वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

© बौद्धिक संपदा निवेदन

नमस्कार,

मराठीमंडळी.कॉम या आपणां सर्वांच्या संकेतस्थळावर आपले स्वागत. या संकेतस्थळाद्वारे आम्ही सतत नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन येत राहू. नियमितपणे अनेक गुणवैविध्याने नटलेले, गुणवत्तापूर्ण मराठी ऑनलाईन साहित्य आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. हे सर्व साहित्यधन तुमचेच आहे, आम्ही फक्त निमित्तमात्र माध्यम बनलो आहोत. मध्यंतरी पुण्यात झालेल्या मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यामध्ये ऑनलाईन साहित्याच्या चोरीसंदर्भात जो विषय चर्चिला गेला त्याच अनुषंगाने या निवेदनाचा प्रपंच.

आविष्कार दर्शक/वाचकांसाठी:

या मराठीमंडळी.कॉम (marathimandali.com) संकेतस्थळावरील कलेचा प्रत्येक आविष्कार (जसे लेखन, काव्य, छाया-प्रकाशचित्रे, रेखाटने, इत्यादी… इथून पुढील उल्लेख आविष्कार) विधिवतरीत्या तो आविष्कार सादरकर्त्याच्या मालकीचा (original author) आहे. त्याचे अन्यत्र कुठेही कुठल्याही स्वरुपातील प्रकाशन आणि वापर (जसे मुद्रण, अन्य संकेतस्थळांवर प्रकटन, व्यावसायिक अथवा धर्मादाय वापर) तो आविष्कार सादरकर्त्याच्या लेखी अथवा इ-मेल अनुमतीविना आणि उचित श्रेयाशिवाय केला जाऊ नये. या निवेदनाचे उल्लंघन झाल्यास आविष्कार सादरकर्ते (original author) त्यावर कारवाई करु शकतात.

आविष्कार सादरकर्त्यांसाठी:

आविष्कार प्रसिद्ध करताना सादरकर्त्यांनी “तो त्यांच्या स्वतःच्या मालकीचा आहे” असे प्रतिपादन केले आहे असे गृहीत धरुनच प्रसिद्ध केला जातो. भविष्यातील तत्संबंधीच्या काही तक्रारींचे (अगर उद्भवल्यास) निराकरण सादरकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर करावे.

धन्यवाद.

-मराठीमंडळी प्रशासन

PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…


Powered By Indic IME