वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मराठी भाषा – शुद्धलेखन

० प्रतिक्रिया

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. वि + आ + (कृ(->करण)) = व्याकरण. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. आपण केलेले लिखाण हे जर भाषेच्या व्याकरणाला आणि शुध्दलेखनाच्या नियमांना अनुसरुन असेल तर त्यामध्ये असलेला भाव आणि मतितार्थ वाचकांना अधिक भावतो आणि चटकन लक्षात येतो.

Marathi [Shravanbelagola]मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी महामंडळाकडून दूर करण्यात आल्या . अ. भा. मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले. हि नियमावली वाचण्याकरता इथे टिचकी मारा.

परंतु लेखन करताना प्रत्येक वेळी आपल्याला हे नियम तोंडपाठ असतीलच असे नाही. किंवा प्रत्येकवेळी ही नियमावली वाचुन लेखन करणे सहज शक्य होईल असेही नाही. त्यामुळे लेखन करताना इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध असलेली डिक्सनरी जर उपलब्ध झाली तर? म्हणजे लेखन करतानाच चुकीचे शब्द लाल अक्षरामध्ये दिसतील. त्या शब्दांवर उजवी टिचकी मारुन योग्य शब्द निवडता येईल.

आपण जर फायरफॉक्स नामक ब्राऊजर वापरत असाल तर अशी सुविधा उपलब्ध आहे. त्याकरता आपल्याला फायरफॉक्स चे प्लगईन वापरावे लागेल. हे प्लगईन / एक्स्टेंशन इथे टिचकी मारुन आपल्या संगणकावर उतरवुन घेता येईल.

हे प्लगईन / एक्स्टेंशन ब्राऊजरला जोडुन फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर माऊसची उजवी टिचकी मारुन योग्य शब्द निवडता येईल. उजवी टिचकी मारुन “चेक स्पेलिंग” च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर टिचकी मारली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात “ऍड टू डिक्शनरी” हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.

सौजन्य आणि अधीक माहीती मराठी विकीपीडीया.

संबंधित लेखन

PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME