वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

बघा जरा पटतय का ते?

१ प्रतिक्रिया
२बीएचके - फ्लॅट!

२बीएचके – फ्लॅट!

असं समजा की एक २ खोल्यांचा – २बीएचके – फ्लॅट विकायचा आहे. त्या फ्लॅट ची कींमत ५० लाख आहे. आणि बँक तुम्हाला त्याच्या एकूण किमतीच्या ८५% कर्ज देऊ करत आहे. आपण धरून चालु कि हे कर्ज आपण २० वर्षांसाठी घेतो आहे. आणि आता खाली दिलेले “कॅल्क्युलेशन्स” पहा.

घर घेण्यासाठी तुम्ही स्वतः दिलेला हातभार – कॉन्ट्रीब्युशन – १५% : रुपये ७.५ लाख ( यामध्येच सगळी बचत/जमापुंजी संपुन जाते !)
गृह कर्ज : रुपये ४२.५ लाख

दरमहा येणारा मासिक हप्ता (व्याजदर ११%) : रु .४७०००
प्रतिपाळ खर्च – मेंटेनन्स- दरमहा : रु .२०००
मालमत्ता कर दरमहा (प्रॉपर्टी टॅक्स) : रु .१०००-१५००

गृह कर्ज व्याजावर मिळणारी कर सवलत : दरमहा रु .४००० ( ते ही फक्त पहिल्या काही वर्षांपर्यंतच )
म्हणजे घरासाठी येणारा एकूण खर्च (अंदाजे) दरमहा : रु. ५००००
(मेंटेनन्स चार्जेस आणि कर हे भविष्यात महागाई दराप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.)

आणि दरमहा एवढे सगळे पैसे दिल्यानंतर –
१. प्रत्येक वेळी तुमच्या कुटुंबाला खरेदीसाठी नकारघंटा ऐकावी लागणार (जरी तुमचा पगार ७० ते ८० हजार असेल तरी)
२. पहिल्या काही वर्षांसाठी तरी खर्चावर संपुर्ण नियंत्रण आणि नविन गाडीचा प्लान पुढे ढकलला जाणार 🙂
३. आणि जर या काळात नोकरी गेली, कामावरुन बडतर्फ केले (जे मंदीच्या काळात हमखास होते !) तर तुमची आर्थिक गणिते अशी काही बिघडतील की काही खैर नाही.

२० वर्षांनंतर तुम्ही दिलेली एकुण रक्कम असेल : ( ५००००० X २० X १२ ) + ७५०००० = १२७५०००० = रुपये १.३ करोड
आणि एवढे सगळे करुन करून तुम्हाला काय मिळालं तर एका २० वर्ष जुन्या असलेल्या सोसायटी मधला एक २० वर्ष जुना झालेला फ्लॅट. २० वर्षांनंतर तुमच्या 2 BHK घराची (market price ) किंमत १.५ करोड असेल. आणि २० वर्षात एका घराशिवाय काहिही मिळाले नसेल.

हेच घर जर तुम्ही घर भाडयाने घेतले तर तुम्हाला जास्तित जास्त घरभाडे १०००० येईल. इतर सगळा खर्च मिळून , आणि असं समजून चालूया की भाडे दरवर्षी ८% दराने वाढेल ( खरे तर कमीच वाढेल). प्रतीवर्षी तुम्ही दिलेलं घरभाडे असेल १.२ लाख, १.३ लाख, १.४ लाख………
याच दराने २० वर्षांनंतर तुम्ही भरलेलं एकुण भाडे असेल …………….फक्त ६० लाख.

फायदे –
१. तुम्ही कधीही घर बद्लु शकता. अगदी एखाद्या छोट्याशा कारणासाठी देखिल !
२. अचानक परगावी किंवा परदेशी स्थायीक होण्याची संधी मिळाली तर तुम्ही सहजगत्या ती संधी स्वीकारु शकता.
३. आपल्या सोयीनुसार ऑफीसच्या जवळ, मुलांच्या शाळेच्या जवळ घर घेऊ शकता.
४. तुमच्या वाढत्या कुटुंबासाठी 3BHK फ्लॅट कधीही घेउ शकता.
५. राहत्या घराचे भाडे जसजसे वाढेल त्यानुसार एचाअरए मध्ये कर सवलतही मिळेल.
आता जर तुम्ही “हुशार” असाल तर काही पैसे शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवाल कारण तुम्ही फक्त रुपये १०००० घरभाडे देत आहात, ५०००० हप्ता नाही.

जर तुम्ही २० वर्षांपर्यंत १५% दराने दरमहा रुपये २५००० गुंतवले ( उदाहरणार्थ तुम्ही जागा खरेदी करा किंवा म्युच्युअल फंड, पीपीएफ मध्ये गुंतवा.) जसे तुमचे घरभाडे वाढेल तसे तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी करु शकाल, आणि तरी सुद्धा तुम्ही २.५ करोड या २० वर्षात कमवु शकता ( हे तुमच्या स्मार्ट गुंतवणुकीवर अवलंबून आहे.)

आणि नंतर तुम्ही असाच एखादा फ्लॅट तुमच्या मूलांकरिता खरेदी करु शकता आणि काही पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षण आणि विकासावर सुद्धा खर्च करु शकता.

– ॠषिकेश सावंत द्वारा पाठवलेल्या ईमेल वरुन.

संबंधित लेखन

  • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
    सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
  • मला भारतरत्न पाहिजे !

    बस…ठरलं ! आता अजून काही नाही…हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच…काय म्हणता ? मला कशाला…? छे…

  • जागे व्हा…..!!
    माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
  • काही लिनक्स कमांड्स – भाग १

    लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

  • फायरफॉक्स ४

    मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

PG

दिपक शिंदे

नमस्कार! आजपर्यंत “भुंगा – द सोशल इन्सेक्ट” या नावाने लिखान करत आलो. मराठी मंडळीवरही तंत्रज्ञानविषयी लिहीत राहीन. आपण मला ट्विटर वरही भेटु शकता.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME