वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मदत हवी आहे?

मराठी मंडळीवर आपले स्वागत आहे.

प्र. मी मराठी मंडळीवर लिखाण करु शकतो का? कसे?
उ. हो! जरुर. आपले लिखाण हे स्वतःचेच असावे. आपण आपल्या लिखाणाचे उदाहरण – आपल्या ब्लॉग अथवा संकेतस्थळाच्या रुपाने आम्हाला दाखवु शकता.खात्रीनंतर आम्ही आपणांस मराठी मंडळीवर लिखाणाची सुविधा उपलब्ध करुन देऊ. या शिवाय आपण आपले लिखाण आम्हांस या aamhi AT marathimandali DOT com ई-मेल वरही पाठवु शकता.

प्र. मराठी मंडळीवर कोणत्या पद्धतीचे लिखाण करता येईल?
उ. लिखाणाबाबत एकच मर्यादा आहे, ती म्हणजे, लिखाण मराठीतच आणि मराठी भाषेसाठीच असावे. यामध्ये आपण भाषा, वाड़्मय, कला, लेख इ. बर्‍याच विषयांवर आपल्या मतांप्रमाणे लिहु शकता.

प्र. मराठीमध्ये कसे लिहायचे?
उ. मराठीमध्ये लिहिण्यासाठी या पानावरचा उजव्या बाजुचा अगदी वरचा कोपरा पहा. तिथे आपणांस “म” अक्षर दिसेल.  त्यावर क्लिक केल्यास आपणांस भाषा बदलण्याची सुविधा दिसेल. या संकेतस्थळावर, ज्या ठीकाणी आपण लिहिणार आहात तिथे किट्ट [क्लिक] करुन “एफ१२” च्या सहाय्याने भाषा बदलने सहज सोपे होते. संगणकाच्या कळ-फलकावरील “एफ-१२” ही कळ दाबुन ‘मराठी/ इंग्रजी’ अशाप्रकारे भाषा बदलु शकता. आवश्यक तिथे उदा. लिंक/ दुवा देताना पुन्हा “एफ१२” ही कळ दाबुन आपणांस इंग्रजी भाषेतुन लिहिता येईल.
याशिवाय, आपण गमभन या संकेतस्थळावरही अगदी सोप्या पद्धतीने मराठीमध्ये लिहु शकता. मराठी मंडळीवर प्रतिक्रिया देताना, प्रश्न / शंका विचारताना मराठीतच लिहा.

“मराठी मंडळी चर्चासत्र” वर यासंबंधित अधिक माहिती तुम्हाला खालील दुव्यावर मिळू शकेल.

दुवाः  मराठीतून लिखान

प्र. ब्लॉगिंगसंदर्भात किंवा मराठी मंडळीविषयी इतर काही अडचणी?
उ. आपल्या सर्व समस्यांचे निरसन करण्यासाठी आम्ही  “मराठी मंडळी चर्चासत्र (फोरम)” तयार केलेले आहे. या चर्चासत्रावर आपण आपली नाव-ब्लॉग नोंदणी करून ब्लॉगिंग किंवा मराठी मंडळी संदर्भात अडचणी मांडू शकता, किंवा इतर सदस्यांच्या समस्यांचे निरसन करू शकता!

PG

मराठी मंडळी

कोणी मेकॅनीकल, कोणी संगणक तज्ञ कोणी ग्राफीक्स तर कोणी अजुन कोण. सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. पण सर्वांमध्ये एका गोष्टीचे साम्य आणि ते म्हणजे मराठी बद्दल प्रचंड आदर आणि मराठीतून लेखन करण्याची आवड. …. पुढे वाचा


Powered By Indic IME