वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

बालपणाच्या पूर्वार्धातील काळजी आणि शिक्षण – भाग १

२ प्रतिक्रिया

ECCE – Early Childhood Care and Education अर्थात, बालपणाच्या पूर्वार्धातील काळजी आणि शिक्षण.

आपल्याकडे जेव्हा असं म्हटलं जातं की नवी पिढी खूपच चलाख आहे किंवा हुशार आहेत, तेव्हा हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, की नव्या पिढीच्या शिक्षणाची सुरुवातही खूप लवकर झाली आहे. आमच्या लहानपणी बालवाडी वयाच्या चौथ्या वर्षी नि मग मोठी शाळा अशी शिक्षणपद्धती असायची. आता मात्र नव्याने सुरू झालेल्या या ECCE शिक्षणपद्धतीमुळे मूल वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षापासूनच शाळेत जाउ लागले आहे.

बालपणाच्या पूर्वार्धातील काळजी आणि शिक्षण – भाग १

हसत खेळत ज्ञान या तत्वावर आधारित अशी ही शिक्षणपद्धती मुलांना केवळ परंपारिक शिक्षणच देत नाही तर, फळे, फुले यांची ओळख, प्राणिसंग्रहालय, सुपर मार्केट, बिस्किटांच्या कंपनीला भेट देणे, समाजोपयोगी व्यावसायिक, जसे वकील, डॉक्‍टर, सुतार, चांभार यांच्याशी संवाद अशा उपक्रमांतून मुलांना समाजातील विविध महत्त्वाच्या घटकांचे अगदी जवळून दर्शन घडवते.
आपल्याला जर अशी शंका असेल, की लहान मुलांना हे सर्व समजत असेल का, तर होय, त्यांना हे सर्व समजतं आणि योग्य वेळी ते त्या माहितीचा उपयोगही करतात. लहान मुलांची कल्पनाशक्ती व ग्रहणशक्ती अविश्वसनीय असते.

लहान मुलांची कल्पनाशक्ती व ग्रहणशक्ती अविश्वसनीय असते.

भारत हा विविध संस्कॄतींचा देश आहे त्यामुळे आपण सर्वचजण आपापले सण थोड्याफार फरकाने आपल्या कुटुंबासमवेत साजरे करतो. तसेच, हे सण जर शाळेत साजरे केले तर, सर्वच मुलांना प्रत्येक सणाची ओळख होते आणि मुलांमध्ये मैत्रीची भावनाही वाढीस लागते. यासाठी हल्ली प्रत्येक बालवाडी आणि नर्सरी हे सण साजरे करू लागली आहे.मोठ्या शाळेत जास्त वेळ बसावं लागण्यची सवय होण्यासाठी बालवाडीमध्ये दोन तास बसणं मुलांना खूप उपयोगी पडतं. यासाठी ECCE शिक्षणपद्धतीमध्ये लहान मुलांच्या वयाला अनुसरून असे विविध उपक्रम असतात.

 

संबंधित लेखन

PG

कांचन कराई

मी कांचन कराई. आरशासारखी स्वच्छ आणि पारदर्शक. मनुष्यस्वभावाचा अभ्यास करणे हा छंद आहे माझा. मराठीच्या प्रसारासाठी निरनिराळ्या माध्यमांतून स्वत:च्या ब्लॉगवर प्रयोग करत असते. स्वत:च्या आवाजात कथा ध्वनिमुद्रित करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत.
मोगरा फुलला

  1. नमस्कार कांचनजी आता तुमचे लेख मला ह्या साईट वर वाचावयास मिळणार हे पाहुन आंनंद झाला.

    असो आपण म्हणता तशी परीस्थिती सध्या शहरामधील शाळातुन निश्चित आहे पण ग्रामिण भागातील मुलांचे काय? कामानिमित्त मी ग्रामिण भागात खुप फीरलो आहे त्याच्या शिक्षणाची परीस्थिति अत्यंत वाईट आहे. अशाप्रकारचे जे शिक्षण शहरातील मुलाना {ते सुध्धा ज्यांचा आर्थिक स्तर उच्च आहे} अशाना मिळते ते जर ग्रमिण मुलाना मिळाले तरच अशा सुधारणाचा उपयोग होईल.

    तरी सुध्धा सध्याची मुले आपल्या पेक्षा भाग्यवान आहेत हे निश्चीत.

  2. ग्रामिण भागात शिक्षणाची परीस्थिति अत्यंत वाईट आहे. या संदर्भात आम्ही एक कार्यशाळा घेतली.त्याचा अहवाल वीजतंत्री- मोफत प्रशिक्षण —या लेखात वाचा.
    http://Savadhan'sblog

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME