वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

बोकेह

५ प्रतिक्रिया

नाव वाचुन विचारात पडलात ना? हा काय प्रकार आहे? फोटोग्राफीमध्ये तुम्ही अगदी मुरलेले खेळाडु असाल तर कदाचीत हा शब्द तुमच्या अंगवळणी पडला असेल, पण इतरांसाठी, ’बोक्या’ शब्दाशी सार्धम्य दाखवणारा शब्द, एवढीच त्याची महती.

डेफ्ट ऑफ फिल्ड

’व्यक्तीचित्र’ ह्या प्रकारातील फोटो काढताना त्या व्यक्तीच्या मागील पार्श्वभुमी ही शक्यतो धुसर येईल असा प्रयत्न असतो जेणे करुन ती व्यक्ती फोटोमध्ये उठुन दिसते. ह्यालाच फोटोग्राफीमध्ये ’डेफ्ट ऑफ फिल्ड’ असे म्हणतात. ’बोकेह’ ही त्याचीच पुढची पायरी. ह्यामध्ये साधारणपणे एखाद्या छोट्याश्या प्रकाश स्त्रोताला ’आऊट-ऑफ-फोकस’ अश्या प्रकारे करतात की तोच प्रकाश डोळ्याला सुखावह वाटतो. शेजारील चित्रामध्ये त्या ’टेडी’च्या शेजारील लाईट पाहीलेत? ते खरं तर छोटी एल.ई.डी. दिव्यांची माळ आहे. परंतु त्याला मुद्दाम ’आऊट-ऑफ-फोकस’ ठेवुन तश्या प्रकारचा आभास निर्माण केला आहे.

सर्व यंत्रणा सज्ज करा.

खरी गंमत तर पुढे आहे. ह्या दिव्यांनाच आपण वेगवेगळे आकार देऊ शकतो, फोटो काढतानाच!! तुमच्या लेन्स वर पुढच्या बाजुस चित्रात दाखवले आहे त्याप्रमाणे कागदाचा एक गोल कापुन चिकटवुन टाका आणि त्या कागदावर तुम्हाला जो आकार पाहीजे तस्सा कापुन घ्या. त्यानंतर पुढील चित्रात दाखवला आहे त्याप्रमाणे सर्व यंत्रणा सज्ज करा.

म्हणजे एका ठिकाणी बारीक दिव्यांची माळ टांगुन ठेवा. दिव्यांच्या माळेच्या मागे आणि भिंतीच्या अलीकडे थोडी फार जागा राहील ह्याची खात्री करा (डेफ्ट-ऑफ-फिल्ड साठी). त्यानंतर त्या माळांपासुन बरेच पुढे, शक्य तितक्या दुर तुमचा ऑबजेक्ट, म्हणजे ज्या वस्तुचा फोटो काढायचा आहे ती वस्तु ठेवा. त्या वस्तु च्या शेजारीच एखादा झिरो शक्तीचा दिवा असलेला नाईट-लॅम्प लावा. त्याचा योग्य प्रकारे प्रकाश पडेल अश्या अंतरावर तुमचा ऑबजेक्ट ठेवा. माझ्या उदाहरणात एक खेळण्यातील कार वापरली आहे.

ऑबजेक्टपासुन थोडे पुढे तुमचा कॅमेरा ठेवा. हे अंतर किती असावे हे तुम्ही कोणती लेन्स वापरता आहात यावर अवलंबुन असते. मी कॅननची ५०एम.एम. एफ२.८ प्राईम लेन्स वापरली असल्याने अंतर फार नसले तरी चालले. तुम्ही टेलीफोटो वापरत असाल तर अंतर जास्ती लागेल. थोडे फार फोटो काढल्यावर हे अंतर किती असावे ह्याचा अंदाज तुम्हाला येईल.

दिव्यांची माळ आणि तो नाईट-लॅम्प!

एकदा का सगळी जुळवाजुळव झाली की खोलीतील सर्व दिवे मालवुन टाका. आता फक्त तुमची दिव्यांची माळ आणि तो नाईट-लॅम्प एवढेच चालु हवे. हे सर्व झाले की तुमच्या कॅमेराचा मोड ऍपेरटअर-प्रायोरीटी (AV) किंवा शटर-प्रायोरीटी (TV) वर ठेवा. एकुण प्रकाशाचा अंदाज घेउन आय.एस.ओ आणि एस्क्पोजरचे नंबर सेट करा आणि मग शटर एकवार अर्धे दाबुन फोटो कसा येतो आहे त्याचा अंदाज घ्या. योग्य वाटला की करा क्लिक-क्लिकाट :-).

ऑटो फोकस मध्ये निट जमत नसल्यास एकवार फोकस सेट करुन झाल्यावर लेन्स वरील बटण वापरुन फोकस मॅन्युअलला सेट करा म्हणजे थोडीफार हालचाल झाली तरी फारसा फरक पडणार नाही.

हे सर्व जमल्यावर पुढील प्रकारचा फोटो मी काढला आहे. ह्यामध्ये कागदावर एका चांदणीची रचना मी केली असल्याने ’बोकेह’ चांदण्यांचा आभास निर्माण करत आहेत.

संबंधित लेखन

 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • फोटोग्राफी: लेन्सविषयी सर्वकाही
  मागील भागात आपण फोटोग्राफीचे विविध प्रकार पाहिले. आता त्यासाठी लागणार्‍या भिंगांची म्हणजेच लेन्से…
 • फोटोग्राफी: विविध प्रकार
  मागील भागात कॅमेरा आणि त्याचे विविध प्रकार जाणून घेतल्यावर आता आपण छायाचित्रणाचे विविध प्रकारांची…
 • डिजीटल स्क्रॅप्स
  पुर्वीच्या काळी, फोटो बद्दलच्या आठवणी, तारखा इत्यादी फोटोच्या मागच्या बाजुला लिहुन ठेवायची पद्धत …
PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

 1. भारीच आयडिया आहे. पंक्या दादाच्या पुर्वीच्या काही फोटोजमध्ये हा “बोक्या” प्रकार मी अजुनही पाहिला नव्हता. बरं एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे तू जे कागदांचे विविध आकार लेन्सवर चिकटवायचे सांगितले आहेस ना, ते जरा कळाले नाही. म्हणजे पुर्ण लेन्स झाकली जाईल या आकाराचा कागद लेन्सवर चिकटवावा आणि त्यामध्ये इच्छित (हवा असलेला) आकार कापावा, असे तुला म्हणायचे होते का?

  तो खेळण्यातल्या कारचा फोटो मी कालच फेसबुकवर पाहिला होता, मस्त आलेत पौर्णिमेचे टिपूर चांदणं त्यात…

  बाकीची माहिती झकास आहे.

  • हो विशाल बरोबर आहे. कॅमेराची पुर्ण लेन्स झाकली गेली पाहीजे.

   बाकी पंक्याचे काही सांगु नकोस, तो सध्या लगीन घाईत मग्न आहे. आता आला की बघ तडाखाच लावेल तो. लग्नाचेच असले भारी भारी काढले असतील ना त्याने फोटो. बोकेह त्याने अजुन चालु केले नाही ते बरंच आहे नाही तर मला कॉम्लेक्स यायचा 🙂

   • ह्म्म, ताईच्या लग्नात तर तो बॅण्ड-बाजांऐवजी त्याच्या कॅमेर्‍याचाच क्लिक-क्लिकाट करत असेल… (ते काहीही असो, तुमच्या दोघांच्या भांडणात आम्हाला एकापेक्षा एक, असे भारी भारी फोटो अनुभवायला तर मिळतात ना..! मग तुम्ही तिकडं कसले का प्रयोग करत नाहीत, आम्हाला त्या प्रयोगांशी काय देणं-घेणं! आमचे थोडेच पैसे जातात त्यासाठी… बाकी तुम्हा दोघांचे फोटो पाहणे म्हणजे नेहमीच पर्वणी असते!!)

    ऐ तुला वरच्या ओळीत मी खोडलेलं दिसतं नाही ना रे.. ते लिव्हाचं नव्हतं मला, पण लिव्हल्या गेलं, अन् त्येला खोडलं बी..! 😛

 2. निखिल वाळवेकर म्हणतात:

  हे तंत्र वापरून काढलेले छायाचित्र
  http://www.flickr.com/photos/walvekarnikhil/4454058871/in/photostream/

  मी तयार केलेली यंत्रणा थोडी वेगळी होती:
  http://walvekar.blogspot.com/2010/03/blog-post.html

दखल घेणारे बाह्यदुवे (ट्रॅकबॅक्स/पिंगबॅक्स)

 1. अरे भुंग्या आहेस कुठे? « डोक्यात भुणभुणणारा मरा - [...] ’मराठीमंडळी.कॉम’ ह्या संकेतस्थळावर इथे लिहीला [...]

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME