वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

म्हणी

८ प्रतिक्रिया

निबंधलेखनात किंवा वत्त्कृत्वात आशय खुलविण्यासाठी आणि वाचक किंवा श्रोत्यांवर आपली वेगळीच छाप पाडण्यासाठी म्हणी उपयुक्त ठरतात. त्यांचा तारतम्याने वापर करण्यासाठी कौशल्य लागते. मला ज्ञात असलेल्या काही म्हणी पुढीलप्रमाणे:

१) नाचता येईना, अंगण वाकडे.
आशय: एखादा वाईट मणुष्य त्याच्याच कामाच्या वस्तूंवर त्याचा राग काढत असतो.

२) बुडत्याला काडीचा आधार.
आशय: जर कोणी अतिशय बिकट संकटात सापडला असेल, त्यावेळी त्यास केलेली इवलिशी मदतही त्याला त्या परिस्थीतीतून बाहेर येण्यास कारणीभूत असू शकते.

३) चकाकते ते सारेच सोने नसते.
आशय: कोणत्याही गोष्टीच्या तळा-मूळापर्यंत गेल्याशिवाय त्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नये.

४) अंथरूण पाहून पाय पसरावे.
आशय: तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल सर्व (किंबहुना भरपूर) ज्ञान (माहिती) असेल, तर तुम्ही तेथेच खोटे बोलावे, नाहीतर अन्यत्र (जिथे काहीच माहिती नाही, अशा ठीकाणी!) पच्ची होते.

५) अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये.
आशय: याच आशयाची दुसरी एक म्हण आहे: “भिकार्‍याने त्याला काय लागते हे मागायचे नसते.”

६) केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा.
आशय: काहीही न करत (मठ्ठं) बसल्यापेक्षा, काही-बाही करतांना उशीर झाला तरी हरकत नाही, तुम्ही मठ्ठं तरी म्हणवला जाणार नाहीत त्यामुळे!

७) गरज सरो वैद्य मरो.
आशय: याच अर्थाची दुसरी एक म्हण आहे: “कामापुरता मामा.”

८) उथळ पाण्याला खळखळाट फार.
आशय: विषयाची किंचितही माहिती नसलेलेच जोर-जोरात ओरडत असतात. (उदा. शाळेतील वर्गात! 🙂 )

९) चार दिवस सासूचे, चार सूनेचे.
आशय: प्रत्येकाला ठराविक कालावधी (संधी?) मिळत असतो, त्या वेळेतेच त्याला सर्वस्व पणाला लावून स्वतःची कीर्ती सिद्ध करायची असते.

१०) दिव्याखाली अंधार.
आशय: चांगले काम करणार्‍यांच्या सोबतीला असलेली मंडळीसुद्धा चांगली असतातच, असे नाही. (या आशयाबद्दल मी जरा साशंक आहे.)

११) आरोग्य हेच ऐश्वर्य.
आशय: किती जरी कमावलं, पण जर निरोगी आरोग्यच नसेल, तर त्या कमावलेल्या धनाचा काहीएक फायदा नसतो.

१२) लवकर नीजे, लवकर उठे, तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य भेटे.
आशय: म्हणीत सांगितल्याप्रमाणे जर लवकर झोपणे, लवकर उठणे दैनंदिन निरंतर पाळले, तर ज्ञान, धन, अन आरोग्य या गोष्टी (आपोआप?) मिळतात.

१३) ऐकावे जनाचे, करावे मनाचे.
आशय: लोकं काय म्हणताहेत, ते जरूर ऐकावे, पण स्वतःहून शांत चित्ताने विचार करून स्वतःहून योग्य निर्णय घ्यावा.

१४) दाम करी काम.
आशय: पैशाने बरीचशी कामे सहज मार्गी लागतात. (सर्वच लागतात असे मुळीच नाही.)

१५) नवी विटी नवे राज्य.
आशय: नविन गोष्टींचा सहभाग झाला की त्या गोष्टीचा बराचसा प्रभाव पडून अनेक नव-नविन घटना बघायला मिळतात (चांगल्या/वाईट – दोन्हीही!).

१६) गरज ही शोधाची जननी आहे.
आशय: जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीची अतोनात गरज भासत नाही, तोपर्यंत ती गरज पूर्ण करणार्‍या एखादा शोधाबद्दल तुम्ही अज्ञानी असता.

१७) गरजवंताला अक्कल नसते.
आशय: जेव्हा गरज भासते, तेव्हा आपण काय करतो आहोत (मग ते वाईट असो किंवा चांगले किंवा निरर्थक/जीवघेणे!) याचे गरजवंताला कसलेही भान राहत नाही.

१८) काट्यावाचून गुलाब नाही.
आशय: चांगल्या गोष्टीकडे जाणार्‍या मार्गात नेहमी अडचणी असतातच, विना अडचणींचा तो मार्ग असूच शकत नाही.

१९) पेरावे तसे उगवते.
आशय: जसे तुम्ही संस्कार कराल, तशी ती वस्तू (गोष्ट) घडत जाते. (पुर्वानुमान?)

२०) जैसी करणी तैसी भरणी.
आशय: कराल तसे भोगाल.

२१) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
आशय: एखाद्या गोष्टीची पारख करून त्या गोष्टीबद्दल आधीच पुर्वानुमान व्यक्त केला जाऊ शकतो.

२२) चुकणे हा माणसाचा धर्म आहे.
आशय: चुका करूनच माणूस शिकतो, त्यामुळे चुका होणे महत्वाचे असते.

२३) वरातीमागून घोडे.
आशय: याच आशयाची एक इंग्रजी म्हण आहे: “doctor after death..!”

२४) एकी हेच बळ.
आशय: कोणतीही गोष्ट जर सहजासहजी प्राप्त करायची (मिळवायची?) असेल तर समुहामध्ये एकी (unity) असणे गरजेचे असते.

२५) आपण चिंतितो एक, पण देवाच्या मनात भलतेच.
आशय: नेहमी आपण ज्या गोष्टीबद्दल हायवासलेलो असतो, तीच गोष्ट शेवटपर्यंत आपल्याला भेटत नाही. याच आशयाची अजुन एक म्हण: “करायला गेलो एक, झाले भलतेच.”

२६) बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ.
आशय: ज्या गोष्टी कधी अथक बोलण्याने सिद्ध होत नाहीत, त्या मौन राखून सिद्ध होतात.

२७) बळी तो कान पिळी.
आशय: ज्याच्याकडे तन, मन, धन या सर्व गोष्टी असतात, तोच श्रेष्ठ असतो.

२८) मध दिसलं, पण मधमाश्या नाही दिसल्या.
आशय: याच आशयाची अजुन एक म्हण: “दूरून डोंगर साजरा.” उदा. “मुलीच्या प्रेमात पडणं! 😉 “

संबंधित लेखन

 • मराठी म्हणी
  म्हणी वाचुन जमाना झाला असं वाटत असेल ना? मला तर तसं वाटतं.. चौथीला – त्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात…
 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • कलेचं देणं
  कलेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे म्हणा. तसे पा…
 • उबुन्टू १०.०४ मध्ये iBus द्वारे देवनागरीत टंकलेखन
  बर्‍याच जणांनी काही दिवसांपूर्वी  प्रकाशित केलेल्या “उबुन्टू १०.०४” लेखाला भरभरून प्रतिसाद दिला व…
 • (नव)रस
  ‘रस’ याचा शब्दशः अर्थ ‘चव’ किंवा ‘रूची’ असा आहे. व्यावहारिक जीवनात एकूण ज्ञात सहा रस आहेत: गोड, क…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेल ही गळे.”
  अर्थ ः अथक प्रयत्न केल्याते वाळुतुन तेल निघु शकते.

  ही म्हण अरब लोकांनाच छान समजली .आणि आपण ते बघतोच आहोत –

  • अतिशय आशयपूर्ण म्हण आहे ही महेशजी! अरबी लोकांनी वाळवंटात नंदनवन फुलवला आहे, त्या लोकांनी तरी ही म्हण स्वतःच्या जीवनात उतरवलेली दिसतेच, त्याबद्दल कसलिही शंका नाहीच!
   पण आपल्याकडीलही अनेक लोक या म्हणीची कित्येकदा प्रचिती करून देत असतातच, तुम्हालाही ते योग्य प्रकारे ज्ञात असेल, असो.

   याच आशयाची इंग्रजी भाषेतील आपल्या नेहमी कानवर पडणारी म्हण (Adidas या बहुराष्ट्रीय कंपनीची ओळख?) आठवली:

   “Nothing is impossible!”

 2. dear vishal ,chuka karane ha jari manasacha dharm asla tari muddam chuka karun tyatun kahihi na shikata chuka karat jaane he kitpat yogya aahe ? ya vishayi tula kaay vaat te !!!!!

  • कैलास,

   नक्कीच.. मी तुमच्या मताशी सहमत आहे.. चुका व्हाव्यात.. कारण तुम्ही विना-चुकांशिवाय एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळविले किंवा ती गोष्ट मिळवली, तर नाण्याच्या ज्याप्रमाणे दोन बाजु असतात.. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीलाही अशाच वेगवेगळ्या बाजु असतात.. ज्या अयशस्वी झाल्याने किंवा काही चूक झाल्याने आपण अनुभवू शकतो, व ती त्यापासून काहीतरी शिकून पुढल्या वेळी ती चूक होऊ नये व इतरांनीही ती चूक करू नये यासाठी केलेले कार्यप्रयोजन महत्वाचे असते. माझ्यामते तरी जीवनात विना-अपयशाशिवाय यशस्वी झालेल्या माणसांपेक्षा अनेक वेळा अपयशी होऊन सुद्धा, हातून घडलेल्या चूकांना सुधारून, कोणाच्याही मदतीशिवाय यशस्वी झालेल्या थोर व्यक्तींनी ही म्हण सिद्ध करून दाखवली आहे…

   ह्म्म, “पण जर अनेक वेळा चूका होऊन, अपयशाला बळी पडून, तुम्ही जर गत-चूकांपासून काहीच शिकत नसाल तर तुम्ही या संसारात व्यर्थ निर्वाह करीत आहात, इतरांसह स्वतःचा सुद्धा वेळ फुकट वाया घालित आहात.” ह्या तुमच्या मताशी मी पुर्णपणे सहमत आहे.

   प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार!

 3. मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही
  एक ना धड भाराभर चिध्या,,,Jockey of Everything and Master of Nothing..
  हाजिर तो वजिर
  अति तेथे माति
  आयत्या बिळात नागोबा
  निन्द्काचे घर शेजारी
  काखेत कळ्सा गावाला वळ्सा
  सरड्याचि झेप कुम्प्नापर्यन्त

 4. मराठी हुमान्नासाठी थोडी जागा हवी आहे!
  कुठे लिहु???
  [हुमान == Puzzle]

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME