वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

पाऊस जगा…!!!

८ प्रतिक्रिया

मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो.

पाऊस येतोय बरं का… तो जगायला पण पाहिजे… माझ्या काही विचित्र तऱ्हा अशा आहेत…

तुमच्याकडे बराच वेळ आहे? म्हणजे साधारण तीनेक तास? तर मग एखादा पिक्चर टाकायला (हो, पहायचा नाही, टाकायचाच) हरकत नाही. म्हणजे कसं की, कंपनी देणारे कुणी असेल तर ती व्यक्ती पण खुश आणि वर आपल्याला पण माणसाळलेले काही केल्याचे समाधान. वर परत बाहेर पाउस पडत असताना interval मध्ये गरमागरम सामोसे, पॉपकॉर्नची मजा. (पडद्यावरची काही दॄश्ये पण तशीच… आजकाल हे फारच common झालंय बुवा… अगदी मराठी पिक्चर मध्ये पण सगळे असते).

काय म्हणता, अर्धा तासच आहे? हरकत नाही, भजीची गाडी शोधा. दोन प्लेट कांदाभजी चापून वर चहाची सर्र्र्र्र्र्रकन फोडणी द्या, पहा जीभ, घसा, पोट किती आशीर्वाद देतात तुम्हाला. पण हा चहा कटिंग वगैरे चालत नाही बर, फुल्ल ग्लासच हवा. तरच खरी मजा. आता काहींना वेगळी फोडणी लागते, त्याचा उल्लेख येथे नको.

ऑफीस मध्ये असताना खिडकीतून पाऊस दिसला आणि काही मिनिटांचा ब्रेक मिळालाय? मग मोठा mug भरून कॉफी घ्या, एक छत्री पैदा करा, आणि ऑफीस बिल्डिंगच्या बाहेरचा एखादा पावसातला बेंच शोधून त्यावर छत्रीखाली बसून कॉफीचे घुटके मारत बसा. लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करता येणे अत्यावश्यक.

रविवारचे मस्त जेवण चापून, थोडी झोप काढून झाली असेल तर एक वाफळता चहाचा कप घेऊन टेरेसच्या आरामखुर्चीवर निवांत पडून रेडिओवर मुकेश-रफी ऐका. किंवा मग मराठी कवितांचे पुस्तक असले तर अतिउत्तम.

अर्धा दिवस दिवस मोकळा आहे?

image_paus

पाऊस जगा…!!!

सकाळपासून सरीवर सरी चालल्यात? अरे मग यासारखे सुख नाही. गाडी बाहेर काढा. चारचाकीची ऐट घरीच ठेवा. दुचाकीला किक मारायची आहे आपल्याला. मोबाइल, पाकीट एका प्लास्टिक बॅगमध्ये टाका आणि निघा शहराबाहेर. Highway सोडून द्या आणि एखादा छानसा रस्ता पकडून मन मानेल तेथपर्यंत एका गतीने (40kmph ideal) पावसात भिजत जात राहा.

पूर्ण दिवस मोकळा मिळालाय? जास्त पावसात भिजणे पण आवडत नाही? मग एक काम करायचे. एसटी स्टॅंड गाठायचे. एक अर्धा दिवस प्रवास करणारा मार्ग निवडा. आणि तिकडे जाणारी यष्टी (शुद्ध मराठीमधे “लाल डब्बा”) पकडायची. खिडकीतून पावसाचे तुषार अंगावर झेलत, डोंगराच्या धबधब्याची चंदेरी पांढरी जानवी पाहत प्रवास पूर्ण करायचा. सह्याद्री आपलाच आहे. आणि परत त्याच आल्या गाडीने परत फिरायचे. रस्त्यात चहा, कॉफी, भजी मारायला हरकत नाही.

२/३ सुट्टी मिळलीये? मग सर्वप्रथम आपल्या नशीबाची पूजा करा. आरशात पहा, चिमटे काढून खात्री करून घ्या. मग एक मस्त चारचाकीची ट्रिप प्लान करा. सगळ्या कुटुंबाला जलधारा लूटू द्या. परत आल्यावर पहा कसा आपला भाव उगाचच किती वाढतो.

काहीच करायची इच्छा नाही? मग तुम्ही जवळपास माझ्या विरुद्ध कॅटेगरीचे आहात. तरीही हरकत नाही. त्याचा पण इलाज आहे आपल्याकडे. खिडकीजवळ असणार्‍या बेडला मित्र बनवा. मस्त एक रजई पांघरून पडी मारा. झोपताना टपोऱ्या थेंबांचा ताशा आणि विजेचा ढोल ऐकता ऐकता स्वप्नात हरवून जा. उठल्यावर आहेच पहिले पाढे पंचावन्न. चहा-भजी and so on.

कुणाला बोअर करावेसे वाटले तर मग ही link पास करा. नाहीतर तुम्ही पण असेच काही लिहायला घ्या.

संबंधित लेखन

 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
 • भुलेश्वरचा शिल्प खजिना
  पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिका…
 • पुण्याजवळील दुर्गदर्शन
  गेल्या पावसाळ्यातल्या वीकएंडला जास्त वेळच नव्हता. अर्धा दिवस मोकळा सापडला. मग काय… शांत थोडाच ब…
 • दृष्टिकोन २०१०

  अज्ञातच पायवाट
  कुणी चेहरा निनावी
  उडी उंच किटकाची
  कैसी कुणी पहावी ?

  चिमुकले असे हे विश्व

PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…

 1. च्यायला एकदम जबरी… नुकत्याच तळलेल्या गरमागरम भज्यांचा (कांद्याचे प्रमाण ८०% असायलाच हवे) खमंग वास यायला लागलाय लगेच… एश्टीने असे सुखद प्रवास अनेकदा अनुभवलेत मी पण!

  सालं, आज नाही, पण तू एवढा भटकंतीचे गाणे लावतोय रोज, त्यामुळे काहीतरी प्लॅनिंग करावीच लागेल… अजुन आमच्याकडे शिराळ जास्त अन पाणी (आय मीन पाऊस) कमी अशी परिस्थिती आहे… म्हणलं, गावाकडे जावं, पहिल्या पाण्याचा आनंद लुटावा, तो पण तळ्याच्या (नॉट तलाव!) उंचच-उंच भिंतीवर उभं राहून!!! नंतर मावश्यांकडे, मामांकडे, काकांकडे सरकी (कपाशी!), मिरच्या लावू लागावं… मस्त आहे राव… हाच् प्लॅन फिक्स करतो, लगेच सोबत येणार्‍यांना फोन लावतो…!!! तश्या बी सुट्ट्याच आहेत म्हणा आता वीसेक दिवस!

  (मला किती बी काही झालं तरी दिवसा बिल्कूल झोप यत नही, त्यामुळे शेवटचा सांगितलेला पर्याय आपुण के लिए नहिचै!!)
  😛

 2. लेख तर मस्तच आहे व त्या सोबतचे चित्र अफ़लातुन.

 3. अरे दादा तु अफलातून आहेस यार! ग्रेट! तुझी साईट पाहून झाली… मस्त….

 4. हवाहवासा वाटणारा पाउस…
  पावसाळा म्हणजे मनातील कोरडेपणा, ऊदासपना घालवुन मनाला ओलेचिंब करणारा, मनाला उत्साहीत करणारा रुतु ..त्यामुळे पावसाळा हवाहवासा वाटतो..
  पावसाने माझे मन ओलेचिंब भिजले,
  मनातील कोरडेपण मग जागीच थीजले,
  पावसाच्या धारा अनं भिरभिरणारा वारा,
  मनातील भावनांचा मग फुलेल पिसारा …
  पावसाळा छानच..पावसाळ्यावरील लेख ही छानच
  ….गॊरी अमोल देशमुख

 5. श्रीराम…
  श्री.पंकज झरेकर मी पण एक भटक्या च आहे ,
  तुमची -माझी जोडी खूप जमेल असे वाटते तेव्हा भेटा/बोला
  ९४२१५३२१९८ ……..यावा हा खानदेश आपलाच असा बरे .

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME