वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यातील काही ठळक घटना

३ प्रतिक्रिया

दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी पार पडलेल्या मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यातील काही ठळक घटना –

 • ह्या स्नेहमेळाव्याला दणदणीत ६० पेक्षा अधीक लोकांची उपस्थीती
 • पुण्याबाहेरुन सुध्दा खास मेळाव्यासाठी आलेल्या लक्षणीय सदस्यांची उपस्थीती
 • वृत्तपत्र आणि मिडीया कडुन ह्या मेळाव्याची दखल
 • सकाळ, पुणे मिरर, हिंदुस्तान टाईम्स, स्टार माझा, साम मराठी आणि झी-टिव्हीमध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सहभाग
 • काही निवडक ब्लॉगर्ससाठी मराठी चित्रपटांची प्रदर्शनापुर्वी स्क्रिनींग करण्यात येणार. हे निवडक ब्लॉगर्स कोण असतील ते लवकरच घोषीत करण्यात येईल. त्या ब्लॉगर्सनी त्या चित्रपटाची अन-बायस्ड स्क्रिनींग त्यांच्या ब्लॉग्स वर प्रसिध्द करावी अशी अपेक्षा आहे जेणेकरुन वृत्तपत्रांकडुन काही चित्रपटांची पुर्वग्रहदुषीत होउन केले जाणारे टिका-समिक्षण कमी होईल, तसेच मराठी चित्रपटांची प्रदर्शनापुर्वीच भारतात आणि भारताबाहेर प्रसिध्दी होईल.
 • स्नेह-मेळाव्यासाठी काही पुस्तक प्रकाशकांचीही हजेरी. शोध नविन लेखकांचा. लवकरच त्या प्रकाशकांची चांगल्या ब्लॉगर्सशी ह्या मेळाव्याच्या आयोजकांतर्फे ओळख करुन देण्यात येईल.
 • मराठी साहीत्य संमेलनात ब्लॉग्सतर्फे प्रसिध्द केल्या जाणाऱ्या साहीत्याची ही दखल घेतली जावी असे अनेकांना वाटते आणि त्यासाठीचे निवेदन येत्या काही दिवसांत अखिल भारतीय संमेलनाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.द.भि.कुलकर्णी ह्याच्याकडे एका शिष्टमंडळातर्फे सुपुर्त केले जाईल. स्नेहमेळाव्याच्या आयोजकांनी हा ठराव आणि त्यासाठीचे निवेदन तयार करुन ठेवले आहे. कुलकर्णी साहेबांची वेळ मिळतात ते त्यांच्याकडे सुपुर्द केले जाईल.
 • पुण्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात मराठी ब्लॉगर्ससाठी एक स्टॉल स्पॉन्सर्ड झाला आहे. ह्या स्टॉल तर्फे संमेलनात येणाऱ्या वाचकांना ब्लॉग्सबद्दल, त्यावरील साहीत्याबद्दल अधीक माहीती दिली जाईल तसेच काही निवडक ब्लॉग्सचे साहीत्य आणि त्या ब्लॉग्सचे दुवे त्या त्या लेखकांच्या संमंतीने ह्या स्टॉलवर मांडले जातील. याबाबत अधीक माहीती येत्या काही दिवसांत प्रसिध्द केली जाईल
 • मराठी ब्लॉगर्सचा एक फॉर्मल ग्रुप स्थापन करुन त्याअन्वये मराठी भाषा, मराठी ब्लॉगींगचा प्रचार आणि अनेक कार्य करण्याचा मानस आहे. ह्या स्नेहमेळाव्यानंतर आयोजक आणि काही प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत अश्या अनेक घटनांचा उहापोह करण्यात आला, ज्याबद्दल सविस्तर माहीती नजिकच्या काळात प्रसिध्दीस देण्यात येईल.
 • ब्लॉगींग आणि ह्या नविन स्थापन होऊ पहात असलेल्या ग्रुपच्या कार्यांची आणि होऊ घातलेल्या कार्यांची माहीती सांगण्यासाठी नजीकच्या काळात एक प्रेस-कॉन्फरन्स घडवुन आणवावी अशी गळ अनेक प्रसिध्दी माधमांच्या प्रतिनीधींनी घातली आहे. बघु कसे जमते ते.
 • याशिवायही अनेक ठळक घटना घडल्या ज्यांबद्दल आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही, सो वेट ऍन्ड वॉच
 • ह्या स्नेहमेळाव्यास अनेक लोकांनी कळत-नकळत सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपुर्वक आभार. अनेक लोकांना इतर महत्वाच्या कामांमुळे व्यक्तीशः बोलणे शक्य झाले नाही त्याबद्दल खरंच खेद वाटतो, परंतु नजीकच्या काळात अश्या अनेक गाठी भेटी आपण घडवुन आणु ज्यावेळी मनमोकळपणाने आपल्याला चर्चा करता येईल ह्याची श्वास्वती बाळगावी.

  @सम्राट फडणीस (ई-सकाळ एडीटर) – धन्यवाद. हा मेळावा संपतो ना संपतो त्याच्या आतच ह्याची बातमी इ-सकाळवर झळकली होती.
  @प्रसन्न जोशी (स्टार माझा) – धन्यवाद. तुमचे अनुभव, अनेक गोष्टीत झालेली मदत, भविष्यातील कार्याबद्दल दिश्या दर्शवल्याबद्दल.
  @योगेश जोशी (हिंदुस्तान टाईम्स) – धन्यवाद, सगळ्यासाठीच. काय काय सांगु आता?
  @नितीन (पुणे मिरर्स) – प्रेस कॉन्फरंन्स बद्दल माहीती, ब्लॉगींगबद्दलचे अनुभव – धन्यवाद
  @रानडे काका – सर्व स्नेहमेळाव्याचे शुटींग आपण केलेत, खरंच धन्यवाद
  @गौरी (झाले मोकळे आकाश ब्लॉग) – धन्यवाद, टेस्टी तिळाच्या वड्यांसाठी. मस्त झाल्या होत्या एकदम
  @प्रभास (कवडसा ब्लॉग) – लाईव्ह ट्विटींगसाठी
  @श्री. अभ्यंकर – पु.ल.देशपांडे उद्यानाची पुर्वपरवानगी आणि संबंधीत कार्यात आपली फार मोलाची मदत झाली. धन्यवाद.

  बहुतेक कुणाला विसरलो नसावा, असेन तर दोन टपल्या मारुन आठवण करुन द्या, लगेच ब्लॉग अपडेट करतो

  सर्व आयोजकांचे (पेठे काका, अनिकेत, विक्रांत देशमुख, दिपक शिंदे, पंकज) हार्दीक अभिनंदन. आजचा स्नेहमेळावा अपेक्षेपेक्षाही अधीक फलदायी आणि छान पार पाडल्याबद्दल

  मराठी ब्लॉगींगच्या एका नव्या पर्वाची ही एक सुरुवात आहे म्हणल्यास ते वावगे ठरु नये. आजच्या ह्या मेळाव्याने त्याची मुहुर्तवेढ रोवली गेली आहे, आता आपल्या सगळ्यांना हे कार्य पुढे न्यायचे आहे.

  आहात ना तुम्ही बरोबर

संबंधित लेखन

PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

 1. हा मेळावा १७ जानेवारीस झाला. मला येण्याची खूप इच्छा होती पण मी १४ते २५ विपश्यने साठी गेलो होतो. तसे मी आधी विरोपाद्वारे कळवले ही होते. असो .पुन्हा केव्हा तरि अशी संधी मिळेल ! मी आशावादी आहे.सर्वांचे कल्याण हो!
  धन्यवाद!

 2. मी हा मेलावा मिस्स केलेला आहे. परत कधि आहे?

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME