वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

बोलु कौतुके !!!

८ प्रतिक्रिया

सदरचा  माहितीपर लेखही हा एका वृत्तपत्रासाठी लिहिला आहे, तो प्रकाशित झाल्यावर इथे कळवले जाईलच. मात्र त्याआगोदर आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मी माझ्या मराठी मंडळीवरील लिखाणाचा शुभारंभ करत आहे.

मराठी अभिमान गीत

गेल्या १५ दिवसात घडलेल्या दोन घटना, मराठीच्या बाबतीतल्या, दोन संपुर्णतः भिन्न क्षेत्रातल्या, पण दोघांमध्ये एकच सामाई़क गोष्ट. दोन्ही उपक्रमातुन दिसते ते आपल्या भाषेवरचे निस्सिम प्रेम. महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव चालु असताना घडलेल्या या गोष्टी आनंददायक आहेतच. पण ज्यांचे तोंड भरुन कौतुक करावे अशाही आहेत.

यातली पहिली गोष्ट म्हणजे ”मराठी अभिमान गीत”,…….! याबद्दल निदान तुम्ही ऐकले किंवा वाचले असेलच किंवा मग पाहिले असेल यु ट्युब वर.  संगीतकार कौशल इनामदारचा हा ”ड्रीम प्रोजेक्ट” . ३५६ समुह गायक, ११२  गायक, ८ स्टुडिओ या सर्वांनी मिळून बनलेले एक ८.१२ मिनिटाचे एक गाणे .सॉरी, गाणे नव्हे, मराठीचा खळाळता झराच जणू .. नुकताचा  मराठी दिनी विविध क्षेत्रातील  २१  नामवंत लोकांचा हस्ते या गाण्याचे उद्धाटन झाले. या गाण्याची जन्मकथा तसी वेगळी आहे…  खरतरं तमाम रेडिओ वाहिन्यांवर ”मराठी”ला  असलेला दुय्यम मुल्याबद्दल असलेल्या रागातुन या गाण्याचा जन्म झाला. आणि गंमत म्हणजे  परवा जेंव्हा मी माझ्या एका मित्राला याबद्दल विचारले,  (तो रेडिओ मिरचीत ”आरजे” आहे) तेंव्हा त्याने त्याच दिवशी आम्ही ते गाणे आणि कौशलची मुलाखत ऐकवल्याचे सांगितले.  याचा अर्थ गाणे  येताच त्याचा मूळ हेतू साध्य झाला , आणि एखाद्या उपक्रमाची नुसती नांदी होताच त्याने अपेक्षित परिणाम साधावा हे त्या उपक्रमाचे सर्वात मोठे यश असते नाही का, होय ते यश कौशल ने मिळवले आहे.. अभिनंदन कौशल!

पण या गाण्याचे कौतुक इतक्याच साठी नाही आहे. कारण हे गाणं इतकं संकुचित नाहीच आहे.. हे गाणं म्हणजे मराठीचा आवाज आहे.  फक्त आपल्या मातृभाषेसाठी ५०० लोकांना एकत्र आणणं.  त्यांच्याकडून गाणं म्हणवुन घेणं, ही खायची गोष्ट नक्कीच नाही.  ”लाभले आम्हास भाग्य” हे तमाम मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करते, त्यांच्य भावना व्यक्त करते.  विठ्ठल उमप ते मुग्धा वैशंपायन आणि शंकर महादेवन ते पं. राजा काळे.  मराठी गानपरंपरा किती प्रगल्भ आणि विविधांगी आहे याचे दर्शन हे गाणे घडवते.  सुरेश भटांच्या  उत्तम बोलानी मराठीची महती सांगायचे आपले काम पुर्वीच केलेले आहे, पण  या गाण्यानं त्या कवितेला आणि त्या भावनांना पुन्हा एकवार जिवंत केलय. महत्वाचे म्हणजे   या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला  कोणत्याही राजकीय  पक्षाचा पाठींबा वा आर्थिक मदत नाही, आली असेल तर ती मदत कौशलने नाकारलेली आहे.  तमाम जनतेने प्रत्येकी ५०० रूपये देऊन हे गाणे तयार झालेले आहे.  म्हणूनच, ते गाणे ”आपले” आहे.  तुम्हा, आम्हा सार्‍यांचे अभिमान गीत. अभिमान गीत म्हणजे नक्की काय असते आणि कसे असावे हे सांगणारे हे अभिमान गीत…

खरतर, या उपक्रमाबद्दल मला गेले वर्षभर माहिती होती, पण मी त्यावर लिहीण कटाक्षानं टाळलं होतं. अभिमान गीत ही संकल्पना खरेच उत्तम होती, पण प्रत्यक्षात ते गाणं कस बनतं याबद्दल मला शंका होती.  पण, परवा युटयुबवर ते गाणं पाहिले.  आणि, कान तृप्त झाले.  अभिमानगीत म्हणून नव्हे तर एक ”गाणं” म्हणूनही ते उत्कृष्ट आहे.  त्यात ना आवेश आहे, ना जल्लोष आहे.आहे  ती फक्त प्रसन्नता. मराठीची प्रौढी नव्हे  तर अभिमान आहे.  असे सांगणारी.  कलाकारांची निवड, आणि त्यांना दिलेले शब्द … अहाहा! क्या बात है !!  निहिरा जोशीला दिलेले “लाजते मराठी ” असो  वा विठ्ठल उमापांचा खर्डा आवाज. ” आमच्या पिलापिलात ” असे हळुवार शब्द गाणार्‍या देवकी ताई …  त्याच्या या निवडीला खरोखरच दाद द्यावीशी वाटते.  हे गाणे मी गेल्या १० दिवसात ५० वेळा तरी ऐकले असेल. त्यामुळेच आज जर का मला हे गाणे फक्त  ऐकवलेत, तर मी त्यातली प्रत्येक ओळ कोण म्हणत आहे, ते लगेच सांगु शकतो.  कारण हे गाणं गाताना, करताना ११२ नामवंत आवाज २४  ओळीत सामावताना प्रत्येक गायकाची आयडेंटीटी जपलेली आहे् हे जे मिक्सिंग चे  जे कौशल्य आहे हे खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक प्रकाराला, प्रत्येक पीढीला योग्य संधी मिळाली आहे. खर्‍या अर्थाने हे गाणे मराठीची आयडेंटीटी बनलेले आहे.

समजा मला कुणी विचारलं, की बाबा रे, या सुवर्णमहोत्सवी वर्षात काय खास घडले?  तर मी लगेच  सांगेन, आम्हाला आमचे ”गाणे” मिळाले. कोण्लाही दोष न देणारे, स्वाभिमान जपणारे पण त्याचा निखारा न बनविणारे  आमच्या मनातल्या भावना  सांगणारे आमचे गाणे. जेव्हा एखादा माणूस तन मन धन अर्पुन एखादी कृती घडते तेव्हा त्याचा परिपाक काय असतो याचा वस्तुपाठ घालुन देणारे ही कलाकृती …

या आनंदातुन बाहेर पडतोय ना पडतो तोच १ मार्चला आम्हा ब्लॉगर्सचे संकेतस्थळ ”मराठी मंडळी” चा श्रीगणेशा झाला. गेले कित्येक दिवस तुम्हा, आम्हा सार्‍यांच्या कानावर पडणारा ब्लॉग हा शब्द. प्रसन्नने युव्या अभिव्यक्ती तल्या लेखातुन ब्लॉग विश्व काय ते उलघडवुन दाखवले आहेच. पण योगायोगाने त्यानंतरच्या आठवड्यात आम्ही ब्लॉगरनी एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले. आम्ही सारे ब्लॉगर जगाच्या विविध भागातले, विविध वयाचे, आम्ही लिहित होतो ते आमच्या सुखासाठी, इतकेच काय, तर आमच्या लिखाणाबद्दल चर्चा करायचो. ऑनलाइन कट्टे जमवायचो, आणि मग कोणत्याही भल्या बुर्‍या विचारावर बिनधास्त चर्चा करायचो. आणि, अचानक अशी जाणीव झाली की आज जवळ जवळ ५००० ब्लॉगर आहेत. सगळे आपल्या भाषेविशयीच्या अनाम ओढीने लिहिणारे. पण जर आपण संघटीत झालो, तर ब्लॉग हे आपल्या भाषेच्या आणि आपल्या सर्वांचच्या विकासाचे प्रभावी माध्यम बनु शकते. हाच विचार पुढे आला आणि १७ जानेवारीला पहिला मराठी ब्लॉगर मेळावा पुण्यात झाला. एकमेकाना लेखातुन भेटणारे लोक प्रत्यक्षात भेटले, आणि काहीतरी ठोस करायचे असे ठरले, आणि अवघ्या १ महिन्यात आम्हा ब्लॉगर्सची हक्काची जागा आम्हाला मिळाली, हीच ती आमची साईट ” मराठी मंडळी”…

मराठी मंडळी

नक्की काय आहे ही मराठी-मंडळी ? तर सर्व ब्लॉगर्सना एकत्र आणणारे एक ठिकाण. आजपर्यंतजे ब्लॉगर वेगवेगळ्या बेटांवर लिहित होते. त्यांचा एक समुह. या साईटने मराठी नेटविश्वात प्रचंड बदल घडवले आहेत. येथुन पुढच्या काळात अनेक उपक्रम या साईटमार्फत चालवले  जाणार आहेत. जुन्यांचे एकत्रीकरण आणि प्रत्येक नव्या मराठी ब्लॉगरला मार्गदर्शन अशी दुहेरी भुमिका ही साईट पार पाडणार आहे. आपल्या मराठीला आपण कसे जपु शकतो, त्यासाठी या माध्यमाचा पुरेपुर वापर कसा करु शकतो, याचा विचार यात झालेला आहे. म्हणूनच आमच्या लेखांबरोबरच जुन्या जात्यावरच्या ओव्या, काही म्हणी, शब्दप्रयोग या सार्‍यांनाही येथे स्थान मिळालेले आहे. थोडक्यात काय, तर एका चांगल्या कामासाठी काही मराठी माणसे एकत्र आली आहेत, त्यांचे हे कुटुंब बनले आहे. या संस्थळाचा उद्घाटन सोहळाच या कुटूंबाची एकी दाखवणारा होता. १ मार्च ला रात्री १०. ०३ मिनिटानी आम्ही सुमारे १०० ब्लॉगर एकाचवेळी ऑनलाईन आलो आणि सर्वांसमक्ष ही साईट चालु केली गेली. आहे ना भन्नाट? त्याहुन गमतीची गोष्ट अशी की त्याच दिवशी संध्याकाळी पुण्यात भुर्जपत्र ते ब्लॉगपेज  असा परिसंवाद रंगला होता, तेथे अनिल आवचट यानी हे संकेतस्थळ चालु झाल्याची घोषणाही केली. साहित्याची जपणूक आणि गुणात्मक वाढ हा एक प्रमुख हेतु ही साईट ठेवताना होता, आणि वरच्या उपक्रमाप्रामाणे नुसती नांदी होताच मराठी मंडळीला  साहित्य संमेलनातील वरच्या परिसंवादात स्थान मिळाले, हादेखील या मध्यमाच्या यशाचाच पुरावा, पण त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे, आणि त्याची जाणीवही आम्हा सर्वांना आहे.

या साईटची जन्मकाहाणी तुम्ही पाहिलित, पण वर  हीदेखील  एक नवी सुरूवात आहे.  मी स्वत: गेली 1½ वर्षे ब्लॉगींग करत आहे.  कारण, ब्लॉग हे नव्या पीढीचे माध्यम आहे  त्यात प्रचंड ताकद आहे.  फक्त इतके दिवस ही ताकत विखुरलेली होती.  ”ब्लॉगर मेळयावाने” ती ताकद एकत्र आली.  आणि ब्लॉग हे एक नवे माध्यम म्हणून समोर आले  आणि त्याचा वापर जनतेच्या भल्यासाठी होत आहे, ही नक्कीच चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे, नाही का? महत्त्वाचे म्हणजे सर्वसमावेशकता हा महत्त्वाचा निकष अगदी सुरवातीलाचा या मंडळीनी पुर्न केला आहे.  कोण नाहीय या मंडळीमध्ये?  ७० वर्षाचे गृहस्थ आहेत ते माझ्यासारखा १६ -१७ वर्षाचा तरूण आहे.  कोल्हापूर ते कॅलिफोर्निया असे सगळीकडचे मराठी बांधव इथे आहेत.  ”जात्यावरच्या ओव्या” ते उद्याचे भविष्य ”आयपॉड” सारे, सारे काही त्यात आहे. हे सर्व करताना कोणताही स्वार्थ, स्वत:चा फायदा नाही, एका अनाम प्रेमापोटी, कोणीही नेता नसताना  हे सारे होत आहे.  कधी नव्हे ते इतकी मराठी माणसे एका ध्येयाने एकत्र आलेली आहेत.  हाताशी ”नेट” हे प्रबळ माध्यम आहे.  मिडीयाचे सहकार्य आहे.  आणि, म्हणूनच मला असा विश्वास आहे,  की मराठीची ही गंगा वाहून नेण्याचे हे काम ही साईट आणि आम्ही ब्लॉगर नक्कीच पार पाडु.

हा! तुम्हाला आता प्रश्न पडला असेल.  की बाबा रे, म्हटले तर ते एक गाणे आणि ही एक साईट …. ! मग त्याचा एवढा उदो-उदो कशाला. त्यांची जन्मकहाणी वगैरे कशाला ऐकवत आहेस आम्हाला? बरोबर आहे !  पण त्या ८-१२ मिनीटाच्या गाण्याने आणि या १७ इंची स्क्रिनवर दिसणार्‍या मजकुराने लोकांच्या विचारात बदल घडवून आणला आहे.   अभिमान गीताने मराठी कशी जपता येते याचे उद्दम उदाहरण घालुन दिलेले आहे. तर त्या साईट ने माध्यम कसे वापरावे हे सांगितले आहे. मग याना त्यांच्या माध्यमात बंदिसत ठेवावे का? नक्कीच नाही. कारण त्यांच्यात परिस्थिती बदलवण्याची ताकद आहे. असे म्हणतात की  साहित्य, कला यातुन समाजाचे प्रतिबिंब प्रकट होत आहे आणि ”मराठी” म्हणून असे हे एक सर्वांगीण, सर्वांगसुंदर प्रतिबिंब आता पडायला लागलेले  आहे.  आणि, म्हणूनच या प्रतिबिंबाचे कौतुक करणे गरजेचे आहे कारण ”भूर्जपत्र ते वेबपेज” असा झालेला प्रवास हा खर्‍या अर्थाने मराठीचा भाग्योदय करणारा  आहे. हा प्रवास जर असाच चालु राहिला तर

माझ्या मराठीचचे बोलु कौतुके |
परि अम्रुतातही पैजा जिंके ||

ही वाणी खर्‍या अर्थाने खरी ठरणार आहे. आणि त्या आशेपायीच मी हे कौतुकाचे बोल लिहिले आहेत.   आता फक्त इतकीच इच्छा आहे की, ज्याप्रमाणे अभिमान गीतात ५00 आवाज ऐकूनही ”एकसंधता” कुठेही तुटलेली नाही तशी ही मराठीची एकसंधता तुटू नये, सर्व क्षेत्रात हे चैतन्य, हा  एकसंधपणा असाच वाढत जावो… आणि तमाम जनतेत आपली मराठी अशीच बहरत राहो, बरोबर ना?

[ सुचना – मी ज्या साधनाच्या अंकात लिहिले होते त्याअ अंकात  “ब्लॉग माझा ” चे आयोजक प्रसन्न जोशी यांचा लेख आला होता. काही लेख व फोटो कौशल इनामदार यांच्याकडुन साभार ,काही मुद्दे त्यांच्याशी झालेल्या चर्चेचे फलीत आहेत.]

संबंधित लेखन

PG

विनायक पाचलग

मी विनायक, बारावीत शिकणारा एक विद्यार्थी, स्वघोषित लेखक, “वाँट टु टॉक” या माझ्या ब्लॉगच्या नावाप्रमाणेच तुम्हा सर्वांशी बोलण्यास उत्सुक, आणि रंगकर्मी .कॉम या मराठीतील पहिल्या नाटकावरच्या संकेतस्थळाचा निर्माता. मला इथे भेटा.

 1. विनायक खूपच प्रगल्भ लेख आहे…फ़क्त ते ’जोशी’ थोडं ठीक करून टाक…तेवढी तीट नको राहायला…

 2. विनायक, लेख उत्तमच आहे. पण या सुंदर गाण्याचे गीतकार सुरेश भट यांचा किमान उल्लेख जरी केला असतास तर जास्त चांगले वाटले असते.

 3. अपर्णा ताई आणि किर्ती ताई दोघांचे ही आभार ,
  किर्ती ताई आपण लेख नीट वाचल्याचे दिसत नाही ,
  हे पहा
  लेखातील वाक्य
  सुरेश भटांच्या उत्तम बोलानी मराठीची महती सांगायचे आपले काम पुर्वीच केलेले आहे,

 4. uttam lekh. pratyek marathi manashi sambadhit aslel likhan kelas hya baddal dhanyawad. bhavishyatil likhanasathi shubhashirwad.

 5. uttam lekh, marathi manashi sambadhit marathi abhimangeet he ek sundar swapna sakar zal yacha anand hoto.

 6. सुरेश पेठे म्हणतात:

  लेख छान आहे. त्या ”मराठी अभिमान गीत” ची लिंक कायम स्वरूपी आपणाला ह्या साईट वर टाकता येणार नाही का ? श्रीयुत कौशलजींची त्याला परवानगी मी गृहीत धरली आहे

 7. VINAYAK tu gr8 ahes re..masta lekh ahe..murti lahan pan vichar mahan ahet..
  lihit ja asech..

 8. धन्यवाद मित्रानो

  सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की हा लेख कोल्हापुर सकाळमध्ये प्रकाशित झालेला आहे ,आपल्या सार्‍यांचे आभार.

  पेठे काका ,मी या संबंधी कौशल शी बोललेलो आहे ,त्याची परवानगी आहे ,

  आपण ते टाकु शकु

  विनायक

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME