वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

माझी माय .. अरुण फिरोदिया..

३ प्रतिक्रिया

बऱ्याच लोकांच्या बद्दल मनामधे एक असा आकस असतो.अर्थात , त्या साठी काहीच कारण असावं लागत नाही. बस्स… उगिच आकस असतो. एखाद्याचा इ मेल आला, तरी पण त्याला उत्तर न देता सरळ डीलीट करुन टाकावासा वाटतो- हे असं का होतं ते काही सांगता येत नाही.

फिरोदिया गृप बद्दल नेहेमीच असाच एक आकस वाटत आलाय. सौ. ने एक दिवाळी अंक सांभाळून ठेवलाय गेल्या दोन वर्षा पासुन. तिला तसाही पुस्तक जमा करुन ठेवायची आवड आहेच. अगदी उर्मिला पवारांचं आयदान, पासुन तर गोडसे भटजींचं प्रवास वर्णन अशी अनेक पुस्तकं तिच्या संग्रही आहेत. तिच्या पुस्तकांना छेडलेलं तिला फारसं आवडत नाही, म्हणुन बरीच पुस्तके पाहिलेली पण नाहीत. आज सकाळी तिचे लेख एकत्र करायला ( ब्लॉग सुरु करायला म्हणुन) म्हणुन तिचं कपाट उघडलं तर त्या मधे एक मासिक दिसल  ” आई होती म्हणुन”! सहज चाळलं तर त्यामधे अतिशय  सुंदर लेख दिसले.  बऱ्याच मान्यवर व्यक्तींनी आपापल्या आई बद्दल सांगितलं होतं , त्या मधेच एक नांव होतं पानकुंवर फिरोदिया – अभय फिरोदियाची आई.. अभय फिरोदिया फोर्स मोटर्स चे एम डी ( जुनी बजाज टेम्पो). अभयने सांगितलेली आपल्या आईची आठवण वाचली आणि मनाला स्पर्शुन गेली.

सहज कुतुहल म्हणुन लेख वाचणं सुरु केलं, आणि मग पुर्ण होई पर्यंत खाली ठेवलं नाही. अतिशय सुंदर मासिक होतं ते. यशवंतराव चव्हाण, प्रकाश आमटे, शरद पवार, गोपीनाथ मूंडे डिएसके इत्यादी अनेक मान्यवरांनी त्यांच्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत त्या मासिकात. अतिश्य सुंदर आणि संग्रहणीय मासिक आहे ते- त्याचं नांव आहे ’आविष्कार समदा’ . माफ करा, लिहिण्याच्या ओघात चुक झाली मासिक नाही तर वार्षीक आहे ते.

प्रत्येकच माणसाच्या जडण घडणी मधे त्याच्या आईचा हात असतोच, त्या मधले सगळेच लेख इतके चांगले आहेत की सगळे लेख जरी इथे पोस्ट केले तर चांगला संग्रह तयार होईल, पण ते शक्य नाही.. फक्त अभय फिरोदियांच्याच आईवरचा लेख जो वाचलाय, त्यावर इथे थोडक्यात लिहितो.

पानकुंवर कोटेचा. मुळ गांव बीड. १९३६ सालचा काळ. त्या काळी बिड मधे फक्त उर्दू शाळा होत्या, म्हणुन तिसऱ्या वर्गा पर्यंत शिक्षण झालं उर्दू मधे. त्या काळामधे स्त्री शिक्षण हे समाजमान्य नव्हतंच. त्यांचं वय झालं होतं १५ आणि त्या काळच्या रिती रिवाजा प्रमाणे त्यांच्या वडिलांनी लग्न ठरवलं त्यांचं.  कोटेचा यांचा मोठा मुलगा गांधीजींच्या विचाराने भारलेला, तेवढ्यातच पानकुंवरने एक दिवस डिक्लिअर केलं की मला लग्न करायचं नाही, तर पुढे वर्धेला जाउन शिकायचं आहे. त्यांच्या वडिलांना अर्थातच हे योग्य वाटत नव्हतं, म्हणुन त्यांनी सरळ नकार दिला.

आई ( म्हणजे  अरुण ची आजी) पण गांधीजींच्या विचाराने भारलेली. त्यांनी सरळ उपोषण सुरु केलं- अगदी आजोबांनी  शिक्षणाला परवानगी देई पर्यंत.त्या काळात लग्न मोडणं म्हणजे खुप मोठी गोष्ट होती.

पानकुंवरला वर्धेला गेली शिकायला. तिथलं शिक्षण एकदम वेगळ्या प्रकारचं होतं. आश्रमा मधे जीवन पध्दती विषयक शिक्षण दिलं जायचं.तत्वज्ञान शिकवलं जायचं. पानकुंवरला इंग्रजी शिकण्याची आवड होती. त्यांनी एक नविनच पध्दत स्वतः डेव्हलप केली. गांधीजींचं माय एक्स्पिरिअन्स विथ ट्रुथ. हे पुस्तक उघडायचं, त्यातले इंग्रजी शब्द काढायचे, त्यांचा अर्थ पहायचा डिक्शनरी मधे, आणि मग दिवस भर तो शब्द बोलण्यात वापरायचा, म्हणजे तो शब्द नेहेमी करता मेमरी मधे रजिस्टर होतो.

१९३८-३९ साली त्यांनी मधुबनी आणि चंद्रपुरला जाउन खादी बनवण्याचे शिक्षण घेतले, आणि मग पुन्हा आपल्या जन्म गावी जाउन स्वावलंबन खादी उत्पत्ती केंद्र सुरु केले.त्या काळी खादी म्हणजे स्वातंत्र्यलढ्याचं प्रतिक होतं.  १९४० च्या सुमारास, गांघीजींचे फॉलोअर्स खुप झाले होते, त्यांच्या एका हाकेसरशी सत्याग्रहात उडी मारुन जेल मधे जायला तयार होते. पानकुंवर यांच्या भावाला सत्याग्रहामधे अटक होऊन तुरुंगात जावे लागले, घरामधे कुणालाही त्याबद्दल वाईट वाटले नाही.. तो पर्यंत पान कुंवरचे वय १८ झाले होते.

घरामधे पुन्हा बोलणी सुरु झाली, की आता तरी लग्न कर.. तेंव्हा तिने सरळ सांगितले, की ज्या घरामधे माझ्या सामाजिक, आणि राजकिय कार्याला ज्या घरात विरोध होणार नाही, त्या घरातच मी लग्न करायला तयार आहे.असं घर शोधणार तरी कुठे? एक लग्न मोडलेलं, वरात अर्ध्यातुन परत पाठवलेली म्हणुन समाजात झालेला बोभाटा, अशात अहमदनगरच्या वकिल साहेबांचे चिरंजीव हस्ती मल फिरोदिया हे इंजिनिअरींगचे बनारस येथे शिक्षण घेत होते. म्हणुन जबलपुर येथे दोघांचीही भेट ठ्रवण्यात आली. मुलाकडची पसंती आल्यावर मात्र आधी माझी पसंती मी दिलेली नाही म्हणुन ठाम पणे सांगणारी ( १९४२ साली) म्हणजे स्त्री वादी प्रतिभेचा उदयच म्हणावा लागेल. हे एक आंतरपोट्जातिय लग्न होतं त्यामुळे त्याकाळी जैन समाजात खुप दिवस या बद्दल चर्चा सुरु होती. तेंव्हा स्वतःला जरी भाग घेता आला नाही तरीही, त्यांनी भुमीगत कार्यकर्त्यांना मदत करणे , त्यांच्या कुटुम्बियांची काळजी घेणे अशी कामं केली, आणि आपली स्वातंत्र्य लढ्या बरोबरची नाळ कधीच तुटू दिली नाही.

लग्नासाठी महात्मागांधींच्या पण शुभेच्छा आल्या होत्या. लवकरच चले जाव ची घोषणा केली महात्माजींनी, पण त्यावेळी गरोदर पणा मुळे पानकुंवरजींना त्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता आला नाही. अरुण दोन वर्षाचे असतांना हस्तिमलजींनी अमेरिकेला पुढिल शिक्षणासाठी प्रयाण केले , तेंव्हा पानकुंवरजींना पण शिकायची इच्छा झाली. तेंव्हा त्यांनी एसएनडीटी मधे प्रवेश घेउन आपले शिक्षण पुर्ण केले.

हस्तिमलजी हे दापोडी येथे एस्टी मधे वर्कशॉप प्रमुख म्हणुन काम करित होते, तेंव्हा पानकुंवरजी या प्रोढ शिक्षण वर्ग चालवायच्या दापोडीला.प्रौढ लोकांना शिकवायची एक निराळीच पध्दत तिने सुरु केली. छोट्या छॊट्य़ा गोष्टी रचलया, आणि गांधीजिंच्या अनुभवातुन शिक्षण पध्दतीने शिकवणे सुरु केले.

जेंव्हा हस्तिमलजींनी नविन धंदा सुरु केला, तेंव्हा कामगार कल्याणाचेही काम केले.सुरुवातीला कंपनी लहान होती , तेंव्हा सगळे कामगार पानकुंवरजीं कडे यायचे आपले प्रॉब्लेम्स घेउन-कामगारांच्या काही अडचणी असतिल तर त्या समजुन घेण्यासाठी त्यांनी संध्याकाळचा वेळ राखुन ठेवला होता.

त्या ज्या काळातल्या होत्या , त्या काळामधे हे असं स्वय़ंनिर्णय घेउन वागणं स्त्रियांसाठी निषिध्द होतं म्हणुनच ’स्व’त्व जपुन जगलेल्या ह्या गृहीणीला शतशः प्रणाम..

संबंधित लेखन

 • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
  सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
 • जागे व्हा…..!!
  माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
 • नौदलातील भरती परीक्षेचा पेपर फुटला!
  नौदलातील भरती परीक्षेचा पेपर फुटला! ही बातमी वाचून धक्काच बसला. देशाच्या संरक्षणाची धुरा ज्यांच्य…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
PG

महेंद्र कुलकर्णी

मी महेंद्र कुलकर्णी. एक वर्ष होऊन गेलं ब्लॉगिंग सुरु करुन . ‘काय वाटेल ते’ ब्लॉग वर लिहितो. मनाविरुध्द काही झालं की चिडणारा, मनासारखं झालं की आनंदाने सगळ्या जगाला सांगत सुटणारा, कोणी थोडं प्रेमाने बोललं की त्याच्या साठी जीव टाकणारा, कोणी थोडा वाकडेपणा दाखवला तर तेवढ्याच आवेशाने भांडणारा- तुमच्या सारखाच मी एक !

 1. महेंद्र, फारच सुंदर आहे हे कथन. वाचायला हवेच. इतके धाडस आणि ठामपण त्याकाळात खरेच कठीणच होते. तुझ्यामुळे निदान एका आईचे निर्विवाद मोठेपण माहीत झाले. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME