वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

भुलेश्वरचा शिल्प खजिना

१५ प्रतिक्रिया

पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्वर. प्राचीन हेमाडपंथी मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून हे ठिकाण भटक्यांमध्ये ओळखले जाते. हा पूर्वी एक लहानसा किल्ल होता. दौलत-मंगलगड त्याचे नाव.

पुराणकालात देवी पार्वतीने इथे भगवान शंकरासाठी इथे नृत्य केले आणि त्याची महादेवांना भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा विवाह संपन्न झाला. आशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवाला भूल पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली म्हणून हे ठिकाण भुलेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले.

भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवत जवळ यावे. यवतच्या अलीकडेच एक उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरस  कदे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून गेलात की पठारावर सपाटीकडे  जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर जायचे. जुन्या टेलिफोन मनोऱ्याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे. बाहेर असणाऱ्या झाडावर अनेक पोपट आणि घुबड हमखास दिसतील. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या चढून गेल्यावर एक लहान दरवाजा आहे. आत प्रवेश केल्यावर विशेष असे काही दृष्टीस पडणार नाही आणि थोडा भ्रमनिरास होईल. पण आत अजून एक लहानसा दरवाजा आढळतो. त्यातून आत गेले की दोन्ही बाजूंना जाणारे दगडी जिने आहेत. त्यांवरुन आपण मुख्य बंदिस्त मंदिर वास्तूत प्रवेश करतो. आणि आजूबाजूचे दृष्य हरखून टाकते. पुरुषभर उंचीचा नंदी, त्यावर एक दगडी मंडप, जिथे नजर जाईल तिथे अप्रतिम कोरीवकाम केलेली शिल्पे. हे सर्व वास्तूशिल्प लहान दरवाजाच्या आड लपवून परकीय आक्रमणापासून वाचवण्याची बुद्धिमत्ता मंदिर निर्मात्याने योजिली आहे. काही मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. पण आजही त्यांचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही.

धीरगंभीर पवित्र वातावरणात मुख्य गर्भगृहात पिंडीवर सतत अभिषेक चालू असतो. दर्शनानंतर मंदिर सौंदर्य पहायला सुरुवात केली की आपली नजरच ठरत नाही. पहाल तिकडे मोहक, रेखीव शिल्पांची जादुई नगरीच. महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी असणारे स्त्री-गणेशाचे शिल्प या ठिकाणी आहे. प्रत्येक शिल्प आणि खांब न्याहाळून पाहताना, त्याच्या निर्मात्या हातांना आपण आपोआपच नमन करतो.

तर मग कधी जाताय भुलेश्वरला?

संबंधित लेखन

 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • पुण्याजवळील दुर्गदर्शन
  गेल्या पावसाळ्यातल्या वीकएंडला जास्त वेळच नव्हता. अर्धा दिवस मोकळा सापडला. मग काय… शांत थोडाच ब…
 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…

 1. जाणार.. तुला घेऊनच जाणार, ५०एम.एम आल्यावर जाऊ यातच आपण. मी फ़्लिकर वर पण नुकतेच जाऊन आलेल्यांचे फोटो बघीतले आणि मला पण भुरळ पडली आहे याची.

  नक्की जायचे.

 2. एकदम सहीच आहे रे… आमच्याकडच्या अजिंठा अन वेरूळ लेण्यांची आठवण झाली..

 3. झरेकर महोदय, छान माहिति दिलि आहे. छोट्या दरवाजा आड सगळ लपवून सुद्धा हे लांडगे तेथे पोचलेले दिसतात. मूर्तीचि मोडतोड पाहवत नाही.
  वरील दिनिकेवर खालिल लेख अवश्य वाचा.
  http://savadhan.wordpress.com/2010/03/01/%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%9C/

 4. You have described it well. Photos are best…
  Which camera u have used ?

 5. सउ भा श गोरे म्हणतात:

  मि आज प्रथम हि वेबसाइत बघत आहे.पन श्हुध कसे ताइप(type) करु?
  Please tell me
  Subhash gore

 6. he thickan manhaje puratatva kalecha uttam namuna ahe,
  parantu mazya mahiti pramane he shilp aurangjebane .Chatripati shivaji Raje yana apalya awakyat ananyasathi jya veles mandiranchi modtod karit hoata tyach veles he shilp hi tyane bhagn kele ahae.

 7. visit saswadkar.com for more information about this place and the places around Saswad as well.

 8. mazya gharajavalach aahe . he mandir khup mast aahe & sravan mahinyamadye Ya devachya darshanasathi khup mothi gardi hote.
  he devstan khup jagrut aahe . ya devachya darshanane aaplaya manatil echya purna hotat. tyachpramane ya thikancha parisar nisargaramya aahe.phakt ekdach bhet dya . tumhi bagatach rahatan.
  //om namh:shivay //
  jay maharashtra

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME