वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”

७ प्रतिक्रिया

(संदीपच्या या कवितेला सलीलदादांनी अफलातून चाल दिलेली आहे. शनिवारी १३ तारखेला झालेल्या ’गाणी मनातली’ या कार्यक्रमात त्यांनी ती म्हणून दाखवली. गीते एकदम झकास बनले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकले की त्यातील रंग अजूनच मनाला भिडतात. )

संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत "जा जा"

कवितेमागची मध्यवर्ती कल्पना –
“शंभर लोकांचा आपल्यावर जीव असतो. पण आपल्याला नेमकी एकशे एकावी व्यक्ती आवडते. आणि त्या व्यक्तीला मात्र दुसरेच कोणीतरी आवडत असते. मग आपला अहंकार दुखावला जातो कुठेतरी. अश्या दुखावलेल्या अंतःकरणाने केलेली ही कविता आहे. यात एक प्रकारचा ऍरोगन्स आहे. मात्र चाल देताना, कंपोझ करताना खुप मजा आली. यातील शब्दांचे प्लेसिंग छान जमले आहे. “

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…देठ पिकल्या फुलांना..
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

कवि – संदीप खरे
गायक व संगीतकार – डॉ. सलील कुलकर्णी

संबंधित लेखन

PG

विक्रांत देशमुख

मी एक चिमुकलं रानफुल…रंग,रूप,गंध नसलेलं… दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं… त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला… रुतुराज आज वनी आला’.

  1. मस्त कविता आहे ही!!! नेहमीप्रमाणेच. . . .BDW हे गीत कोणत्या अल्बम मध्ये आहे???

  2. Hey Vikrant,

    Dhanyavaad hi kavitaa share kelyaabaddal….

    Remember, UNDIR & VAGHOBAA joke!!!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME