वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

रविवारचे खारट चाट फरसाण!

३ प्रतिक्रिया

प्रस्तावना:

एक पावसाळलेली रविवार सकाळ. पावसाळलेली म्हणजे पाऊस असलेली आणि त्यामुळे आळसावलेली अशी रविवार सकाळ. २ गारगोट्या घासल्या की ठिणगी उडते, तशी दोन ब्लॉगर-डोकी एकत्र आली की… सुज्ञास अधिक सांगणे न लगे. तसं मी आणि आल्हाद, आम्ही दोघंही फार काही बरे लेखकू नसल्याने फार काही उदात्त साहित्यकृती वाचायला मिळेल असल्या भ्रमातून बाहेर या. बाकी जे तुमच्या आयुष्यात घडतं तेच तसंच अगदी डिट्टो वगैरे आमच्या आयुष्यात घडलं असण्याची सुतराम शक्यता वाटत्येय म्हणून हे पोस्ट.

उर्वरित पोस्ट वाचण्याअगोदर:

=> ह्यातला मी म्हणजे विशाल, आल्हाद म्हणजे आल्हादच. (वरील प्रस्तावना लिहिणारा सुद्धा आल्हादच बरं…)

=> फिकट निळ्या व तिरप्या अक्षरांमधील कमेंट्स या माझ्या व फिकट नारंगी व तिरप्या अक्षरांनी दर्शवलेल्या कमेंट्स या आल्हाद महाशयांच्या!

=> काही ठिकाणी प्रश्नाचे उत्तर जरा उशीरा दिलेले तुम्हाला आढळेल, तेवढं मात्र थोडं समजून घ्यावं!

चला करा सुरू वाचणं:

येथे एक चित्र आहे, ते लोड नाही झालंय, पृष्ठ रीलोड करा!


आल्हाद: रविवारच्या आळशी शुभेच्छा!
मी: (कडाडून जांभई देत) मी ९:१५ ला अंघोळ केली आज…
आल्हाद: ककऽऽक्काय? मी ९:१५ ला उठलोसुद्धा नव्हतो! तुझी अंघोळ शुक्रवारची पेंडिंग होती काय? 😉
मी: तुम्हालाही अनेक आळशी (जांभया देत..) शुभेच्छा…
आल्हाद: yawn yawn (च्यामारी आमचा आळसपणा आंग्लाळलेला…!)
मी: (उगाच विस्मयकारी भाव आणून) शुक्रवारची, ती कशी काय?
आल्हाद: जुम्मेका दिन होता है ना यार?
मी: अरेच्चा… मी मंदिरातच वर्षामध्ये एखाद्या वेळी जातो दर्शनाला, तेव्हा जुम्मा कसा याद राहणार भाईजी?
आल्हाद: हाहाहाहाहा! (हा प्राणी येथे हसतोय की खिदळतोय, हेच मुळी मला कळत नाही!) मलाही शुक्रवार हा दिवस आंघोळीचा म्हणून लक्षात आहे! 😉
मी: अंघोळ केली नाही तरी काही फरक पडत नाही, सर्दी होईल म्हणून नाही करत, असं सांगा घरच्यांना.. 😉
आल्हाद: वा रे, बाकी काय नवीन तुझ्या ब्लॉगवर? (रिकाम्या डोक्यात मुद्दे लवकर येतात, अन् अश्यांना डिवचण्यासाठीच असे प्रश्नप्रयोग करावेत!)
मी: काहीच नाही… दलदलीत फसलाय ब्लॉग… अन् म्युनिसिपल कार्पोरेशनवाल्यांना टोल-फ्री नंबरवरुन मदतीसाठी फोन करू-करू बेजार आहे सध्या… 🙁 पण साल्यांकडून कसलाच रीस्पॉन्स नाही.. (आता त्या लोकांचा येथे काय संबंध म्हणायचा?)
आल्हाद: का रं? ही कंची दलदल म्हनायची?
मी: शेवटी मी आता उपरवाले के भरोसे सोडलाय ब्लॉग! “आळस!” नावाची दलदल, भौ!
आल्हाद: आरं रंरं…. (कायपण तिच्यायला कारणं आहेत!)
मी: बाकी मी तुमच्या ब्लॉगवर ढूंकून(?) सुद्धा पाह्यलं नाय आजुन, मागच्या वेळी गुगल रीडरला जोडून वाचीन, असं कबुल करुनसुद्धा! (च्यायला, पण मी हे सांगतोय का? इतरांनी मात्र वाईट वाटून घेऊ नये!) 😛
आल्हाद: आर्मग पहा की… (तरीच… तरीच माझा इंडीरॅंक कमी झाला या वेळेला…) काय आमंत्रण कराय्चं का लग्नावानी?
मी: कारण एकच!!!! ::::: “आळस!!!” अन् आर्मग म्हंजे?
आल्हाद: काय राव तुमी पन
मी: पन आहेर नाही आणनार आपुन..
आल्हाद: आर्मग ~ आरं मग चा शॉटफॉम
मी: आसं व्हय…
आल्हाद: आहेर सोडा हो, जेवायला तर या, नागपुरी वडाभात देतो या… 🙂
मी: दात घासायचेत अजुन…
आल्हाद: व्हय का…
मी: आस्सं होय, पान बी तयार ठेवा मंग, मी दात घासतो लगेच…
आल्हाद: मग कडुनिंबाची काडी देतो या, दात मस्त ढवळे फटक होतीन तुम्चे…
मी: गरज नाय, मी कोळशाने घासत असतो, जव्हा मन होतं तव्हा… मोसंब्या अन संत्रं काय म्हणत्यात मंग नागपुरकर‌‍ऽऽऽऽ…? (३ मिनिटे झाली तरी रीस्पॉन्स नाही देऊ राहीला हा प्राणी!) झोपलात काय तिकडं?
आल्हाद: (जरा दोन मिनीटं वडाभातात गुंतलो तर… ऐकत म्हणून नाही कार्ट…) पयल्या धारेची संप्ली की राव…. उशीर केला तुमी
मी: च्यायला.. याचं नेमकं कारण म्हंजे :::: “आळ्ळस!!!”
आल्हाद: यॉनिंग डॉगचा ओवर्डोस झाला काय बे? (असा एक ब्लॉग आहे. जिज्ञासूंनी गूगलावं!) साला तो बी पुरा ब्लॉग आळसावरच हाय
मी: नाय… (अश्या ब्लॉग्जवर बी वर्षा-दीड वर्षानं चक्कर मारावी, तव्हा कुठं काहीतरी नवं लिहलेल सापडन!) तसं, सगळ्यायच्याय बाबतीत हे खरं हाये…
आल्हाद: ह्म्म्म्म, तुमच्या त्या वेबसाईटवर वर बी आळस हाय का? मराठीविश्व का काय ते? (च्यायला, काय म्हणाव या प्राण्याच्या स्मरणशक्तीला, काजू-बदाम खाऊ-खाऊ बुद्धी भ्रष्ट करुन ठेवलीय नुसती!)
मी: हाव… लागन झाली त्या मराठी मंडळीला बी…
आल्हाद: अर्र्र्र्र…. च्च्च्च्च्च (ही काय पद्धत झाली का विस्मय प्रकट कराची, तुमीच सांगा बरं…!)
मी: भहीर पाणी चालु असला की कोन लिवनार तिकडं.. (जसं काय माझ्याकडे छत्री नाय म्हणून दुसर्‍यायकडं बी नाय, असं मला नेहमी वाटतं) घरंचंच निस्तरायचं पडलंय, तर बाहेरच्याची काय गोस्ट.. (म्हणून मराठी माणूस मागे रहातो.)
आल्हाद: घरात बसून त लिवायचं… (मग काय बाहेर बसून लिहित असतात?) बाय द वे, हुंदडायला कुटं जायचंय?
मी: कुटं नाय…
आल्हाद: आसं करु नी बाला…
मी: कसं, भौ?
आल्हाद: इक्ता बी आलस करू नी… उद्या पोरगी पटवून बी आलसच करशीन का?
मी: नही ~ नी?
आल्हाद: व्हय
मी: आसं कसं भौसाहेब, तुमी मांगं आसल्यावर आमी मजेतच राहणार, फक्त आळसाच्या शुभेच्छा देजा पोरगी पटवल्यावर… 😉
आल्हाद: “तुमी मागे असल्यावर आमी मजेतच राहणार”… तुमी गे असान असं वाटलं नवत (डेव्हिल्स माईंड एम्प्टी वर्कशॉप म्हणतात ते हे असं!) 😀
मी: पोरगी पटवल्यावर तीला बी आळस रोग लागल्याशीवाय राणार नाय
आल्हाद: च्च्च्च्च***
मी: (गे, दोस्ताना इफेक्ट हा असा दिसतोय सगळीकडे!) च्यायला… :-/ मी अजुन पोरगं हाये राव… लहान पोरांशी अशा गोस्टी करु नी!! (तसं अशा गोष्टी बोलण्यानं कोणाचं काय जातं म्हणा!), काय बरोबर ना?
आल्हाद: आता तुमी बोलायलेच तसं तर त्याले आमी काय करू
मी: मला नेमकं एक कळत नाही, की आपण ही चर्चा नेमक्या कुठल्या/कोणत्या बोलीभाषेत करतोय ते…
आल्हाद: आमी नाय बा त्यातले…
हाहाहाहाहाहाहाहाहा (असं हसणं वाचतांना नेमकी कुठली शिवी द्यावी असं तुम्हाला नेहमी वाटत असणार!) नागपुरी पासून कोल्हापुरी पर्यंत, मराठवाडी अहिराणी सकट…
धमाल आहे बाकी?
मराठी मराठी आहे शेवटी
मी: आमची ओंगळवानी मराठवाडी म्हर्ह्हाटी कशी आसती मंग?
आल्हाद: एक काम कर
मी: ह्म्म, धमाल आहे!
कोणतं?
आल्हाद: आपला चॅट आख्खा कॉपी करून टाक मराठी मंडळीवर
आणि विचार लोकांना की किती अन् कोणत्या बोलीभाषा वापरल्या ते
मी: च्यायला… मला गे म्हणलात तुम्ही..
ते बी टाकू काय? ( 😉 )
आल्हाद: we could invite other articles also
टाका की डिस्क्लेमर देऊ खालती (विशाल, डिस्क्लेमरचं विसरू नकोस रे…)
मी: हा… ते चालेल…
आल्हाद: मग….
मी: पण ब्लॉगवर की साइटवर… कसं भलतंच लफडं व्हायचं नहीतं!! ??? (पापभीरू म्हणतात ते हेच…)
आल्हाद: कुटं बी टाक… लफडं कस्लं व्हनारे? (अन जर तसा काही प्रकार जरी झाला, तरी तो विशाललाच निस्तरावा लागणार आहे… )
मी: मला नाय महित… पण कुथपर्यंत कॉपी करु.. अन टायटल काय द्याचं?
ठ~थ*
आल्हाद: ह्म्म्म
टायटल….
इचार करू दी बाबा
इचार फार महत्वाचा अस्तूय
मी: “च्यायला!!” (हे काय नाव झालं का ल्येका?)
तुमचं बोला..
आल्हाद: “रविवार सकाळ… मराठीत” (हे म्हणजे काहीही…)
मी: मराठीत कशासाठी?
म्हंजे. ते कशासाठी घुसडलं त्येच्यात?
आल्हाद: ह्म्म्म
आणि हे, आर्टिकल करायचं ठरल्यानंतरचं डिस्कशन ता.क. म्हणून टाकू, काय?
तुला काय सुचतंय?

ता.क.

मी: काय नाय, आपुन पक्कं आळशांडलेले कारटं… (हे असले शब्द मराठीत असण्याचे फारच कमी चान्सेस असतील?)
आल्हाद: आयला तुझ्या आळसाची तर आय भैन काडेन आता (राग…)
मराठी शिव्या कम्युनिटीतल्या शिव्या कॉपी पेस्ट करू का? (उसना राग…)
मी: बरं एक करता का, तुमी मला हे व्यवस्थित फॉर्मेट करु देता का, मी लगेच साइटवर पोस्टतो…
आल्हाद: वक्के
मी: आपल्याला नाय लागणार त्या शिव्या..
विचारा कहुन…? (काय म्हणून कोणी असा प्रश्न विचारेल…)
कहुन् की त्या आपुन वाचणारच नाय… आता बोला…
आल्हाद: वर्ड फाईल पाठवतोस की ओपनऑफिस?
हाहाहा
मी: ओपन ऑफिस – .odt फॉर्मेट
आल्हाद: मेल कर
किंवा गूगल डॉक्सवर शेअर कर
मी: डायरेक्ट साधा मेल करु का?
तुम्ही पोस्टणार आहात की मी?
आल्हाद: तुम्हीच पोस्टा
एडिटून पाठवतो (हे पण मराठीच)
मेल्लीस फाईल की सांग
मी: चालन.. मी चॅट हिस्टरी मेल करतो तुम्हाला
आल्हाद: मी जरा पाकीस्तानला जाऊन येतो
odt मध्ये कर बे…
आलोच
मी: ह्म्म.. मला असले किळसवाणे प्रदेश नाही आवडत जास्त… (१ अन २ नंबर करणं बी लय अवघड जातं अश्या ठिकाणी, बरोबर ना!)
19 मिनिटे (ही आमच्या पाकिस्तानवारीला लागणारी वेळ…! ;))
आल्हाद: mailed?
मी: This is an autoreply: I am currently not available. Please leave your message, and I will get back to you as soon as possible.
आलो… जरा बाहेर गेलो होतो चपला भरवायला (श्शी! हा भर पावसात चिखलात गेला हगायला…)
ह्म्म, मेल पाठवलीय.. चेक आउट
आल्हाद: marathi nit disat nahiye
specially tu type kelela
odt madhe patahv
मी: च्यायला, बरं पाठोतो….
आल्हाद: पाठो पाठो
मी: हॅंगलय कम्प्युटर… ५१२MB रॅम वर काय काय करणार राव..
आल्हाद: च्यामारी मी पण पाश्शेबारावरच कर्तोय ना?! (म… रा…. ठी…. च!!!)
मी: सोबत अग्निकोल्हा चालु हाये ना, १७५७ ऍड-ऑन्ससह, त्याचं काय!
आल्हाद: हाहाहाहाहा (हे असलं हसणं म्हणजे अति झालं आता…! वाचायलाच किती त्रास पडतोय, तसं हसतांना तर आतडे बाहेर येतील पोटामधून!)
म्हणून शान्या मान्सावानी क्रोम वापरावं
मी: (फायरफॉक्सपेक्षा क्रोमच माझी रॅम दुप्पटीने ओढतो, हे सांगितलं तर हा प्राणी बहुतेक जागीच खल्लास होईल त्याच्या विचित्र हसण्यामुळं, त्यामुळे त्याला न सांगनेच बरे!) १ मिनिट, लगेच मेल करतो
odt मध्ये प्रॉब्लेम येतोय… मी चॅट हिस्टरी फॉरवॉर्ड करतोय…
आल्हाद: बघ कसं ते
मला नीट वाचता येऊ दे म्हणजे झालं
मी: ह्म्म
आल्हाद: मी आलोच
मी: या. हिंदडून, मी चाल्लोय खादडायला…
😉


(रविवारजन्य फाल्तूगिरीची इतिश्री)

हाणा कमेंट, जेवढ्या हाणता येतील, तेवढ्या….!!!संबंधित लेखन

 • पत्तेशोधन – काही चिंतन
  (ओपनिंग लाईन, ती सुद्धा इंग्लिशमध्ये टाकली की वाचकांचे लक्ष एकदम वेधून घेतले जाते. म्हणून आजकाल म…
 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • आकाश निळे का दिसते?
  लेखात समाविष्ट सामग्री:

  अभिसारण
  रेलिघचा अभिसारण नियम
  अभिसारणाची उदाहरणे
  सामान्यतः आकाश …

 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • जागे व्हा…..!!
  माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. हे म्हणजे स्वताच्या डोक्याचा शॉक दुसऱ्याच्या डोक्याला देण्यासारख आहे. बरंय

 2. Very good. Me susha font vaparto. Marathisathi kahi sopya tricks kalava.
  Aravind.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME