वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

‘वणवा’

१७ प्रतिक्रिया

‘विवाहितेवर हिंजेवाडीत झालेल्या सामुहिक बलात्कार’ घटनेने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. मनात प्रक्षोभाचा ‘वणवा’ पेटला.

वणवा

मन आगीने पेटून उठलंय
काळजात आगीचा डोंब उसळलाय,
स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांनी
तनामनात वणवा पेटलाय.

समजूच शकत नाही
अत्याचार करणारया नराधमांची मानसिकता.
नसतात का यांना आई आणि बहिणी हि नाती
का ते केवळ नर-मादी हीच नाती जाणती

अत्यंत हीन यांची करणी
माणूसपण शरमेने झुकवी.
शिक्षा करण्या अपराध्यांसी
हात चवताळूनी  उठती.

सख्यानो आता तरी सावध व्हा, जागरूक रहा
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागू नका,
पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा.
नोकरी किंवा पैशाला जीवापेक्षा मोठा करू नका.
आत्मरक्षणासाठी स्वयंसिद्धा व्हा
जवळ तिखटाची पुडी किंवा  छोटासा चाकू बाळगा.

आता तरी पेटून उठा!
का अजूनही वाटच बघणार आहोत
आणखी नयना पुजारी, ज्योतिकुमारी बळी जाण्याची?
अत्याचार करणाऱ्या नराधमाना धडा शिकवा,
‘केस’ दडपून  समाज सुरक्षेला आव्हान   देणारया  राजकारण्यांना
खडसून जाब विचारा.

गुन्हेगारांना शिक्षा करण्याची नसेल त्यांची हिम्मत
तर आपणच अपराध्याला धडा शिकवूया
अशी जबरदस्त शिक्षा देऊया कि
परत नाही होणार कोणाचीहि  हिम्मत
स्त्रीवर अत्याचार करण्याची,
तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्याची !

{प्रतिमा: आंतरजालावरुन साभार}

संबंधित लेखन

PG

मंजिरी

 1. अहो मंजिरीताई, या नराधमांना लिंगासह दोन्ही हात छाट्ण्याची शिक्षा हॊणं गरजेचं आहे. काय चाललंय या देशात हेच समजेनासं झालंय? महिलानी ही जागृत होणं आवश्यक झालंय.परत परत अशा घटना कां होतायत? किति असुरक्षित झालंय हे जीवन? दुसरेहि काही प्रश्न आहेत या संदर्भात ते येथे वाचा;- बलात्कार या लेखात.
  http:// savadhan.wordpress.com

 2. गेल्या काही वर्शान्पासुन शहरआत अश्या घतना घदत आहेत.या शहरतील सर्व खाजगी वाहनचालकान्चा राखीपौर्निमेला राखी बान्धुन सर्व महिलाना सन्मानाने वर्तनुक मिलेल असा वचन् नामा त्यानी जाहिर करावा.व आशा वाहनचालकाचा गनेशामन्द्लाने सत्कार करावा.

 3. hya sarv ghatana baghun man ekdam sunna hote,ase wat te ki apan kuthe rahatoya,susabhya,su-sanskrut maharashtrat ka talibani madhe afghanat/wa bihar madhe

 4. he vachun man sunn jhal. ka asa ghadatay yethe te samajat nahi. mala asa vatat ki yala galicha picture,vdo,aani ashya parakarachya batamyavar jor deun tech tech satat TV VAR dhavanare jaast jabaabadar aahet. Apalyach deshat yach pramaan ka vadhatey. iatar deshat sa hou shakte ka? laghech ashy gunhegarana shiksha dili jaate. yethe varsonvashe nikalach lagat naahi.samanya manasache jivan atyant asurkshit jhale aahe.

 5. ही कविता वाचल्यावर खाली उल्लेख केलेले ललित लेखन वाचलेत पाहिजे. वाळवंटात नाही का आपण ओऍसिस शोधतो. अगदी तसेच.

  http://shabdankit.wordpress.com/2010/04/13/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/

 6. जोवर गुन्हेगाराला जाहिरपणे जबर शिक्षा होत नाही… जेणेकरून इतरांना दहशत बसेल तोवर हे असेच चालणार. काहीही केले तरी कोणीही आपले काहीच वाकडे करू शकत नाही हा माज जोवर उतरत नाही…… लहान लहान अगदी तान्ही बाळीही यातून सुटत नाही…. तडफडाट होतो जीवाचा….. वांझोटा तडफडाट… किमान स्वत:हून ओढवून तरी घेणे टाळता येईलच नं….. ( या अशा लिफ्ट मागण्याची काही गरज आहे का? शिवाय या प्रकरणी नक्की खरे काय घडलेयं…. ???? )
  मंजिरी, छान मांडलस गं. 🙂

  • खरं आहे भाग्यश्रीताई, असे प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी गुन्हेगाराला जाहीरपणे जबर शिक्षा होणे अतिशय आवश्यक आहे.
   आणि असे प्रकार स्वतःहून ओढवून घेणे तर निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. या प्रकरणी नक्की काय घडले आहे ते हळूहळू स्पष्ट होईलच पण तरीही अशा घटना घडल्या कि मनाची तडफड होतेच..आणि तुम्ही म्हणता आहात तसा अचूक- वांझोटा तडफडाट..याचा अजूनच जास्त त्रास होतो.
   भाग्यश्रीताई, आपली प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. आपल्या ‘sardesaies’ या ब्लॉग ची मी रेग्युलर फोलोअर आहे. आपले साधे, सहज आणि मनाला भिडणारे लिखाण खूप आवडते. त्यामुळेच अशा मोठ्या माणसांनी हे लिखाण वाचलं म्हणून अतिशय बरं वाटलं..आपले मनापासून आभार.

 7. मंजिरी,

  आज मी ही कविता वाचली , तुझ्या वेदना तु उद्विग्नपणे मांडल्यास, वर्तमानपत्रामध्ये आपण या बातम्या वाचतो त्यावेळी मनाला खुप वेदना होतात, समाज सुसंस्कारीत झाल्याशिवाय या घटना कमी होणार नाहीत, असे गुन्हे केल्यानंतर शासन होते हे माहीत असुनही गुन्हेगार असे प्रकार करतातच, असे प्रकार थांबवायचे असतील तर मुलींनी,स्त्रीयांनी व त्याच बरोबर समाजानेही जागरुक राहीले पाहीजे, [पोलीस प्रशासनावर अवलंबुन न रहाता]

 8. मंजिरी ताई
  तुमचे विचार चांगले आहेत. पण कविता कुठे आहे? ही कविता आहे कि लेख?
  कविता आणि लेख यात फरक असतो.
  कवितेबद्दल किती गैरसमज आहेत..

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME