वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

पागल स्ट्युपीड मन

२ प्रतिक्रिया
Blog

ब्लॉगींग

विज्ञानाने अनेक शोध लावले, पण मनुष्याच्या मनाचा वेध घेणारे उपकरण अजुन तरी अस्तीत्वात आलेले नाही. मन अथांग आहे, अनेक विषय, विचार, आठवणींचा भरणा त्यामध्ये झालेला असतो. ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’, ‘मनी वसे ते चित्ती दिसे’ अश्या म्हणींचा उदयही झालेला आहे.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, किंबहुना आजच्या युगाचा विचार केला तर होता. काळानुरुप लोकांची मनं आकुंचली गेली आणि त्याबरोबर मनाच्या कक्षाही. मनुष्य एकलकोंडा होत गेला. मनामध्ये साठलेले विचार, चिंता, भावना, ज्या व्यक्त करण्यासाठी, पुर्वीच्या काळी नातेवाईक, मित्र-मैत्रीणी, आई-वडील होते त्याचे प्रमाण कमी झाले. परीणामी अनेक गोष्टी ज्या मोकळ्या होण्या गरजेचे होते त्या मनामध्येच साठुन राहु लागल्या. नुसते हेच नाही तर कित्तेक लोकांमध्ये कलात्मकता लपलेली असते.. ‘हिडन टॅलेंट’ ते व्यक्त झाले, त्याला अनुरुप प्रतिसाद मिळाला तर त्याचा नक्कीच विकास होऊ शकतो, एक प्रकारचे व्यासपीठ त्याला मिळु शकते.

माहीती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक नवनविन क्रांती घडत गेल्या आणि त्यातुनच ‘ब्लॉगींग’ची निर्मीती झाली. ब्लॉगींग सुरुवातीला केवळ एक ‘ऑनलाईन अनुदीनी’च्या रुपातच होते. ‘मी आज हे केले’, ‘मी आज ते पाहीले’ असल्या गोष्टींनी ब्लॉगस्फीअर भारलेला होता. पण हळु हळु लोकांना ब्लॉगींगची व्याप्ती, त्याचे फायदे जाणवु लागले आणि ‘ब्लॉगींग’ने एक नविनच रुप धारण केले.

‘ब्लॉगींग’च्या माध्यमातुन अनेक नवकवि, कथा लेखक जन्माला आले. आजवर ज्या गोष्टी आपल्याजवळील नोंदवहीत उतरवुन ठेवलेल्या होत्या त्या काही क्षणातच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या जाऊ लागल्या. वाचकांकडुन मिळणारी प्रतिक्रिया, कौतुकाची थाप स्फुर्ती वाढवु लागली. ब्लॉगींगचे प्रकार ते किती? कवितांचा ब्लॉग, कथांचा ब्लॉग, व्यंगचित्रांचा ब्लॉग, पाककलेला वाहीलेला ब्लॉग, छायाचित्रणासंबंधीचा ब्लॉग, छायाचित्रांचा ब्लॉग, तत्वज्ञान, अध्यात्माला वाहीलेला ब्लॉग, दैनंदिन घडामोडींवर भाष्य करणारा ब्लॉग. एक ना अनेक प्रकारचे ब्लॉग उदयास आले. ब्लॉगींगच्या नावाने बोटं मोडणारे भले भले ब्लॉगींगच्या नादी लागले.

ब्लॉग हा मानवाच्या मनाचा एक आरसाच आहे. कधी रोखठोकपणे तर कधी एखाद्या मुखवट्याआडुन जो तो आपली मतं ब्लॉगींगच्या माध्यमातुन व्यक्त करत असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये साठलेल्या प्रचंड विचारांना, भावनांना ह्या ब्लॉगींगने जगासमोर व्यक्त केले आहे. लेखकांना तर हक्काचे व्यासपिठ मिळालेच, पण त्याचबरोबर वाचकांनासुध्दा एक भला मोठ्ठा खजिना उपलब्ध झाला आहे. ‘अलिबाबाची गुहा’च जणु, तुम्ही त्यातुन कितीही घेतलत तरी संपणारच नाही.

ब्लॉगींग हे असे माध्यम आहे जे तोडु ही शकते आणि जोडु ही शकते. ब्लॉग्सवर केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण शकतात , माणसं एकमेकांपासुन दुरावुही शकतात किंवा ब्लॉगच्या माध्यमातुन अनेक नाती-गोती जोडलीही जाउ शकतात. ह्या प्रभावी शक्तीचा वापर कसा करायचा हे ज्याच्या त्याच्या विचारांवर आणि संस्कारांवर अवलंबुन आहे, नाही का?

संबंधित लेखन

PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

  1. नक्कीच.. ब्लॉगिंग मुळे आज बराचसा कायापालट झालेला जाणवतो! मिडियाला आजपर्यंत संविधानाचा चौथा स्तंभ म्हणून ओळख होती, पण त्यासोबतच घोड-दौड करणारी “ब्लॉगिंग” ही नवीनच प्रणाली आज स्वतंत्र भारताच्या संविधानाचा पाचवा स्तंभ होऊ पाहत आहे. ब्लॉगिंगच्या माध्यमातून प्रत्येक जन-माणसाला त्याचे विचार जगातील प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचविण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. देशाच्या प्रत्येक सुजाण नागरिकाने आपले कर्तव्य समजून बर्‍याचशा गोष्टींसाठी, ज्या गोष्टींवर त्याला काही तरी बोलायचे आहे, त्यावर त्याने ब्लॉगिंगच्या माध्यमातून स्वतःचे विचार प्रकट करावेत. आपल्या भावी पिढीला नंतर असे म्हणण्याची गरजच नाही पडली पाहिजे कि आपल्या पूर्वजांनी सर्व सुविधा असुनही ते केलेच का नाही, ते एवढे कसे आळशी होते. हो की नाही? चला तर मग, प्रत्येक वाचकाने आपला एक स्वतंत्र ब्लॉग निर्माण आत्ताच निर्माण करावा, त्यासाठीची पुढील सर्व मदत त्याला “मराठी मंडळी” वरून मिळेलच!

  2. विशाल महोदय, अनिकेतभाई नी अगोदरच तंबी देऊन ठेवली आहे “थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा”मग त्यावर मला काही लिहावसं वाटलं तर ते कसं लिहावं? “छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा”जसे अनिकेत आहेत तसाच मी ही.खरं म्हणजे इथं कोणी काही आपल्याला म्हंटलं तर आपण मनाला का लाऊन घ्यावं? पण मनुष्य स्वभावच असा विचित्र आहे की या महाजालकाला पण तो मन चिकटवून बसतो आणि मग इथं कोणी आपल्या मनाविरुद्ध लिहिलं तरी त्याचं आपल्याला दुखः होतं.अनिकेत भाई मी म्हणतोय ते खरं आहे ना? आता मूळ मुद्यावर येतो. आपला पागल–मन लेख छान झालाय.पण “पिवळा पितांबर” सारखं त्याचं नाव झालंय.फक्त आपण मध्ये इंग्रजी शब्द वापरून द्विरुक्ती साधलीय.एव्हढच.मन नका हो करु खट्टु !मराठी मंडळीवर मन झालंय लट्टू ! मन झालंय लई लई लट्टू!!!!!
    http://Savadhan.wordpress.com

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME