वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

रिसीवींग एंड ला मीच आहे रे

१५ प्रतिक्रिया
रिसीवींग एंड ला मीच आहे रे

रिसीवींग एंड ला मीच आहे रे

तुमच्या आमच्या सारख्या बऱ्याच घरात हे असे प्रत्यक्ष व देहबोलीतून ठसक्यात व्यक्त होणारे संवाद घडत असतातच.

प्रसंग एक, माणसे प्रत्यक्ष दोन अप्रत्यक्ष दोन, काळाचे टप्पे दोन.

मुलाचे-विजयचे नुकतेच लग्न झालेले. सुनेने-रेवाने संध्याकाळी चहा केला, सगळ्यांना-म्हणजे सासू-सासरे, विजय व स्वतःला दिला. रिकामे कप आत नेऊन ठेवले, विजय व रेवा फिरायला बाहेर पडले.

जिना उतरताना रेवा विजयला म्हणाली, येईलच हाक आता तुझ्या आईची, ” रेवा आधी वर ये. चहाचे भांडे, गाळणी व कपबश्या स्वच्छ विसळून जागेवर ठेव आणि मग कुठे जायचे ते जा. ” हे तिचे सांगणे पुरे होतेय तोच खरचं आईची हाक आली आणि रेवा संतापली. विजयने थोडा प्रयत्न केला, ” आई, अग आम्ही उतरलोत आता. आल्यावर पाहू.” त्यावर आईचा कडक आवाज आला,  ” मी तुला हाक मारलेली नाही, रेवा येतेस ना? ” रेवा वर गेली. सगळे काम आवरले आणि खाली उतरली. झाल्या प्रकाराने रेवाचा फिरायला जाण्याचा उत्साह कधीच संपला होता व त्याची जागा आता संताप, अपमानाने  घेतली. विजयही थोडा अस्वस्थ झाला होताच. आईपण कधी कधी अतीच करते. काय झाले असते स्वतःच केले असते तर? नव्हते करायचे तर ठेवायचे तसेच रेवाने केले असते ना आल्यावर, पण छे! हट्टीपणा नुसता.

इकडे घरात सासूबाईंनी सुरवात केली, ” पाहिलेत ना, कशी तणतणत आली आणि एकदाचे सगळे धुऊन आपटून गेली. काय चुकीचे सांगितले होते मी? चहाचे भांडे, गाळणे, कपबश्या तश्याच पडल्या की पटकन मुंग्या लागतात, शिवाय त्याला डागही पडतात. हातासरशी विसळून टाकले की पटकन होऊन जाते व पुढे काही निस्तरत बसावे लागत नाही. ” सासरे म्हणाले, ” अग हे सगळे तुझे बरोबर आहे गं, पण नसते आत्ता सांगितलेस तर काय बिघडले असते तुझे? रेवाचा चेहरा किती उतरला. आता कसले फिरणे? सगळा वेळ ते दोघेही हेच बोलत राहणार. ” हयावर नेहमीप्रमाणे सासूबाईंनी मान उडवली आणि त्या निघून गेल्या.

पाहता पाहता रेवाच्या संसाराला पंचवीस वर्षे झाली. सासूबाईंच्या अनेक गोष्टी नकळत रेवाही करू लागली. काही गोष्टी त्याच्या त्यावेळी केल्याने होणारे फायदे ठळक दिसल्याने रेवाने ते सगळे स्वतःला शिकवले आणि आता ते पक्के भिनले होते. दिवस जात होतेच. पाहता पाहता मुलाचे लग्न झाले. जुई एकदम गोड मुलगी. खूप लाडात वाढलेली, शिवाय श्रीमंताची पोर. त्यातून पोराचे लव्हमॅरेज. रेवाने आधीच ठरवलेले कोणाच्याही स्पेसमध्ये आपली ढवळाढवळ करायची नाही.

एक दिवस संध्याकाळी अचानक जुईला चहा करायची लहर आली. जुई चहा करणार, ह्याचेच भरपूर कौतुक झाले. भारी क्रोकरीत एकदम थाटात चहा आला. मग ज्याने त्याने आपापला बनवून घेतला. तोवर तो बराच थंड झाला होता तरीही सगळ्यांनी खूप कौतुकाने प्यायला. डायनिंग टेबलवर व ओट्यावर सगळे तसेच टाकून जुई पोराबरोबर किती मोठे काम केले ह्या आनंदात पसार झाली.

ते उष्टे कप पाहून रेवाला सासूबाईंची खूप आठवण आली. तुमची त्या मागची भूमिका बरोबरच होती परंतु सांगण्याची पद्धत कडक. कालांतराने मला त्याचे फायदे कळले असले व आत्ता मीही तसेच सारे करत असले तरीही जुईला काही म्हणणार नाही. कधीतरी तिला कळेल. किंवा नाही कळाले म्हणूनही काही मोठे बिघडणार नाही. मात्र तिचे हे सुंदर दिवस परत येणार नाहीत. तेवढ्यात विजयने तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शातून सगळे भाव पोचले. रेवा मनमोकळे हसून म्हणाली, ” विजय, जुईचे वागणे अगदी नॉर्मल व अपेक्षीत आहे. तसेच सासूबाईंचेही बरोबरच होते. फक्त दोन्हीत रिसीवींग एंडला मीच आहे रे. “

संबंधित लेखन

 • प्रेममयी
  मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • पाऊस मनातला !
  आज रविवार ऑफिस ला  मस्त सुट्टी. सुट्टीची संध्याकाळ आभाळ भरून आलेल विजेच्या कडकडाटा सह पावसाल सुरु…
 • नगण्यतेत समावलेले जीवन….

  मानवी मनाची सगळ्यात आवश्यक गरज म्हणा, इच्छा म्हणा…..” कोणीतरी माझी विचारपूस करेल, आठवण…

PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

 1. हा हाऽऽऽ..! “दोघींचे वागणे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे, पण दोन्हींत रिसीविंग एण्डला मीच आहे…” अतिशय छान वातावरण निर्मिती जमवलिय भानस ताई..! बरेच काही शिकण्यासारखे आहे या कथेतून, माझ्यापरीने मी यातून भावी आयुष्यासाठी काही गोष्टी अंगिकारल्या आहेत.

  बाकी गद्य अतिशय सुंदर जमलाय, पुढेही अशाच प्रकारचे लेख लिही ताई…

 2. विशाल,अनेक आभार. लहानसहान गोष्टीही कश्या जिव्हारी लागतात आणि विसरताही येत नाही्त पण नजरीयां बदलता येतो आणि बदलायचा प्रयत्न करायला हवाच. बरेचदा उलटेच घडते….

 3. जालन्दर बनकर म्हणतात:

  भानसताई,काय लिहावे?घरोघर मातिच्याच चुली.एका बाजुला सासु, एका बाजुला सुन.आमचे मात्र असे होतेकी,एका बाजुला आई व एका बाजुला बायको.दोघिन्च्या दोन पिड्या.आमचे मधल्यामधी काय होत असेल? दोघिन्चा रागरुसवा आमच्या ध्यानातच आला नाही असे म्हणुन वेळ मारुन न्यायची. लहानपणी घरात पाच बहीणी. जेवनाचे ताट सुध्दा बाजुला सारायची वेळ यायची नाही तर बाकीचे काम कसले.आता आमची मुले म्हणतात (२मुली १ मुलगा)तिघानिही सारखी कामे केली पाहिजेत. आईचे रुसण्याचे कारण एकच,मला एकदा तरी महिन्यातुन गावी जाउ द्या. बर आईला एकटीला गावी कसे पाटवणार? वडलान्चा जिव नातवन्डातच गुन्तलेला.आता आई बाबा दोघेही नाहीत.आम्हाला मात्र आता दोघान्ना एकत्र बाहेर जाता येत नाही.गेलो तरी सन्ध्याकाळी घरी परत यावेच लागते.कारण मुलान्कडे कोण पाहणार.काहीही असु द्या दोन पिडया सान्धणारे,साम्भाळणारे कुणीतरी घरी असावेच.

  • जालन्दर, अगदी खरेच. घरोघरी मातिच्याच चुली. थोडे डावे-उजवे. आपले शेवटचे वाक्य महत्वाचे, दोन पिढ्यांना साधणारे व सांभाळणारेही कुणीतरी घरी असावेच. पोरकेपण म्हणजे काय असते हे जेव्हां आई-बाबा नसतात तेव्हांच कळते. बाकी आजकाल काळ खूपच बदलला आहे त्यामुळे दोन्ही किंबहुना तिनही पिढ्या ( जर एकत्र असतील तर )सामंजस्याने व सलोख्याने वागताना दिसतात. अडमुठेपणा-हेकटपणा करण्याचे प्रकार कमी होऊ लागलेत. हा बदल अतिशय महत्वाचा व प्रेम वाढवणारा आहे.
   अभिप्रायाबद्दल अनेक आभार.

 4. नमस्कार भाग्यश्रीताई,
  मी तुमचा ब्लॊग नेहमी वाचत असते. मला तो खुप आवडतो. आणि हो, हा लेखहि नेहमी सारखा छान जमला आहे. रेवाच्या विचारांशी सहमत. मला वाटते, नवीन पिढि बराचसा वेगळा विचार करायला लागली आहे. थोडासा स्पेसचाहि विचार करायला लागली आहे.

 5. शैलजा, नमस्कार. आपण माझा ब्लॉग वाचता व लिखाण भावते हे वाचून खूप आनंद झाला. 🙂 आभार. आजकाल दोन्ही पिढ्या निदान एकमेकांच्या बोलण्यावागण्याचा विचार व आदर करू लागलीत ही जमेची बाजू. अपवाद असतातच. पण निदान केवळ मी का यांचे ऐकू- हे कोण मला शिकवणार, ही तेढ कमी होऊ लागली आहे.

 6. भाग्यश्री, इतके दिवस ‘वाचायचा, वाचायचाच हा लेख’ म्हणत होते पण राहून जात होतं…. छान रंगवले आहेस प्रसंग! आताच्या ज्या सासवा आहेत त्यांना अनुभवायला मिळणारा हमखास प्रसंग आहे हा…. त्यांच्या पिढीला सासूबाईंच्या आज्ञेत, त्यांच्या धाकात आणि शिस्तीत काम करायची सवय लागली. त्यामुळे आयुष्यभर त्या सून म्हणूनच घरात वावरल्या…. आणि आता सासूपदाची झूल अंगावर आली तरी नव्या पिढीतील सून कुठं ‘सून’पदाची झूल घ्यायला उत्सुक असते?!!! तिला तर पोटच्या मुलीसारखे लाड करून हवे असतात. त्यामुळे आधी सासूच्या हाताखाली आणि आता सूनबाईच्या तालावर….
  ती गळचेपी तू छान, हलकेफुलकेपणाने मांडली आहेस!

  • सर्वप्रथम प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार व व्यक्त व्हायला थोडा विलंब झाला, दिलगीर आहे. अगदी खरे आहे गं. मधल्या पिढीची गळचेपी होतेय. माझ्यापेक्षा बारा-पंधरा वर्षाने मोठ्या माझ्या मावस-मामेबहिणींच्या घरात हे द्वद्वं पाहावयास मिळते. काही ठिकाणी चांगलेही चित्र आहेच.

 7. नमस्कार भाग्यश्री ताई. मी तुमचा blog नेहमी वाचते. मला तुमचे लिखाण अतिशय आवडते. तुम्ही खूप मनापासून लिहिता असे वाटते. असेच छान लिहित राहा. तुम्हाला अनेक शुभेच्छा.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME