वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मराठी ओव्या

७ प्रतिक्रिया

आपल्याला लाभलेला हा वाङ्मयठेवा आपण प्रयत्नपूर्वक जपायला हवा तसेच पुढच्या पिढीलाही द्यायला हवा असे मला वाटते. त्यासाठीचा हा प्रस्ताव ! इथे आपल्याला माहीत असलेल्या, आपल्या आजी, आई, मावशी, काकू, आत्या वगैरेंकडून ऐकलेल्या ओव्या लिहाव्यात ही विनंती. ‘जसे सुचेल तसे रचले’ असे वाटणार्‍या ओवीचा उगम वैदिक आणि अनुष्टुभ छंदात आढळतो. ग्रंथात आढळणारी ग्रांथिक ओवी आणि लोकगीतातील गेय ओवी असे दोन ढोबळ प्रकार म्हणता येतील.
– मराठी विकि वरुन

१) पहिली माझी प्रदक्षणा, उल्हास वाटे माझ्या मना
झाली पापाची खंडणा पाप दोष हरीला
हरीचे नाम विसरू नका

२) दुसरी माझी प्रदक्षिणा, तुळस म्हणे मी काशी
वृन्दावणी ऋशिकेशी रामनाम तयाशी
सार्थक झाले जन्माचे
हरीचे नाम विसरू नका

३) तिसरी माझी प्रदक्षिणा, गोपाळ घाले घुंगरू पावा
ठेउनी गुरुवारी सत्यभामा लुब्ध झाले
हरीचे नाम विसरू नका

४) चौथी माझी प्रदक्षिणा, तुळशी पाशी उभा कान्हा
त्यांनी मला भेट दिली अंतःकाळा सोडवली
हरीचे नाम विसरू नका

५) पाचवी माझी प्रदक्षिणा, पाचमुखी जपा हरी
पुण्य झाले बरोबरी
हरीचे नाम विसरू नका

६) सहावी माझी प्रदक्षिणा, सहा तीर्थ तुळशीपाशी
स्नान करते गंगा भागीरथीचे
हरीचे नाम विसरू नका

७) सातवी माझी प्रदक्षिणा, सात माझे दंडवत
तुळस पाहे माझे चित्त
हरीचे नाम विसरू नका

८) आठवी माझी प्रदक्षणा, लहू गुंपे नारायणा
ऐसे कृपाळू कानुळी, हात ठेवी मस्तकी
हरीचे नाम विसरू नका

९) नववी माझी प्रदक्षणा, रामबोले केशावापाशी
पुत्रफळे देवाशी
हरीचे नाम विसरू नका

१०) दहावी माझी प्रदक्षणा, दहा खंड तुळशीपाशी
माझा नमस्कार भीमा शंकराशी
हरीचे नाम विसरू नका

११) अकरावी माझी प्रदक्षणा अकरा माझ्या एकादशी
तुका बोले चला वैकुंठाशी
हरीचे नाम विसरू नका.
हरीचे नाम विसरू नका.

संबंधित लेखन

PG

विक्रम घाटगे

आपण कधी कधी असे काहीतरी वाचतो जे मनाचा ठाव घेऊन जाते, विचार करावयाला लावते. स्वतःकडे, या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवण्यास भाग पाडते. असे काही मी वाचलेले आपल्यासारख्या वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावे म्हणून मी “जीवनमूल्य “ या ब्लॉगवर लिहितो. जय हिंद, जय महाराष्ट्र!

  1. Dear Viram Ghatghe

    It was very nice and nice draft but it will be in a singing form will impress all the reader.

    Regds

    Prakash

  2. The treasure of our beloved language needs to be saved. All should contribute. I will also contribute shortly.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME