वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

श्रीमद्भगवद्गीता व आहार

१ प्रतिक्रिया

आजच्या काळात आपल्याला खाण्यासाठी कुठे काय मिळते,कुठले ठिकाण चांगले आहे त्याची इत्यंभूत माहिती असते पण काय खायला पाहिजे,शरीरासाठी काय चांगले आहे त्या बाबत अनभिज्ञ असतो. शरीरापेक्षा हि मनावर या खाण्याचा खूप परिणाम होत असतो. आणि ऋषीमुनी/आपले पूर्वज यांनी या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.परंतु आपण या कडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. “You become what you eat”. हेच हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने सांगितले आहेच.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा।

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा।
[६ वा अध्याय १७ श्लोक]
[१७ वा अध्याय ७,८,९ श्लोक]

आयु: सत्त्वबलारोग्यसुख प्रीति विवर्धना:।
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या आहारा: सात्त्विकप्रिया:।
कट्वम्ललवणात्युष्ण तीक्ष्णरूक्ष विदाहिन:।
आहारा राजसस्येष्टा दु:खशोका भय प्रदा:।
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्। 1

राजस, तमास, सात्विक असे आहाराचे प्रकार या मध्ये सागितले आहेत. त्या त्या पद्धतीच्या आहारानुसार आपण घडत असतो. आणि हि काही एका चुटकीसरशी होणारी गोष्ट नाही. महत्वाचे काय आहे की कोणता आहार आपल्या साठी आवश्यक आहे. या आणि अश्या कितीतरी गोष्टी ५००० वर्षांपूर्वी सांगितल्या गेल्या आहेत .परंतु अध्यात्म किंवा गीता वगैरे गोष्टी retire झाल्यानंतर करायच्या अशी आपली पक्की समजूत असते आणि आपण त्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतो. महत्वाचे म्हणजे गीता हा कोणताहि प्रकारचा धार्मिक ग्रंथ नसून तो एक जीवन ग्रंथ आहे.

संबंधित लेखन

PG

सचिन

कोन्निचीवा ..! मित्रांनो हे आहे जपानी भाषेमधील “राम राम “:) मी सचिन पाटीलबा गाढे.
जपानी भाषा शिकलो आहे. थोडी कामामध्ये देखील वापरतो. सॉफ्टवेअर कंपनी मध्ये QA इंजीनीयर चे काम करतो. पपु. पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय/युवा केंद्रामध्ये मी नियमित जातो. देवावर माझी नितांत डोळस श्रद्धा आहे. आता पुरे करतो .. नाही तरी रामदास स्वामींनी म्हणलेच आहे. “अपुली स्तुती करी तो एक मुर्ख” 🙂

  1. प्रस्तुत गोष्ट सत्य आहे. मात्र “आहार” या शब्दाचा अर्थ मुखद्वारे ग्रहण करायचे खाद्यपदार्थ इतका सीमित नाही. श्रवण केलेल्या, बघितलेल्या, चव घेतलेल्या प्रत्येक विषयाचा समावेश “आहारा” च्या व्याखेत होतो.
    तसेच “मन: आणि त्याचा निग्रह” या पुस्तकात स्वामी बुधानंदानी उपनिषदातील एका गोष्टीद्वारे सांगितले आहे की मन-व त्यावरील प्रभाव हा प्रामुख्याने आहारामुळे होतो व पाणी हे प्राणाच्या उज्जीवानास कारणीभूत आहे.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME