वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

डोळ्या मध्ये पाणी का बर यावे.

२ प्रतिक्रिया

जगताना मी जीवनातला
आनंद जगुन घ्यावे.
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.

हसतं जगावे जीवन सारे
दुखः न समजु द्यावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.

खंत नसावी कशाची मज
रहीले काय असावे.
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.

निभावली सारी नाती गोती
उरले काय आसावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.

मरताना मज चेहे-यावरचे
दुखःन कोणा दिसावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.

त्रुप्त दिसावे जातान आन
कोनास न काही उमजावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.

संपले सारे जीवन आता
सुखात मी निजावे
मग जाता जाता डोळ्या मध्ये
पाणी का बर यावे.

चैतलि कदम

संबंधित लेखन

 • काही प्रश्न
  वेळे सोबत सारं काही का बदलतं ?
  हसू कधी रडता रडता का आढळतं ?
  मुके पणी शब्ध बोलके का होतात ?
  सार…
 • काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला
  द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
  सुकुमारी…
 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
 • ‘वणवा’
  ‘विवाहितेवर हिंजेवाडीत झालेल्या सामुहिक बलात्कार’ घटनेने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा…
 • जेव्हा तो लढला होता
  जवळपास सहा महिन्यांपूर्वी
  टेनिसन ची The Charge of the Light Brigade हि कवीता माझ्या वाचण्यात आली…
PG

चैताली कदम

मी चैताली कदम मला वेग वेगवेगळ्या कला शिकायला खुप आवडतात आणि त्या सगळ्यान पर्यंत खुप सुंदर रीत्या पोहोचाव्यात असे मनापसुन वाटते
आयुष्यात चढ उत्तार हे येतच रहतात पण ते कसे पार करावेत ही कला शिकुन
आयुष्य खुप सुंदर पध्द्तीने निभवावे ही आवड.
आणि ब्लॉगस्पॉट वर मनोकल्प या नावने लिहिते .
माझा ब्लॉग
http://manokalp.blogspot.in/
हे लिखाण कॉपीराईट प्रोटेक्टेत आहे लिखाण कुठेही पब्लिश / प्रकाशित करण्या आधी लेखकाची परवानगी घेणे आवशक

 1. कविता बर्यापैकी जमली आहे . मात्र कवितेचा आकृतिबंध जमला नाही. कविता खूपच जुन्या वळणाची , जुन्या घटनीची वाटते .

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME