बनवण्यासाठी खालील कमांड वापरा:

zip -r File.zip Folder/


सर्व ऍक्टिव्ह नेटवर्क्स तपासणे

सर्व कार्यरत इंटरनेट कनेक्शन्स, त्यांचा प्रोटोकॉल, पाठवलेला/घेतलेला डेटा, लोकल ऍड्रेस, फॉरेन ऍड्रेस, सद्यस्थिती आणि PID/प्रोग्रॅमचे नाव यामध्ये पाहता येईल.

sudo netstat -tupl

ड्राइव्हची FAT फाइल सिस्टीम चेक/दुरुस्त करणे
उदा. एखाद्या युएसबी फ्लॅश-ड्राइव्ह (पेन-ड्राइव्ह) ला चेक करण्यासाठी (काही प्रॉब्लेम येत असल्यास):

fsck.vfat /dev/sdb1

वायरलेस नेटवर्क कार्डचे कन्फिगरेशन चेक करणे

iwconfig wlan0

MBR ची बॅकअप इमेज तयार करणे
MBR (Master Boot Record) ची एक बॅकअप कॉपी इमेज फाइलमध्ये साठवण्यासाठी आणि त्या इमेज फाइलद्वारेच रिस्टोअर करण्यासाठी खालील कमांड्स पाहा:

dd if=/dev/hda of=mbr.img bs=512 count=1 #MBR ची बॅकअप इमेज

dd if=mbr.img of=/dev/hda bs=512 count=1 #MBR रिस्टोअर करण्यासाठी

मशीन बुट झाल्यानंतरचे महत्वपूर्ण लॉग्ज
पहिल्या कमांडमध्ये बेसिक इव्हेण्ट्स दिसतात, दुसर्‍या कमांडद्वारे बुटिंग कर्नल च्या प्रोसेसेसबद्दलच्या इव्हेन्ट्स ची माहिती मिळते. या लॉग्जमुळे एखादे वेळी काही प्रॉब्लेम आला तर तो डायग्नॉस (शोधून दुरुस्त) करण्यास सोपा जातो.

tail /var/log/messages

tail /var/log/dmesg

वाय-फाय स्पॉट्स शोधणे
तुमच्या सिस्टीम नजीक असणारे वाय-फाय (WiFi) हॉट स्पॉट्स शोधण्यासाठी ही कमांड वापरा. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक व योग्य ते हार्डवेअर्स (ड्रायव्हर्स सहित) असायला हवेत…

iwlist wlan0 scan

सगळ्यांकडे wlan0 नसते, इथरनेट असल्यावर etho, eth1 असं काहीसं असू शकतं…! 😉

who कमांड
याद्वारे सध्या कोण-कोण लॉगिन आहे, शेवटच्या सिस्टिम बुटची वेळ, बंद पडलेल्या (dead) प्रोसेसेस, सिस्टिम लॉगिन प्रोसेसेस, ऍक्टिव प्रोसेसेस, इत्यादी माहिती बघता येते.

who -a

डेबिअन पॅकेजेस डाउनलोड करणे
काही वेळा तुम्हाला एखादे डेबिअन पॅकेज (उबुन्टू, कुबुन्टू इत्यादी साठी असलेले) इन्स्टॉल न करता नुसते डाउनलोड करून ठेवायचे असतील तर खालील कमांड वापरा. डाउनलोड झालेली फाइल /var/cache/apt/archives या ठिकाणी सापडेल.

apt-get -d install पॅकेजचे_नाव

HDD ची रिमोट होस्ट वर बॅकअप घेणे
तुमच्या लोकल हार्ड डिस्क (HDD) ची ssh वापरून रीमोट होस्ट वर बॅकअप घेण्यासाठी खालील कमांड वापरा:

dd bs=1M if=/dev/hda | gzip | ssh user@ip_addr 'dd of=hda.gz'

RAM चे स्टेटस
RAM ची फ्री मेमरी, वापरात असलेली मेमरी (सर्व मेगाबाईट्स मध्ये) पाहण्यासाठी खालील कमांड टाइप करा:

free -m

सिस्टिमचा होस्ट कोण?
सिस्टिमच्या होस्टचे नाव पाहण्यासाठी खालील कमांड वापरा:

hostname

रीबुट चा इतिहास
आतापर्यंत तुमची मशीन किती वेळा अन कधी-कधी रीबुट केली गेली, त्याचा इतिहास पाहण्यासाठी खालील कमांड वापरा:

last reboot

curl द्वारे FTP
तुमच्या रीमोट सिस्टीमला FTP (curl कमांडद्वारे) वापरून एखादी फाइल कॉपी करण्यासाठी खालील कमांड वापरावी, यासाठी तुमच्याकडे curl असणे आवश्यक आहे. अधिक माहिती या दुव्यावर सापडेल.

curl -T filename.txt -u username:password ftp://example.com/filename.txt

राग तर नाही आला ना?
राग तर नाही आला ना? | सौजन्य: IBM


…(क्रमश:)

संबंधित लेखन

 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • उबुन्टू १०.०४ मध्ये iBus द्वारे देवनागरीत टंकलेखन
  बर्‍याच जणांनी काही दिवसांपूर्वी  प्रकाशित केलेल्या “उबुन्टू १०.०४” लेखाला भरभरून प्रतिसाद दिला व…
 • उबुन्टू १०.१०
  परिचय-ओळख
  उबुन्टू १०.०४ नंतर, म्हणजे ६ महिन्यांनंतर कॅनॉनिकलने १० ऑक्टोबरला आपली नवीन आवृत्ती बा…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. धन्यवाद , अतिशय सपमर्क उत्तर दिल्याबद्दल.

  माझ्या मते लिनक्स + मराठी या दोन्हि एकमेकास सपमर्क आहेत. [ Sorry — I am trying to type in Marathi – but its taking too long – But believe me, All my next comments will be in Marathi for sure ]

  1. Free Operating system without hassle of virus and anti-viruses. Marathi Manoos now frees himself from paying unnecessarily for anti-virus software and for their most frustrating updates.

  2. Marathi person is [ and should ] most self- respected person. Why should he use pirated os / software when decent options are available at no cost.

  3. Computing in own language will facilitate to reduce the digital divide between who can use [ computer ] and who can not [ either afford or uneducated ]. We all need to actively promote, advertise computing in Marathi for benefit of Marathi person.

  4. Its shame on us that when we say that Marathi is spoken by more than 100 million people, but there is hardly any Marathi appearance in Digital world. This needs to change on ‘war-footings’. Marathimandali.com – are doing excellent job. But we need many more efforts in that direction. — Request google to start translation service for Marathi ? + request them to add Marathi news link may be good starters.

  बघा पटतय का ?

  ता.क. –> आपलि साइट गुगल क्रोम मध्ये न वाचन्या सारखी आहे.

  • गणेश,

   अगदी बरोबर बोललात… एवढं सगळं मोफत मिळत असतांना विकत घेऊन किंवा पायरेटेड कॉपीज वापरून संगणक वापरणे लोकांनी थांबवले पाहिजे… जास्तीत जास्त लोकांपर्यंत “ओपन सोर्स” पोहोचण्यासाठी जनजागृतीची नितांत आवश्यकता आहे, आम्ही हा आमच्या परीने केलेला एक प्रयत्न आहे, शेवटी आपल्यासारख्या वाचकांमुळेच आमचा आत्मविश्वास अजुनही उंचावलेला आहे व त्यामुळेच आम्हाला आलेले अनुभव व तुम्हा लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केलेले लेखन नक्कीच तुमच्या आवडीनुसार असेल, याची मी हमी देतो.

   गुगल क्रोम हे एक लाइटवेअर वेब न्याहाळक आहे, फायरफॉक्स बहुतेकांना न आवडण्याचे कारण म्हणजे ते तुमची प्रायमरी मेमरी अधिक वापरते, त्यामुळेच लोकं (कदाचित तुम्हीसुद्धा) क्रोमिअमला प्रथम पसंती देता. आता तर क्रोम मध्येसुद्धा फायरफॉक्सप्रमाणे ऍड-ऑन्स जोडता येत असल्याने अनेकांनी फायरफॉक्सला राम-राम ठोकलाय! पण शेवटी फायरफॉक्सची ताकद क्रोम/सफारी/ओपेरा यांच्या तुलनेने किती अधिक आहे, हे तुम्हालाही माहितच असेल. तुम्ही अनुभवल्यानुसार “मराठी मंडळी” क्रोम वर न वाचण्यासारखी आहे. अगदी बरोबर! क्रोमचा युनिकोड मराठी व इतर अनेक आंतरराष्ट्रीय भांषांकरिता सपोर्ट अजुनही “बीटा” स्वरूपातच आहे. खालील दोन स्क्रीनशॉट्सवरून तुम्हाला त्याची प्रचिती आली असेलचः

   – मराठी मंडळी “गुगल क्रोम” वरः
   MM_on_Chromium
   ह्या स्क्रीनशॉटमध्ये युनिकोड मराठीला क्रोमचा सपोर्ट किती ढिसाळ आहे, हे मी दर्शविले आहे, मोठ्या आकारात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

   – मराठी मंडळी “फायरफॉक्स” वरः
   MM_on_Firefox
   फायरफॉक्सवर काहीच अडचण नाही, सगळं काही अगदी व्यवस्थित, मोठ्या आकारात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

 2. Hi

  I had installed Ubuntu on my desktop but I couldn’t configure my BSNL brodband on it so un-installed and back to XP.

  Satish

 3. अरे विशाल प्रत्येक कमांड वापरण्यापूर्वी “help” आणि “man” पेज व्यवस्थित वाचून घेतले तर उत्तम. प्रत्येक कमांडची माहिती वापरण्यापूर्वी करून घेणे हे केव्हाही उत्तम. बाकी लेख छान..

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME