वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

फोटोग्राफर्स@पुणे मेळावा

२३ प्रतिक्रिया

नमस्कार मंडळी,

आपणांस फोटोग्राफीची आवड असेल आणि पुण्यातील काही हौशी फोटोग्राफर्सना भेटण्याची इच्छा असेल तर आपणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. फोटोग्राफर@पुणे’तर्फे येत्या रविवारी म्हणजे १८ एप्रिल २०१० रोजी, सकाळी ७:३० वा. पुण्यात अशाच काही हौशी फोटोग्राफर्सचा मेळावा आयोजित केला आहे. विविध फोटोग्राफर्सना भेटणे, ओळखी करुन घेणे, अनौपचारिक गप्पा मारणे, त्यांचे अनुभव ऐकणे, फोटोग्राफीचे शक्य ते ज्ञान मिळवणे, फोटोग्राफीच्या नवनवीन साधनांची ओळख करुन घेणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे.

फोटोग्राफर्स@पुणे हा ग्रुप (ज्याला P@P असेही संबोधले जाते) २००६ मध्ये काही बोटांवर मोजण्याइतक्या मित्रांनी स्थापन केलेला एक ऑनलाइन ग्रुप आहे. एका परदेशी शहरातल्या ग्रुपपासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेला हा ग्रुप सुरुवातीला फार थोड्या लोकांना माहिती होता. वारंवार निमंत्रणे पाठवून काही सदस्य जमा झाले होते. सगळ्यांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे आपले छायाचित्रण कौशल्य सुधारणे. त्यासाठी मोजके लोक एकत्र भेटून स्वत:चे विचार एकमेकांशी शेअर करत असत. हळूहळू या ग्रुपने मूळ धरले आणि आज तीन वर्षांमध्ये या ग्रुपचे आज जवळपास १५०० हून अधिक सदस्य झाले आहेत. पूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. त्यामध्ये कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज लोक, विविध वयोगटातील हौशी छायाचित्रकार आहेत. काही सदस्य जरी पुणे शहराबाहेर असले तरी ते सदस्य काही ना काही कारणाने या शहराशी आपले नाते जपून आहेत मग ते भले नोकरीनिमित्त इतर शहरांमध्ये किंवा देशांमध्ये स्थायिक झाले असतील किंवा आज बाहेरुन येऊन पुण्यात स्थायिक झाले असतील.

सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन परस्पर संवाद साधणे आणि कौशल्याची देवाण-घेवाण करणे हा प्रमुख हेतू बाळगून या ग्रुपने वाटचाल सुरु केली आहे. प्रत्येक सदस्य फोटोग्राफीच्या अनेक पैलूबद्दल एकमेकांना मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेटी-गाठी आणि ऑनलाइन चर्चेच्या माध्यमातून फोटोग्राफीसंदर्भात अनेक विषय चर्चिले जातात. त्याद्वारे अनेक नविन फोटोग्राफर्सना शिकण्याची संधी मिळते. अणि विशेष म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ग्रुपचा सदस्य होण्यासाठी फ्लिकर अकाउंट असणे ही एकमेव गरज आहे. कुणीही या साइटवर रजिस्टर करुन फोटोग्राफर@पुणेचा सदस्य होऊ शकतो.

प्रत्येक फोटोग्राफरचे वेगळे कौशल्य असते आणि ते इतरांबरोबर शेअर केल्याने अनेकांना त्याचा फायदा होतो, तसेच त्यालाही आपले गुण-दोष समजतात. फोटोग्राफीच्या संदर्भातील अनेक पैलूंवर जाणकार लोकांकडून सदस्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी ग्रुपचे सदस्य नियमितपणे एकमेकांना भेटून संवाद साधतात. ग्रुपमार्फत अनेक चर्चासत्रे, सहली, कार्यशाळा, बैठका, जेष्ठ छायाचित्रकारांची व्याख्याने आयोजित केल्या जातात. गेल्यावर्षी पु.ल. देशपांडे उद्यान, सारसबाग, वाई-मेणवली, तिकोणा किल्ला, काही इनडोअर शूट आयोजित केले गेले. त्याचबरोबर सदस्य एकत्रितपणे किंवा लहान लहान गटांमध्ये मुळशी-ताम्हिणी, जेजुरी, रायगड, पानशेत, सिंहगड, भिगवण, मयुरेश्वर अभयारण्य, दिवेघाट परिसर अशा ठिकाणी फोटोग्राफीकरता जात असतात. ग्रुपच्या अनेक सदस्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीव स्तरावर पारितोषिके मिळाली आहेत किंवा त्यांच्या फोटोंचे हक्क विकले गेले आहेत.

फोटोग्राफर@पुणे’विषयी अधिक माहिती आणि फोटो, चर्चासत्रे आपणांस खालील दुव्यावर वाचता येतील.

http://www.flickr.com/groups/photographersatpune/

फोटोग्राफीमध्ये स्वतःच्या आनंदामध्येही ग्रुपच्या सदस्यांना समाजाचा कधीच विसर पडला नाही. एक सामाजिक बांधिलकी बाळगून प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रुपने विविध सामजिक संस्थांना नेहमीच मदत केली आहे. आपल्या आनंदामध्ये दुर्लक्षित घटकांना सहभागी करुन घेण्याचा ग्रुपचा प्रयत्न नेहमीच स्तुत्य राहिला आहे. आतापर्यंत फोटोग्राफर्स॒पुणेने तीन यशस्वी प्रदर्शने आयोजित केली आहेत. पहिले प्रदर्शन जुलै-२००८ मध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये भरले होते. त्याद्वारे जमा झालेला निधी विद्या महामंडळाच्या मूक-बधिर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्यात आलेला होत. दुसरे प्रदर्शन त्याच वर्षी डिसेंबरमध्ये न्यू आर्ट गॅलरी घोले रोड येथे भरवून जमा झालेला निधी ’आपले घर’ या सामाजिक संस्थेला देण्यात आला. गेल्या वर्षी पुन्हा एकदा तिसर्‍या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि मूक-बधिर मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला निधी उभा करुन देण्यात आला.

अशा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला हे निमंत्रण.

काय: फोटोग्राफर्स@पुणे मेळावा
कधी: रविवार, १८ एप्रिल २०१०.
वेळ: सकाळी ७:३० वाजता.
कुठे: पु.ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे.
कुणासाठी: फोटोग्राफीची आवड असणार्‍या सर्वांसाठी.

संपर्क क्रमांक: ९९२१८४५१५१ (पंकज), ९८५००३६२७५ (सुहास).

संबंधित लेखन

PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…

 1. १८ मार्च २०१० कि १८ एप्रिल २०१० ……..?

 2. pankaj,
  कधी: रविवार, १८ मार्च २०१०.
  is it 18th April?

 3. माफ करा मंडळी. कृपया १८ एप्रिल असे वाचावे. तसदीबद्दल क्षमस्व.

 4. सउ भा श गोरे म्हणतात:

  माझ्या जवल चान्गला क्यमेरा नाहि.म्हनुन येउ शकत नाहि

 5. khoop changala upakram aahe .aapanas shubheccha .Mi ek haushi photographer aahe pan Basmathnagar Pune anter 500km asalyamule echha asunahi sahabhagi hota yet nahi .kshamasva .

 6. फोटोग्राफर्स@पुणे मेळावा zala aasel ter please koni tari eakde update karave
  kya zale tya madye te..

  aase pan barech jan aahet jya ne he post ushera vach li aahe tari please kya zale te update karave ..

 7. Hi Pankaj
  Tumhi khup changali mahiti dili aahe camerya baddalchi
  tyabaddal man:purvak dhanyavad
  malahi photographyvishayi far aawad aahe
  ajun mahiti vachayala nakki aawadel

  regards
  Ashwini Pandire

 8. Hi Pankaj,

  Upakram farch chan ahe…photography baddal ajun mahiti karun ghyayla nakkich awdel. फोटोग्राफर्स@पुणे मेळावा che updates milale tar changla hoil..As maza sarkhi ajun khup loka astil jyanni ha post nantar baghitlay…

  Pooja Datar

 9. नमस्कार पंकज,
  फोटोग्राफर्स@पुणे मेळावा पुन्हा एकदा आयोजित करावा अशी खूप इच्छा आहे.
  मला फोटोग्राफीची अतिशय आवड आहे.. फोटोग्राफी बद्दल अजून माहिती करून घ्यायला नक्कीच आवडेल.
  फोटोग्राफर्स@पुणे मेळावा चे updates मिळाले तर चांगलं होईल…

  ~ गौरी

 10. नमस्कार पंकज,
  फोटोग्राफर्स@पुणे मेळावा पुन्हा एकदा आयोजित् ककेल्याबदद्लब thanku
  मला फोटोग्राफीची अतिशय आवड आहे.. फोटोग्राफी spardha बद्दल mahiti havi aahe ti mala pathawa

  sandip

 11. tumhi photography baddal dilelya mahiti baddal aaple hardik aabhar.
  me photographer nahi. parantu mala photography chi aawad aahe.
  tari pudhachya velela tumcha melava asel tevhya mala mazhya email id var kalva.

  thank you

 12. mi ek photographer aahe maze naav nilesh shinde aahe
  दि. Apr 12, 2010 hi date nighun geli aahe tari pudcha veli jar asel tar mi nakii yeil

  from
  nilesh
  studio24
  mob no – 09325337036
  thxxxx..

 13. Mi Photographer aahe mala aapli maithe avadli
  mala sabasad vaila avadel
  Nitin
  9922486035

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME