वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

जागे व्हा…..!!

० प्रतिक्रिया

माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या पिकला भाव मिळत नाही. सरकार कापसाला योग्य दर देत नाही, शेतकऱ्यांना योग्य सोई सुविधा पुरवत नाही. जो कापूस पिकवतो त्याचीच पोरं ठिगळं लावलेली कपडे घालतात अन् ज्याकडे पैसा असतो तो शंभराच्या नोटा काड-काड वाजवून नवनवीन कपडे बाजारातून विकत घेतात. खरेतर हे सरकार काहीच करू शकत नाही आणि असल्या सरकारला आपण मतदान करून विजयी करतो ही आपली एक शोकांतिका आहे.

बी-बियाणं महाग झालेत, त्याच्याच जोडीनं खतांच्याही किमती वाढत आहेत. मग पेरणीसाठी कर्ज काढावे लागते. ते फेडता फेडता नाकी नाऊ येते. पेरणी जरी केली तर त्यात पावसाचा काय भरवसा, पाऊस पडला तर पडला नाही तर  दुष्काळच. कधी वेळेवर येऊन मेघराजा बरसतो, अन् कधी अचानकच पडून उभ्या पिकाची नुकसानी करतो. पिकला पाणी द्यायच्या वेळेस नेमकी वीज रहात नाही. पोटच्या पोरापरी वाढवलेलं पिक नजरेसमोर करपतं. त्यातूनच जर पिक उभारले अन् जोमाने वाढले तर पिकाला योग्य हमी भाव मिळेल ला नाही याचा काहीच भरवसा नाही.

मुठभर पिकला हाताशी धरून तो स्वतःच्या अन् स्वतःच्या बायका-पोरांच्या आयुष्याचा जुगारच खेळत असतो. बाजारात योग्य भाव मिळाला तरच सावकाराचे देणे फिटेल, मुलीचे लग्न होईल, मुलाचे शिक्षण पूर्ण होईल. लग्नानंतर बायकोच्या अंगावर गुंजभर सोनं पण नसतं पोरांच्या सुखापाई ते सावकाराकड गहान पडलेले असते. यंदा पैसा आला तर पोरी चे लग्न नाही तर यावर्षीही तिची कूस उजवायची राहिली.

शेतात जे पिकतं ते आमच्या पोरांच्या ताटात नसतं, कधी माझा शेतकरी बांधव आपल्या लेकरांना मोत्याचा घास सुद्धा भरवू शकत नाही एवढा हतबल झालेला असतो. बायकापोरांच्या किमान गरजा सुद्धा तो भागवू शकत नाही. सावकाराकड गहाण पडलेली जमीन, अन् त्यावर वाढणारे व्याजा वर व्याज, दररोज देणेकरी दारावर पैसे मागायला येतात. या सर्वानी तो इतका खचतो की त्याच्या समोर जीव देण्या समोर पर्यायच उरत नाही. अन् गळ्याला फास घेऊन किवा कीटकनाशक पिऊन तो स्वतःला संपवतो.

मी कोणत्या पक्षाचा नाही, जातीचा नाही अथवा यातून मला कोणता फायदा होतोय असेही काही नाही. मी एक माणूस आहे, ऐक शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेलो आहे. अन् त्यांच्या या परिस्थितीला पाहून माझ्या आतड्याला पिळ पडतोय. आज हा लेख वाचून एक माणूस जागा झाला तर उद्या दहा होतील. जेव्हा माझ्या शेतकऱ्यांची व्यथा सरकारला समजेल अन् प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात सुख समृद्धी नांदेल तेव्हाच माझ्या जन्माचे सार्थक होईल.

या लेखा मद्धे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर आम्ही क्षमस्व.
किरण मोरे.

संबंधित लेखन

 • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
  सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
 • १४ एप्रिल ची मिरवणूक
  येत्या १४ अप्रीलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येणार आहे. दरवर्षी येणारी ही बाबासाहेबांची ज…
 • शोध जीवनाचा…

  कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती झाली. रसायनांच्या, वायुंच्या वेगवेगळ्या अभिक्र…

 • ‘वणवा’
  ‘विवाहितेवर हिंजेवाडीत झालेल्या सामुहिक बलात्कार’ घटनेने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा…
 • आपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह…
  २००७ च्या शेवटी कधीतरी alvin and the chipmunks चित्रपट पाहिला. ऍनिमेटेड चित्रपट पाहायला वयाचं बंध…
PG

किरण मोरे .

मी कसा आहे हे कधी कधी मलाच कळत नाही… शब्द तर खूप असतात व्यक्त होण्यासाठी… पण कोठुन सुरवत करु हेच कळत नाहि.
शब्द कमी पडतात सांगताना….
तरी हि सांगतो ….मी माझा….
एका सर्वसामान्य कुटुंबातून आला हा मुलगा…काही तर बनायचे आहे..स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करायची आहे…हे स्वप्न उराशी बाळगून मी माझे पहिले पाउल मुंबापुरीत ठेवले…सुरवातीला खूप त्रास झाला , पण धावत्या मुंबई बरोबर धावणे मलाही जमले…त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले …
खरंतर मला ,,
कविता करायला आवडतात…वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवेडते …निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवेडते…स्वप्नात रमायला आवेडते…

एकटी स्वप्न माझी ,
मी स्वप्नातही एकटा,
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा…….!!!!

या मुंबापुरीत आल्यापासून खूप काही शिकायला मिळाले ..
काही चांगल्या तर, काही वाईट गोष्टी…
येथे चांगले मित्र भेटले ..सर्व काही आहे माझ्याकडे…
पण आता असे वाटू लागले आहे कि,या मुंबईच्या गर्दीत मी स्वतःलाच हरवून बसलो आहे …असो ,
मी कसा आहे हे कधी कोणालाच कळले नाही….काही बोलतात एक उनाड…काही बोलतात खूप डांबरट आहे…तर काही म्हणतात खूप प्रेमळ आहेस तु….
मी कसा आहे , बघा तुम्हालाच समजतंय का ???आणि नंतर प्लीज मला सांगायला विसरूनका हं …..!!!!!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME