वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मला भारतरत्न पाहिजे !

० प्रतिक्रिया
सचिन

बस…ठरलं ! आता अजून काही नाही…हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच…काय म्हणता ? मला कशाला…? छे छे…माझ्यासाठी नाही..मी कुठे काय केलेय…मला हा पुरस्कार पाहिजे तो आपल्या सचिनसाठी ! क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याने एक हट्ट केला होता…भारताला विश्वचषक जिंकून देण्याचा ! आता २१ वर्षाच्या तपानंतर कुठे त्याचे स्वप्न साकार झालेय. २ एप्रिल २०११ रोजी तो सोनियाचा दिवस उजाडला आणि ती झळाळती ट्रॉफी त्याच्या हाती आली. आणि तेव्हापासून सगळे जण वेडेच व्हायचे बाकी राहिलेत.

मला पुरस्कार पाहिजे असे म्हटले कारण सचिनचा गौरव तो आमचाच गौरव. सचिनने शतक केले तर आपल्याला आपणच शतक झळकावल्याचा आनंद होतो. सचिन आउट झाला म्हणजे आपणच आउट झाल्याचे वाटते. सचिन खुश तर आपण खुश. गेल्या वर्षी सचिनने द्विशतक केले तेव्हा कोण आनंद झाला होता. भारतभर नुसता जल्लोष आणि आनंदी-आनंद ! पन्नास षटके खेळून काढणे ते ही वयाच्या ३७व्या वर्षी काही सोपी गोष्ट आहे का? पण त्याने ते केले. सेहवागने ही ठरवले ५० षटके खेळायचे पण काही जमले नाही. राजाचा मुकुट राजालाच लाभायचा होता ! म्हणून एवढे पराक्रम केल्यावर आता नवीन काय करावे असा विचार त्याने केला आणि मारले एक द्विशतक ! आता इतका आनंद दुसरा कोणी खेळाडू देतो का ? सचिन मात्र देतो. भारतीयांचे काहीतरी ऋण असल्यागत एकामागे एक शतक करून फेडत जातो. आता वर्ल्डकपही जिंकून दिला. काय करावे या माणसाला ? ( गेल्या काही वर्षात तो देव असल्याचा साक्षात्कार झालाय लोकांना !)

सचिनबद्दल बोलायला लागलो की शब्दच अपुरे पडतात…किती बोलू आणि काय बोलू. त्याच्या महानतेविषयी तर दर महिन्याला एक-एक पोस्ट टाकेन मी. मला एकट्यालाच नाही सर्व सचिनच्या चाहत्यांची हीच अवस्था आहे. गेल्या २१ वर्षात त्याने किती पराक्रम गाजवले. त्याच्या कारकिर्दीत रेकॉर्ड आणि सचिन हे समानार्थी शब्द बनले. बघता-बघता सगळे या जादूगाराच्या करामतीने गुंग झाले. हल्लीच नाना पाटेकरने आपल्या लेखात सचिनला म्हटले ‘ ‘आमच्या वेळी अमुक एक महान खेळाडू होता’ असे म्हणायचे पण तुझ्या बाबतीत तसे म्हणता येत नाही कारण तू सर्वांच्या वेळीस होतास !’ आता अजून किती वर्षे खेळेल ते तोच (देवच) ठरवेल !

सचिन

कितीतरी दिग्गजांनी भारत सरकारला सांगितले की सचिनला भारतरत्न द्या पण त्यांना काही मुहूर्त सापडत नाहीये. एक तर सचिन स्वत:हून कधी मागणार नाही…सचिन काही पुरस्कारांसाठी खेळत नाही. आता हा एक पुरस्कार मिळाला की सवयीप्रमाणे तो भारतीयांना अर्पण करेन म्हणजे आम्हालाच मिळाला की ! भारत सरकार बहुतेक निवृत्त होण्याची वाट बघताहेत पण त्याला अजून बरीच वर्षे खेळायचे आहे, तुम्ही किती वर्षे हा पुरस्कार राखून ठेवणार आहात ? मला कधी कधी वाटते की हा नक्कीच कोणीतरी अवतारी पुरुष असून, निवृत्त झाल्यावर अचानक गायब वगैरे होईल किंवा स्वर्गातून त्याला न्यायला विमान तरी येईल. मग त्याच्या पश्चात पुरस्कार देण्यापेक्षा आता दिला तर चांगले होईल. तेवढेच आम्हा सचिन-वेड्या भारतीयांना अजून एक आनंदाची बातमी. बस आता लवकरात लवकर तो शतकसोहळा आटोपता घे. म्हणजे पुढची पोस्ट लिहायला अजुन एक निमित्त.

संबंधित लेखन

 • दृष्टिकोन २०१०

  अज्ञातच पायवाट
  कुणी चेहरा निनावी
  उडी उंच किटकाची
  कैसी कुणी पहावी ?

  चिमुकले असे हे विश्व

 • बघा जरा पटतय का ते?
  असं समजा की एक २ खोल्यांचा – २बीएचके – फ्लॅट विकायचा आहे. त्या फ्लॅट ची कींमत ५० लाख आहे. आणि बँक…
 • जागे व्हा…..!!
  माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
 • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
  सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
 • शोध जीवनाचा…

  कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती झाली. रसायनांच्या, वायुंच्या वेगवेगळ्या अभिक्र…

PG

SagarKokne

माझा ब्लॉग = http://majhyamanatalekaahee.blogspot.com

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME