वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

फायरफॉक्स ४

१४ प्रतिक्रिया
Firefox logo

अग्निकोल्हा | सौजन्यः neds.com

मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक लेख आत्ताच वाचला. त्यांनी मोझिला कम्युनिटीवर काही दिवसांपूर्वी मोझिलाची ३.५ व्या आवृत्तीनंतरची अद्ययावत आवृत्ती मोझिला ४ रोडमॅप साठीची योजना मांडली. या आवृत्तीमध्ये अनेक नवनविन सुविधा देण्यात आल्या आहेत. सध्या गुगल क्रोम आणि सफारी न्याहाळकांनी फायरफॉक्सचे बरेचसे वापरकर्ते आपल्याकडे खेचले आहेत, ते परत आणण्यासाठी फायरफॉक्स ४ मध्ये वापरकर्त्यांच्या मूलभूत गरजा जाणून घेऊन बदल करण्यात येणार असल्याचे श्री. बेल्ट्झ्नर म्हणतात. हा अद्ययावत करण्याचा उपक्रम येत्या जुन महिन्यापासून चालू करण्यात येईल व ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्वांना ही चौथी आवृत्ती वापरण्यासाठी उपलब्ध असेल, शिवाय दर १-२ आठवड्यांनी छोटे छोटे अपडेट्स सुद्धा अव्हेलेबल असतील. यासाठीच्या नमुना स्लाईड्स आणि स्क्रीनशॉट्स बेल्ट्झ्नर यांनी उपलब्ध करून दिले आहेत, ते तुम्ही खालील दुव्यांवर पाहू शकता (यामध्ये नंतर बदल होऊ शकतो).

दुवेः १) स्लाईड शो २) चित्रफित

सध्या ३.६.४+ आवृत्ती उपलब्ध आहे, पण ३.५ ही आतापर्यंतची सर्वांत सुरक्षित आणि लोकप्रिय आवृत्ती आहे, व हीच आवृत्ती जगभरातील बहुतेक लोक वापरतात. पण सध्या अनेक कारणांमुळे फायरफॉक्सचे वापरकर्ते गुगल क्रोम वर स्थायिक झाले आहेत, आणि ज्यांनी फायरफॉक्स पहिल्यांदाच वापरले, त्यांना त्यांचा लुक न आवडणे, स्लो वाटणे, अशामुळे नविन युझर्स फायरफॉक्सला मिळत नाहियेत. कारणे भरपूर आहेत, पण त्यांतील मुख्य कारणे खालीलप्रमाणेः

 • फायरफॉक्सला सुरू होण्यासाठी किमान मिनिटभर वेळ लागतो.
 • सुमारे १००-२५० एमबी इतकी रॅम स्पेस फायरफॉक्स स्वतःसाठी वापरते.
 • फायरफॉक्सवर नविनच आलेल्या लोकांना त्याचा लुक आणि युजर इंटरफेस किचकट वाटतो.
 • काहींना फायरफॉक्स मधील मेन्यु बार (File, Edit, View, इत्यादी) बिनकामाची वाटते.
 • डेटाबेस अपलोडिंग सपोर्ट नाही.
 • बुकमार्क टुलबार मुळे नाहक जागा जाते आणि इत्यादी…

या आणि अशा बर्‍याच गोष्टींमुळे फायरफॉक्सची हुकुमत सध्या क्रोम आणि सफारी यांनी हिरावून घेतल्याचे चित्र दिसते आहे. फायरफॉक्स हे एक ओपन सोअर्स (मुक्त स्त्रोत) इंटरनेट ब्राउजर आहे, त्यामुळे याचा वापर करून तुम्ही अनेक सोयी-सुविधांद्वारे नेट ऍक्सेस करू शकता. फायरफॉक्स हे मुलतः लिनक्स च्या फ्लेवर्सवर चालण्यासाठी बनवले गेले होते, पण आता सर्वच ऑपरेटिंग सिस्टिम्सवर हे ब्राऊजर वापरणे शक्य आहे. फायरफॉक्स ३.५ हे मी माझ्या उबुन्टू ९.०४ सह वापरतो, त्याअगोदरही विन्डोज एक्सपी वर मी हीच ३.५ आवृत्ती असलेले फायरफॉक्स वापरत होतो. यामध्ये मला अजुन तरी कसलिही अडचण आलेली नाही. उलट फायरफॉक्स ३.५ किंवा याचीच नविनतम आवृत्ती असलेले ब्राउजर जर नसले की मला इंटरनेट वापरणे म्हणजे एक गुन्हा वाटतो… 😉

फायरफॉक्स ३.५ चे अनेक फायदे आहेत, सर्वांत मुख्य म्हणजे, तुमच्या गोपनिय माहितीची सुरक्षितता, ऍड-ऑन्स, सुलभता, छान इंटरफेस, आणि इतर बरेच… तुम्ही एकदा का फायरफॉक्स वापरायला सुरू केले ना, की मग तुम्ही याला नक्कीच सोडणार नाहीत, याची मला पक्की खात्री आहे… याचे फायदे सांगत बसलो तर ही पोस्ट लांबलचक होऊन बसेल, त्यामुळे मी हे इथेच आटोपतो.

बेल्ट्झ्नर यांच्यामते, फायरफॉक्स ४ मध्ये खालील ठळक वैशिष्टे उपलब्ध करून दिली जातील, माझी तरी फायरफॉक्स ४ ला नापसंती आहे, त्यामध्ये बायडिफॉल्ट दिले जाणारे पर्याय, आज उपलब्ध असलेल्या लाखो ऍड-ऑन्सद्वारे मिळवता येतात, त्यामुळे तरी मी माझ्या लाडक्या ३.५ लाच चिकटून बसणार आहे!

फायरफॉक्स ४ ची ठळक वैशिष्ट्येः

 • वेगवानः जलद प्रोसेसिंग होईल..
 • शक्तिशालीः HTML5, CSS3 (अजुन आकर्षक स्टायलिंग पर्यायांसह) ला सपोर्ट असेल..
 • सुरक्षितताः अधिक सुविधांद्वारे आताच्या आवृत्तींपेक्षा अधिक सुरक्षेची आणि गोपनियतेची हमी
 • शिवाय SMIL आणि ऍनिमेशन साठी CSS Transitions ला सपोर्टिव्ह
 • मेन्यु बार बाय-डीफॉल्ट दिसणार नाही (क्रोम व सफारी प्रमाणे)
 • क्रोम व सफारी ४ प्रमाणे ऍड्रेस बारच्या वरती, म्हणजेच सर्वांत वर टॅब बार आणि त्यासाठी सँड-बॉक्स लुक
 • डिबगींग आणि पेज ऍनालायझिंग साठी डेव्हलपर्सना आवश्यक असलेल्या अधिक शक्तिशाली साधनांची उपलब्धता
 • आयई ९ प्रमाणे हार्डवेअर-ऍक्सलरेटेड Direct2D रेंडरिंग (यथार्थचित्रण)
 • सध्या उपलब्ध असलेल्या TraceMonkey इंजिनच्या जागी त्यामध्येच सफारीसाठी वापरले जाणारे ऍपलचे नायट्रो असेम्ब्लर जोडून JägerMonkey हे जलद जावास्क्रिप्ट इंजिन उपलब्ध असेल
 • Glass, Aero या आणि अशा प्रकारच्या शिल्लकच्या सुविधा इत्यादी.

ही आवृत्ती जेव्हा प्रसिद्ध होईल, तेव्हा खालील दुव्यावर जगातील प्रमुख भाषांमध्ये (मराठी सुद्धा) उपलब्ध असेल, सध्या खालील दुव्यावर लेटेस्ट आवृत्ती उपलब्ध असेल.

दुवाः  फायरफॉक्सची नविनतम आवृत्ती डाउनलोड करा!

धन्यवाद!

त. टि.: तुम्ही जर माझ्यासारखेच फायरफॉक्सचे असीम चाहते असाल, तर या नविन आवृत्तीबद्दल आणि सध्या वापरत असलेल्या आवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटते, ते कमेंटण्यास विसरू नका, आणि फायरफॉक्स वापरत नसला तरी, ते का वापरत नाही हे सुद्धा कमेंटा!! 😛

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. great!

  FF 4 che processing “faster” honar te kiti ani kase yavar kahi prakash taku shakalat tar farach uttam hoil.

  Sadhya mi FF 3.6 use karato aahe. pan tyache memory consumption khup ch aahe.
  tyamule mi baryach vela FF use karane talatoch.

 2. विशाल, मस्त लिहिलं आहेस रे.. पण मला अग्निकोल्ह्यापेक्षा क्रोमच आवडतं. अग्निकोल्हा क्रोमच्या तुलनेत बराच स्लो आहे. आणि क्रोमचं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे ते खूप लाईटवेट आहे. नवीन खिडक्या, नवीन पानं अग्निकोल्ह्याच्या मानाने जास्त वेगाने उघडतात. अर्थात हे झालं माझं मत आणि माझं निरीक्षण 🙂

  • ह्म्म, ही गोष्ट एकदम बरोबर आहे… क्रोम हे लाइटवेइट असल्याने आणि फास्ट लोड होत असल्याने बरेच फायरफॉक्स प्रेमी क्रोम कडे आकर्षिले गेले आहेत, जसं की मी या लेखात सांगितलंय… असो.. येत्या फायरफॉक्स ४ कडून तरी फक्त हीच अपेक्षा आहे की ते फास्ट लोड व्हावं आणि रॅम कमी खावी… काही जरी झालं तरी मी आणि माझ्यासारखे बरेच फायरफॉक्स (ऑफकोर्स ओपन सोर्स सुद्धा!) चे दिवाने आहेत… मी तरी कधीच फायरफॉक्सचा वापर करणं सोडणार नाही.. सध्याची मी वापरत असलेली ३.५ आवृत्ती मला अधिक आवडते… आणि याचे फायदे नक्कीच इतरांच्या तुलनेने बरेच आहेत… फक्त वरील गोष्टींमुळे लोकांना ते माहित नाहीत… असो…

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

 3. मी उबन्टू वापरतो, यावर फायरफॉक्सला पर्याय नाही, काही दिवस कोर्मचा नाद केला पण व्यर्थ !

 4. मी पण फ़ायर फोक्स ३.५ वापरतो . तुझी माहीती मस्तच असते. आमच्या सारख्यांना ती फार उपयुक्त असते.

 5. मला chrome पेक्षा firefox जास्त आवडते.
  त्यातील ad on सुविधा खूप छान आहे.
  आणि स्पीड हि मला ठीक वाटतो.

  • सतिश,
   फायरफॉक्सवर उपलब्ध असलेले ऍड-ऑन्स क्रोमवर सुद्धा उपलब्ध आहेत…
   होतंय काय, ओपन सोअर्स ऍप्लिकेशन असल्यामुळे त्यातील चांगल्या गोष्टी गुगलने लाईटवेअर ब्राउजर बनवून त्यात उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलीय, त्यामुळे फायरफॉक्सचा ओढा सध्या तरी मंदावलाय, पण आशा आहे की लोकांना फायरफॉक्स ४ नक्कीच आवडेल. फायरफॉक्सची खरी ताकद बर्‍याच जणांना अजुन ज्ञात नाही. असो..
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, फायरफॉक्सचा नाद कधी सोडू नका, बस्स! 😛

 6. विशाल,
  मला एक प्रोब्लेम होता. ओपेरा मध्ये कोणत्याही site वरील मराठी मजकूर नीट वाचता येत नाही. पण तोच मजकूर firefox मध्ये नीट दिसतो. मी windows Xp वापरतो.
  हा प्रोब्लेम ओपेरासाठी कसा सोडवायचा.

 7. हाय विशाल,
  अरे विशाल मी सध्या एपिक हा browser वापरत आहे. तू वापरलं नसशील तर वापरून बघ. खूप छान आहे. तो भारत देशासाठी विशेष बनवला आहे. त्याचा पाया मोझील्ला चा आहे. पण त्यामध्ये थोडे फेरफार केले आहेत. तू वापरून तुला आवडला का ते कळव.

 8. sir i using compaq laptop wih 2.0 speed and 2 gb ram so can u tell me which OS ANR BROUSER best for me.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME