वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

फोटोग्राफी: विविध प्रकार

० प्रतिक्रिया

मागील भागात कॅमेरा आणि त्याचे विविध प्रकार जाणून घेतल्यावर आता आपण छायाचित्रणाचे विविध प्रकारांची ओळख करुन घेऊ.

स्थळानुसार होणारे वर्गीकरण:

 1. इनडोअर फोटोग्राफी (Indoor photogrpahy) : या प्रकारामध्ये सगळे फोटो चार भिंतींच्या आत काढले जातात. विशिष्ट प्रकारची प्रकाशयोजना करुन केल्या जाणाऱ्या या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये प्रामुख्याने जाहिरातींसाठी लागणारे उत्पादनांचे, व्यक्तींचे फोटो किंवा विशेष प्रयोग करण्याच्या हेतूने काढलेले फोटो यांचा समावेश होतो. इनडोअर फोटोग्राफी साठी विविध साधने आणि प्रकाशयोजनांनी सज्ज अशी खोली वापरली जाते जिला सामान्य भाषेत स्टुडिओ म्हणतात. प्रकाशयोजनेसाठी विविध प्रकारचे प्रकाशस्त्रोत, प्रकाशरोधक, विविधरंगी पडदे, परावर्तक, अर्धपारदर्शक आवरणे वापरले जातात.
 2. आउटडोअर फोटोग्राफी (Outdoor photogrpahy): चार भिंतीच्या खुल्या जागी केल्या जाणऱ्या या पद्धतीमध्ये प्रकाशाचे महत्व असले तरी त्यासाठी इनडोअरप्रमाणे विशेष साधनांचा फार कमी प्रमाणात वापर होतो आणि नैसर्गिक प्रकाशाचा अधिकाधिक वापर केला जातो. या प्रकारामध्ये प्रामुख्याने निसर्गछायाचित्रण, वन्य आणि पक्षीजीवन, मार्गचित्रण (स्ट्रीट फोटोग्राफी), नैसर्गिक व्यक्तिचित्रण (कॅन्डिड पोर्ट्रेट्स) यांचा समावेश होतो.

वेळेनुसार होणारे वर्गीकरण:

 1. दिन छायाचित्रण (Day photography): दिवसाउजेडी नैसर्गिक प्रकाशात काढली जाणारी छायाचित्रे. उदा. फुले, पक्षी आणि वन्यजीवन, निसर्गचित्रण, व्यक्तीचित्रण.
 2. निशा छायाचित्रण (Night photography): रात्री कृत्रिम प्रकाशात काढली जाणारी छायाचित्रे. उदा. रात्रीच्या वेळी काढली जाणारी वाहतुकीची छायाचित्रे, चंद्र-तारे, शहरातील दिव्यांच्या प्रकाशातली छायाचित्रे.

प्रकारानुसार होणारे वर्गीकरण:

 1. निसर्ग छायाचित्रण (Landscape photography): या प्रकारात खुल्या आकाशात निसर्गाची विविध रुपे कॅमेरामध्ये बंदिस्त केली जातात. यामध्ये नैसर्गिक प्रकाश पूरक असणे फार महत्त्वाचे असते. अगदी क्वचित प्रसंगी कृत्रिम प्रकाशाचा वापर केला जातो. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी ही छायाचित्रे सकाळी सुर्योदयाच्या आणि संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळच्या तासा-दोन तासात काढली जातात.
 2. हवाईचित्रण (Aerial photography): उडत्या विमानातून किंवा पॅराशूटमधून अथवा उंच इमारतीवरुन काढली जाणारी जमिनीची आणि भोवतालच्या परिसराची छायचित्रे. उद. विमानातून घेतलेला एखाद्या नदीचा किंवा किल्ल्याचा फोटो.
 3. गतीशील छायाचित्रण (Action photography): एखादी घटना घडत असताना त्यातील गती किंवा क्षण टिपण्यासाठी केलेले छायाचित्रण. उदा. पळणारा घोडा, हवेत उडालेला पोलव्हॉल्टपटू.
 4. पाळीव प्राणिचित्रण (Pet/Animal photography): पाळीव प्राणी आणि त्यांचे मानवाशी असलेले नाते अचूक टिपणे.
 5. स्थापत्यचित्रण (Architectural photography): विशेष इमारत, वास्तू, कारखाना यांचे छायाचित्रण.
 6. खगोल छायाचित्रण (Space photography): खगोल दुर्बिणीच्या सहाय्याने केले जाणारे अवकाशातील छायाचित्रण.
 7. सर्जनशील छायाचित्रण (Artistic photography): सर्जनशील चौकट धरुन काढलेले छायाचित्र.
 8. प्रसंगचित्रण (Event photography): एखाद्या प्रसंगाचे, समारंभाचे केलेले छायाचित्रण.
 9. सूक्ष्म छायाचित्रण (Macro photography): अतिशय लहान गोष्टींचे केलेले चित्रण. उदा. फुले, त्यातील कीटकजीवन, इ.
 10. पत्रकारिता छायाचित्रण (Journalist photography) : विशेष बातमीमूल्य असलेले चित्रण.
 11. वैद्यकीय छायाचित्रण (Medical photography): वैद्यकीय उपयोगासाठी केले जाणारे छायाचित्रण.
 12. व्यक्तिचित्रण (Portrait photography): अनेकविध व्यक्ती आणि त्यांच्या विविध भावमुद्रा टिपणारे छायाचित्रण.
 13. न्यायवैद्यक छायाचित्रण (Forensic photography): पोलिसतपास आणि न्यायालयीन कामकाजात पुरावा म्हणून सादर होणारे छायाचित्रण.
 14. खेळांचे छायाचित्रण (sports photography): विविध खेळ, त्यातील जल्लोश, ऊर्जा यांचे केलेले छायाचित्रण.
 15. प्रवासचित्रण (Travel photography): प्रवास करताना केलेले छायाचित्रण. एखाद्या स्थळाचे वैशिष्ट्य दर्शवणारे छायाचित्रण.
 16. वन्यजीवन छायाचित्रण (Wildlife photography): वन्यजीवन, प्राणी, पक्षी यांचे विश्व उलगडणारे छायाचित्रण.
 17. पाण्याखालील छायाचित्रण (Underwater photography): पाण्याखालील प्राणिजीवन, वनस्पती आणि तळाशी असलेल्या जमिनीचे छायाचित्रण.
 18. उत्पादन छायाचित्रण (Product photography): एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी केलेले उत्पादनाचे छायाचित्रण.
 19. नग्न छायाचित्रण (Nude photography): मानवी शरीराची कलात्मक रचना करुन त्याची सौंदर्यस्थळे उलगडणारे छायाचित्रण.
 20. मॉडेल छायाचित्रण (Model photography): जाहिरातीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यक्तींचे छायाचित्रण.
 21. फॅशन छायाचित्रण (Fashion photography): (बहुतेक वेळा) कपड्यांच्या किंवा अन्य उत्पादनाच्या विक्रीच्या जाहिरातीसाठी केले जाणारे छायाचित्रण.

तर मग तुमची आवड ओळखा आणि सुरु करा आपली स्वतःची ’फोटोगिरी’!!!

पुढील भागात आपण  विविध प्रकारची भिंगे (Lens) आणि त्याचे उपयोग जाणून घेऊ.

संबंधित लेखन

 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
 • फोटोग्राफी: ओळख
  फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रण. खरे तर प्रकाशचित्रण हा शब्द अधिक संयुक्तिक ठरेल, कारण फोटो काढताना …
 • डिजीटल स्क्रॅप्स
  पुर्वीच्या काळी, फोटो बद्दलच्या आठवणी, तारखा इत्यादी फोटोच्या मागच्या बाजुला लिहुन ठेवायची पद्धत …
 • फोटोग्राफी: लेन्सविषयी सर्वकाही
  मागील भागात आपण फोटोग्राफीचे विविध प्रकार पाहिले. आता त्यासाठी लागणार्‍या भिंगांची म्हणजेच लेन्से…
 • फोटोग्राफर्स@पुणे मेळावा
  नमस्कार मंडळी,

  आपणांस फोटोग्राफीची आवड असेल आणि पुण्यातील काही हौशी फोटोग्राफर्सना भेटण्याची इ…

PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME