वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

नौदलातील भरती परीक्षेचा पेपर फुटला!

० प्रतिक्रिया

नौदलातील भरती परीक्षेचा पेपर फुटला! ही बातमी वाचून धक्काच बसला. देशाच्या संरक्षणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यापैकी नौदल ही एक शाखा. त्यातील १५० उमेदवार प्रत्येकी ५० हजार रुपये देऊन परीक्षेसाठी उतरतात ही बाब भारतासाठीच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकासाठी लज्जास्पद आहे.

भारत देश जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जर या देशातील तरुण पिढी एवढया खालच्या पातळीवर उतरून, परीक्षा देण्यात त्यांना धन्यता वाटत असेल तर याला काय म्हणावे? या सर्व अपात्र १५० विद्यार्थ्यांना नौदलाने काय पण भारतातील इतर कोणत्याही उच्च परीक्षेपासून वंचित करावे. नौदलातील जे अधिकारी यात सामील असतील त्यांना कायमचे नोकरीतून काढून टाकावे. अशा कारवाईमुळे तरी सर्वांना वचक बसेल.

असली बरबाद तरुण पिढी नौदलात सामील झाली तर या भारत देशाचे काही खरे नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी देश विकून टाकतील. अशी मानसिकता असणाऱ्यांना नौसेना, वायुसेना, स्थलसेना इत्यादींमध्ये भरतीसाठीच्या देशातील अन्य उच्च परीक्षांपासून वंचित करावे. ह्या प्रश्नावरून इतर लोकसेवा वा तत्सम सनदी सेवांमध्ये भरतीसाठी, टेंडरसाठी किती पैसे घेऊन काम होत असेल? “आदर्श” घोटाळ्यामध्ये नौसेनेचे उच्च विभूषित व उच्चपदस्थ आदर्श असे अधिकारी आहेत. देशाच्या संरक्षणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा तिन्ही दलात असे “आदर्श”सारखे कितीतरी घोटाळे झाले असतील किंवा होत असतील हा ही प्रश्नच आहे. देशाच्या संरक्षण मंत्र्यांना तरी याची माहिती असेल का, की आनंदी-आनंदच? या बाबत ठोस कारवाई झालीच पाहिजे. तरच या देशाला काहीतरी भविष्य आहे, असे सामान्य जनतेला म्हणता येईल.

[सुचना: प्रस्तुत लेखातील व्यक्त केलेले मत हे लेख-प्रस्तावकाचे स्वतःचे आहे. – संपादक]

संबंधित लेखन

 • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
  सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
 • ‘वणवा’
  ‘विवाहितेवर हिंजेवाडीत झालेल्या सामुहिक बलात्कार’ घटनेने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा…
 • माझी माय .. अरुण फिरोदिया..
  बऱ्याच लोकांच्या बद्दल मनामधे एक असा आकस असतो.अर्थात , त्या साठी काहीच कारण असावं लागत नाही. बस्स…
 • बोलु कौतुके !!!
  सदरचा  माहितीपर लेखही हा एका वृत्तपत्रासाठी लिहिला आहे, तो प्रकाशित झाल्यावर इथे कळवले जाईलच. मात…
 • प्रेम
  प्रेम.. तसं म्हणलं तर कित्ती सोप्पं.. पण सांगायचे म्हणले तर भल्या-भल्यांचे तोंड बंद होतील. वारा क…
PG

chingi

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME