वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

ज्ञात – अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत!!!

५ प्रतिक्रिया

भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची आज ८७वी पुण्यतिथी. २३ मार्च १९२३ रोजी या तिघांना फाशी दिले गेले. इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. हे तिघे यांच्या जहाल ( इंग्रजांच्या मते ) देशभक्ती-देशप्रेम व निधड्या वृत्तीमुळे इंग्रजांना अतिशय डोईजड झालेच होते. संपूर्ण हिंदुस्तानात जहाल क्रांतीची धगधगती मशाल पेटली होती. कुठल्या न कुठल्या आरोपाखाली लवकरात लवकर यांचा बंदोबस्त इंग्रजांनी केलाच असता. हे तिघे व अनेक क्रांतिकारी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते. इंग्रजांच्या गुलामीतून तर भारत मुक्त झाला. हजारो वीरांनी आपल्या प्राणांची-घरादाराची आहुती देऊन आपला भारत देश गुलामगिरीच्या जोखडातून सोडवून येणाऱ्या पिढीला एक खुशहाल आपला भारत देश मोकळा श्वास घेण्यासाठी दिला. त्यावेळी इंग्रज हे एकमेव व संपूर्ण हिंदुस्तानाचे शत्रू होते. परंतु ज्या कारणांमुळे इंग्रजांनी आपली पावले इथे रोवली आणि राज्य केले तीच कारणे, अंतर्गत कलह-बंडाळ्य़ा-स्वार्थ मात्र आजही तशीच आहेत.

भगतसिंग-राजगुरू-सुखदेव ज्ञात – अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत!!!

शहीदांना सलाम ठोकले-उगाच दोनचार कार्यक्रम केले ( तेही कोणाला आठवण राहिली तरच …..), यानिमित्ते मिडियासमोर मिरवले…….” अहो, म्हणून तर केला ना हा दिखावा…. नाहीतर आम्हाला काय घेणं देणं हो…. ते देशासाठी बलिदान वगैरे आम्हाला काही समजत नाही…… आणि गरजही नाही. ” खरेच आहे ना…… जी गोष्ट आयती ताटात फुकट वाढून मिळते त्याची किंमत नसतेच. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला आणि भ्रष्टाचार- नेतेगिरी-गुंडगिरी यांच्या तावडीत अडकला, अडकतच गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे व तमाम क्रांतिकारी फक्त इतिहासाच्या पानातच राहिले. त्यातही काही ठिकाणी चक्क ते आतंकवादी होते असेही म्हटले आहे. इंग्रजांनी आतंकवादी म्हटले तर समजून घेता येईल पण चक्क आपल्यातील काही लोक त्यांना आतंकवादी म्हणतात म्हणजे……….. तर कुठे गांधीजींनी या तिघांची फाशी थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत हा वाद. परंतु भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या विचारसरणीचा, देश स्वतंत्र का व कशातून झाला पाहिजे या दृष्टिकोनाचा कोणीही विचारच करत नाही. समोर दिसणाऱ्या शत्रूशी निदान निकराने व एकमुखाने लढता तरी येते. परंतु या न दिसणाऱ्या व तहहयात पोखरणाऱ्या आपल्यातील स्वार्थाशी – स्वार्थी प्रवृत्तींशी कसे लढायचे? आजकाल तर अनेक मुलांना हे क्रांतिकारी माहीत तरी असतील का, अशी शंका येते. पाठ्यपुस्तकातून धडेच्या धडे – हा इतिहासच इतिहासजमा करून टाकला जात आहे. उरलासुरला एकमेव मार्गही उखडून टाकला जाताना दिसतो. निदान एखादी लाट यावी तसे ते चार-पाच सिनेमे आले म्हणून तरी बऱ्याच मुलांना यांनी केलेले महान कार्य-त्याग समजला. ( दुर्दैव सिनेमे पाहून समजला पण समजला हे जास्त महत्त्वाचे . ) फक्त स्वकेंद्रित होऊन जगण्याने आपण सारेच देशाला कुठे घेऊन गेलो आहोत आणि जात आहोत हे पाहिले की भीती वाटते. या सगळ्या वीरांचे बलिदान सार्थकी लागलेय का? याला आपणही जबाबदार आहोतच. मूठभर शोषण करणाऱ्यांना आपण आपले शोषण करू देतो म्हणजे आपणही तितकेच दोषी. भगतसिंग शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा आपण मात्र सुखनैव राहावे ….. नाही. भगतसिंग आपल्या प्रत्येकाच्या घरी जन्माला यायला हवा तरच कदाचित……..

संबंधित लेखन

PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

  1. “शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,
    वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा”

  2. SAWARKAR DEKHIL SWATANTRYA NANTAR BARECH DIWAS TURUNGAT HOTE. HYA SARVACH LOKANCHE KARYA MAHAN AHE. PAN HALU HALU HYANI KELELE KARYA KUTHECH ADHAL NAR NAHI, VA TEHI ITIHAS JAMA HOIL. FAKT RAHTIL TE GANDHI ANI NEHRU.

  3. विवेक, अगदी सत्य बोललात. अनेक लोकांना सावरकर माहीतही नसतील. दुर्दैव. 🙁

  4. navin pidhiche itihas far kache hot chalale ahe..pan hyasathi gharatlya senior lokanich pudhakar ghyayla hava..mulana swatantrya sathi ladhnarya mahan wyaktinche yogdan mahiti karun dile pahijel..
    pratyek bharatiya nagrickache te kartavyach ahe…he pidhyan pidhya chalu thevale pahijel.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME