वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

जेव्हा तो लढला होता

२ प्रतिक्रिया
जवळपास सहा महिन्यांपूर्वी
टेनिसन ची The Charge of the Light Brigade हि कवीता माझ्या वाचण्यात आली.
हि सहाशे इंग्रज सैनिकांवर केलेली कविता , ज्यात जीवाची पर्वा न करता चालून
जाणार्या सैनिकांचं वर्णन केल होत. हि कविता वाचल्यापासून माझ्या डोळ्यांपुढे सतत
मुरारबाजी सोबत दिलेरखानाशी लढलेले सातशे मराठे येत. पुरंदरला दिलेरखानच्या
तावडीतून सोडवायचा निकराचा प्रयत्न करताना मुरारबाजीने पराक्रमाची शर्थ केली.
क्षणभर दिलेर खानालाही  वाटून गेल कि असा मर्द आपल्या फौजेत हवा . त्यान
मुरार्बाजीना कौल दिला , जहागीरीच आमिष दाखवलं. मुरारबाजीने ते नाकारलं आणि
स्वराज्याशी इमान राखल. हा प्रसंग मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
दख्खन वरती चालून आली मिर्झा राजांची स्वारी | सोबतील दिलेरखान अन फौजफाटा होता भारी|
जिंकायचं स्वराज्य, वाढवायचा रुबाब दरबारी| ठाऊक न बिचार्यास कि महाराजांची माणस आहेत न्यारी |

दिलेरखानास बिलकुल निघत नव्हता दम थोडा| सासवडला येताच त्यान दिला पुरंदरास वेढा|
रुद्रमाळ नि पुरंदरावर चालू झाला मारा जोरदार | पण पुरंदरचा किल्लेदार हि होता तेवढाच तालेवार |

हळूहळू खानाने पुरंदरचा वेढा आवळला |तोफांच्या माऱ्यापुढे एक दिवस वज्रगड हि पडला|
जणू कुणी पुरंदरचा खड्गहस्तच तोडला |तोफांचा मारा आता पुरंदरच्या माचीला जाऊन भिडला|

त्यातच एक दिवस सफेद बुरुजावर सुरुंग उडाला | सहज किल्ला जिंकण्याच्या स्वप्नात खान बुडाला|
पण तोफांच्या मार्यानेही मागे हटेनात महाराजांची मानसे|डरली न तोफांना दोन असो कि दोनशे|

तेव्हा दिलेरखानाने ठरवलं रचायचा सुलतानढवा | आता एकाच फटक्यात पुरंदरचा घास घ्यायला हवा|
गोळा केले त्याने पाच हजार कडवे बहलीये पठाण |ज्यांच्या तलवारीला सदैव दुष्मनाच्या रक्ताची तहान |

पाहत होता गडावरून हि तयारी मुरारबाजी|समशेरीचा शेर अन मैदानात रणगाजी|
त्यान ठरवलं आता पलटूया हि बाजी |उधळायचा डाव खानाचा असा निश्चय मनामाजी
|

सातशे मराठी मर्दानी उचलली मग ढाल तलवार |भाळी लावला भंडारा बोलत जय मल्हार |
खानाला दाखवण्या निघाले मराठी जोहार |हरहर महादेव गर्जत रणी तळपू लागल मराठी हत्यार|

मुरारबाजीच्या अंगी जणू प्रलयभैरव संचारला|शिवासाठी पुन्हा एकदा वीरभद्र रक्ताने न्हाला|
पाहून पराक्रम त्याचा खानही क्षणभर दिपला|असावा असा रुस्तुम संगती हा मोह त्याला पडला |

ये चाकरीत शहाच्या करू आम्ही तुझी सर्फराजी|घे कौल तू शहाचा ऐक एवढी गोष्ट माझी|
कौल तुझा लखलाभ तुला स्वराज्य हि दौलत माझी | समशेरीने उत्तर देण्या झेपावे मुरारबाजी |

आता मुरारबाजीला लागला एकच ध्यास| घेवून खानच्या नरडीचा घास तोडायचा पुरंदरचा फास|
तितक्यात खानच्या बाणान साधला होता डाव |कंठनाळ छेदत मुरारबाजीच्या वर्मी पडला होता घाव|

शिर कटूनहि मुरारबाजीचा देह रणांगणी झुंजला | स्वराज्यासाठी महाराजांचा रुस्तुम रक्तात रंगला|
कशी पैदा होतात अशी माणसे सवाल खानास पडला| कालभैरव बनून जेव्हा मुरारबाजी पुरंदरी लढला |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२६ / १२/२०११

संबंधित लेखन

 • प्रेममयी
  मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती…
 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
 • काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला
  द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
  सुकुमारी…
 • ‘वणवा’
  ‘विवाहितेवर हिंजेवाडीत झालेल्या सामुहिक बलात्कार’ घटनेने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा…
 • डोळ्या मध्ये पाणी का बर यावे.
  जगताना मी जीवनातला
  आनंद जगुन घ्यावे.
  मग जाता जाता डोळ्या मध्ये
  पाणी का बर यावे.

  हसतं जगावे …

PG

परिमल गजेंद्रगडकर

माझा ब्लॉग = http://gparimalv.blogspot.com/

 1. ce, so e book yourself daily out with the help of some friends and trawl your shops Most likely you may find what you’re looking for.
  If you could make wedding favors by yourself then you need to sit decrease and choose what you’ll make, could potentially be great fun whilst your choice is definitely endless, would you like trinket boxes with the traditional almonds or it could be a sheet of wedding food, or even a small offer of some type.
  The wedding mementos aren’t required to be edible ce, so e book yourself daily out with the help of some friends and trawl your shops Most likely you may find what you’re looking for.

  If you could make wedding favors by yourself then you need to sit decrease and choose what you’ll make, could potentially be great fun whilst your choice is definitely endless, would you like trinket boxes with the traditional almonds or it could be a sheet of wedding food, or even a small offer of some type.

  The wedding mementos aren’t required to be edible they may be something that can be kept because of your guests for a considerably long time.Pink ones for ladies blue varieties for space maybe, remember that they will be part of your table decor so want to be in preserving whatever else you could be having shared.There also are some attractive materials to choose from so you may could help to make little small cloth bags that can be decorated by using ribbons plus flowers like these may look lovely contained in the table decorations and perhaps a little quicker to make which the trinket box.

  Remember are unable to want whatever to difficult because you might have a great number of or more in making.Also will not leave it to late to settle on your wedding mementos as you can’t want that they are rushed along at the last hour as generating them turns into a laborious task.Decide on your wedding wedding favors and but the necessary gear and then you could make one or two each daytime, believe everyone it incredibly therapeutic.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME