वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

पुण्याजवळील दुर्गदर्शन

१२ प्रतिक्रिया

गेल्या पावसाळ्यातल्या वीकएंडला जास्त वेळच नव्हता. अर्धा दिवस मोकळा सापडला. मग काय… शांत थोडाच बसेन. “पाबे घाट” हे नाव बरेच ऐकले होते. आणि धबधब्यांचे फोटो काढायची खुमखुमी होती. मग घेतल्या बाइक्स आणि मारली एक दुर्गदर्शन (दुरूनच) भ्रमंती.

या दुर्गदर्शन भ्रमंतीसाठीचा मार्ग असा:

पुणे-सिंहगड रोड-खडकवासला धरण-डोणजे फाटा-खानापूर नंतर २०० मीटरवर एक तोरणा-राजगडकडे जाणारा रस्ता दाखवणारा फलक आहे. तिथून डावीकडे वळून घाट चढून जावे. पुढे काही गावे, वाड्यांना मागे टाकून आपण पाबे घाटात पोचतो. हा घाट पुढे चढून गेलात की एक माथ्यावर पाबे खिंड आहे. तेथून तोरणा आणि राजगडाचे विहंगम दृष्य दिसते. तोच रस्ता पुढे उतरुन एका तिठ्यावर येतो. उजवीकडे जाणारा रस्ता आहे तोरणा पायथ्याच्या वेल्हे या गावी जाणारा आणि डाव्या बाजूचा रस्ता जातो राजगडाकडे. तोच पुढे नसरापूरमार्गे मुंबई-बंगळूर हायवेला मिळतो. हा वर्तुळमार्ग एका भेटीत सिंहगड, तोरणा, राजगड, विचित्रगड अशा भुलेश्वर डोंगररांगांतील दुर्गमालिकेचे दर्शन घडवतो. पावसाळ्यात या रस्त्याचे सौंदर्य तर अगदीच जगावेगळे असते. प्रसन्न हिरवाई, डोंगरमाथ्यावर टेकलेले ढग, नागमोडी रस्ता आणि असंख्य धबधबे यांमुळे आठवड्याचा शिणवटा कुठल्या कुठे पळून जाईल.

सोबतीला कॅमेरा होताच.

संबंधित लेखन

 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • दृष्टिकोन २०१०

  अज्ञातच पायवाट
  कुणी चेहरा निनावी
  उडी उंच किटकाची
  कैसी कुणी पहावी ?

  चिमुकले असे हे विश्व

 • भुलेश्वरचा शिल्प खजिना
  पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिका…
 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…

 1. अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफीचा नमुना! तुझ्या पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा!

 2. ase jastit jast gad killyanchi aani bhatkantichi mahiti taka … khup upgoyi aahe amchya sarkhya bhatkyansathi … thanks

 3. Photo khup aawadale……
  Ya pavsalyat mi hi mazya mitransobat ithe bhet deyeen……….
  T.c Best LUCK………..

 4. साचिन नेवसे म्हणतात:

  अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफी आहे.
  मराठी मंडळी हया साईट मुळॅ. मराठी पाउल पड्ते पुढ हे अगदि खरे झाले आहे.

  खुप खुप शुभेच्छा!

 5. are 1 vicharaycha hota ……..pan waterfall madhala pani asa nahi disat na? i mean edit kelay ka?

 6. पंकज राव म्हटल्यावर फोटो छान असायलाच हवेत !!
  @शरयु – पाण्याचे असे कापसासारखे रुप Long Exposure टेक्निक वापरुन मिळवले असणार.
  प्रत्येक फोटोला थोडे फार एडिटिंग करावेच लागते हे मान्य… पण ४थ्या फोटोतला हिरवा रंग थोडा जास्त saturated वाटतोय हे खरे.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME