वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वीचे आहे!

११ प्रतिक्रिया

काही वर्षांपूर्वीच केलेल्या नविन संशोधनाच्या आधारे, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (magnetic field) अस्तित्वात असल्याची पुष्टी करणारे सुमारे २५० दशलक्ष वर्षांपुर्वीचे सबळ पुरावे संशोधकांच्या हाती लागले आहेत. हे क्षेत्र एवढे जुने असण्या मागचे कारण म्हणजे ते सुर्यापासून निघणार्‍या घातक कॉस्मिक विकिरणांपासून पृथ्वीच्या सुरूवातीच्या काळातील काही जीवनाचे कवच (shield) राहिले असावे, असा अंदाज आहे.

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाले असावे, या संबंधीचा एक संशोधनपर अहवाल न्युयॉर्कच्या रोचेस्टर विद्यापीठातील काही संशोधक आणि दक्षिण अफ्रिकेच्या क्वाझुलु-नेटल विद्यापीठाचे काही संशोधक, अशा बहुसदस्यीय संघाने ५ मार्च, २०१० रोजी जाहीर केला.

त्या काळात पृथ्वीवरील जीवन हे सुरूवातीच्या विकासाच्या पायर्‍या चढत असावे (उत्क्रांतीच्या अगोदर), जेव्हा आपल्या सुर्यमालेतील काही ग्रहांद्वारे बाहेरील अंतराळात फेकले जाणारे अवशेष/घान/निरूपयोगी अवशेषांचा ढिगारा (debris) पृथ्वीच्या वातावरणात अतिशय वेगाने आदळत होते, आणि वातावरण ऑक्सिजनने भरलेले होते, हा तो काळ असावा. काही पुरातन संशोधने असे सुचवतात, की सुमारे ३ ते ४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीला चुंबकिय क्षेत्र असणे हे अतिशय गरजेचे होते आणि आजही त्याची गरज आहेच व राहीलही, जर ते नसते तर घातक अतिनील सौर विकिरणांनी व इतर अवकाशीय (अंतराळातील) घातक पदार्थांनी पृथ्वीचे वातावरण नाहीसे केले असते, पृथ्वीवरील उपलब्ध असलेले पाणी शोषून घेतले असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचा र्‍हास केला असता. त्यामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीचे एखाद्या ढालीप्रमाणे (कवचाप्रमाणे) काम करते.

शोधकर्त्यांनी दक्षिण अफ्रिकेतील कापवाल क्रेटन या भूगर्भिक भागातील सुमारे ३ अब्ज वर्षांपूर्वी़च्या काही दगडांचे चुंबकीय सामर्थ्य (magnetic strength) मोजले. पण काही संशोधकांच्या मते या दगडांचे चुंबकीय सामर्थ्य मोजण्यामध्ये भरपूर चुका होऊ शकतात. काहींच्या मते, काही लोह-गुणधर्मीय खनिजे, त्यांच्या तयार होण्याच्या काळातील त्यांच्या भोवताली असलेल्या चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य व दिशा यांबद्दल चिरस्थायी स्वरूप (record) देऊ शकतात. पण अशी खनिजयुक्त दगडे (खडक,) असंख्य वर्षांच्या कालावधीमध्ये निरंतर चालू असणार्‍या भूवैज्ञानिक प्रक्रियेमध्ये गरम होतात, पृथ्वीच्या भूगर्भात चालणार्‍या रासायनिक अभिक्रियांमध्ये त्यांचा सहभाग असतो, त्यामुळे एक तर सर्व रेकॉर्ड पुसून जातात किंवा नाहीसे होतात. त्यामुळे त्या काळातील दगडांचा अभ्यास निष्फळ आहे.

सन २००७ मध्ये जॉन टार्डुनो (रोचेस्टर विद्यापीठातील संशोधक) आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी क्वॉर्ट्झ (ज्यामध्ये काही अंशी लोहयुक्त मॅग्नेटाईट खनिज असते) आणि याच प्रकारच्या काही दगड-खनिजांचा अभ्यास केला. या संशोधनामध्ये त्यांना असे आढळून आले की, सुमारे ३.२ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आजच्या चुंबकीय क्षेत्राच्या तुलनेने अर्धेच (half) चुंबकीय क्षेत्र उपलब्ध होते. एका विशिष्ट मॅग्नेटोमीटर (चुंबकीयमापक) आणि इतर विकसित सुसज्ज प्रयोगशाळेच्या मदतीने, टार्डुनो आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी एक शोध लावला, त्यांना सुमारे ३.४५ अब्ज वर्षांपुर्वीच्या एका दगडामध्ये चुंबकीय संकेत (magnetic signal) मिळाले, ज्यांची शक्ती आजच्या पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीच्या मानाने ५० ते ७० टक्केच होती.

टार्डुनो म्हणतात, “जर जीवनाच्या अस्तित्वाबद्दल विचार केला तर आपल्याला दोन मुद्दे हाती लागतात, त्यातील एक म्हणजे पाणी! पण तुम्हाला चुंबकीय क्षेत्र असणेसुद्धा पाण्याइतकेच महत्वाचे आहे, कारण ते वातावरणाची धूप होण्यापासून आणि पाण्याचे संपुर्णतः बाष्पीभवन होण्यापासून वाचवते. मंगळ ग्रहावर आज पाणी नसण्यामागचे हेच एक कारण असू शकते, कारण त्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र हे त्यांच्या सुरूवातीच्या काळातच नाहीसे झाले होते.”

त्या काळी उपलब्ध असलेले चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीवर होणार्‍या सुर्याच्या घातक विकिरणांच्या मार्‍यापासून पृथ्वीला संरक्षित करण्यास पुरेसे होते का हे जाणून घेण्यासाठी टार्डुनो यांच्या टीमला त्या काळात सुर्याबाबत संशोधन करणे गरजेचे होते. त्यासाठी टार्डुनो आणि एरिक मॅमाजेक (रोचेस्टर विद्यापीठातील एक अंतराळवीर) यांनी नव्यानेच तयार होत असलेल्या आपल्या सुर्यासारख्या काही तार्‍यांच्या निरीक्षणांचा अभ्यास केला, की कुठवर पृथ्वी सुर्यापासून निघालेल्या विकिरणांपासून स्वतःचा बचाव करीत असेल.

चुंबकिय क्षेत्र

सुर्यापासून बाहेर फेकल्या जाणार्‍या प्रभार-युक्त चुंबकीय लहरी (वादळे) प्रतिमा स्त्रोत: NASA

अगदीच नविनच तयार झालेला सुर्यासारखा तारा स्वतःच्या आसाभोवती आजच्या सुर्यांच्या तुलनेने अतिशय वेगवान गतीने फिरतो. या वेगवान फिरण्यामुळे अतिशय शक्तीशाली चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, ज्यामुळे सुर्याचे वातावरण खुप तापले जाते, ज्याची परीणिती – सुर्याच्या अंतर्भागाचे काही प्रमाणात वस्तूमान आणि कोनीय आवेगशक्ती हे एका खुप मोठ्या प्रभार कुंडाच्या (वादळाच्या) रूपाने सुर्याच्या बाहेर ढकलले जाते (बाजुच्या आभासी प्रतिमेमध्ये दर्शविले आहे.) टार्डुनो यांच्या टीमने ज्या वेळी, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र  ह्या सौर वादळाला असे काटेल (cancels) की ते वादळ पृथ्वीच्या मध्यबिंदूशी असलेल्या फक्त पाच त्रिज्यांएवढेच शिल्लक राहील, जे की आजच्या १०.७ त्रिज्यांच्या अर्ध्यापेक्षा (half) कमी असेल, त्या वेळच्या (स्थितीच्या) बिंदूची गणना केली.

टार्डुनो पुढे म्हणतात, सुमारे ३.४५ अब्ज वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर नियमीत पोहोचणार्‍या हानिकारक विकिरणांची एकंदर मात्रा (amount) ही आजच्या स्थितीतील सुर्यापासून तयार होणार्‍या काही वादळांच्या वेळी पृथ्वीवर होणार्‍या बहुतेक पाऊसाच्या (rain) एकंदर मात्रेशी मेळ खावू शकते. (म्हणजेच दोन्हींत साम्य असू शकते.) Aurora-borealis (उत्तर ध्रुवप्रदेशात आकाशात दिसणारे तेजोवलय), पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला लागून सारखा भडिमार करणार्‍या सौर वादळांतील काही गतिशील पदार्थांमुळे निर्माण होते, जे दक्षिणेकडेपासून ते न्यु यॉर्क शहरामधून बघितले जाऊ शकते, ज्याचा या संशोधनात खुप फायदा झाला.

संत ऍण्ड्र्युज विश्वविद्यालय – स्कॉटलंड, च्या एक खगोल वैज्ञानिक मोइरा जार्डाइन म्हणतात, की हे संशोधन जीवनाचे अस्तित्व असलेले इतर ग्रह शोधण्यात नक्कीच उपयोगी पडेल, ज्याचा मार्गदर्शक म्हणूनही उपयोग केला जाऊ शकतो. त्या म्हणतात, की खगोल वैज्ञानिकांनी जुन्या तार्‍यांवर किंवा ग्रहांवर (म्हणजेच सुर्याच्या वयाच्या किंवा पृथ्वीच्या वयाच्या), त्यांच्या स्वतःच्या चुंबकीय क्षेत्राच्या आधारे खोलवर निरीक्षण करायला हवे.

वस्तूस्थिती अशी आहे की आजपर्यंत तरी अजुनही असा एकसुद्धा ग्रह, जो आपल्या सुर्यमालेबाहेरील इतर सुर्याभोवती फिरतो (extrasolar planet) आणि तोही त्याच्या स्वतःच्या चुंबकीय क्षेत्रासह… शोधला गेलेला नाही! पण तरीही या वस्तूस्थितीला न जुमानता जार्डाईन आणि टार्डुनो हे आशावादी आहेत. टार्डुनो म्हणतात, की “हे संशोधन म्हणजे या महामार्गाला लागून असलेली एक पाऊलवाट आहे, ज्यावर आपण सर्वांनी जरा विचार करण्याची गरज आहे.”

संबंधित लेखन

 • आकाश निळे का दिसते?
  लेखात समाविष्ट सामग्री:

  अभिसारण
  रेलिघचा अभिसारण नियम
  अभिसारणाची उदाहरणे
  सामान्यतः आकाश …

 • GSLV – इतिहास आणि ओळख
  [लेखात शेवटचा बदल: १२:३६ वाजता, डिसेंबर  २६, २०१० रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार]
  पूर्वार्ध

  कॉन…

 • उडत्या तबकड्या (U.F.O.)
  निश्चित अंदाज व्यक्त होऊ न शकलेल्या अनेक अवकाशिय वस्तूंच्या घटनांबद्दल जगातील अनेक ठिकाणच्या पुर…
 • “अवकाशात गुरूत्वच नाही” हे असत्य आहे!
  “अवकाशामध्ये ग्रॅव्हिटी (गुरूत्व/वजन ?) नाहीच!” हे वाक्य जर खरे असते, तर आजच्या अवकाशाची जागा, जी…
 • शोध जीवनाचा…

  कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती झाली. रसायनांच्या, वायुंच्या वेगवेगळ्या अभिक्र…

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. जालन्दर बनकर म्हणतात:

  चुंबकीय क्षेत्राबद्दल लिहीलेला लेख आवडला.आपला ग्रह म्हणजे एक मोठा लोहचुंबक आहे,इथपर्यंत माहिती होती.पण आपल्या पर्यावरणाची व पाण्याची एवढी काळजी चुंबकीय क्षेत्र घेते हे माहित नव्हते.निसर्गातील प्रत्येक शक्ती नेमुन दिलेले काम करते व मानवी जिवनाला सुकर करते.धन्यवाद.तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनुस्वार देता येतो.तसेच बराहा पण डाउनलोड केले आहे.

 2. विशाल, खूपच उपयुक्त व विस्तृत माहीती दिलीस. धन्यवाद.

 3. विशाल माहिती उद्बोधक अशी आहे. लेख आवडला.विशाल, शून्यवाद आणि चैतन्यवाद–! हा लेख अवश्य वाचावा अशी विनंती.तो अध्यात्म आणि विग्यान याचा मिलाफ आहे.
  काही वेळेस द्न्य लिहिता येत नाही. काय करावे?

  • आपला लेख वाचण्याचा मी प्रयत्न करेन!


   » तुम्ही मराठी लिहिण्यासाठी जर बराहा वापरत असाल तर,

   j (लहान जे) आणि ~ (हे चिन्ह टॅब कळीच्या वरच्या कळीवर असते, शिफ्ट कळ दाबून ते आणता येईल) आणि पुन्हा j दाबले की “ज्ञ” लिहिता येतो.

   उदा. ज्ञानेश्वर – j~jaaneshvar

   » आणि जर तुम्ही बराहा न वापरता, या संस्थळाच्या अगदी वरच्या उजव्या बाजूस दिसणार्‍या विझेटचा (F12 दाबून मराठी/इंग्रजी बदलता येते) मराठी लिहिण्यासाठी जर तुम्ही वापर करत असाल किंवा मोझिला फायरफॉक्समधील काही मराठी लिहिण्यासाठीच्या ऍड-ऑन्सचा वापर करीत असाल (उदा. प्रमुख टाईप पॅड इत्यादी) तर “ज्ञ” लिहिण्यासाठी,

   G आणि y दाबावे.

   उदा. ज्ञानेश्वर – Gyaaneshvar

   धन्यवाद!

 4. पृथ्वी एका मर्यादेपर्यंत थंड झाल्यावर चुंबकीय क्षेत्र स्थिरावले असादेखील या अभ्यासाचा निष्कर्ष निघू शकतो.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME