वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

नात्यांतील अस्थिरता

१ प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

त्याची गाडी जुनी होती पण अतिशय सुंदररीत्या काळजी घेतलेली होती. स्वतःच्या गाडीला बाहेरुन व्यवस्थित ठेवणारी माणसे बरीच आहेत. परंतु स्वतःच्या मुलाच्या तब्येतीची काळजी घेतो तशी वाहनाच्या स्वास्थ्याची काळजी घेणारे विरळा असतात. मुलगा एकदा खोकला तर जास्त वाट न बघता आपण त्याला सुंठीचे चाटण देतो पण एखादे दिवशी गाडी पहिल्या झटक्यात सुरु झाली नाही तर लगेच बॉनेट उघडणारे कितीजण असतात? परंतु त्या गाडीची गोष्ट निराळी होती आणि बघितल्यावरच तीच्या मनातील आनंद स्पष्टपणे दिसत होता. गाडीच्या मालकाची चालविण्याची पध्दतही गाडीला जबरदस्तीने फर्मान सोडल्यासारखे नसून गोडीगुलाबीने चालविण्याचे होते. परंतु आता फारचवेळा मेकॅनिककडे नेण्याची वेळ येत असल्याने नवीन गाडी घ्यायची वेळ आली होती. इतके वर्षे घरच्या माणसासारखे गाडीला सांभाळले असल्याने तीला सोडायची तयारी होत नव्हती पण इलाज नव्हता. अशी जुनी गाडी न वापरता तशीच ठेवली तर लगेच नादुरुस्त होणार असल्याने तीला विकण्यातच सर्वांचे(गाडीचेसुध्दा) भले होते पण गाडीशी असे ‘कामापुरता मामा’ पध्दतीने वागणे निर्दयी वाटत होते.

शाश्वत नाते

आपण एखाद्या वस्तूवर वा व्यक्‍तीवर प्रेम केले की नकळत त्यांच्याबरोबर एक बंधन निर्माण करतो आणि त्या बंधनाला चिरस्थायी बनवून जीवन जगायला लागतो. परंतु आपल्या आयुष्यात निर्गुण भगवंताखेरीज एकही गोष्ट शाश्वत नसल्याने आपण ज्या वस्तूशी नाते जोडलेले असते ती आणि आपण स्वतः बदललेलो असतो याचे भान आपणास नसते. गवताचे पाते ज्या सूक्ष्म गतीने वाढते तसा आपल्यामध्ये होणारा बदल काही काळाने अचानक जाणवितो आणि मनात पक्क्या ठरविलेल्या नात्यांना परत उजाळा द्यायची वेळ येते. अशावेळी मनाची पाटी कोरी नसेल तर फार कठीण प्रसंग येतो. उदाहरणार्थ, स्वतःच्या गुरुंबरोबर असलेले आपले नाते हळूहळू बदलत असलेले अर्जुनाला जाणवत नव्हते असे नाही पण त्यांचा वध करण्याइतपत ते बदललेले आहे हे कळल्यावर तो हादरला आणि त्याचा स्वतःच्या जगण्यातला रसच निघून गेला. नाती जोडण्यामध्ये धोका नसतो. परंतु एकदा बांधली गेलेली नाती आयुष्यभर तशीच राहणार आहेत असे जो मानतो त्याने स्वतःला फार कमकुवत बनविलेले असते. अशावेळी अंतर्स्फूर्तीरुपी भगवंत समोर असला तरच स्वतःच्या निर्बल मनस्थितीवर आपण अर्जुनाप्रमाणे मात करुन योग्य कार्य करु शकतो.

‘म्हणजे गाडी मिळेल त्या किंमतीत विकून टाकून तीला विसरुन जाऊ असेच तुम्हाला म्हणायचे आहे ना?’

ज्या क्षणी हा विचार मनात आला आहे त्याक्षणी तू गाडीच्या बंधनातून मुक्‍त झाला आहेस हे लक्षात घे. मग तुझ्या हातून काय घडेल हे महत्वाचे नाही. तीला स्वतःच्या मुलासारखी तू मानत होतास असे म्हणतोस पण आता हे वाक्य उच्चारल्याने नाते बदललेले आहे, कारण स्वतःच्या मुलाबद्दल असे कधीतरी बोलशील काय? आणि एकदा नाते बदलल्यावर मग अपराधीपणाची भावना ठेवायचे कारणच शिल्लक रहात नाही.

[छायाचित्र – साभार – पंकज]

संबंधित लेखन

 • वर्गवारी करण्याची सवय
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
  खिशात हात घालून त्या निर्मनुष्य रस्त्यावर स्वतःच्या…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • यथा राजा तथा अधिकारी….

  आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त…

 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
 • तेज:रक्षक की भक्षक?
  मिल जळून भस्मसात या घटनेची भीषणता व आलेली विषण्णता अजूनही मनातून जात नाही. तसे पाहिले तर आजकाल ही…
PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

 1. परीवर्तन ही ससार का नियम है! इस पल जो अपना है, अगले पल वो किसी और का हो जाता है!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME