वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

शिक्षणाच्या आयचाऽऽ घोऽ..!

२ प्रतिक्रिया
शिक्षणाच्या आयचा घो!

शिक्षणाच्या आयचा घो!

नुकत्याच, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या “शिक्षणाच्या आयचा घो..” आणि “थ्री इडियट्स” या दोन चित्रपटांबद्दल तुम्हाला माहिती असेलच. या दोन्ही चित्रपटांमधून सध्याची शिक्षण पद्धती देशाच्या भवितव्यासाठी का सुखकर व पोषक (अनुकूल) नाहिये, त्याबद्दल विचार मांडले गेले आहेत.

जर अतिशय काळजीपूर्वक विचार केला तर असे जाणवेल की खरंच भारतात असलेली सध्याची शिक्षणपद्धती राष्ट्रासाठी विघातक असू शकते. सर्वात पहिले तर सर्व राज्यांत त्यांचे-त्यांचे शिक्षण मंडळं आहेत. हं, असावेत, पण जर CBSE आणि ICSE या पॅटर्नच्या अभ्यासक्रमाच्या मानाने आपल्या महाराष्ट्रातील SSC अन HSC हे बोर्ड पॅटर्न्स खुपच कमकुवत आहेत. CBSE किंवा ICSE पॅटर्न शिकणारा ७वी इयत्तेतील विद्यार्थी जर आपल्या महाराष्ट्राच्या बोर्ड पॅटर्ननुसार ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार शिकणार्‍या १०वी तील विद्यार्थ्याची बरोबरी करीत असेल, तर यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी काय असू शकते? आपली संस्कृती, संस्कार, इतिहास याशिवाय विद्यार्थ्याला जगासोबतही नेहमी अपडेट राहता यावे, यासाठी आपल्या शिक्षण-पद्धतीत काहीच तरतुदी नाहियेत.

पाल्य ५ वर्षांचा झाला ली नंतर लगेच केजी-बिजी असे आज-काल काही सर्रास चालणारे प्रकार दिसतात. यांची काही गरज आहे का? जर शिक्षण-पद्धतीत योग्य सुधारणा केल्या गेल्या, तर का एखादा विद्यार्थी १०वी मध्ये असतांनाच मराठीशिवाय, हिंदी आणि इंग्रजी व्यवस्थित बोलू शकणार?

आपले कित्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतात, पण त्यांचं (त्यातील बहुतेक जणांचं) ज्ञान हे कवडी-मोल असतं, कारण त्यांना ते जे शिकलेत त्याचा प्रॅक्टिकली नेमका काय उपयोग होतो आणि त्यात काय बदल केले की काय होते, या गोष्टी आधी कधीही न अनुभवल्यामुळे ते जरी गुणवंत विद्यार्थी असले तरी बिन-कामाचे असू शकतात. हम्म, त्यातील किंचित विद्यार्थी/विद्यार्थीनी, कोणतीही गोष्ट मान्य करण्या-अगोदर स्वतः प्रॅक्टिकली करून पाहण्यात तरबेज असतातही… पण जर अभ्यासक्रमातच काही हलके-फुलके बदल केले तर नक्कीच चांगले विद्यार्थी घडू शकतील. प्रत्येक नवखा कन्सेप्ट विद्यार्थ्याला अगदी व्यवस्थित कसा समजेल, या गोष्टीचा प्रत्येक शिक्षकाने व्यवस्थित विचार केला, त्या कन्सेप्टला अ आ इ ई… सारखे घोकण्यापेक्षा सर्वात पहिले त्याचा ओव्हरव्ह्यू (सारांश) सांगून नंतर वन बाय वन गोष्टी समजावून सांगितल्या, त्या कन्सेप्टचा नेमका उपयोग काय? या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या गेल्या तर निश्चितच विद्यार्थ्याला त्या विषयाबद्दल आवड निर्माण होईल. नेहमीच कुठेही स्पर्धा घेण्यापेक्षा, ती गोष्ट अगदी मन लावून केली तर त्यातून किती उकली (अजुन वेगवेगळ्या नवख्या गोष्टी) निघू शकतात याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले, तर….

गृहपाठ, वर्गपाठ, असाईनमेण्ट्स इत्यादींमधून वेळ मिळेल तेव्हाच कुठे विद्यार्थी शांत चित्ताने मन लावून अभ्यास करू शकेल ना? त्यापेक्षा नेहमी विद्यार्थ्याला आनंदी ठेवेल, असे काही नवखे प्रयोग आज करण्याची गरज भासते आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता, असे स्पष्ट होते की, विद्यार्थ्यांना घरच्यांचा नाहक मानसिक दबाव, जगातील वाढत्या स्पर्धांमध्ये आपण मागेच राहून जाऊ या भितीने ते गळून पडतात, आणि अशा परिस्थितीत त्यांना समजून घेणे तर दूरच, त्यांच्यावर अजून दबाव वाढविला जातो. जापान, अमेरिका, चीन तसेच अनेक युरोपिय राष्ट्रांमधील विद्यार्थी एकाच वर्गात ३ ते ४ वेळा अयशस्वी होईनही जोमाने तयारी करतात, शाळेतील पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक तसेच स्वतःच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांनी मिळवलेले ज्ञान उतरवण्याचा प्रयत्न करतात. हम्म, त्यांना घरच्यांचा, समाजातील ज्येष्ठ मंडळींचा हातभार असतो अशावेळी… जर आपणही विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांना पूर्ण करणारा बनवल्यापेक्षा त्याची स्वप्ने घडविण्यात हातभार लावला, त्याच्या सुपिक डोक्यातील नव-नविन कल्पनांना वाव दिला तर ते विद्यार्थी पुढे चालून नक्कीच काहीतरी कौतुकास्पद कामे करून आपले स्टेटस उंचावण्यास मदत करतील. कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवण्यापेक्षा त्यांना समजेल अशा भाषेत त्या गोष्टीचे चांगले, वाईट परिणाम सांगितले तर त्यांच्या ज्ञानात भर तर पडेलच आणि त्यांना त्या गोष्टीची पुर्वकल्पनाही राहिल, एखाद्यावेळी जर ते भरकटले तर… हो ना?

मला मात्र एक गोष्ट मुळीच पटत नाही, “ते करू नको” हीच ती गोष्ट! तुम्हाला जर कोणी सांगितले की, येथे क्लिक करू नका, तर तुम्ही काय कराल…? जर या गोष्टीचा वापर करून कोणी शिक्षक, पालक विद्यार्थ्याला एखादी अतिशय महत्वाची गोष्ट समजावून सांगत असेल, आणि ती गोष्ट केली तर काय दुष्परिणाम होतील हे न सांगता… तर मात्र त्या विद्यार्थ्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून कोणीच थांबवू नाही शकत!

विचार करा, यासंबंधी तुमची काय मते आहेत तेही सांगा…

धन्यवाद!

संबंधित लेखन

 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • जागे व्हा…..!!
  माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
 • शोध जीवनाचा…

  कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती झाली. रसायनांच्या, वायुंच्या वेगवेगळ्या अभिक्र…

 • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
  सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
 • १४ एप्रिल ची मिरवणूक
  येत्या १४ अप्रीलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येणार आहे. दरवर्षी येणारी ही बाबासाहेबांची ज…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. मस्त जमला आहे रे लेख, प्रत्येकाच्या मनातच आजकाल शिक्षणपध्दतीबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत! खरं विद्यार्थी ज्ञानार्थी आहे की परीक्षार्थी ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

 2. vichar changle ahet sadhyachya paristhitila pahun…pan SSC/HSC wale toppers pan aaj jagachya kana kopryat ahet…
  SSC/HSC updation karayla have nakkich…pan neglcet karun nahi chalanar…i mean tyachye mahatva kami karun nahi chalnar..DEMAND FOR THE UPDATION instead of replace with other boards…

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME