वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

केविन कार्टर

५ प्रतिक्रिया

पुलित्झर पुरस्कार फोटो

केविन कार्टर

१९९४, साली केविन कार्टर नावाच्या सॉउथ आफ्रिकन फोटोपत्रकाराने अत्यंत प्रतिष्ठित मानला गेलेला ‘ पुलित्झर पुरस्कार ’ ज्या फोटोने मिळवला तोच हा फोटो आहे. सर्व्हायवर-फीडिंग कॅम्पकडे खुरडत चाललेली ही लहान मुलगी आणि तिच्या मागेच काहीसे दूरवर तिच्या मरणाची वाट पाहत बसलेले गिधाड. तो म्हणतो की जेव्हां मला गिधाड दिसले तेव्हा चांगला शॉट मिळावा म्हणून मी अगदी काळजीपूर्वक गिधाडाचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेतली. गिधाडाने त्याचे पंख पसरावे याकरिता तब्बल वीस मिनिटे वाट पाहून हा फोटो घेतला. असे म्हटले आहे की, त्याला सांगितले गेले होते की पत्रकाराने तिथल्या लोकांना स्पर्श(कॉन्टॅक्ट ) करू नये कारण त्यामुळे कदाचित कुठल्यातरी रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला होऊ शकतो. फोटो काढून झाल्यावर त्याने त्या गिधाडाला पळवून लावले आणि त्या मुलीचे खुरडत खुरडत कॅम्पच्या दिशेने जाणे तो पाहत राहिला. कॅम्प जवळपास एक किलोमीटर लांब होता.
१९६० साली जन्मलेल्या केविनने आपली फोटोपत्रकारीता सॉउथ आफ्रिकेतील भूकबळींच्या जळजळीत वास्तवाच्या चित्रणानेच सुरू केली होती. पुरस्कार मिळाल्यावर स्वत:च्या आई-वडिलांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, ” या फोटोमुळे मला इतर कोणाही पेक्षा जास्त प्रशंसा मिळाली. कधी एकदा तुम्हाला माझी ट्रॉफी दाखवतो असे मला झाले आहे. माझ्यासाठी ही अतिशय मौल्यवान गोष्ट असून माझ्या कामाला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे. ” हा फोटो प्रसिद्ध झाला पुरस्कारही मिळाला.
हळूहळू मित्र-सहकारी विचारू लागले की चांगला फोटो यावा याकरिता तू वाट कशी पाहू शकतोस तेही त्या मुलीच्या मरण यातना पाहत. तू तिला काहीच मदत केली नाहीस का? म्हणजे तूही आणखी एक गिधाडच होतास तर. का त्याहीपेक्षा भयंकर. कारण गिधाड त्याचे अन्न म्हणून पाहत होते पण तू…….. यानंतर जुलै २७, १९९४ रोजी केविनने आंत्यतिक दु:ख व बोच( गिल्ट ) सहन न होऊन आत्महत्या केली. मरणापूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तो म्हणतो, ” सभोवताली मरत असलेले व मरून पडलेले जीव, दाहकता, तीव्र दु:ख…… अनेक दिवस उपासाने खंगलेल्या, जखमी झालेल्या मुलांच्या विवक्षित आठवणी माझी पाठ सोडत नाहीत…… “
हा फोटो आज इतकी वर्षे लोटूनही माझ्या स्मरणातून जात नाही. केविन कार्टर या एका संवेदनशील व्यवसायाने फोटोजर्नलिस्टने सुदानमधील भूकबळींचे जळजळीत वास्तव मांडले. मला अजूनही स्पष्ट आठवतेय, हा फोटो प्रसिद्ध झाला, केविनला अत्यंत प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. केविन अतिशय आनंदात होता. परंतु या गौरवानंतर जगभरातून केविनवर अतिशय टोकाची टिका झाली. त्याच्या वर्तनाचा जाहीर धि:क्कार झाला. खूप उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. आणि फक्त तीनच महिन्यांनी ३३ वर्षांच्या केविनने आत्महत्या केली.
वस्तुतः या जगात माणूस हा कमालीचा किंवा घृणास्पद वाटेल इतका स्वार्थी प्राणी आहे. कोणी म्हणाले की जर त्याला रोगराई होईल म्हणून कोणालाही स्पर्श करू नका असे सांगितलेले, म्हणून त्याने त्या मुलीला उचलून घेतले नाही. तर काही म्हणाले की इतक्या हृदयद्रावक प्रसंगात आपल्याला रोग होईल हा विचार मनात येऊच कसा शकतो? तिथे तर असे हजारो तडफडणारे जीव होते मग तो कोणाकोणाला मदत करू शकणार होता? एक ना दोन अनेक प्रकारे वाभाडे काढले गेले. त्याचबरोबर हजारो तडफडणाऱ्या मुलांपैकी एकाचा फोटो काढला म्हणून धिक्कार करणाऱ्या किती जणांनी किमान एकदा तरी उंची रेस्टॉरन्ट मध्ये न जेवता ते पैसे गरजूंना दिले? टिका करणे फारच सोपे आहे असेही मत होतेच आणि ते सत्यच आहे.
मुळातच तो फोटो काढण्याआधीही केविन सभोवताली भूकबळीच पाहत होता. व्यवसायाचा भाग झाला तरी माणसाचे मन हे सारे पाहून अतिशय दु:खी होणारच त्यात या फोटोमुळे झालेली निर्भर्त्सना आणि आपल्या वर्तनाचा आलेला टोकाचा गिल्ट….. केवळ व्यवसायाच्या नावाआड मीही डोळ्यावर कातडे ओढले, मी स्वार्थी झालोय? या जगात इतकी टोकाची विषमता का असावी? भुकेचे दाहक सत्य. यासारखे काळीज पिळवटून काढणारे प्रश्न त्याला सोसले नसावेत. पर्यवसान फक्त ३३ व्या वर्षी आत्महत्या. परंतु या फोटोमुळे जगभरातून मदतीचा प्रचंड ओघ सुदानकडे वळला असेल. अनेक जीव जगले असतील. म्हणजे या फोटोचा हेतू ’ तो ’ नसला तरी साध्य झाला.
ते होते खरेखुरे गिधाड. ज्याला जगण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या मरणाची-मासांची गरज आहे. आज आपल्याकडे असे अनेक प्रश्न-पिडीत-शोषित जीव आहेत, ज्यांचे जिवंतपणीच लचके तोडले जात आहेत. शेतकऱ्यांचा गेली काही वर्षे चाललेला निकराचा संघर्ष – झगडा आणि प्रशासनाची- सरकारची- काही मूठभर मातब्बर प्रतिष्ठित धनदांडग्याची लचके तोडणारी गिधाडी वृत्ती. यांच्यात आणि त्या फोटोत काय फरक आहे? शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा वाढलेला डोंगर, कधी अवर्षण तर कधी पूर यामुळे न आलेले पीक. पर्यवसान गहाण ठेवलेले शेत, जमीन, दागिने सहकारी संस्थांच्या/ सावकाराच्या घशात. परंतु यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे साधनच हिरावून घेतले जातेय. घरदार उध्वस्त-पोरंबाळं भुकेकंगाल झालेले पाहून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

गाडीचे कर्ज, टिवी-फर्निचर, फ्रीज, मोठ्यामोठ्या सहली इत्यादींचे कर्ज, विम्याचा हप्ता, घराचे कर्ज यांच्या बोज्यापोटी कोणी जीव देतोय का? कारण ही कर्जे जगण्याशी निगडित नसून सुखसोयींशी निगडित आहेत. सरकार कर्जमाफी-अनुदान पॅकेजेस अशी मोठीमोठी आश्वासने देतेय परंतु त्याआधी मुळातच पडलेल्या बोज्याने तिजोरी खालीच आहे ही बोंब मारलेली आहेच. सामान्य जनतेचा पैसा हडपून काही हजार करोड रुपयांची मालमत्ता बाळगणारे राजकारणी-सत्ताधीश-उद्योगपती फक्त स्वत:ची तुंबडी भरण्यात मग्न आहेत आणि सुखनैव झोपतही आहेत.

संबंधित लेखन

PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

  1. wow! very sensitive one everyone knows story but remarks you put @ end of blog are really touchy!
    everyone must think and do his own part for change process,
    thankx bhagyashree fro really nice article!

  2. namaskar bhagyashri..!! tujha lekh vachla , manavi manala sparsh karnare vichar tu ya lekhat lihile aahet .ya vicharat aajchi paristiti khup changlya ritine mandli aahe . pudhil lekhachi aaturtene vaat baghato…..!! all the best for your new article.

  3. निखिल, तुम्ही बराहा वापरून कुठेही मराठीत लिहू शकाल.धन्यवाद. 🙂

    कैलास, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME