वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

काही लिनक्स कमांड्स – भाग २

२ प्रतिक्रिया

मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामुळे यावेळी जरा बेसिक आणि एकदम सोप्या कमांड्स या लेखात देण्याचा प्रयत्न करतोय… काही शंका असल्यास नक्की विचारा… सुचनाही स्वागतार्ह आहेत!

सिस्टीम चालू/बंद/रीबूट करणे

कमांडसंबंधित माहिती
shutdown -h nowसिस्टीम लगेच बंद करते आणि पुन्हा चालू (रीबूट) होत नाही.
haltवरील कमांडप्रमाणेच सर्व प्रोसेसेस बंद करण्याचे काम करते.
shutdown -r 5५ मिनिटांत सिस्टीम बंद करून पुन्हा रीबूट करते.
shutdown -r nowसिस्टीम लगेच बंद करून पुन्हा चालू (रीबूट) करते.
rebootसर्व प्रोसेसेस बंद करून सिस्टीम पुन्हा रीबूट करते. (वरील कमांडप्रमाणेच)

फाइल्स किंवा डिरेक्टरीज पाहणे/हलवणे/कॉपी करणे/उडवणे/तयार करणे

कमांडसंबंधित माहिती
pwdतुम्ही सध्या जेथे आहात, त्या डिरेक्टरीचा संपूर्ण पत्ता दर्शविते.
ls
किंवा
dir
सध्याच्या डिरेक्टरीमधील उपलब्ध फाइल्स व सब-डिरेक्टरीजची यादी दर्शविते.
ls -lसध्याच्या (current) डिरेक्टरी मधील उपलब्ध फाइल्सची व सब-डिरेक्टरीजची यादी लाँग फॉर्मॅट (परवानग्या, फाइल तयार होण्याची तारीख, आकार इत्यादी माहिती) मध्ये दर्शविते.
ls -Fसध्याच्या डिरेक्टरी मधील फाइल्स आणि डिरेक्टरीजची यादी दर्शविते, शिवाय त्यांची फाइल सिस्टिमसुद्धा दर्शवते. उदा. सध्याच्या डिरेक्टरी मधील Picture ह्या डिरेक्टरी मध्ये अजुन काही सब-फाइल्स आहेत, त्यामुळे या यादीमध्ये ह्या डिरेक्टरीला हायलाईट केलेले दिसेल, इतर रिक्त डिरेक्टरीजना वेगळा रंग आणि ठळक ऍट्रिब्युट असेल, तर साध्या फाइल्स सामान्य शैलीत दिसतील.
ls -aसध्याच्या डिरेक्टरीमध्ये लपवलेल्या (hidden) फाइल्स व डिरेक्टरीज सुद्धा दिसतात.
ls -laCसध्याच्या डिरेक्टरीमधील उपलब्ध फाइल्सची व सब-डिरेक्टरीजची यादी लाँग फॉर्मॅट आणि कॉलम्समध्ये व्यवस्थित मांडणी करून दर्शविते.
ls -R /directory_name/directory_name या डिरेक्टरीमध्ये असलेल्या सब-डिरेक्टरीज ट्री-स्ट्रक्चर मध्ये दाखवते.
ls m*सध्याच्या डिरेक्टरीमध्ये, फक्त m पासून चालू होणार्‍या नावाच्याच उपलब्ध फाइल्स दर्शवते.
ls *on*सध्याच्या डिरेक्टरीमध्ये उपलब्ध असलेल्या अशा फाइल्सची यादी दाखवते, ज्या फाइल्सच्या नावामध्ये on अशी अक्षरे आहेत.
ls ????सध्याच्या डिरेक्टरीमध्ये असलेल्या अशा फाइल्सची यादी दाखवते, ज्या फाइल्सच्या नावांमधील अक्षरांची संख्या ४ आहे.
ls ?on*ज्या फाइलचे नाव, “कोणतेही एक अक्षर+on+असंख्य अक्षरे” असे आहे, अशा फाइल्सची यादी दर्शवते.
rm filenameसध्याच्या डिरेक्टरीमधील filename नावाची फाइल उडवते.
rm /home/vishaltelangre/Pictures/Justin_Bieber.jpg/home/vishaltelangre/Pictures या डिरेक्टरी मध्ये असलेली Justin_Bieber.jpg ही फाइल उडवते.
rmdir Picturesसध्याच्या डिरेक्टरीमध्ये असलेली Pictures नावाची डिरेक्टरी उडवते. यामुळे फक्त एम्प्टी (रिक्त) डिरेक्टरीजच उडवल्या जातात.
rm -rf dir_namedir_name नावाची डिरेक्टरी (रिक्त असो वा नसो!) उडवली जाईल.
cp me.jpg /home/vishaltelangre/Picturesसध्याच्या डिरेक्टरीत असणार्‍या me.jpg या फाइलची /home/vishaltelangre/Pictures या डिरेक्टरीमध्ये एक प्रत (कॉपी) बनवते.
cp -r dir_name Desktopdir_name ही डिरेक्टरी डेस्कटॉप वर कॉपी केली जाईल. (या कमांडचा वापर मुख्यत्वे फोल्डर्स कॉपी करण्यासाठी जास्त केला जातो.)
mv old_name new_nameold_name नावाच्या डिरेक्टरीला पुनर्नामित (rename) करून तीचे नाव new_name असे करेल.
mv me.jpg /home/vishaltelangre/Picturesसध्याच्या डिरेक्टरीत असणार्‍या me.jpg या फाइलला /home/vishaltelangre/Pictures या डिरेक्टरीमध्ये हलवते.(move)
cat test.txttest.txt ह्या फाइलला तुमच्यासमोर रीड-ओन्ली (फक्त बघण्यासाठी) मोड मध्ये उघडते.
more filename ने एकावेळी १ पान, व बाकीचे पाने पाहण्यासाठी स्पेसबार दाबावे.
cat > newfilenameही कमांड एन्टर केल्यानंतर त्यामध्ये काही लिहा अन ctrl+d दाबा, यामुळे newfilename नावाची एक फाइल सध्याच्या डिरेक्टरी मध्ये तयार होईल.
touch test.txttest.txt नावाची एम्प्टी फाइल तयार करेल.
mkdir dirnamedirname नावाची एक डिरेक्टरी तयार करेल.
mkdir dir1 dir2 dir3 dir4dir1, dir2, dir3, dir4 अशा एकापेक्षा जास्त डिरेक्टरीज तयार करेल.
mkdir -p dir/dir1/dir2/dir3एकामध्ये एक, अशाप्रकारे डिरेक्टरीज तयार करेल, म्हणजे dir या डिरेक्टरीमध्ये dir1, dir1 मध्ये dir2 अशाप्रकारे…
या डिरेक्टरीज ट्री-स्ट्रक्स्चर मध्ये पाहण्यासाठी वर दिलेली कमांड वापरा किंवा खालील कमांड पहा:
ls -R dir

युजर ऍडमिनिस्ट्रेशन

कमांडसंबंधित माहिती
adduser accountname
किंवा
useradd accountname
accountname नावाचा नविन युजर ऍड करते.
युजर डिलिट करण्यासाठी userdel वापरावी
युजरची माहिती कधीही बदलण्यासाठी usermod ही कमांड वापरावी.
passwd accountnameaccountname या युजरसाठी नविन पासवर्ड सेट करते.
addgroup groupname
किंवा
groupadd groupname
groupname नावाचा नविन ग्रुप ऍड करते.
ग्रुप डिलिट करण्यासाठी groupdel वापरावी.
ग्रुप ला पासवर्ड सेट करण्यासाठी gpasswd ही कमांड वापरावी.
groupmod ने ग्रुपमध्ये इच्छित बदल करता येतात.
groupsसध्या लॉगिन असलेला युजर कोण-कोणत्या ग्रुप्सचा सदस्य आहे ते दर्शवते.
suसुपर युजर म्हणुन लॉगिन करते. (रूटचा पासवर्ड माहित असणे गरजेचे.)
sudo -iतुम्ही जर ऍडमिनिस्ट्रेटर युजर (sudoers फाइलमध्ये असाल) असाल तर रूट साठी असलेल्या काही परवानग्यांचा फायदा घेण्यासाठी ही कमांड वापरावी.
su accountnameसध्याच्या युजरला लॉगऑफ न करता दुसर्‍या accountname नावाच्या युजरला लॉगिन करण्यासाठी
exitसध्याच्या युजरचे सेशन शिवाय टर्मिनल लॉगिंग समाप्त करते.

फाइल परवानग्या (Permissions)

कमांडसंबंधित माहिती
chown ownername filenameएखाद्या फाइलची किंवा डिरेक्टरीची ओनरशिप (मालकी?) बदलण्यासाठी ही कमांड वापरतात.
उदा. root@vishaltelangre-laptop:/# ls -l
आउटपुट असे काहीसे असेल:
drwxr-xr-x 2 root root 4096 2010-04-20 19:29 abcd
(परमिशन) (ओनर) (ग्रुप ओनर) (साइझ) (वेळ) (फाइल/डिरेक्टरी नाव)
root@vishaltelangre-laptop:/# chown nitin /abcd
आता या उदाहरणामध्ये /abcd ह्या डिरेक्टरीचा ओनर nitin होईल.
root@vishaltelangre-laptop:/# ls -l
drwxr-xr-x 2 nitin root 4096 2010-04-20 19:29 abcd
chgrp group_owner_name filenameएखाद्या फाइलची/डिरेक्टरीची ग्रुप ओनरशिप बदलण्यासाठी ही कमांड वापरतात. वरील उदाहरणात सांगितल्याप्रमाणेच ही कमांड वापरावी.
chmod value file/directory_nameएखाद्या फाइल/डिरेक्टरीच्या परमिशन्स बदलण्यासाठी ही कमांड वापरतात.
ही कमांड अति-महत्वाची आहे, पण येथे जागेचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे ह्या कमांडविषयी एका स्पेशल पोस्टमध्ये मी नंतर लिहिण्याचा प्रयत्न करेन.

काही शिल्लकच्या कमांड्स

खाली काही शिल्लकच्या कमांड्स आणि त्यांबद्दल थोडीफार माहिती देतोय, पण त्यांचा उपयोग कसा करावा, हे पाहण्यासाठी

man command_name

ही कमांड वापरावी. याद्वारे तुम्हाला कोणत्याही कमांडविषयी सर्व माहिती मिळेल!

कमांडसंबंधित माहिती
cfdiskहार्ड डिस्कचे पार्टिशन करण्यासाठी
chattrएखाद्या फाइल/डिरेक्टरीचे ऍट्रिब्युट्स बदलण्यासाठी
clearतुमच्या टर्मिनल/कमांड प्रॉम्प्टचे स्क्रीन क्लिअर करण्यासाठी
cdडिरेक्टरी (फोल्डर) बदलण्यासाठी
calकॅलेंडर
dateआजची दिनांक
findएखादी फाइल शोधण्यासाठी
freeएकूण मेमरी, वापरलेली मेमरी, आणि मोकळी मेमरी दर्शवते.
gccC, असेंब्लर आणि प्री-प्रोसेस्ड C सोर्स फाइल्स कम्पाइल करण्यासाठी
grepएखाद्या फाइलमध्ये विशिष्ट पॅटर्न शोधण्यासाठी
hdparmडिस्कची माहिती
historyमागील काळात तुम्ही एक्झिक्युट केलेल्या काही कमांड्सचा इतिहास
killएखादी प्रोसेस रिस्पॉन्स देत नसल्यास तीला फोर्सफुली बंद करण्यासाठी वापरतात.
killall ह्याद्वारे विशिष्ट प्रकारे ग्रुप प्रोसेसेस किल करता येतात.
locateफाइल/डिरेक्टरी शोधण्यासाठी
lastशेवटच्या काही लॉगिन्स आणि रीबुट्स चा इतिहास
manएखाद्या कमांडविषयीची मॅन्युअल पाने
mergeएकापेक्षा अधिक फाइल्स मर्ज करण्यासाठी
spellएखाद्या फाइल मधील स्पेलिंग चुका शोधण्यासाठी
wcफाइलची साइज, शब्द, ओळींची माहितीधन्यवाद!

संबंधित लेखन

 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • उबुन्टू १०.०४ मध्ये iBus द्वारे देवनागरीत टंकलेखन
  बर्‍याच जणांनी काही दिवसांपूर्वी  प्रकाशित केलेल्या “उबुन्टू १०.०४” लेखाला भरभरून प्रतिसाद दिला व…
 • उबुन्टू १०.१०
  परिचय-ओळख
  उबुन्टू १०.०४ नंतर, म्हणजे ६ महिन्यांनंतर कॅनॉनिकलने १० ऑक्टोबरला आपली नवीन आवृत्ती बा…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. I operate linux in my office but i was problem to cancel print on winbee please tell me how to cancel print

 2. मला मराठीमधून सी प्‍लस प्‍लस प्रोग्रमिंग लँग्‍वेज शिकायची आहे क़पया त्‍याबाबतीत एखादी वेबसाईटची माहिती सांगा

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME