वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

विसरू नको श्रीरामा मला….

२ प्रतिक्रिया

’विसरू नको श्रीरामा मला’… ही हाक मारता यायला हवी…. मारायलाच हवी.

त्या राजीवलोचन रामाला विनवायला आपण आधार तरी अजून कुठल्या शब्दांचा घेणार?

मुग्धा आळवायला सुरूवात करते अन्‌ नकळत आपले डोळे झिरपू लागतात.

’विसरू नको श्रीरामा मला’… एका भक्ताचं मनोगत… अगदी पिळवटून टाकणार्‍या भावात व्यक्त झालेलं…

आपल्या आराध्यदैवताला मनापासून केलेली ही विनंती…’विसरू नको’…

अनंतकोटी ब्रम्हांडनायक परमात्मा केवढा अन्‌ मी केवढासा? त्याचं लक्ष तरी असेल का माझ्याकडे? तो पाहतोय का मला?.. निजभक्ताला पडणारे हे स्वाभाविक प्रश्न.

उत्कट भावांची उद्याने नाहीत पण रानफुलांची छोटीशी ओंजळ आहे. भक्तीचा, ज्ञानाचा उन्मेष नाही पण प्रांजळपणाची, सच्च्या मनाची इवलीशी झोपडी मात्र आहे.

मुग्धाचा आवाज आता टीपेला पोहोचलेला ’मी तुझ्या पाउली, जीव वाहिला, प्रिया….’

इथलं जगणं तुझ्यासाठी… इथलं अस्तित्व तुझ्या कृपेने… प्रभु रामचंद्रा, जे काही आहे ते सगळं तुझंचं आहे.. या प्राणांसकट !!

मुग्धा फारचं भावविभोर करते आपल्याला…

’किती जन्म झाले, तुझी प्रेमिका मी, कितीदा नव्याने तुला भेटले मी’

ऋतु आले नी गेले, जन्म झाले नी संपले पण सोडला नाही भक्तवत्सला तुझ्या भक्तीचा खटाटोप….

मुग्धा एक वेगळीच उंची गाठते …..’तुझी सावली झाले, घेउनी हिंडले सतीचा वसा’ … आता तुझ्या निरंजनरूपाचेच मला वेध….

मुग्धाने पण कमाल केलीय आर्ततेची पातळी शिगेला नेऊन ठेवून…

का हा दुरावा रघुनंदना? कल्पोकल्पींचा विरह… तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेला मी…. रामचंद्रा, तुझी पाऊले कधी उमटणार इथे?

खरंचं ’विसरू नको’ ज्या भावगर्भतेने गायलंयं मुग्धाने त्याला तोड नाही. ऐकताना तन-मन वितळून जातं, मुग्धाच्या स्वरात आपल्याही आतला साधक तेवढाच तळमळतो आणि राहतो फक्त एका श्रीरामाचा ध्यास….

संबंधित लेखन

PG

विक्रांत देशमुख

मी एक चिमुकलं रानफुल…रंग,रूप,गंध नसलेलं… दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं… त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला… रुतुराज आज वनी आला’.

  1. मीसुद्धा हे गीत कालपासून ऐकतोय, मन अगदी भावविभोर होऊन जातं.. मुग्धेची श्रीरामाला विनवणी ऐकतांना श्रीरामाने तीच्या तळमळीची जाणीव राखून तीला आपलेपणाने काहीतरी सांगावे अशी मनात एक इच्छा जागृत होते…

    गीताचे संगीत अतिशय मधुर आहे, तुम्ही येथे गीताचा मांडलेला किंचितसा भावार्थही मनाला लागून जातो..

  2. लेख छान आहे. राम नवमि निमित्त्त अजुन लेख प्रसिध करावे
    आभरि आहे
    शरद

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME