वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण

२२ प्रतिक्रिया

[लेखात शेवटचा बदल: दिनांक १ जानेवारी, २०११]

mm_logo.png
केवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले ‘मराठी मंडळी’ हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून संपादकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले चर्चासत्र, चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् मराठी मंडळी ब्लॉगर्स वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे ‘मराठी मंडळी’ ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला. मराठी ब्लॉगर्सचे तर येथे येणे-जाणे चालूच असते.

काही दिवसांपासून प्रशासक मंडळातील काही सदस्यांना असे वाटत होते की सर्वसामान्य वाचकांना देखील ‘मराठी मंडळी’वर लेखक म्हणून सदस्यता घेता यावी व त्यांना त्यांचे लेखन प्रदर्शित करता येण्याची सुविधा उपलब्ध असावी. सर्वांशी चर्चा-विनिमय करुन ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सकारात्मकपणे होकार मिळाला. ह्याच निर्णयाचा प्रचार व्हावा व लोकांना माहिती व्हावी हा शुद्ध विचार ध्यानी ठेऊन हा लेख लिहिला आहे. आंतरजालावरील सर्वांना ‘मराठी मंडळी’ लेखन करण्यास निमंत्रित करीत आहे.

आपल्याला जर मराठी मंडळीवर लेखन करण्याची इच्छा असेल आणि म्हणूनच ‘मराठी मंडळी’वर लेखक होण्यासाठी नोंदणी सुविधा उपलब्ध व्हावी, असे वाटत असेल, तर खाली प्रतिसाद नोंदवून तसे कळवा. आपल्यासारख्याच इतर वाचकांच्या प्रतिसादांवर विचार-विनिमय करुन ही सुविधा दिनांक १ जानेवारी, २०११ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल!


अद्ययावत:

सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जसे की या प्रस्तुत निमंत्रणपर लेखात आश्वासन दिले गेले होते, त्यानुसार आता कोणीही वाचक “मराठी मंडळी” वर नोंदणी करुन आपले लेख संस्थळावर लिहू शकतो.
सदस्य-नोंदणी साठी खालील दुव्यावर जावे.

http://www.marathimandali.com/wp-login.php?action=register

पुढील माहीती (प्रवेश करण्यासाठीचा संकेतशब्द व दुवा) नोंदणी केलेल्या इमेलद्वारे कळवली जाईल.

इतर काही शंका/अडचणी असतील, तर त्या येथे आपण विचारू शकता.

धन्यवाद.

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. मला या साईटवर लेखन करण्यास आनंद वाटेल.आणि हो आपल्या या ब्लोग वरील काही साहित्य माझ्या मासिक शिवमार्ग च्या अंकात आपल्या परवानगीने प्रसिद्ध करता येईल काय?
  आपणास या संधी बद्दल धन्यवाद…

  दत्तात्रय सुर्वे
  संपादक-मासिक शिवमार्ग

 2. प्रिया विशाल,नमस्कार
  आपल्या या साईट वर कृपया माझा http://shivamarg.blogspot.काम हा ब्लॉग जोडून सहकार्य करा.
  धन्यवाद
  दत्तात्रय सुर्वे
  संपादक -मासिक शिवमार्ग

 3. मला आवडेल लेखन करायला….मंदार

 4. Namskar,

  Sarva pratham Marathi Mandali che Abahr.Marathi Mandaliwar Lekhan Karnyachi Ichha ahe.Mala awadel aplya sanket sthalwar lekhan karayla.Vachkansathi Marathi Mandali Lekhan karnyachi sandhi det ahe Mahanje Amchaysarkhya vachkanstahi ek Uttam vyaspeeth milat ahe yacha atishay anand hot ahe.

  pooja

 5. मला खूप आवडेल जर मला मराठी मंडळी वर लेखन कारायची संधी मिळाली तर .

  धन्यवाद
  विशाल गडकरी

 6. प्रिय विशाल,नमस्कार

  मला या साईटवर लेखन करण्यास आनंद वाटेल.जर मला मराठी मंडळी वर लेखन कारायची संधी मिळाली तर .

  धन्यवाद
  krushna

 7. divasaakaathi kaahitari lihat jaave….ashi sandhi jar milat asel tar tisadhalich pahije….

 8. नमस्कार,

  मराठी माणसाने मराठी माणसासाठी चालवलेला हा उपक्रम उत्तम आहे.
  सर्व मराठी होतकरु लेखकांनी आपलं लिखाण इथे प्रस्तुत करावे आणि रसिक प्रेक्षकांनी आपली मते त्यावर मांडावी.

  धन्यवाद,
  प्राज.

 9. मला खूप आवडेल जर मला मराठी मंडळी वर लेखन कारायची संधी मिळाली

  धन्यवाद
  चैतलि कदम

 10. मला मराठी मंडळावर सामील करण्या बद्दल धन्यवाद आणि एक समस्या आहे तीच पण निर्मुलन कराल अशी अपेक्षा मी तुमचा विजीट कोड माझ्या ब्लोग ला लावला आहे पण मराठी मंडळीच चिन्ह माझ्या ब्लोग वर दिसत नाही

  धन्यवाद
  चैतलि कदम

 11. Dear Vishal,

  This is my first day on this site. I have just obtained a registration. I wish to write on this site marathi katha, kavita and kadambari, etc. Site seems to be very exciting. Please let me know how I can use marathi font here. I want to write a recent poem here
  Please let me know the procedure.

 12. I want to send the following poem on marathimandali. Pl. advise how to send.

  अध्यात्माची महती

  आम्ही बरे भोगी
  योग नको तुमचा
  चौकट ज्याची असे
  अध्यात्माची
  योग, अध्यात्माचा जगी
  नित्य असे दणका
  देह भोगणारा
  तळमळतसे
  अजूनही शमली
  नाही वासनाही
  अध्यात्माची शाल का
  पांघरावी ?
  अध्यात्म अवघे
  बजबजले अनंती
  उपयोग शून्य त्याचा
  व्यवहारामधी
  कुणी म्हणे शांतीसाठी
  कुणी म्हणे साठीसाठी
  अद्यात्माचा दवा
  अतिउत्तम
  तुम्हा सांगतो ऐका गोष्ट
  अध्यात्माची नशा
  नाही उतरत
  सर्वदाही
  मदिरेच्या नशेला
  काळाचे बंधन
  अध्यात्माची नशा नुतरे
  कधीही
  देवादिक असती
  त्याच्या सभोवताली
  आम्हीच रंगविले
  हवे तसे
  रोजचीच मारामारी
  जगणे झाले अशक्य
  अध्यात्म सांभाळिता
  लुळे पडलो
  सहिष्णुता भिनली
  विनाकारण अंगी
  दाबणारा दाबी
  हवा तसा
  अध्यात्म धरूनी
  होई शोध गुरूचा
  तोही सापडला
  भोगवादी
  अध्यात्म वेगळे
  ज्याचे त्याचे असे
  परी अंतरंगी स्वार्थ
  सारखाची
  आता श्रीचरणी
  असे प्रार्थना ही
  आवरी अध्यात्म आणि
  गुरुचा सुळसुळाट
  गंगाधरसुत म्हणे
  ऐसी अध्यातमाची महती
  जगण्यासाठी निष्प्रभ
  ठरते जे Reply Forward

 13. मला लेख लिहायला खुप आवडेल.
  मी माझी वेबसाईट पण आहे. ती मी स्वतः बनवली आहे.
  http://www.techshree.eahmadnagar.com/

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME