वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

खारीचे योगदान

१६ प्रतिक्रिया

आपण सगळेच जण कधी ना कधी प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर पीतोच . पाणी पिऊन झाले की रिकामी बाटली कचऱ्यात फेकून देतो. ह्या दोन्ही क्रिया इतक्या अंगवळणी पडल्यात की ह्यामागच्या संभाव्य धोक्यांची व वस्तुस्थितीची कल्पना कानामागे टाकली जाते, दुर्लक्षिली जाते. माहीत असलेलेच पुन्हा वाचले गेले तर किमान काही दिवस तरी मन त्याचा पाठपुरावा नक्कीच करते, त्यासाठी हा प्रयत्न.

प्रदुषण

एका बॉटल्ड वॉटरची किंमत- साधारण $१.५० म्हणजे नळाच्या पाण्यापेक्षा १९०० पट्टीने जास्त. म्हणजे, आजच्या रिसेशन, महागाई च्या जमान्यात वर्षभरात बॉटल्ड वॉटरसाठी केवढा तरी पैशाचा अपव्यय.

पाणी प्लॅस्टिकमध्ये ठेवल्यामुळे विषारी द्रव्ये शोषून घेते [Bisphenol-A(BPA)] ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. ह्या बॉटल्सचे पॅकिंग, वाहतूक आणि शेवटी त्याची विल्हेवाट ह्या प्रक्रियेमुळे वातावरण खराब होते.

२००४ साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एका वर्षात २६,०००,०००,००० लीटरपाणी म्हणजे २८,०००,०००,००० प्लॅस्टिक बॉटल्स. त्यातील ८६% बाटल्या कचऱ्यात फेकल्या जातात. म्हणजेच दर सेकंदाला १५०० बाटल्या कचऱ्यात.

प्रदुषण

२६,०००,०००,००० पाण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक बॉटल्स बनविण्याकरिता १७,०००,००० बॅरल्स तेल लागते. ह्या एवढ्या तेलावर १,००,००० गाड्या वर्षभर धावू शकतात. शिवाय ह्याच्या उत्पादनामुळे वातावरणात २५,००,००० टन्सकार्बन डायॉक्साईड सोडला जातो.

$१००,०००,०००,००० म्हणजे १०० बिलीयन डॉलर्स इतके पैसे दरवर्षी प्लॅस्टिकबॉटल्स मुळे खर्च होतात. ह्यापुढे तर फेडरल बेलऑऊट पॅकेजही लहानच आहे.

आपण जर फक्त बॉटल्ड वॉटरच पीत असाल तर आपल्याला हे माहीत आहे का? तुम्ही पैसे खर्च करता व वातावरणात प्रदूषण वाढविण्यास मदत करता.जमिनीखाली असलेल्या पाणी धरून ठेवणाऱ्या खडकांचा थर प्रदूषित करता. ज्यामुळे विहिरीतून पाणी मिळण्याची प्रक्रिया कमी होते.

आता सोयीचे पडते म्हणून सगळेजण गाड्यांमध्ये ह्या प्लॅस्टिक वॉटर बॉटल्स ठेवतात. पण, गाडीत असलेली उष्णता व बॉटल्सचे प्लॅस्टिक ह्यामुळे तयार होणारी केमिकल्स आतले पाणी शोषून घेते. परिणाम ब्रेस्ट व इतर प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात.

आता ह्या बॉटल्स आपल्यापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या तापमानातून प्रवास करतात. म्हणजे, गोडाउन मध्ये २५ फॅ ते ८५ फॅ, ट्रक्समधून प्रवास १०० फॅ ते १५० फॅ, दुकानात माल उतरवणे-चढवणे ४५ फॅ ते १०० फॅ, दुकानात ५५ फॅ ते १०० फॅ व शेवटी आपले घर-गाडी. म्हणजे आतील पाण्यावर किती दुष्परिणाम झाले ते पाहा.

प्रदुषण

दरवर्षी १४ बिलीयन पॉउंडस टायर्स, कार्डबोर्ड बॉक्सेस, प्लॅस्टिक कप्स, बॉटल्स, कॅन्स, शीटस व इतर प्रचंड कचरा समुद्रात टाकला जातो. त्यातीलकाही समुद्राच्या तळाशी जातो तर काही मासे खातात. परंतु प्लास्टीकयुक्त कचरा पाण्यावरच तरंगत राहतो, मैलोनमैल प्रवास करतो. शेवटी कधीतरी कुठल्या न कुठल्या किनाऱ्यावर फेकला जातो. प्लॅस्टिक हे कधीही नष्ट होत नाही. म्हणजे शेवटी नुकसान आपले व सगळ्या प्राणिमात्राचे होते. अगदी अलास्काच्या दुर्गम प्रदेशातही प्लॅस्टिक बॉटल्स सापडल्या आहेत.

प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर व्यतिरिक्त आपण कसेही पाणी प्यायलो तर आपली पृथ्वी व आपले पाकीट हरेभरे ठेवायला खूपच मदत होईल. प्रत्येकाने लावलेला हातभार येणाऱ्या पिढीच्या भविष्यास काही अंशी कमी प्रदूषण निर्माण करेल.चला तर मग ह्याची अंमलबजावणी नक्की करून आपले खारीचे योगदान देऊयात.

[ अनेक उपयुक्त लेखांमधून वरील माहिती संकलित केलेली आहे. ]

संबंधित लेखन

 • यथा राजा तथा अधिकारी….

  आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त…

 • आकाश निळे का दिसते?
  लेखात समाविष्ट सामग्री:

  अभिसारण
  रेलिघचा अभिसारण नियम
  अभिसारणाची उदाहरणे
  सामान्यतः आकाश …

 • हत्तींचे संवादकौशल्य

  हस्त नक्षत्र लागले की हत्तीची प्रतिमा पाटावर रेखून त्याच्याभोवती फेर धरत ”ऐलमा पैलमा गणेश दे…

 • वसुंधरा दिवस २०१०
  आज २२ एप्रिल म्हणजे जगभर साजरा होणारा आपल्या धरणीमातेसाठीचा वसुंधरा दिवस.या निमित्ताने निरनिराळे …
 • गोंधळ
  विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा …
PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

 1. भाग्यश्री महोदया, छान महिती. धन्यवाद! मी निसर्गप्रेमी संत
  हा लेख वरील लिहिला आहे तो आपण वाचला असावा.

 2. Best Information which is need to read every indian.Try to upload in english at other website to reach each and every indian.Vedant Holiday Home

 3. mahatvachi mahiti dili ahe..ata amhi water bottle wicket ghayache talu ani steel kiva glass bottles waparu…
  pan lahan mule ji water bottles netat shalemadhye tyache kay? te pan dangerous ahe ka?

 4. जालन्दर बनकर म्हणतात:

  खुप माहितीयुक्त लेख आहे.आकडेवारी तर डोळ्यात आन्जन घालनारी आहे.प्रत्येकाणे जर थोडा विचार केला तरीही खुप साध्य होवू शकते.पण प्लास्टिक बाटलितले पाणि पिणे ही तर फॅशन झाली आहे.हा लेख तुम्ही मराटी व इन्ग्लिश वर्तमानपत्रामध्ये जरुर लिहावा.

 5. Why F.D.A has permitted to such companies if all these evils has been noticed to our health and also for enviroment

 6. पुरूषोत्तम, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  वेदान्त हॉलीडे होम, आभार.जरूर करेन.

  समीर,पाण्यातले प्रदुषण पाहता शाळेत जाणा~या आपल्या लहानग्यांना घरून पाणी देणे क्रमप्राप्त असल्याने नाईलाजच आहे. परंतु वॉटर बॉटल्स रोजच स्वच्छ केल्या जातात तसेच मुले घरी आली की लागलीच पाणी( उरले असल्यास ) आपण टाकून देऊन ती कोरडी करतो व पुन्हा ताजे पाणी भरतो. यामुळे निदान थोडी मदत नक्कीच होते. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

  जालन्दर, आकडेवारी फारच भयावह आहेच आणि आता त्यात अजून बरीच भर पडली असेलच. प्रत्येकाने अगदी स्वत:पुरता जरी विचार केला तरी खूप मदत होईल. धन्यवाद.

  सुधीर, हेच तर दु:ख आहे ना… प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

 7. HI,
  This is really nice study of Plastic uses and its losses.. why dont u upload and share through emails in English version also. We will spread this information through out the Internet.. I have few communities we will post this info there also.. even in Orkut , Facebook post all.. This is really gr8 gr8 information. Once should spread this..if u have english version drop me mail on my mail address…waiting for your reply.
  Thanks..Keep it up We proud of you!!!!

  Anup Deshpande

 8. भाग्यश्री, तुझा हा लेख मी माझ्या मराठी मित्र-मैत्रीणीना व नातेवाईकांना फोरवर्ड केला….इतकी चांगली माहिती संकलित करून मराठीत उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक! 🙂 असेच सुंदर व उपयुक्त लेख येऊ देत.

  सप्रेम
  अरुंधती

  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

 9. नमस्कार भाग्यश्री . .
  अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिलात
  धन्यवाद . .

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME