वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

शोध जीवनाचा…

११ प्रतिक्रिया

शोध जीवनाचा…

कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती झाली. रसायनांच्या, वायुंच्या वेगवेगळ्या अभिक्रिया घडत जाऊन प्रतिकूल परिस्थितीत जगणार्‍या एकपेशीय सुक्ष्मजीवांची निर्मीती झाली, त्यातील काहींनी अशा कठोर परिस्थितीत (एनोरोबिक वातावरणात) पृथ्वीवर जीवनाची सुरूवात केली. कालांतराने हळूहळू बहुपेशीय जीवांची उत्पत्ती होऊन पृथ्वीवर जीवनाची उत्क्रांती झाली, त्यात जीवांच्या अनेक जाती निर्माण झाल्या. चला, आपल्या पृथ्वीवरील जीवनाच्या सुरूवातीपासूनचा हा अतिशय सुक्ष्म असा सारांश मी इथे मांडला. बहुतेक जणांना शालेय जीवनापासून हेच ज्ञात असावे. आपणच तयार केलेले नियम, समजुती, बंधने, दिशा, बांधिलक्या, सुत्रे इत्यादींच्या पेक्षा काही वेगळेही असू शकते, याचा विचार करणारे अतिशय विरळ असे लोक आपल्या पृथ्वीवर असतील. ही गोष्ट अशी समजून सांगितली आहे ना, मग त्यानुसारच आपण पुढे विचार करू लागतो, त्यामुळे कित्येक न सुटलेले प्रश्न सुटतात, कित्येक नविन तयार होतात, पण आपण ज्या गोष्टीच्या (संकल्पनेच्या) आधारे हे सर्व निष्कर्ष काढतो, तीच जर चुकीची असेल तर….?

विज्ञानात शिकल्याप्रमाणे सर्वांना ज्ञात असेल की पृथ्वीवरील जीवनास ऑक्सिजन या वायूची अत्यंत गरज असते, पाण्याचीही अत्यंत गरज असते, या दोन्ही गोष्टींशिवाय पृथ्वीवरील जीव जगूच शकणार नाहीत. हे सत्य आहे. पण यामुळे आपली (माझी नाही!) अशी समजूत झालेली आहे की, आतापर्यंत जे काही (अवकाशाशी संबंधित, म्हणजेच ग्रह, उल्का इत्यादी.) नविन शोध लागलेत, अवकाश शास्त्राशी संबंधित शाखांशी जोडलेल्या शाखांमधील लोक (शास्त्रज्ञ) तेथे सर्वात पहिले काय काय उपलब्ध आहे, याची कसून तपासणी करतांना दिसतात. या तपासणीतून हाती लागलेल्या महत्वपूर्ण निष्कर्षांच्या आधारे ते पुढील बाबी तपासण्यात व्यग्र होतात. त्यांचा सर्वात पहिला आवडीचा विषय असतो तो म्हणजे अशा ठिकाणी पाणी शोधणं, तिथल्या वातावरणाची तपासणी करणं, वातावरणात कोणत्या प्रकारचे वायू आहेत, त्यांचा शोध घेणं, आणि सर्वांत महत्वाची गोष्ट, ती म्हणजे त्या ठिकाणी जीवनाची सुरूवात होऊ शकते का? वेगवेगळ्या बाबी तपासून झाल्यानंतर शेवटी त्यांचे एवढ्यावरच खटकते की तिथे पाणी व ऑक्सिजन या पृथ्वीवरील जीवनास अत्यावश्यक गोष्टी नसल्याने त्या अमुक ठिकाणी जीवन सुरू होऊ शकणार नाही. (निश्चितच उपलब्ध असलेले नियम, समजुती यांच्या आधारे, म्हणजेच, पृथ्वीवरील जीवनाच्या सुरूवातीची तुलना करून..!)

हे तर सगळ्यांनाच माहित असेल की, पृथ्वी सुरूवातीच्या काळात फक्त एक आग ओकणारा गोळा होता, ज्याला स्वतःचे वातावरण, गुरूत्वाकर्षण काहीही नव्हते. त्यावेळी पृथ्वीवर शेकडो सक्रिय ज्वालामुखी होते, त्यांच्या विस्फोटांनी पृथ्वी सतत हादरत राहत असे. ज्वालामुखींच्या उद्रेकाच्या वेळी उत्स्फुर्तपणे बाहेर पडलेले काही वायू उदा. मिथेन, यांनी पृथ्वीचे सुरूवातीच्या काळात वातावरण निर्मीती करण्यास मदत केली. जीवनास आवश्यक असणारे हायड्रोकार्बन्स, ऑक्सिजन व इतर मुलद्रव्ये त्याकाळी पृथ्वीवर अजुन तयार झालेले नव्हते. अशा परिस्थितीत या लेखाच्या सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे मिथेनवर जगणारे काही सुक्ष्मजीव तयार झाले. ज्यांच्यामुळे आज आपण इथे पृथ्वीवर आहोत. विना-पाण्याचे जीवन तयार होऊ शकते, असे आपण आतापर्यंत शिकलेलोच नाही आहोत, त्यामुळे ०.५ टक्के एवढे पाणी असलेल्या मिथेनच्या किंवा अतिशय थंड असणार्‍या कठोर झालेल्या बर्फामध्ये जीवन असू शकते, याचा आपण सहजा-सहजी स्विकार करणार नाहीत, पण ते एक सत्य आहे.

सन १६५५ मध्ये डच खगोल-शास्त्रज्ञ ख्रिस्तीयन हायजीन्स यांनी शोध लावलेला आतापर्यंतचा आपल्या सुर्यमालेतील शनी ग्रहाचा सर्वांत मोठा नैसर्गिक उपग्रह, “टायटन”, २००४ मध्ये सुरू झालेल्या कसिनी-हायजीन्स मोहिमेअंतर्गत या उपग्रहाची पाहणी करण्यात आली. या उपग्रहाला स्वतःचे असे वातावरण तसेच हवामान आहे, निश्चित कालाने तिथे हवामानाचा प्रभाव दिसून येतो. टाय़टनवर मिथेन व इथेन यांचे वातावरणात नेहमी ढग असतात. कसिनी मोहिमेअंतर्गत मिळालेल्या निकषांच्या आधारे असे दावे करण्यात आले आहेत की तेथील सध्याची परिस्थिती ही पृथ्वीच्या सुरूवातीच्या काळातील घटनांशी अतिशय मिळती-जुळती अशी आहे, शिवाय तेथे हायड्रोकार्बन्सचेही अस्तित्व असल्याचे नमूद करण्यात आले. पण नंतर यावरील पुढील संशोधन मंदावल्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत. कारण एकच असू शकते, ते म्हणजे पाणी व ऑक्सिजन हे तिथे अजुनही उपलब्ध नाहीत, आपले संशोधक फक्त आपल्याला पोषक असतील, अशाच जागांचा अवकाशात शोध घेत आहेत, असे यावरून स्पष्ट होते.

या लेखामागचा माझा सांगण्याचा उद्देश्य एकच आहे तो म्हणजे जे उपलब्ध आहे, त्याच्या आधारेच सर्व निष्कर्ष काढून मोकळे होणे हे मला अ पटण्यासारखे आहे, त्या गोष्टीमध्ये अजुनही काही चमत्कारिक गोष्टी असू शकतात, ज्या आपल्याला माहित असलेल्या संकल्पनांमध्ये एकतर बसत नाहीत किंवा त्यांच्या मर्यादेच्या खूप बाहेरच्या असतात. मान्य आहे, त्यांचे विश्लेषण करण्याइतके आपण अजुन विकसित नाही आहोत, पण त्यांवर परंपरागत तत्वे, नियम, प्रथा सर्व एकीकडे ठेऊन जरा वेगळा विचार करून बघितला, तर निश्चितच काही महत्वाचे निष्कर्ष हाती लागू शकतील, जे सध्याच्या संशोधनांमधून तरी अशक्य असे वाटतात. शेरलॉक होल्म्सच्या रहस्यकथांमध्येही त्याचा असाच स्वभाव लेखकाने दाखवलेला आढळतो. असो. मला नेमके काय म्हणायचे होते, ते जर आपल्याला कळले तर माझ्या एवढ्या लिखानाचे सार्थक झाले, असे मी समजेन! (मुळात या लेखाला मला “संकल्पना बदलण्याची गरज” असे शिर्षक द्यायला हवे होते मी..! 😛 )

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. जालन्दर बनकर म्हणतात:

  तुम्ही खरोखरच वेगळा विचार मान्डला आहे.चाकोरीबाहेर जावूनच काही नवे हाताला लागते.आपल्याला जे हवामान लागते ते हवामान दुस-या ग्रहावर नाहि. पण त्या ग्रहावरील प्राण्याना किवा जिवानुना वेगळे हवामान लागत असेल का.मी तर असेसुध्दा वाचले आहे की अतिउश्ण हवामानातही काही जिवानु जगु शकतात.दुसरे काही प्रश्न- अवकाश अनन्त आहे म्हणजे नेमके काय?नुसती पोकळी.पोकळीला काही आदीअन्त नाही काय?या पोकळीचा विचार करताना सुध्दा डोक्याचा भुगा होतो.एवड्या विशाल अवकाशात आपल्या सारखे हवामान नसनारच हे मनाला पटते काय?

  • जालंदर जी,

   आपल्याला माझा या लेखामागचा हेतू पटला, हे नेमके बरे झाले.
   इतर ठिकाणी (परग्रहांवर किंवा अवकाशात अन्यत्र कोठेही!) जीवाणू अत्यंत उष्ण ठिकाणी किंवा अत्यंत शीत (थंड) ठिकाणी किंवा इतर परिस्थितीत (जिला आपण नरकासारखे धरून चालू) अशा कोणत्याही ठिकाणी जीवनाची उत्पत्ती होऊ शकते, शक्यतो होत असेलही! हे मान्य करण्यासाठी फक्त आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे, नाहीतर आपल्याच बंधनांच्या आधारे हे सर्व अशक्य आहे.

   आता आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाला मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे, उत्तराबद्दल आपले दोघांचे किंवा इतर वाचकांचे, जाणकारांचे दुमत असू शकते, पण त्यावर जर चर्चा रंगली, तर अनेक प्रश्न निकाली लागू शकतीलः

   प्रश्नः अवकाश अनंत आहे म्हणजे नेमके काय? पोकळी आहे, तर तीला अंत आहे का?
   उत्तरः आपल्या इतिहासातील आजवर झालेल्या संशोधनांतून, प्रयोगांतून, आणि सध्या उपलब्ध असलेल्या सर्व शास्त्रे, तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींचा पुर्ण (पुरेपूर) लाभ (उपभोग?) घेऊन आपल्या जाणकारांनी (संशोधक हा शब्द मला इथे योग्य वातत नव्हता!), असा निष्कर्ष काढला आहे, की अवकाश हे अवाढव्य नसून अनंत आहे, म्हणजे आपण कितीही शक्तीशाली जरी झालो तरी त्याची सीमा आपण अनुभवू (पाहू) शकणार नाही. अवकाशाची सीमा ठरवतांना आजवरची सर्व गणिती सुत्रे निष्फळ ठरली आहेत. आपली जिथपर्यंत नजर जाईल, डावीकडे, उजवीकडे, वर, खाली, त्रिमितीय, चतुर्मितिय यांचा आधार घेऊनही अवकाशाची सीमा आपण ठरवू शकलेलो नाहीत. त्यामुळे सध्या तरी अवकाश हे अनंत (म्हणजे ज्याला सीमाच नाही असे) असेल, अशी संकल्पना रूढ आहे. बरं, आता आपण हे सर्व डावलून जरा वेगळा विचार केला, आजवरची सर्व संशोधने, गणितीय सुत्रे यांना बाजुला ठेऊन अवकाशाला कुठेतरी सीमा असेल आपण मानू. समजा अवकाशाला जर निश्चित अशी सीमा असेल तर ते आपल्या पृथ्वीप्रमाणे किंवा सुर्यमालेप्रमाणे असेल, ज्यात सर्व अब्जावधी आकाशगंगा सामावलेल्या आहेत. पण आता इथे अतिशय मोठी पंचाईत होते, ती म्हणजे जर अवकाशाला सीमा आहे, तर ते ही कशामध्ये तरी सामावलेले आहे, त्याच्या सीमेपलिकडे काय असेल, का त्याच्या बाजुलासुद्धा अशी अनेक अवकाशे असतील, अर्थात, आपल्या मेंदूचा पार भुगा होईल, पण मग या सर्व अवकाशांना सामावणारी कोणती गोष्ट असेल, तीची सुद्धा काही सीमा असेल का? असली तर तीच्या सीमेपलिकडे काय असेल, ती कशामध्ये असेल….. जाऊ द्यात, जालन्दर जी, माझ्याही डोक्याचा याआधीच यो गोष्टीचा विचार करू करू भेजा फ्राय झालेला आहे…! 😛 (ह्म्म, एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे अवकाश ही एक पोकळी आहे, ज्यामध्ये सर्व तारे, ग्रह, आणि इतर अंतराळातील पदार्थ, वायू इत्यादी नैसर्गिक गोष्टी, ज्यातील अजुनही अनाकलनिय आहेत, त्या सर्व निसर्गाच्या वैश्विक नियमाप्रमाणे आपले काम चालू ठेवतात.)

   😉

 2. जालन्दर बनकर म्हणतात:

  धन्यवाद विशाल,आपली क्षमा मागुन परत एक प्रश्न आहेच.मा.खगोल सन्शोधक जयन्त नारळीकर यान्च्या एका लघुकथेत,एक जन अवकाशात जातो व परत आल्यवर त्याचे वय तेवडेच असते.मग तो एका मुलीबरोबर लग्न करायचे म्हणतो.ती मुलगी त्याच्या मित्राचीच असते.शेवटी त्यानी ज्या सुत्राच्या आधारे ही कथा लिहिली आहे ते सुत्र दिले आहे.अवकाशात गेल्यानन्तर वेळ ही बाब शुन्य होते.सुत्र म्हणुन ते बरोबर असेल पण प्रत्यक्षात हे खरे होउ शकते काय?तसा माझा या विशयावर अभ्यास नाही.परन्तु नेटवर,वर्तमानपत्रात व शास्त्रिय पुस्तकामध्ये बरेच लिखान वाचतो व असे काही बाळ्बोध प्रश्न पडतात.मी काही या मोटया सन्शोधकावर विश्वास नाही म्हणून नाही, तर एक कुतूहल म्हणूनच विचारतो.(मराटी लिहीताना अनुस्वार कसा द्यावा हे माहित नाही.तसेच काही अक्षरे लिहिता येत नाहीत, क्षमस्व.)

  • जालंदर जी,

   अवकाशात जाणे व परत येणे यात भरपूर वेळ खर्ची होतो, किमान काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. पण एक गोष्ट ध्यानात ठेवावी ती म्हणजे आपण हे सर्व ठरवतो ते पृथ्वीवरील वार रेषेच्या (date line) आधारे… पृथ्वीच्या बाहेरील वातावरणात, म्हणजेच अवकाशात (पृथ्वी ही सुद्धा तशी अवकाशाचाच एक अंश आहे, पण आपण तीला अवकाशापासून वेगळे मानतो, का ते मलाही अजुन माहित नाही!) पृथ्वीवरील वेळेचा कसलाही प्रभाव नसतो. शिवाय आत्ताच काही वर्षांपूर्वी डिस्कवरी, कोलंबिया यानांनी पृथ्वीवरील वेळेप्रमाणे अंतराळात प्रत्येकी किमान १ वर्ष तरी वास्तव्य (प्रवास) केला. पण अंतराळात त्यातील लोकांवर या पृथ्वीच्या वेळेचा कसलाही प्रभाव दिसला नाही, त्यांच्या वयोमानातही फारसा बदल जाणवला नाही. याचा अर्थ, ही गोष्ट एका अर्थी मानू शकतो की अंतराळात गेल्याने वयोमानात फारसे बदल होत नाहीत, पण ह्म्म यामागचे शास्त्रिय कारणे, संशोधने मलाही अजुन ज्ञात नाहीत. आवश्यक ती माहिती मिळाल्यानंतर मी ती इथे नक्की नमूद करेन!


   मराठीत लिहिण्यासाठी या साईटच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील “Type in” या मधील मराठी निवडून आपण फोनेटिक (म्हणजे रोमन अक्षरे दाबली की ती जशीच्या तशी मराठीत उमटतात) टंकलेखन करू शकाल, आणि इंग्रजी व मराठी यांमध्ये कधीही टॉगल (अदलाबदली) करण्यासाठी F12 ही फंक्शन की दाबावी.

   अनुस्वार देण्यासाठी (बराहा, गमभन, या साईटवरील मराठी लिहिण्याची उपलब्ध पद्धत या सर्वांमध्ये) आपणास SHIFT आणि M (म्हणजेच कॅपीटल M) या दोन्ही कळा एकाच वेळी दाबून धराव्या लागतात.

   उदा.
   जालंदर – jalaMdara
   आनंद – aanaMda

   अजुन काही अवघड शब्द, आणि याविषयीची सविस्तर चर्चा तसेच मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेला यासंबंधित लेखाचा दुवा आपणास बराहा वापरा आणि मराठीत लिहा या “मराठी मंडळी चर्चासत्र” वरील चर्चेत बघावयास मिळेल.

 3. विशाल महोदय, लेख अतिषय सुंदर झाला आहे.आपण वैश्विक कोलमड,सांत कि अनंत विश्व,विश्वाची बिंदूवत अवस्था,स्पंदनशील तत्त्व,आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद- चतुर्मित ’अवकाश व काल’ त्याअनुषंगाने -वस्तुमानावर वेगाचा परीणाम,दृग्गोचरतेवर वेगाचा परीणाम,आणि वेगाचा कालावर परीणाम ,याअंतर्गत जुळ्याचा प्रवास-( श्री.जालंदर यांचा प्रश्न) अशा अनेक मुद्द्याना या एका परीच्छेदात आपण स्पर्श केला आहे. हा विषय खगोल भौतिकी,सूक्ष्म आणि कण भौतिकी, उष्मागतिकी तत्त्वज्ञान या सार्‍यांशि निगडित आहे.या क्षेत्रातील विद्वानाना सुद्धा ज्या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळाली नाहीत त्याची चर्चा आपण येथे करत आहोत. असो.मि ही या क्षेत्रातील तज्ञ नाही.

  • आपल्या अमुल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार पुरूषोत्तम काका..

   जरी खगोल भौतिकी, खगोलिय जीवशास्त्र, खगोलिय रसायनशास्त्र, मायक्रो फिजिक्स अन् थर्मोडायनामिक्स (उष्णता व यांत्रिक काम यांच्या परस्परसंबंधीचे शास्त्र) या सर्व खर्‍या अन् काही आभासी शास्त्रांमधील विद्वान लोक त्यांच्या परीने संशोधन करीत आहेत. त्यांच्याच संशोधनांच्या मदतीने मी माझे यासंबंधीचे सर्व लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. असो..

   अन् नकळत या अशा लेखांमुळे माझी या विषयांमध्ये असलेली रूची अजुन वाढते आणि वरचढ (ज्ञानाने) लोकांच्या प्रतिक्रियांमुळे बरेच काही (अन-छुए?) शिकायला मिळते.

   काही प्रश्न अतिशय सोपे असतात.. ज्यासाठी कितीही डोके आपटले तरी अंधुकसा मार्गही दिसत नाही त्यांना सोडवण्यासाठी.. पण अशी काही विलक्षण माणसे आपल्यामध्ये उपस्थित असू शकतात, जे असे प्रश्न (शेरलॉक होल्म्ससारखी वेगळीच शक्कल लढवून) चुटकीसरशी सोडवू शकतात.

   उदा. अपोलो चांद्रयान मोहिमेच्या आधी यानाचे बाहेरील संरक्षक आवरण (ऍल्युमिनिअम प्ले्ट्सपासून बनवलेले – बहुदा ३-५ इंची जाड असावे), यान पृथ्वीचे बाह्यावरण सोडत असतांना व अवकाशातून परत येतांना असलेल्या सुमारे ताशी १५००० ते १८००० मैल गतीमुळे वातावरणातील बारीकात बारीक कणांशी होणार्‍या घर्षणामुळे अफाट उष्मा (सुमारे १६०० अंश केल्विन) उत्पन्न होत असे, व त्यापैकी काही कण या अतिजलद घर्षणामुळे यानाचे संरक्षक कवच तोडून आत येऊ शकत होते. या कारणांमुळे यानात उपस्थित असणार्‍या अंतराळ वीरांच्या जीवाला धोका असू शकत होता. त्यासाठी उपाय शोधणे सुरू झाले. नासाने शर्थीचे प्रयत्न चालवले, अमाप पैसा खर्च केला, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेवटी एका सामान्य माणसाने (मला नाव माहित नाही) संरक्षक कवचामध्ये एकच आवरण वापरण्यापेक्षा (मग ते कमी जाड असले तर लगेच नष्ट होऊ शकेल व जास्त जाड असले तर यानाचे वजन अवाढव्य रीतीने वाढेल) दोन आवरणे वापरावीत असे सुचवले. दोन्ही आवरणांमध्ये काही स्थिर अशी मोकळी जागा असावी (निर्वात असावी की नसावी, याबद्दल मला माहिती नाही) जेणेकरून एखादा कण किंवा वस्तू अतिजलद गतीने घर्षण होऊन यानाचे आवरण तोडून आत येत असेल तर पहिले आवरण ते नष्ट करून आतमध्ये येऊ शकेल पण मधली मोकळी जागा व पहिल्या आवरणासोबत झालेल्या धडकेमुळे त्याचे त्वरण बरेचसे कमी झालेले असेल. दुसर्‍या आवरण थरापर्यंत जाईपर्यंत त्यातील गतिज ऊर्जा बरीचशी कमी झालेली असेल, अर्थात आतील संरक्षक आवरण थराचे रक्षण होईल. ही गोष्ट जेव्हा नासाच्या संशोधकांनी प्रयोगांनी तपासून बघितली तेव्हा त्यांना खुप अपमान झाला असावा.

   फारशी माहिती नसतांनाही माणसाचे डोके एखादेवेळी बरेच जोरात चालते व कित्येक काळापासून डोक्याला किड लावून बसलेले प्रश्न माणूस सहजासहजी सोडवतो. (मानसशास्त्रातील तज्ञ लोक याबद्दल जास्त बोलू शकतील..) यावरून सामान्य मणुष्यही बरेच काही करू शकतो, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या माझ्या लेखांचाही असाच काही उपयोग होईल, अशी आशा आहे. (या प्रतिक्रियेत मी काय लिहिले आहे, वाचून बघितलं, मला काहीच कळालं नाही माझंच लिहिलेलं.. इतरांना काय कळणार!!!)

   आणि हो अतिउष्ण तापमान वाढल्याने त्यापासून यानाचे संरक्षण करण्यासाठी लाल लोकांनी (रशियन्स!) यानाच्या बाहेरून कोकच्या टाईल्स लावल्या होत्या, नंतर जास्त इफिशिअन्सी साठी आणखी संशोधन होऊन नंतर सिलिकायुक्त टाईल्स लावल्या जाऊ लागल्या व अजुनही तीच पद्धत वापरली जाते. (या गोष्टीचा या प्रतिक्रियेत काहीही संबंध नसला तरी मी का नमूद केली काय माहित..!) 😉

   • विशाल महोदय, या विषयाचा आवाकाच प्रचंड आहे.यात काय नाही असं काही नाहीच.सगळिच्या सगळी शास्त्रं यात येतात.अगदी अध्यात्म सुद्धा!यादृष्टीकोनातून अद्वैतवेदांत विज्ञानाशी हातात हात घालून चाललं आहे असं जाणवतं.मात्र विज्ञान वेदांताला जवळ येऊ देत नाही अशी प्रीस्थिती आहे.अर्थात हे सगळेच अनाकलनिय आहे.एन.सी.पंडा या शास्त्रज्ञाने माया इन फिजिक्स असं एक पुस्तक लिहिलंय ते मी २००१ सालानंतर केव्हातरी पुण्यात असताना वाचलं होतं.त्यात त्यानी सूक्ष्म भौतिकीपासून ते मानसशास्त्रापर्यंत अशा अनेकांचा परामर्ष घेतला आहे.कदाचित आपण ते वाचले असावे.दुसरे एक पुस्तक डान्सिंग युनिवर्स हे पुस्त्क मी फक्त चाळ्ले पण संपूर्ण वाचून झाले नाही.असो
    आपला या विषयाचा अभ्यास चांगला आहे.अनेक वाचलेल्या गोष्टी पुनः त्याला उजाळा मिळ्तोय त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो.

 4. जालन्दर बनकर म्हणतात:

  विशाल,प्रतिक्रियांच्या अनुशंगाने तुमच्यात आणि पुरूशोत्तम यांच्यात झालेले लिखाण वाचले.त्यांनी दिलेल्या लिंक वरिल लेख सुध्दा वाचला.अतिशय क्लिश्ट विशयावरिल लिखाण दोघांनिही खुप सोप्या पध्दतिने लिहीले.अशाच एखाद्या नविन संकल्पनेवर लिखाणाची अपेक्शा करित आहे.धन्यवाद. दोघांनाही.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME