वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

सप्तपदी

५ प्रतिक्रिया

सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. सप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवतार्‍याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.
– मराठी विकि वरुन

१) हे रमणी, संसाराची मधुर स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे साकार होत असताना,जीवनात काही खटकले तर सहनशीलतेची जोपासना कर.सर्वाना आनंदी ठेवण्याचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पाड.

२) हे सौभाग्यकांक्षिणी आज तुझ्या सौभाग्याची सुरवात आहे.काळाचा अल्लडपणा उद्या चालणार नाही.हे दुसरे पाऊल उचलताना एका वेगळ्या जबाबदारीची जाणीव तुझ्या मनात जन्म घेउदे.

३) हे गृहिणी हे तिसरे पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात ठेव,केवळ तू आणि तुझे पती म्हणजे सारा संसार असे समजू नकोस. व्यवहारी जीवनातही यशस्वी होईल असा आत्मविश्वास बाळग.

४) हे गृहलक्ष्मी सुखी संसारात मनसोक्त विहार करण्याची वेळ येईल तेंव्हा सासू,सासरे,दीर,नणंदा,जावा घरात असताना अनेक मोहाचे क्षण तुला आवरले पाहिजेत.संसाराची शोभा आहोरात्र टिकवली पाहिजे.

५) हे भाग्यलक्ष्मी,स्त्रीने स्वतः करिता कधीच काही मागितले नव्हते.पतीला देव समजून तोच आनंदाचा ठेवा मागून त्यात तिने आनंदाचा क्षण मानला पाहिजे.तुही त्याच स्त्रीत्वाच्या गुणाची जोपासना कर.

६) हे स्वामिनी,तुझे पती हे तुझे केवळ सहप्रवासी नह्वेतर सोबतीसुद्धा आहेत.तूला कानात हळूच सांगावेसे वाटते पुरुष फार लबाड असतात,तेंव्हा त्यांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांचे मन विचलित होऊ न देण्याचा काटेकोरपणे प्रयत्न कर.

७) हे मातृदेवते,तुझ्या स्त्रीत्वाची सांगता होण्याचा काळ आता जवळ आला आहे यावेळेस जीवनातील ७वे पाऊल उचलताना संसाराच्या वेलीवर उमलत असणारया कळीत सुगंध आणि सौंदर्य भरण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा.

संबंधित लेखन

 • उखाणे
  अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/ घटना सुचवण्यासाठी वापरल्…
 • गोंधळ
  विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा …
 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • व्हॅलेन्टाईन नावाचं भूत
  व्हॅलेन्टाईन नावाचं भूत
  लेखक: जयेश मेस्त्री

  “प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
  मातीमध्ये…

 • जोगवा – एक वास्तव दर्शन
  शहरीकरणाच्या थोड्याच दूर असणार्या वास्तवासाठी पहा, त्याला चव्हाट्यावर आणणाऱ्या धाडसी निर्मात्यांस…
PG

विक्रम घाटगे

आपण कधी कधी असे काहीतरी वाचतो जे मनाचा ठाव घेऊन जाते, विचार करावयाला लावते. स्वतःकडे, या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवण्यास भाग पाडते. असे काही मी वाचलेले आपल्यासारख्या वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावे म्हणून मी “जीवनमूल्य “ या ब्लॉगवर लिहितो. जय हिंद, जय महाराष्ट्र!

 1. Chaan zala aahe lekh tumacha! Tumache sarv lekh mi vachale aahet tumachya blog varati..Keep it up!

 2. खुप दिवस झाले मी नेट वर मराठि मधे टाईप केलेली सप्तपदी शोधत होते..पण आता तुमच्या या पेज मुळे भेटली.
  मनापासुन धन्यवाद

 3. लेख खुप सुन्दर् आहे. ‘माहित झाला’ धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME