वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

निळकंठेश्वर

९ प्रतिक्रिया

पुण्यापासुन फक्त ५० कि.मी. दुर निळकंठेश्वर नावाचे हे सुंदर भटकंतीसाठी ठिकाण आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. सिंहगडापासुन फक्त २० कि.मी. वर अत्यंत कमी गर्दीचे आणि सिंहगडाच्या तुलनेचे, किंबहुना त्याहुनही सुंदर ठिकाणाबद्दल थोडेसे आणि काही फोटो.

निळकंठेश्वर हे खरं तर एका मोठ्या डोंगरावर बसलेल्या शिव-शंकराच्या देवळाचे नाव. ह्या देवळाच्या भोवती असंख्य पौराणीक काळातील सुंदर शिल्प उभारली आहेत. मी या-आधी तिन वर्षापुर्वी या ठिकाणाला भेट दिली होती त्यानंतर आणि आजच्या भेटीमध्ये एक-दोन अपवाद वगळता सर्व शिल्प त्यांचे सौदर्य टिकवुन होती हे आश्चर्य.

निळकंठेश्वरला जाण्यासाठी सिंहगडापायथ्याशी वसलेल्या डोणजे गावापासुन फाटा फुटतो जो पानशेत/ वरसगावाकडे जातो. त्या रस्त्याने थोडे गेल्यावर दोन मार्ग आहेत.

१. खानापुरच्या थोडे पुढे गेल्यावर निळकंठेश्वराची पाटी दिसते. तेथे गाडी लावायची. तेथुनच एक छोटी मोटरबोट धरणाच्या पाण्यातुन निळकंठेश्वराच्या पायथ्याशी आणुन सोडते. तेथुन पर्वताच्या टोकावर जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २ तासाचे चढण आहे. अर्थात रस्ता बरा आहे त्यामुळे घसरण्याची भिती नाही. एक सोप्पा ट्रेक म्हणुन हा मार्ग पत्करायला काहीच हरकत नाही.

२. खानापुरच्याच रस्त्याने वरसगाव धरणापर्यंत सरळ जायचे. वरसगाव धरणाच्या भिंतीपासुन एक छोटा रस्ता निळकंठेश्वराकडे जातो. हा रस्ता अत्यंत खराब आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी ओढे, नाले, छोटे धबधबे लागतात जे पार करुन जावे लागतात. अर्थात गाडीनेही अगदी शेवटपर्यंत जाता येत नाही. गाडी साधारण पर्वताच्या मध्यापर्यंतच जाते तेथुन पुढे चालतच जावे लागते. हे अंतर साधारण-पणे ३०एक मिनिटांचे आहे.

पावसाळ्यात जरुर भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. संपुर्णपणे धुक्यात बुडालेले, फारशी गर्दी नसलेले, वरसगाव आणि पानशेत धरणाचे दर्शन घडवणारे आणि हिरव्यागार टेकड्यांचा सुंदर पॅनोरमा देणारे हे ठिकाण पर्यटनाचा आनंद तर देतेच पण शिव-शंभो निळकंठेश्वराच्या दर्शनाने तिर्थक्षेत्राला भेट दिल्याचे पुण्य सुध्दा देते.

वर खाण्यापिण्याची फारशी (चांगली) सोय नाही त्यामुळे बरोबर खाणे, पाण्याच्या बाटल्या घेउन जाणे हेच योग्य.

निळकंठेश्वरची काही चित्र –

संबंधित लेखन

 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • दृष्टिकोन २०१०

  अज्ञातच पायवाट
  कुणी चेहरा निनावी
  उडी उंच किटकाची
  कैसी कुणी पहावी ?

  चिमुकले असे हे विश्व

 • पुण्याजवळील दुर्गदर्शन
  गेल्या पावसाळ्यातल्या वीकएंडला जास्त वेळच नव्हता. अर्धा दिवस मोकळा सापडला. मग काय… शांत थोडाच ब…
PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

 1. I was shocked to see those pictures. Why they have installed such hedious statues? Why not to keep it natural? It’s very disappointing. Sorry to say this, but I don’t want to go there.

 2. मित्रवर्य, निलकन्ठेश्वरचे फोटो फारच चागले आलेले आहेत.आमच्या तालुक्यतील हे स्थल आहे.ध्न्यवाद….
  आपला हा लेख आम्ही आमच्या मासिकात प्रसिध्द करु का? आपन तशी परवानगी द्यावी ही विननती.
  कळावे,
  आपला
  द्त्तात्रय सुर्वे

 3. khup chhan aahet Photo
  Next time me sudhha majhya friendsbarobar Bhatkantila jaanaar
  Thank you for information

 4. मित्रा,
  हा लेख वाचल्यामुळे पुण्याजवळील एका नविन सुंदर पर्यटनस्थळाची माहीती मिळाली, वेळ काढुन एकदा नक्कीच तेथे जायला मला आवडेल, फोटो खुपच सुंदर आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME