वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

ब्लॉगपोस्ट चोरीला आळा घालता येतो का?

६ प्रतिक्रिया

या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात द्यायचं तर ’हो’ असंच द्यावं लागेल. मात्र ब्लॉग पोस्टची चोरी होणं पूर्णत: थांबवणं अशक्य आहे. याची कारणं मी ’ब्लॉगपोस्ट चोरी: खबरदारीचे उपाय’ या लेखात दिली आहेत. सोबतच काही खबरदारीचे उपायही सांगितले आहेत.

ब्लॉग पोस्टची चोरी होणं हा प्रकार मला तरी नवीन नाही. मी मोगरा फुलला हा ब्लॉग सुरू करून जेमतेम दोनच महिने झाले असतील, तोच माझ्या काही कविता दुस-या एका ब्लॉगवरही प्रसिद्ध झाल्याचं मला लक्षात आलं. मी सुरूवातीला समजावून पाहिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट त्या चोर महाशयांनी मलाच ईमेलमधे आव्हान द्यायला सुरूवात केलं. शेवटी त्या चोर महाशयांचा ब्लॉग ज्या वेब होस्टींग कंपनीतर्फे सुरू झाला होता, त्या कंपनीकडे मी तक्रार केली व काही पुरावेही सोबत जोडले. कंपनीने तो ब्लॉगच बंद करून टाकला आणि एकदाचं ते प्रकरण मिटलं.

माझ्या मते आपलं साहित्य दुस-या ब्लॉगवरही प्रसिद्ध झालेलं दिसलं, तर आधी त्या ब्लॉगधारकाला समजावून सांगून पहावं. कारण, बरेचदा ब्लॉगधारकांने केवळ आवड म्हणून आपलं साहित्य त्याच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेलं असू शकतं. जर ब्लॉगधारक ’चोर’ नसेल तर तुमच्या समजावून सांगण्याचा चांगला परिणाम तुम्हाला २४ ते ४८ तासांत दिसून येईलच. जर ब्लॉगधारकाने मुद्दाम हे केलं असेल किंवा त्याला आपली चूक कबूल करायची नसेल, तर मात्र तुम्हाला पुढच्या पायरीवर जाणं भाग आहे.

मात्र आपलं साहित्य ब्लॉगवरून काढून टाकण्याची विनंती ब्लॉगधारकालाक करण्याआधी तुम्ही काही गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या गोष्टींची माहीती चोरी झाल्यानंतरची कारवाई या लेखात वाचायला मिळेल.

हा लेख ’ब्लॉगवाले’ या ब्लॉगवरील प्रश्नमंचातून इथे पुन:प्रसिद्ध केला आहे.

संबंधित लेखन

 • टेक मराठी सभा -२
  टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्…
 • टेक मराठी सभा – ऑक्टोबर २०१०
  या महिन्यातील टेक मराठी सभेची माहिती पुढीलप्रमाणे-

  विषय: द्रुपल वापरून मराठी वेब-साईट्स कशा क…

 • उबुन्टू १०.१०
  परिचय-ओळख
  उबुन्टू १०.०४ नंतर, म्हणजे ६ महिन्यांनंतर कॅनॉनिकलने १० ऑक्टोबरला आपली नवीन आवृत्ती बा…
 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

PG

कांचन कराई

मी कांचन कराई. आरशासारखी स्वच्छ आणि पारदर्शक. मनुष्यस्वभावाचा अभ्यास करणे हा छंद आहे माझा. मराठीच्या प्रसारासाठी निरनिराळ्या माध्यमांतून स्वत:च्या ब्लॉगवर प्रयोग करत असते. स्वत:च्या आवाजात कथा ध्वनिमुद्रित करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत.
मोगरा फुलला

 1. कांचन,

  याला एक अतिउत्तम पर्याय जो काहिसा ‘too good to ignore’ यावर आधारित आहे. जर तुम्ही तुमच्या कलेत ‘डॉमिनन्टली गुड’ असाल तर व्यक्त कला, लेख, कविता तुमचा छाप सोडतेच आणि ते जर ‘too good to forget’ असेल तर तुमचे वाचकच तुम्हाला सांगतात ‘ अरे हे मेलम्धून चाललय, किंवा कॉपी झालय’ आदी‌.

  आता येऊया पायरसीकडे, हा फक्त तुझा माझा प्रश्न नाही‌, तो प्रत्येकाला भिडसावणारा प्रश्न आहे, ‘द अल्केमिस्टचे’ पाऊलो कोहेलोंनी यावर विन-विन स्टॅन्ड घेतला आहे : http://www.newsweek.com/id/108715

  मला जेव्हा हा अनुभव आला तेव्हा मलाही‌ वाईट वाटलं पण नंतर मी माझा दृष्टीकोन बदलतोय. तुला हे माहित आहे आहे का, जगातील टॉप ब्लॉगर्समधे अग्रगण्य असलेल्या लिओ बबुटाने यावर केलेला उपाय – अन्-कॉपिराईट !..

  आपण ‘मुक्त व्यवस्थेत’ रहातोय. ओपन इकॉनॉमी, ओपन सोर्स सॉफ्टवेअर, ओपन एज्युकेशन, (आपल्यासाठी )ओपन नेशन, ओपन थॉटस .. त्यामुळे ‘असं’ होण स्वाभाविक आहे, पण यात वैतागून न जाता क्रीएटिव्हली फेस केलं पाहिजे ..

  जाता-जाता :‌माईन्ड मॅप हा शब्द ऐकला की तुला कोणता ब्लॉग आठवतो ?

  • सोमेश, आपलं साहीत्य दुस-या ब्लॉगवर पुन:प्रसिद्ध होणं हीदेखील ब्लॉगरसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र, ब्लॉगर जेव्हा त्या लेखाखाली किंवा कवितेखाली म्हणा आपलं नाव असावं असं गृहीत धरतो तेव्हा त्यात काहीच चुकिचं नाही, असं वाटतं. शिवाय अशा त-हेने पुन:प्रसिद्ध केले्ल्या साहित्यावर कुणी हक्क सांगितलाच तर – “मला ईमेलने आलं” एवढं बोलून चोर हात वर करून ब्लॉगरचा पचका करतो, हे मला एक ब्लॉगर म्हणून पटत नाही.

   एखाद्या प्रतिथयश साहित्यिकाला त्यांचं सुधारणा अंतर्गत असलेले (अद्यापि अप्रकाशीत असं) साहित्य जर दुस-या कुणाच्या नावाने वाचायला मिळालं, तर त्यांना कसं वाटेल? कदाचित ’मोठेपणा’ म्हणून एक दोनदा ते दुर्लक्ष करतील पण प्रत्येकवेळी असं करणं, त्यांना तरी परवडेल का? इथे साहित्यिकांच्या जागी जर ब्लॉगर्सचा विचार केला, तर ब्लॉगर्सना अजून साहित्यिकांइतकी मान्यता मिळालेली नाही. (काही स्वघोषित साहित्यिक असतीलही, मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाही) पण मनाचा हा मोठेपणा दाखवून जर ब्लॉगर्स विन विन सिच्युएशनवर अवलंबून राहू लागले तर उद्या चोरी करणारा मूळ ब्लॉगच्या प्रत्येक पोस्टवर हक्क सांगायचा. आत्ता या क्षणी कदाचित माझ्याही कोणत्या लेखाची चोरी होत असेल, हे मला माहित नाही. मला ते कळत नाही तोपर्यंत ठिक आहे पण मला ते कळलं तरी मी त्यावर अवाक्षर न काढणं म्हणजे मी स्वत:वरच अन्याय करणं नाही का?

   तंत्रज्ञानात जितकी आधुनिकता येत जाते तसंतसे फायदे आणि गैरफायदेही वाढत जातात, म्हणून तर “विज्ञान शाप की वरदान” हा विषय निबंधासाठी अजूनही शाळेत दिला जात असावा. असो. मला तुझं एक वाक्य पटलं की वैतागून न जात हे क्रिएटिव्हली फेस केलं पाहिजे आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तुझ्याकडे काही क्रिएटीव्ह उपाय असतील तर इथे किंवा माझ्या ब्लॉगवाले ब्लॉगवर अवश्य प्रसिद्ध कर. धन्यवाद.

 2. सचिन हळदणकर ह्यांनि दिलेल्या अनुभवातुन हा लेख आपण लीहला ह्यात शंका नाही. असो माहीतीचा ईतर लेखकांना उपयोग होईल.

  • सुधीरजी, आपला अंदाज चुकिचा आहे. मला इथे कुणाचाही नामोल्लेख न करता हे सांगावंस वाटतं की आपण ज्या घटने बद्दल बोलत आहात, ती घटना गेल्या महिन्यात घडली आहे आणि मी ज्या अनुभवाद्दल या लेखात लिहिलं आहे. ती गोष्ट फेब्रुवारी २००९ मधे घडलेली आहे. ही माहिती मी केवळ अनुभव म्हणून दिली आहे. उपयोग होण्यासारखी माहिती माझ्या ब्लॉगवाले या ब्लॉगवर उपलब्ध आहे. जरूर वाचा.

 3. आपल ब्लॉगवरून काही कॉपी झालं आहे याची माहिती http://www.copyscape.com वरून मिळू शकते.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME